आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< २०० होऊ शकला असता..>> ब्राव्होने नेटकी गोलंदाजी केली म्हणून नाहीं झाला . राणा ३५चेंडूत ७० कौतुकास्पद. मुंबईच्या गोलंदाजीची आतां खरी कसोटी !

सौ सुनार की एक धोनी लोहार की ..

संपला नाही धोन्या आज एवढेच दाखवून द्यायला खेळला बस्स..

पुढच्या आयपीएलला या पुण्याच्या संघापासून सावध राहा आता सर्वांनी

कोलकत्ता १५५/५ (१७ ओव्हर्स). ईडन गार्डन च्या टर्निंग विकेट वर हा स्कोअर बक्कळ झाला असं वाटतय. डिक्लेअर केली ईनिंग तरी चालेल.

"जीवाचं रान करीन, पण मालकाचं कर्ज फेडीन...."
...
...
....

खाल्ल्या मिठाला जागणारा
...
...
...
विराट कोहली Happy Happy

(व्हॉट्सअ‍ॅप झिंदाबाद)

Bangalorian Dravid coaching Delhi against Bangalore while Delhiite Kohli defends Bangalore against Delhi

१३९ हें कांहीं आरसीबीसाठी अव्हानात्मक लक्ष्य वाटत नाहीं. पण बघूं सामन्यात मधेच कांही तात्पुरया तरी सस्पेन्स निर्माण होतो का !

सहाच्या आसपास रन रेट आहे नि मॉरिस नि झहिर च्या १-१ ओव्हरस बाकी आहेत फक्त. शांतपणे खेळून मॅच घेता येईल सहज.

गेल, एबीडी, वॉटसन एका बाजूने अपयशी ठरताहेत तर हा विराट पठ्या एकटा दुसर्‍या बाजूने आरामात खेळून मॅच जिंकतो !! काय सातत्य व आत्मविश्वास ! [ ' विराट प्रेशर कूकर असता तर शिट्याच ऐकू आल्या असत्या', कुणीतरी समालोचकाने म्हटलं आज ! खरंच प्रेशरने दबून न जातां हा त्याचं वाफेचं इंजीनच बनवतो !! मानलं !! आरसीबी डिझर्वड टू बी इन टॉप फोर, इफ ओन्ली फॉर विराट !!

त्या दिवशीं आयपीएलच्या मॅचला 'अ‍ॅपल'चा टीम कूक आला होता व मैदानावर त्याचा छोटासा इंटरव्ह्यूही घेण्यात आला;
व्हॉट'स कूकींग ?

"व्हॉट'स कूकींग ?" - मार्केटप्लेस मार्केटप्लेस म्हणतात ती हीच! तशी एक दुसरी शक्यता आहे, की कुक साहेब स्वतःचा आयफोन ५०० र. मधे अनलॉक करून घ्यायला भारतात आले होते Wink

नाहीं तर विराटचं 'अ‍ॅप्लिकेशन' बघूनही थक्क झाले असण्याचीही शक्यता आहेच !! Wink

Lol

मुंबई त्यांच्या कर्माने बाहेर गेली. पुढच्या वर्षी बटलरला ठेवतील का ? मुंबईला बरेचदा एका सीझन नंतर प्लेयरला बाहेर काढायची घाई असते. फिंच, धवन हि बोलकी उदाहरणे. मुंबईअमधून बाहेर निघून इतर संघांची बलस्थाने झालेले बरेच खेळाडू आहेत - फिंच, ब्राव्हो, डे. स्मिथ, धवन, झहिर, कार्थिक, मॅक्स्वेल, जॉह्न्सन, सूर्य कुमार यादव.

दिल्ली त्यांच्या अति प्रयोगशिलते मूळे बाहेर गेली. एव्हढे experiments करताना शेवटच्या मॅच मधेही मॉरीस ला थोड वर पाठवावे असे वाटले नाहि. हा निव्वळ अडेलतट्टूपणा वाटतो. मुंबई नि दिल्ली दोन्ही संघांना opening problem होता नि दोन्ही बाहेर गेले हा निव्वळ योगायोग समजावा कि अजून काही ?

<< opening problem होता नि दोन्ही बाहेर गेले हा निव्वळ योगायोग समजावा कि अजून काही ? >> 'पॉवर प्ले'च्या ६ षटकाना अनन्यसाधारण महत्व आहे टी-२० मधे. त्यामुळे हा केवळ योगायोगच नसावा.

दिल्ली चे प्रयोगः मुळात प्रयोगासाठी प्रयोग अशी पी.एच.डी. मानसिकता नसेल, तर प्रयोगातून काहीतरी साध्य व्हायला हवं. क्रिकेटपुरता बोलायचं तर ह्या प्रयोगातून एक सेटल्ड टीम तयार व्हायला हवी. दिल्ली च्या प्रयोगातून ते साध्य झालं नाही असं खेदानं म्हणावं लागेल. हॉर्सेस फॉर कोर्सेस हा अ‍ॅप्रोच चांगला असला तरी त्यासाठी आधी एक सेटल्ड टीम हवी. प्रत्येकाला आपला रोल माहीत हवा आणी तो पूर्णपणे निभावण्याचा सराव ही हवा. अन्यथा ती एक टीमची मोडतोड ठरते, जे दिल्ली च्या बाबतीत झालं.

जे सचिन च्या कॅप्टन्सी मधे भारताच्या संघाचं झालं (बॅटींग मधे जे त्याला सहज शक्य व्हायचं त्याची तो टीमकडून अपेक्षा ठेवायचा), तसच काहीसं द्रविड कडून दिल्ली चं झालं का? (त्याच्याकडे अ‍ॅडाप्टेशन सहजतेनं येतं, त्याची तो टीमकडून अपेक्षा ठेवतो का?)

त्याच्याकडे अ‍ॅडाप्टेशन सहजतेनं येतं, त्याची तो टीमकडून अपेक्षा ठेवतो का? >> नाहि रे, द्रविड ने अ‍ॅडॉप्ट करायला शिकण्यासाठी बरेच दिवस घालवलेत. सुरूवातीला strike rotate न केल्यामूळे बाहेर पण बसला होता लिमिटॅद ओव्हरस्मधे. द्रविड भारताचा कोच झाला तर DD चा अनुभव कामी येईल अशी अपेक्षा ठेवूया.

आज टॉप फॉर्ममधे असलेली सर्वोत्तम बॅटींग वि. टॉप फॉर्ममधे असलेली बॅलन्सड टीम ! किमान ४०० धांवांचा सामना होण्याची दाट शक्यता ! एबीडी, गेल व वॉटसन तिघेही एकाच सामन्यात लवकर बाद होवूं शकतात हें गेल्या त्यांच्या सामन्यात पाहिल्यामुळे गुजरातला हुरूप येवूं शकतो किंवा त्याचं उट्टं ते या सामन्यात काढल्याशिवाय रहाणार नाहीत या जाणीवेने गुजरात दबावाखालींही येवूं शकतो. आरसीबी कोणतेही लक्ष्य 'चेस ' करुं शकते ही शक्यता लक्षांत घेतां, त्याना प्रथम बॅटींग मिळो, अशीच प्रार्थना गुजरात करत असेल !
घरच्या खेळपट्टीचा व पाठीराख्यांचा आरसीबीला फायदा मिळणार असला तरीही सामना रंगतदार होणार हें निश्चित ! ही बाद फेरी नसली तरीही दोन्ही संघ ति बाद फेरी आहे अशाच जिद्दीने खेळणार हेंहीं निश्चित.
हॅपी व्ह्यूयींग !

आरसीबी ची बॉलिंग!

असामी, तुझं म्हणणं (द्रविड च्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळाविषयी) एकदम बरोबर आहे. तेच लॉजिक पुढे खेचुनच मी म्हटलं होतं की अशा माणसानं नंतर च्या काळात कुठल्याही क्रमांकावर बॅटींग करून, वेळप्रसंगी अँकर करून, तर वेळप्रसंगी आक्रमक खेळून, ओपनिंगला येऊन, विकेटकिपींग करून (वन-डे / टेस्ट) कमी तिथे आम्ही चं मुर्तिमंत उदाहरण दिलं होतं. ह्या अ‍ॅडाप्टेशन विषयी मी बोलत होतो. असो. तो आता भूतकाळ झाला.

आज विराट वि. रैना.

Pages