आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपवून टाका एकदाचे!

धोनी ढेपाळतोय आणि कोहली थोडा mature झाल्यासारखा वाटतोय (RCB चे पराजय तो ज्या पद्धतीने पचवतोय ते बघता)

"पण ऋन्मेषजी 'व्हेटो' वापरतीलच ना !!" - भाऊ Happy तुम्ही शब्दांतुन सुद्धा रंगरेषांईतकेच चांगले चिमटे काढता की Happy

आज बंगळुरू वि. मुंबई. ह्या आयपीएल मधे कोहली च्या मॅच्युरिटी ने प्रभावित केलय.

कोहलीसाठी परफेक्ट स्लिप प्लेस करणे, गेलला पुढे खेळवत हवेत उचलायला लावणे.. आणि आता राहुल येताच स्पिनर पांड्या काढणे.. आज मुंबई अभ्यास आणि गेमप्लान करून आलीय.. आणि आतापावेतो सरस ठरलाय..

<< आणि गेमप्लान करून आलीय.. आणि आतापावेतो सरस ठरलाय..>> डि व्हिलीयर्सची विकेटही आज मुंबईचाच दिवस आहे याचे संकेत देतेय.

<< पोलार्डला कशाला दिली ओव्हर >> आणि तेंही भज्जीची एक ओव्हर शिल्लक असताना ! पोलार्डने एका ओव्हरमधे दिलेल्या २२ धांवा म्हणजे मुंबईने " आज आम्हाला कोण जिंकवतो बघूंया " अशी दिलेली जाहीर चॅलेंजच !!!

मुंबई सहज जिंकेल असं मला वाटतय. बंगळुरू कडे ईतकी कमी टोटल डिफेंड करू शकणारे बॉलर्स नाहीयेत.

<< ईतकी कमी टोटल >> १५१ ही कांहीं इतकी कमी टोटल आहे,असं नाहीं वाटत. दुसरं, वॉटसन हा असा खेळाडू आहे जो बॅटींगचं उट्टं गोलंदाजीत काढायचा जिवापाड प्रयत्न करेल ! मुंबईला लढावं लागेलच. अर्थात पोलार्डनेही गोलंदाजीचं उट्टं फलंदाजीत काढलं नाहीं तर !!

चला, मुंबईचं घोडं न्हालं एकदाचं गंगेत !! अभिनंदन !!
क्रिकेटला आवाजाची साज चढवणारा, क्रिकेट जगणारा व शब्दांतून क्रिकेटची जादू साकारणारा टोनी कोझिअर आज क्रिकेटजगत कायमचं सोडून गेला ! Sad

वॉटसन ने सलग तिसर्‍या सामन्यामधे खराब बॉलिंग केली. चहल परत मस्त बॉलिंग करायला लागलाय. कोहली क्रुनाल वर इंप्रेस्ड वाटला. बहुधा दोघेही झिंबाव्वेला चक्कर मारून येतील असे वाटतेय. के. एल. राहुल मस्त खेळलाय शेवटचे काहि सामने. रैनाच्या जागी आणायला हरकत नाही.

सॅमी मधे मधे काहि पण बोलत असतो. जॉर्डन ने गुडघ्यावर टाकलेल्या दोन फुल टॉस वर बॉलरला यॉर्कर साठी किती कमी मार्जिन आहे म्हणतो. फूटभर मार्जिन पुरत नसेल तर बॉलर चा कंट्रोल नाहि म्हणायला काय हरकत आहे.

टोनी कोझिअर सध्या कमी अ‍ॅक्टीव्ह होता वाटते. रिसेंटली काहि वाचल्याचे आठवत नाही. RIP Sir !

<< फूटभर मार्जिन पुरत नसेल तर बॉलर चा कंट्रोल नाहि म्हणायला काय हरकत आहे. >> कोणाबद्दल व कशाबद्दलही फार तिखट, कडवट [ फार सत्य !] नाहीं बोलायचं, असा 'क्लॉज' असावा काँट्रॅक्टमधे !!!
<< टोनी कोझिअर सध्या कमी अ‍ॅक्टीव्ह होता वाटते.>> खरंय. मला वाटतं आजारीच होता तो.
<< बटलर आणी पोलार्ड लौकिकाला जागले.>> जुन्या लौकीकाला जागले म्हणणं अधिक योग्य; हल्लींचा त्यांचा लौकीक फार जागण्यासारखा नसावा ! Wink

कोणाबद्दल व कशाबद्दलही फार तिखट, कडवट [ फार सत्य !] नाहीं बोलायचं, असा 'क्लॉज' असावा काँट्रॅक्टमधे !!! >> शक्य आहे, हर्श भोगले प्रकरणानंतर हे कठीण वाटत नाही.

कॉमेंटेटर्स ना जर परखड सत्य मांडायची मुभा नसेल, तर ही भाटगिरी करण्यासाठी माजी खेळाडूंची काय गरज आहे? बर्यापैकी ईंग्लिश असलेली आरजे, व्हीजे जमात मुबलक प्रमाणात आहेच की.

दिल्ली चे पुन्हा एकदा घाऊक प्रमाणात बदल. त्यापैकी झहीर ईंज्युरीमुळे बाहेर असल्यामुळे कुल्टर-नाईल आणी कॅप्टन्सी साठी ड्युमिनी हे फोर्स्ड बदल आहेत. जयंत यादव ला बहुदा हैद्राबाद कडे असलेल्या डावखुर्या फलंदाजांसाठी घेतलं असावं. आगरवाल कुणाच्या जागी आलाय ते माहीत नाही.

त्यापैकी झहीर ईंज्युरीमुळे बाहेर असल्यामुळे >> झहिर वि. नेहरा मधे झहीर इंजरी मुळे बाहेर हे बर्‍यापैकी आयरॉनिक आहे Happy

असामी Happy

एक झहीर ईंजुअर्ड असल्यामुळे टीम काँबिनेशन वर केव्हढा मोठा फरक पडला! बॉलर (कुल्टर-नाईल), कॅप्टन (ड्युमिनी) हे दोघं तर आत आलेच, पण परिणामस्वरूप सॅम बिलींग्ज आणी ब्रेथ्वैट बाहेर गेले आणी त्याचं कॉम्पेनसेशन म्हणून मयंक आगरवाल टीम मधे आला. यादव आणी नदीम मात्र सरळ बदल आहेत.

टीम काँबिनेशन वर केव्हढा मोठा फरक पडला >> +१.

वॉर्नर चे शमीला ऑफ साईडला मारलेले फोर्स कसले महान टायमिंगवर होते . मजा आली.

दिल्लीच्या बॉलर्सनी सुटलेल्या वॉर्नरची विकेट काढल्याबरोबर बाकीचे सर्व बॅट्समन गळपटले हैद्राबादचे. मॉरीस आणि मिश्राची बॉलिंग मस्तं होती. डुमिनी कॅप्टन म्हणून योग्य नाही हे मात्रं नक्की. मिश्राच्या चार ओव्हर्स पूर्ण करण्याऐवजी स्वतः दुसरी ओव्हर कशासाठी टाकली त्याने?

दिल्लीच्या बॅटींगमध्ये एक क्यूडीके आणि काही प्रमाणात करुण नायर सोडला तर फारसा राम नाही. अर्थात मॉरीससारखा अनप्रेडीक्टेबल हिटर आहे, पण आधीच्यांना नीट खेळावं लागेल.

दिल्लीच्या बॅट्समननी माझे दात अगदी व्यवस्थित घशात घातले आहेत Happy

डीकॉक खेळणार हे अपेक्षीतच होतं, पण त्याला आऊट देण्याचा निर्णय साफ अनाकलनीय होता. करुण नायर बर्‍यापैकी खेळून गेला, पण संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांनी खरी कमाल केली. कोणतंही टेन्शन न घेता आरामात त्यांनी हैद्राबादच्या बॉलर्सचा समाचार घेतला. विशेषतः ज्या पद्धतीने त्यांनी मुस्तफिजूर् रहमानची धुलाई केली ती भारी होती.

मॉरीस चा मी फॅन होत चाललोय. त्याचा खेळ, संघभावना, मैदानावरची वागणुक ही सगळी एका चांगल्या 'खेळाडू' ची लक्षणं आहेत.

फेरफटका + ७८६
मलाही तो आवडतो. याच कारणांसाठी ..

उद्याचा सामना मुंबईने जिंकायला हवा.. स्पर्धा रंगतदार होण्यासाठी तरी ..

मॉरीस राहू दे. यंदा एकही उल्लेखनीय कामगिरी करणारा नवोदित तरूण भारतीय खेळाडू नाही ह्याचे वाईट वाटतेय. दर वर्षी एखादा तरी पुढे येतो.

"नवोदित तरूण भारतीय खेळाडू नाही ह्याचे वाईट वाटतेय" - ठळकपणे अजुन कुणी चमकला नाहीये, पण रिषभ पंत ची आजची ईनिंग आणी गुजराथ विरुद्ध ची ईनिंग हे एका लेव्हल-हेडेड खेळाडूचं लक्षण आहे. दोन्हीकडे परिस्थिती ओळखुन छान खेळला. संजु सुद्धा आज, परवा पंजाब विरुद्ध आणी मुंबई विरुद्ध वेगवेगळ्या परिस्थितीत आणी वेगवेगळ्या रोलमधे चांगला खेळला. मुंबईकडुन कृणाल पंड्या चांगला खेळतोय. बंगळुरू कडून सचिन बेबी चांगला खेळलाय. अपेक्षाभंग झाला तो म्हणजे श्रेयस अय्यर कडून.

Pages