आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा गंमत-

' काय रे, आज नाही खेळवत तुला ?' , असं दर वेळीं नाय इचारायचं, समजलं ?
'पिझ्झा होम डिलीव्हरी'चा युनिफॉर्म आहे हा !!!
pizzaa.JPG

मस्त खेळले पंजाब काल.... पहील्यापासून विजय कॅप्टन असता तर वेगळे चित्र बघायला मिळले असते का?.... अस वाटायला लावणारा परफॉर्मन्स देतय पंजाब सध्या!
असो.... जर तर च्या गोष्टी सोडून देवू!

पण A captain is as good as his team or it's other way around असा प्रश्न पडतो कधी कधी!

<< खरच विचारता का काय तुम्ही अस? >> नशीब माझं, ' खरंच विचारतात का लोक तुम्हाला असं ?' असं नाहीं विचारलत !! Wink
<<..... it's other way around असा प्रश्न पडतो कधी कधी! >> स्वरुपजी, असा प्रश्न पडलाच तर तो एखादा 'लिजंड' कॅप्टन असेल तेंव्हांच पडूं शकेल; विजयच्या बाबतींत नाही ती शक्यता- अजून तरी !

विजय लिजंड नाही हे मान्य!
मिलरची पंजाब इलेव्हन आणि विजयची पंजाब इलेव्हन याच्यात बराच फरक दिसला म्हणून आला तो विचार डोक्यात इतकेच!

<<... म्हणून आला तो विचार डोक्यात इतकेच! >> स्वरुपजी, विजय हा खरंच दर्जेदार फलंदाज आहे, 'टेंपरॅमेंट' उत्तम आहे व नेतॄत्व गुणही त्याच्या असल्याचं जाणवतंच. त्यामुळे संघाची कामगिरी सुधारली, सरस झाली तर नि:संशय त्यालाही श्रेय जातंच.

भाऊ व्यचि भारी ... तुमची गेले 7-8 मस्त जमलेली व्यचि पाहता तुम्हीही फॉर्मात आहात असे बोलू शकतो..

तुम्ही एक धागा काढा ना यांचा. आधी अशीच ईथे तिथे प्रतिसादांत टाकत जा. पण नंतर त्या धाग्यातही संकलित करत जा. जे क्रिकेटच्या धाग्यावर फिरकत नाही त्यांनाही यांचा लाभ घेता येइल.

ॠन्मेष, धन्यवाद.
[ बव्हंशी, हीं [ तथाकथित ] कार्टून्स त्या त्या दिवशींच्या चर्चेच्या संदर्भात असतात; 'टॉपिकल इंटरेस्ट' असलेलीं अशीं कार्टून्स त्या दिवशीं चपखल वाटलीं तरी नंतर तीं संदर्भाशिवाय अर्थहीन वाटण्याची शक्यताच अधिक. (अर्थात, वरचं कार्टून याला कांहींसा अपवाद). वेगळं संकलन करण्यात म्हणूनच मला खास रस नाही]

भाउ ओके
एबीडी शतक
43 चेंडूत
हा भाई जेव्हा असा खेळत असतो तेव्हा आपण अंडर आर्म क्रिकेट बघतोय का असे वाटते.. पाहिजे त्या पोजिशनमध्ये येऊन येईल तो बॉल हवा तसा मारणे.. सर्कशीतला बॅटसमन आहे हा

ही मॅच नाही पहातां आली; एका अर्थी बरंच झालं. इतर मॅचेस 'स्लो मोशन सिनेमा' पाहितोय असं वाटलं असतं !!!!
गुजरातच्या आत्मविश्वासाला मोठाच तडा गेला असावा !

<< विको आणी एबी, वेडे आहेत. >> १००% सहमत ! विकोच्या वेडात कांहींतरी 'सिस्टीम' तरी आहे पण एबी तर ठार वेडाच !!! Wink
कोलकताचा मध्यमगती गोलंदाज राजपूत 'प्रॉमिसींग' वर्गात नक्कीच बसत असावा. छान टाकतोय बोलींग आज.

धोनी १८ चेंडूत ७ धावा काढून खेळतोय. आता त्याची टी २० मधून पण निवृत्त होण्याची वेळ झालीय असं वाटू लागलंय.

.

.

<< २२ बॉल्स ८ नाबाद!! >> 'अँकरींग रोल' !!!!
आतां सुपरजायंटसना कसलंच टेंशन नाही व इतराना तंगड्या घालून पाडायला मोकळे !!! Wink
काल युसूफ पठाण १८ चेंडूत ३७ ! ह्या 'आयपीएल'मधे उलट पठाणाकडूनच ऑक्शनच्या पैशांची पुरेपूर वसूली करताहेत केकेआर !! Wink

२२ बॉल्स ८ नाबाद!! >> 'अँकरींग रोल' !!!! - Happy काल विराट खेळला अँकरिंग रोल. ५ बॉल्स मधे १०५ च केले.

"ह्या 'आयपीएल'मधे उलट पठाणाकडूनच ऑक्शनच्या पैशांची पुरेपूर वसूली करताहेत केकेआर !!" Happy Happy

कृणाल पंड्या ने पैसे वसूल केले. झहीरला मारलेला सिक्स क्लास होता. त्याने फ्रंट फूट क्लीयर करून मारलेले सिक्स काय खल्लास होते राव.

Pages