आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत तरी IPLच्या आधी होणार्‍या World Cup, T-20 World Cup मधे दणकून खेळणारे नंतरच्या लगेच होणार्‍या IPL मधे तेव्हढे प्रभावी ठरत नाही. ह्यावेळी ह्याला कोणी अपवाद ठरतो का बघू. कदाचित mental exhaustion होत असावे.

१. अ‍ॅबे ह्या वेळी RCB ला जिंकून देउ शकेल का ? गेल, अ‍ॅबे, कोहली, स्टार्क ही नावे असलेला संघ जिंकू शकत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.
२. MI नी बटलर ला घेतय पण त्याला आत आणायला मलिंगा/अ‍ॅण्डरसन पैकी एक कोणी तरी बाहेर ठेवावे लागेल. Is it worth the gamble ? ह्या वेळी तरी पहिल्या सामन्यापासून पटेल नि सिमन्स हि जमलेली सलामीची जोडी कायम ठेवतील असे धरूया.
३. धोनी, जडेजा, रैना, अश्विन हे चौघे बर्‍याच वर्षांनी वेगळ्या संघातून खेळताहेत. काय होईल ?
४. कुठले नवीन भारतीय खेळाडू यंदा पुढे येतील ?

एक मात्र नक्की आहे, स्पर्धेच्या शेवटी फॉर्म गवसणारे संघ ज्यांचा core domestic player group मजबूत आहे असेच संघ शेवटी बाजी मारून जातात. हे बदलण्याची शक्यता कमी वाटते. तुमच्या मते असा संघ कोणता आहे ? MI, KKR...

गेल, अ‍ॅबे, कोहली, स्टार्क ही नावे असलेला संघ जिंकू शकत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.
>>>>
टीम कॉम्बिनेशन. बाहेरचे ४ च असणे. हे जरी वर्ल्डक्लास असले तरी वेगवेगळे रोल निभावणारे नसले तर अवघड होऊन जाते.
पहिल्याच आयपीएलला बहुधा हैदराबामध्ये मोठमोठी हिटर नावे होती. बरेच लोकांना वाटलेले की हे लोकं २०-२० मध्ये तुडवातुडवी करणार. पण ते सातव्या की आठव्या नंबरला जाऊन थांबले.

चेन्नई सुपरकिंगने मात्र हेच साधल्याने नेहमीच अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स देत आलीय.
राजस्थान हे आणखी एक उत्तम उदाहरण.
मुंबईला नेहमीच ही परफेक्ट टीम कॉम्बिनेशनची किल्ली गवसायला उशीर लागतो. पण गवसते तेव्हा लगातार विजयाचा ईतिहास घडवते.

कलकत्याच्या विजयात बरेचदा नारायण हा तुरुपचा एक्का बनतो. मात्र त्याला सही सही वापरणार्‍या कर्णधार गौतम गंभीरला मी आयपीएल मधील वन ऑफ द बेस्ट कप्तान समजतो. तो कलकत्याच्या एव्हरेज संघाला नेहमी स्पर्धेत आणतो.

बाकीचे संघ कधी माझ्या जास्त गिणतीतही नसतात.

असो,
मी मुंबईकर असल्याने आणि रोहीत तसेच हरभजन देखील आवडीच्या खेळाडूंपैकी असल्याने, आणि ऑफकोर्स मैदानाबाहेरून पाठिंबा देणारा क्रिकेटचा देव आमच्याच भूमीतील असल्याने मालक रिलायन्स खास आवडीचे नसूनही माझा सपोर्ट सालाबादाप्रमाणे मुंबईलाच Happy

पण यंदा मला उत्सुकता आहे ती होनी को कर दे अनहोनी कप्तान धोनी यावेळी नवीन संघ घेऊन पुणे तिथे काय उणे करू शकतो का Happy

मित्रांनो - हा आय-पी-एल मुंबईचाच बरं का. पुण्याची पण टीम आहे ह्या वर्षी.

दोन्ही टीमला आॅल-द-बेस्ट.

राजस्थान बाहेर पडल्यामुळे तसा थोडासा मुड ऑफ झालेला पण द्रवीडला दिल्ली ने घेतल्याचे कळल्यावर परत भारी उत्साह आला!

दिल्लीसारखा लो-प्रोफाइल संघ आणि द्रवीड-ॲप्टॉन ची जोडी....अहाहा..... making of new delhi बघायला मजा येइल Happy

यंदा अजून संघच नीट कळालेले नाहीयेत.. दोन जुन्या टीम्स जाऊन नवीन आल्याने बर्‍यापैकी शफलिंग झालेले आहे.. त्यात कोणाच्या पदरात काय पडले आहे आणि त्याचा उपयोग कोण कसा करुन घेतो हे बघायला मजा येईल..

पुण्याची टीम बर्‍यापैकी चेन्नईच्या टीमच्या सारखी वाटते आहे.. धोनी कॅप्टन आणि फ्लेमिंग कोच.. ते बरोबर त्यांना पाहिजे तशी टीम बिल्ड करतील...

भारतीय प्लेयर्स कसे खेळतात ह्यावरच बर्‍याच संघांचे स्थान वर खाली कसे होईल ते ठरेल.

Cricinfo ची Fantsay League का नाहीये म्हणे यंदा? (म्हणजे world cup ला तरी नव्हती)
बाकीच्या लीग्स ना cricinfo ची सर नाही!

स्वरूप, सेम पिंच. द्रविड मुळे माझा पाठिंबा कधी नव्हे ते दिल्ली डेअरडेविल्स ला. श्रेयस अय्यर, अखिल हेरवाडकर, रिषभ पंत, संजू सॅमसन, करुण नायर, प्रत्युश सिंग, पवन नेगी, मयंक आगरवाल, महिपाल लोमरोर, जयंत यादव ह्या उगवत्या खेळाडूंना द्रविड चं मार्गदर्शन मिळण्याचा फायदा होईल असं वाटतय. झहीर खान च्या कॅप्टन्सी विषयी, फिटनेस विषयी आणी अ‍ॅटीट्यूड विषयी मी साशंक आहे, पण दुसरा पर्याय ही दिसत नाहीये.

<< पुण्याची पण टीम आहे ह्या वर्षी. >>

काढून टाका डोक्यातून तें खूळ ! चितळ्यांची बाकरवडी चघळणार आणि
सपोर्ट पुण्याऐवजीं दिल्लीच्या सोनहलव्याला ?
bhoot.JPG

स्पर्धेच्या आधी कितीही SWOT करा.... चर्चा करा.... काथ्याकूट करा..... Actually स्पर्धेत काही वेगळेच घडते!
आज सहज म्हणून अगदी २००९ पासूनच्या आयपीएलच्या धाग्यांवरुन फिरुन आलो आणि हे अजुनच पटले.... पण तरी इथे खरडल्याशिवाय जीवाला शांतता मिळणार नाही
अन्दाज बरोबर येतील न येतील.... लिहायला काय हरकत आहे!

रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर (RCB):
गेल, वॉटसन, कोहली, एबीडी.... या फॉर्मॅटमधले ड्रीम टॉप फोर आहेत आणि याचेच त्यांच्यावर दडपण असणार आहे..... भारी खेळले तर ते अपेक्षितच आहे आणि ढेपाळले तर जनता Whatsapp सरसावून तयारच असणार.... लोअर मिडल ऑर्डरमध्ये बिन्नी, सर्फराज, लोकेश राहुल, केदार जाधव वगैरे मंडळी आहेत पण त्यातले भरवश्याचे (केदार जाधवचा थोडाफार अपवाद वगळता) कुणीच नाही
वरचे तिघे फोरेनर हमखास संघात असतील आणि चौथा म्हणजे स्टार्क त्यामुळे बद्री, ट्रॅविस हेड, मिल्ने, डेव्हीड विसा, केन रिचर्डसनला संधी मिळायची शक्यता कमीच आहे
स्पिनची जबाबदारी चहल, इक्बाल अब्दुल्ला आणि परवेझ रसूल कडे असेल पण स्टार्कला साथ द्यायला तितका सक्षम पेसर बन्गलोरकडे नाहीये

टॉप फोर चालले तर This will be a team to watch!

कोलकोत्ता नाइट रायडर्स (KKR):
नावाजलेले भारतीय सलामीवीर (गंभीर, उथाप्पा), आक्रमक मिडल ऑर्डर (मनीष पांडे, युसुफ पठाण, सुर्यकुमार यादव), अतिशय उपयुक्त ऑलराउंडर्स (शकीब आणि आन्द्रे रसेल), शकीबच्या जोडीला नरीन, चावला, हॉग आणि चायनामन कुलदीप यादव, जलदगती गोलंदाजीत मोर्केल, उमेश यादव आणि उनाडकट..... KKR has covered all bases
गंभीर, उथाप्पा, पठाण वगैरे मोठया गॅपनंतर किती लवकर भरात येतात यावर केकेआरचे भवितव्य आहे

कागदावर तरी सर्वात संतुलित संघ हाच दिसतोय!

मुंबई इंडियन्स (MI):
सिमन्स, पोलार्ड, अ‍ॅन्डरसन आणि मलिंगा हे चार फोरेनर पक्के आहेत.... मलिंगा फीट नसला किंवा त्याची फारच पिटाई झाली तर मॅकेल्घन किन्वा साउदी ला चान्स मिळेल
वरच्या पैकी कुणीतरी सतत फेल गेल तरच बटलरला चान्स मिळेल बहुदा
रोहित, रायडू, पटेल, भज्जी, पन्ड्या हे नेहमीचे शिलेदार असतीलच पण मला उत्सुकता लागून राहीलीय ती नथूसिंगची बॉलिंग बघण्याची

फेव्हरिट तर ते आहेतच पण ओव्हर कॉन्फिडन्स सांभाळला पाहिजेल!

किन्ग्ज एलेव्हन पंजाब (Kings 11)
मिलर हा एकमेव परदेशी कर्णधार.... मिलर, मार्श, मॅक्सी हा परदेशी दारुगोळा आणि मोहीत, सन्दीप शर्मा, अनुरीत आणि अक्षर हा देशी तोफखाना.... प्लेऑफ ला जाण्याची क्षमता नक्कीच आहे या संघात
यंदा सेहवाग नसल्यामुळे मुरली विजय च्या साथीला बहुतेक मनन व्होरा येईल सलामीला आणि वरच्या भारतीय गोलंदाजीला मिशेल जॉन्सनच्या अनुभवाचा फायदा मिळेल
एक कर्णधार (आणि सहवाग) सोडला तर या संघात फारसे काही बदलेलेले नाही!

A strong contender for sure!

सनरायझर्स हैद्राबाद (SRH):
त्यांची बॅटींग बरीचशी वॉर्नरवरच अवलंबून आहे..... धवन, युवी, विल्यमसन, मॉर्गन वगैरे नावे मोठी आहेत पण त्यांना लवकरात लवकर फॉर्मात येण्याची गरज आहे... वरची मिडल ऑर्डर बघता आवश्यक असणारी पॉवर देण्याचे काम हूडाला करायला लागणार आहे!
भुवी आणि नेहरा (सध्याचा) ही टी२० साठी एकदम आयडीयल जोडगोळी आहे.... जोडीला बोल्ट आणि करण शर्मा असतीलच

एकंदरीत यंदा मला काही सनरायझर्स कडून फारश्या खास अपेक्षा नाहीयेत!

गुजरात लॉयन्स (GL):
स्मिथ, ब्राव्हो, फॉल्कनर आणि मॅकल्लम हे फिक्स फॉरेनर...... फिंच, स्टेन आणि अ‍ॅन्ड्र्यू ताय ची वर्णी लागणे कठीणच
रैनाची कॅप्टन्सी हे मुख्य आकर्षण!
इशान किशन, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी अशी फारच अननुभवी भारतीय फलंदाजीची फळी हा एकमेव कच्चा दुवा
गोलंदाजीत मात्र प्रवीणकुमार, तांबे, धवल कुलकर्णी असा दर्जेदार भारतीय ताफा आहे
पॉल अ‍ॅडम्स सारखी बॉलिंग अ‍ॅक्शन असणारा शिविल कौशिक सरप्राइज पॅकेज ठरु शकतो

स्मिथ, मॅकल्लम आणि रैनावरच फलंदाजीची मदार!

रायझिंग पुणे सुपरजायंटस (RPS):
सुपरकुल कर्णधार धोनी, आजच्या घडीचा भारताचा सर्वोत्तम स्पिनर अश्विन, स्वताला प्रूव्ह करायला उत्सुक असलेला पीटरसन, तन्त्रशुद्ध रहाणे, चतुर स्मिथ, धमाकेदार मिशेल मार्श आणि परेरा.... कागदावर तर पुण्यात काही उणे दिसत नाहीये
इरफानला यंदा तरी संधी मिळणार का हा प्रश्न आहे Wink
आरपीलाही खेळवण्याची शक्यता एकदम कमी
दिंडा आणि इशांत शर्मा एका संघात ही मात्र प्रतिस्पर्ध्यांसाठी मेजवानी ठरु शकते
हा मुरुगन अश्विन कोण आहे ही पण एक उत्सुकता!

एक पुणेकर या नात्याने पुण्याला आपला भरघोस पाठींबा!

दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD):
राजस्थान रॉयल्सच्या जवळपास जाणारा संघ... सगळ्यात लो-प्रोफाइल.... कुणालाही फारश्या अपेक्षा नसणारा एक गुणवान संघ.... आणि अश्या संघाला अतिशय अनुरुप असा द्रवीड आणि अ‍ॅप्टॉनचा थिंक टॅन्क!
यंदाचा दिल्ली संघ हा जवळपास नवा आहे..... झहीरच्या कॅप्टन्सीबद्दल अनेक प्रश्नचिन्हे आहेत.... बहुतांशी त्याच्या फीटनेसबद्द्ल... पण हा विचार दिल्लीच्या मॅनेजमेन्ट ने नक्कीच केला असणार.... They know it better than us!..... स्वता झहीरसाठी हा खुप मोठा बहुमान आहे आणि तेव्हढीच मोठी जबाबदारी सुद्धा!
दिल्लीसाठी क्यूडी कॉक, ड्युमिनी, मॉरीस आणि इम्रान ताहीर हे फोरेन प्लेयर्स पक्के असतील आता यात वर्ल्डकपचा स्टार ब्रेथवेटला कुठतरी जागा करुन द्यायला पाहिजेल.... हॉर्सेस फॉर कोर्सेस वाला द्रवीड याची काळजी नक्कीच घेईल
QD आणि श्रेयस अय्यर/मयंक अगरवाल ही टॉप ऑर्डर..... सॅमसन, ड्युमिनी, करुण नायर ही मिडल ऑर्डर..... नेगी, मॉरीस, ब्रेथवेट ही अष्टपैलू लोअर मिडल ऑर्डर..... मिश्रा, ताहीर, नेगी आणि शहाबाज नदीम ची फिरकी.... शमी, झहीरचा तेज मारा.... अणि बॅकअपला अखिल हेरवाडकर, रिशभ पंत, खलील अहमद, लोमरोर, छामा मिलिन्द अशी तरुण मंडळी..... DD has everything needed but just lack in Impact Player.... पण उपलब्ध रिसोर्सेसचा कसा खुबीने उपयोग करुन घ्यायचा हे द्रवीड आणि पॅडी अ‍ॅप्टॉनला बरोबर माहीत आहे

दिल्लीचा हा संघ कुठवर मजल मारेल माहीत नाही पण आतापर्यतच्या दिल्लीच्या संघांची कामगिरी पाहता everything is bonus!

धन्यवाद, स्वरुपजी.
[ आयपीएल संबंधित कुठल्याही चर्चेत इंप्रेशन मारायला मला आतां ही माहिती खूप झाली !:डोमा: ]

नविन खेळाडू पहायला मिळणं, याबरोबरच अजूनही 'कम बॅक'ची जिद्द बाळगून असणारे खेळाडूही [युसूफ पठाण, उत्ताप्पा, गंभीर, धवल कुलकर्णी इ.इ.] जीव पणाला लावून खेळताना पहाणं, हेंही तितकंच रंजक.

आयपीएलचा टिपीकल प्रॉडक्ट - तांबे ! त्याची गोलंदाजी यंदाही बघायला मिळणार तर !

कोलकत्तामधून नरिन खेळणार ? त्याच्या 'अ‍ॅक्शन'चा घोळ संपला ? [ मला तर त्याची अ‍ॅक्शन एकदम क्लीन वाटायची] ग्रेट बोलर !

बुमराह कुठून खेळतोय ? यॉर्कर प्रभावीपणे टाकणारा तो सध्याचा एकमेव भारतीय असावा !

धोनी नंतर बॅट्समन विकेटकिपर म्हणून मला केवळ उथ्थप्पाच दिसतो. एक तर आपला सलामीचा प्रश्न सुध्दा सुटेल वर एक अतिरिक्त बॅट्समन सुध्दा मिळेल. बाकी विकेटकिपिंग धोनी सारखी तर जगात एकाही विकेटकिपरला अद्याप जमली नाही. त्यामुळे त्यात तोडीसतोड मिळणे फार अवघड आहे. 'नमन ओझा' याची विकेटकिपिंग चांगली आहे पण अजुन मोठ्या सामन्यांमधे टेस्टींग झाली नाही, संजू सॅमसग ची बॅटींग टी२० साठी उपयुक्त आहे. पण वनडे मधे कितपत यशस्वी होईल याचा अंदाजा होत नाही. विकेटकिपिंग सुध्दा मोक्याच्या क्षणी गडबडते. दिनेश कार्तीक आणि पटेल हे आता वयस्कर झाले त्यामुळे त्यांच्या नावावर काट मारावे. उगाच पाठीमागे जाऊन फायदा नाही.

<< धोनी नंतर बॅट्समन विकेटकिपर म्हणून मला केवळ उथ्थप्पाच दिसतो >> सहमत. खूप मेहनती व विश्वासार्ह. पण 'कम बॅक' करण्यातच बरीचशी करीअर गेल्याने बिचार्‍याची दमछाक झालीय ! संजू सॅमसनच मला तरी भविष्यातला धोनी वाटतोय.

भाऊ गेल्यावर्षीच्या रेकॉर्डेड दाखवल्या तरी गुण येईल. किंवा खाली सोसायटीच्या प्रांगणातील मुलांचा गेम रोज सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा तास दाखवला तरी चालेल. बरे वाटेल. पाणी उकळून गार करून द्या. उशाला ब्याट अथवा पॅड्स ठेवा. जुन्या बेल्स उगाळून कपाळाला लावा आय पियेल सुरू होइस्तोवर Happy

<< भाऊ गेल्यावर्षीच्या रेकॉर्डेड दाखवल्या तरी गुण येईल. >> 'एक्सपायरी डेट'ची अडचण येईल ह्या औषधाबाबत. बाकीचे उपाय करून बघायला हरकत नसावी. निदान उलटा तरी कांहीं परिणाम नाहीं संभवत ! Wink

भाऊ, तुमचे इंंप्रेशन सांभाळायला तुमची व्यंगचित्रे आहेत की!

बुमराह मुंबईकडून खेळतोय

हो .... मलाही सॅमसनच धोनीचा वारसदार वाटतोय.... पण अजुन त्याला खुप लांबचा पल्ला गाठायचाय!

दिनेश कार्तीक आणि पटेल हे आता वयस्कर झाले त्यामुळे त्यांच्या नावावर काट मारावे. उगाच पाठीमागे जाऊन फायदा नाही >> कार्थिक नि उथप्पा दोघेही सारख्यच वायचे आहेत. पटेल एखद वर्षे मोठा असेल. ओझा सगळ्यात मोठा आहे.

मलाही सॅमसनच धोनीचा वारसदार वाटतोय.... पण अजुन त्याला खुप लांबचा पल्ला गाठायचाय! >> बरोबर, पहिल्या सीजन नंतर फारसा effective राहिला नाहिये तो.

धोनी चं विकेटकिपींग हे सरत्या काळानुरूप सुधारलय. एक अतिरिक्त बॅट्समन संघात हवा म्हणून गांगुली ने द्रविड ला विकेटकिपींग करायला लावली होती. त्यामुळे संधी मिळताच (म्हणजे द्रविड कॅप्टन होताच आणी एक स्फोटक फलंदाज - विकेटकीपर म्हणून धोनी चा उदय होताच), धोनी ला संधी मिळाली. निव्वळ विकेटकिपींग च्या बलाबला चा विचार करता, तेव्हा कार्थिक, पटेल ह्या दोघांची जबरदस्त स्पर्धा होती. पण ते दोघही धोनी च्या बॅटींग आणी नंतर नेतृत्वगुणांमुळे मागे पडत गेले.

मला तरी संजू सॅमसन, रिषभ पंत, इशान किशन,, अदित्य तारे हे वन-डे / टी-२० साठी चे उमेदवार वाटतात.

टेस्ट मधे साहा आणी ओझा च आहेत अजुन काही वर्ष तरी.

साहा तसा तरूणच असावा त्यामुळे तो धोनीला पर्याय असूं शकतो. संजू सॅमसन तर आहेच लायनीत. आणि, कुणी सांगावं, आयपीएल/ रणजीतून उगवेलही एखादा नविनच धोनी !
<< तुमचे इंंप्रेशन सांभाळायला तुमची व्यंगचित्रे आहेत की! >> स्वरुपजी, अहो, क्रिकेटच्या धाग्यांवर माझं इंप्रेशनच मुळात 'कार्टून' म्हणूनच आहे !! Wink

Pages