आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

RCB पेक्षा कोहली बद्दल वाईट वाटले. एकट्याने शक्य तेव्हढे खेचली टीम. can not fault him. किती ती दळभद्री बॉलिंग ?
>>>>

खरंय

पण वॉर्नर बद्दलही तितकेच वाईट वाटले असते. त्याला ईतर टीमने टप्याटप्यावर साथ दिली असली तरी सारा डोलारा त्याच्या अवतीभवतीच उभा होता. अगदी गेल्या सामन्यातही पुन्हा त्यालाच नैय्या पार लावावी लागली होती.

फरक ईतकाच की कोहली बॅट्समन होता आणि त्यांच्या संघाचा प्रॉब्लेम बॉलिंग असल्याने त्यात तो काही करू शकत नसल्याने हतबल होता.
याऊलट वॉर्नरने लीड करत फलंदाजीची धुरा सांभाळली की साथ द्यायला बॉलर होते..
शेवटी आज ईथेच वॉर्नर सरस ठरला आणि कोहली हरला ..

असो, वॉर्नरबद्दल आनंद झाला..
कोहलीला आजचा पराभव मेंटली आणखी स्ट्राँग बनवेल असे धरून पुढे जाऊया ..

अ‍ॅबे ने फायनल्स मधे न खेळण्याचा रिवाज मोडला नाही >>> आखिर साऊथ आफ्रिकन रक्त है उसके रगो मे Happy

<< याऊलट वॉर्नरने लीड करत फलंदाजीची धुरा सांभाळली की साथ द्यायला बॉलर होते..
शेवटी आज ईथेच वॉर्नर सरस ठरला आणि कोहली हरला >> +१ . संतुलित संघ हा एकांगी संघापेक्षां सरस ठरण्याची शक्यता अधिक असावीच.
गेल काल 'अनस्टॉपेबल' वाटला तरीही त्याच्यासाठीचं गोलंदाजीचं प्लानींग किंवा त्याची अंमलबजावणी यात बरीच कमतरता होती असं मात्र सतत जाणवत होतं. त्याच्या बहुतेक सिक्सर्स सहज टप्प्यात मिळालेल्या चेंडूंवर मारल्यासारख्या वाटल्या. कीं , हा माझाच भ्रम आहे ?

Pages