आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, Happy

कोलकत्ता ची वाट लावतोय स्मिथ. पण अजुन पठाण आणी यादव आहेत आणी विकेट चा पु. लं. च्या दामले मास्तरांएवढ्या हिरव्या रंगाच्या प्रेमाने नटलेला रंग पाहून कोलकत्ताची बॉलिंग पण रंग जमवेल अशी आशा आहे. जिथे स्मिथ चालतो, तिथे मॉर्केल नाचेल असा माझा अंदाज आहे.

<< हिरव्या रंगाच्या प्रेमाने नटलेला रंग पाहून कोलकत्ताची बॉलिंग पण रंग जमवेल अशी आशा आहे. >>खेळपट्टी व
आऊटफिल्ड एकाच रंगाचे बघण्याचा दुर्मिळ योग , निदान भारतात तरी !! पण पीच तसं बाऊन्सी व खतरनाक मात्र नाही वाटत.

KKR सगळेच soft dismissals आहेत . त्यामूळे सांगता येत नाही.

गुजरातने १२४चं लक्ष्य सहज पार केलंय . रैना ५०+ ! एकच सामना उरल्यामुळे - व तोही हैदराबाद विरुद्ध - केकेआर आता अडचणीत येण्याची शक्यता जास्त !

मुंबईला अंतिम चारात जायला फक्त जिंकायचे आहे. जिंकले की गुजरात मागे जाणार तसेच बेंगलोर आणि दिली आपसात सामना आहे. जो हरणार तो मुंबईच्या मागे राहणार.
पंजाब पुणे तर बादच आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने असा विचार करायला हवा की कोणत्या दोन टीमला मागे टाकता येईल.

ईंटरेस्टींग म्हणजे मुंबई पहिल्या दोनांतही येऊ शकते जर ईतर रिझल्ट त्यांना हवे तसे लागले तर..
तसेच गुजरातशी हरूनही पहिल्या चारात जाऊ शकते जर ईतर रिजल्ट त्यांना हवे तसे लागले तर..
आणि हे असे कमीअधिक सर्व संघांना लागू..

यात पावसाने हजेरी लावली 1-1 पॉईंट वाटला तर वेगळेच समीकरण
ईण्टरेस्टींग झालेय सारे Happy

पाच टीम्स तीन स्थानांसाठी झगडणार. पंजाब नि पुणे आता काहि प्रभाव पाडू शकत नाहीत. पाऊस, पीच नि पंचांपेक्षा प्लेयर्स मूळे हे तीन संघ ठरले तर खरा पंच येईल स्पर्धेमधे Wink

केदार अरे ते उगाचच काहितरी. त्या दिवशी भाऊंनी पंजाब, पुणे नि पाऊस लिहिलेले त्यावरून लिहिलेले Happy

बेटींसाठी >> म्हणजे काय हो ?

हैदराबादचाही पहिल्या दुसर्या क्रमांकाचा ईंटरेस्ट अजून बाकी आहे. गुजरात बेंगलोर त्यांना मागे टाकू शकते.

काय मजेशीर आहे. गुजरात आणि बेंगलोर पहिलेही येऊ शकतात. दोघे बाहेरही जाऊ शकतात..

या सर्वात पंजाब आणि पुणे सातव्या क्रमांकासाठी लढून येत्या वीकेंड धमाक्याची सुरुवात करणार आहेत Wink

ह्या धाग्यावर ही कॉमेंट अस्थानी किंवा थोडीशी विरोधी सुद्धा ठरू शकेल. पण काल आणी आज सकाळी आयपीएल च्या आधी जेव्हा मला ईंग्लंड - श्रीलंका टेस्ट मॅच चं स्कोअरकार्ड बघायचा मोह झाला, तेव्हा मी स्वतःचं क्रिकेट प्रेम 'सेल्फ-अटेस्ट' केलं. Happy

दिल्ली - हैद्राबाद मधे दिल्ली ची टॉस जिंकुन बॉलिंग.

"मी हाय लाईञ्ट्स पण पाहिले" - सेम हिअर! Happy

मॉरीस बाहेर म्हणजे दिल्ली ला धक्काच आहे. ड्युमिनी ने अजुन लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाहीये, आता तरी करावी. अय्यर च्या जागी नेगी आलाय. दिल्ली च्या दुर्दैवानी अय्यर आणी आगरवाल दोघंही आऊट ऑफ फॉर्म आहेत. नेगी म्हणजे नगाला नग वाटतो.

<< मॉरीस बाहेर म्हणजे दिल्ली ला धक्काच आहे.>> हैदराबादचा हुकमी गोलंदाज नेहरा पण नाहीय - थोडं तरी बॅलन्सींग ! शिवाय, दोन रन- आऊट घेवून दिल्लीने आणखी बॅलन्सींग केलंय !! हैडराबाद -५१-२ !

ब्रेथवेटला का खेळवत नाही म्हणून रोज मी ओरडा करत होतो. दिल्लीची एकाच छापाची बॅटींग लाईन, स्पेशली मिडल ऑर्डर पाहता मागे मॉरीस आणि ब्रेथवेट हे मोठे फटके खेळणारे खूप गरजेचे होते. फायनली आज मॉरीसच्या जागी नाईलाजाने खेळवला आणि गोलंदाजीत चमकला. होपफुल्ली आता इथून पुढे तो दिसेलच..

दिल्ली ९२-२ [१३ षटक] ड्युमिनी आलाय आत्तां. उट्टं काढेल का तो आतांपर्यंतच्या ह्या स्पर्धेतील खराब कामगिरीचं ?

हा मुस्तफिजुर बांग्लादेशला मिळालेला एक हिरा आहे.. काय वरायटी आहे.. य्योर्कर.. स्लोअर.. जिथे कॅरी बाऊन्स असतो तिथे जबरी उसळवतो सुद्धा.. नवीन बॉल जुना बॉल.. बांग्लादेशी अक्रम आहे हा

जिंकले बाबा एकदाचे. मस्त झाली मॅच. व्हॉट अ मॅच!! शेवटी करुण नायर, वॉर्नर आणी भुवनेश च्या रिअ‍ॅक्शन्स नी सगळ्याचं सार सांगितलं. दिल्ली च्या कँप मधे बिलींग्ज ची प्रतिक्रिया पण मस्त होती.

"उरलेल्या ५ संभाव्य संघांतील कुणीही पहिल्या चारात येवूं शकतात." - हेच आत्ता बघत होतो क्रिकईन्फोवर. ईतका वाईड ओपन प्लेऑफ ह्या आधी आयपीएल मधे झालेला मला तरी आठवत नाहीये.

Pages