आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅड लक किंग्ज इलेव्हन!

विजय सुंदर खेळला, पण त्याला इतर कोणीच स्टॅंड दिला नाही फारसा. मिलर फ्लॉप पूर्णपणे. स्टॉईन्सने शेवटपर्यंत प्रयत्नं केले, पण शेवटी ते अपुरे पडले. काही बाबतीत बँगलोर लकी ठरले. अनेक वाईट बॉलवरही शॉट्स मारणं पंजाबच्या बॅट्समनना जमलं नाही. वॉटसनची बॉलिंग मस्तं पडली.

बेहराडिन ऐवजी अक्षर पटेल आला असता तर पंजाब जिंकले असते. ( स्टॅटिस्टिकली Happy

विजय मस्त खेळला. त्याचे १०० व्हायला हवे होते पण बंगलोरच जिंकायला हवे होते. Happy

बेहराडिन ऐवजी अक्षर पटेल आला असता तर पंजाब जिंकले असते.>>>>>

हीच कॉमेंट क्रिकइन्फोवरही वाचली होती. वास्तविक मॅक्सवेलच्या ऐवजी मिलरला बसवणं जास्तं योग्यं ठरलं असतं. मिलर या वर्षी पूर्णपणे फ्लॉप आहे. अर्थात इन अ हाईंडसाईट असं म्हणणं सोपं आहे, पण मॅक्सवेल दोन-तीन इनिंग्जमध्ये चांगला खेळला आहे या वर्षी.

मी लाईव्ह पाहत होतो. त्यामुळे क्रिकइन्फोकडे लक्ष दिले नाही. पण अक्षर गेले काही मॅच अफलातून बॅटिंग करत आहे. त्यामुळे त्याला पाठवणे योग्य होते. पण पंजाब जिंकण्यापेक्षा मला बंगळुर जिंकावे वाटत होते. कोहली मुळे. कोहलीने फायनल चेस करुन काढावी असे वाटत आहे. Happy

सामने जर असेच अटीतटीचे होत राहिले , तर 'आयपीएल २०१६' अविस्मरणीयच होईल !
वॉटसनने आमलाची विकेट घेतली [झेल बिनी ] तिथेंच माशी शिंकली पंजाबसाठी !!
<< कोहलीने फायनल चेस करुन काढावी असे वाटत आहे. >> टी-२०मधे महत्वाच्या सामन्यात आयत्या वेळीं हुकमी एक्क्यांपेक्षां एखादा गुलामच डाव जिंकून देण्याची शक्यता अधिक !

<< सामने चुरशीचे होतायत पण अजुन एकपण सुपरओव्हर नाही! >> 'सुपर ओव्हर' हा 'पेनल्टी शूटआऊट' प्रमाणेच नाईलाजाने वापरावा लागणारा नियम आहे; मला तरी अटीतटीच्या सामन्यांचा तो 'अँटीक्लायमॅक्स'च वाटतो. शेवटच्या चेंडूवर निकाल लागणं हें कितीतरी रोमांचक व अशा सामन्याना न्याय देणारं असावं.
हैदराबाद ९ सामने - १२ गुण व गुजरात १२ सामने -१४ गुण. पुण्याला आज हरवलं तर हैदराबाद गुणतक्त्यात अग्रक्रमावर येईल. बघूं निद्रीत 'धोनी फॅक्टर' आज खडबडून जागा होत कांहीं जादू दाखवतो का !!!

'सुपर ओव्हर' हा 'पेनल्टी शूटआऊट' प्रमाणेच नाईलाजाने वापरावा लागणारा नियम आहे;>>>>

मागे एकदा भारत पाकिस्तान सामन टाय झाला तेंव्हा बोलिंग करुन ५ चेंडूत जास्ती जास्त वेळा स्टम्प उडवण्याची ओव्हर होती तर पाकिस्तान बोलरचा एकही चेंडू स्टंपवर लागला नव्हता हे विशेष! मला वाटते त्या टाय ब्रेकर मध्ये आपण ३-० जिंकली मॅच!

<< तर पाकिस्तान बोलरचा एकही चेंडू स्टंपवर लागला नव्हता हे विशेष! >> कारण त्याना स्टंपसमोर फलंदाज असेल तेंव्हांच स्टंप उखडायची संवय होती, अजूनही आहे !! Wink

उद्यांच्या अटीतटीच्या मॅचमधे आपण अंपायर्स आहोत. जरा लक्षांत ठेव,
माझ्या नातवाला 'सुपर ओव्हर' काय असतं तें दाखवायचंय !!
3umpire.JPG

भाऊ Lol

आज हैद्राबाद विरुद्ध पुण्याची मॅच.

पुण्याचं काही खरं दिसत नाहीये अद्याप या आयपीएलमध्ये. आजची मॅच हरले तर जवळपास गच्छंती नक्की आहे त्यांची. धोनी पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अर्थात पीटरसन, डुप्लेसी, स्मिथ हे गेल्यामुळे त्यांची बॅटींग साफ लंगडी पडते आहे. रहाणे खेळतोय पण त्याला अँकर म्हणूनच खेळावं लागत आहे. स्वतः धोणीही हिटरच्या रोलमध्ये काही करु शकलेला नाही. A captain is as good as his team हे पुन्हा एकदा सिद्धं होतं आहे.

हैदराबाद ११५-५ [ १७.५ षटकं] !
<< बघूं निद्रीत 'धोनी फॅक्टर' आज खडबडून जागा होत कांहीं जादू दाखवतो का !!!>> खरंच असं होणार कीं काय आज !!

झंपा नि छान बॉलिंग केली. पुण्यासाठी आदर्श परिस्थिती आहे. रहाणे एका बाजुने खेळून दुसरीकडून अ‍ॅटॅक करतील बहुदा.

रहाणे गेला. भुवनेश ची सुंदर बॉलिंग. अप्रतिम बॉल. ईनिंग च्या सुरूवातीला अशा बॉल्स वर विकेट पडण्याची शक्यता खुप जास्त असते.

एखादा गुलामच डाव जिंकून देण्याची शक्यता अधिक ! >>

आज अश्विनरावांना गुलाम म्हणून नं ४ वर पाठवले. आहे. Happy

<< भुवनेश ची सुंदर बॉलिंग. >> स्विंग बोलींगचं प्रात्यक्षिकच !!
<< आज अश्विनरावांना गुलाम म्हणून नं ४ वर पाठवले. आहे.>> Wink

अपेक्षेप्रमाणे पुण्याची बॅटींग फ्लॉप झाली आहे.
अखेरची आशा धोणीच आहे पुण्यासाठी आता.

पुण्याच्या पराभवाचं श्रेयं भुवनेश्वर, मुस्तफिजूर आणि नेहरा यांच्या बॉलिंगला आणि धोणीच्या अनाकलनीय कॅप्टनसीला.
अश्विनच्या जागी तो स्वतः का आला नाही?
अश्विन कन्सॉलिडेट करु शकतो तर धोणी नाही करु शकत का?
किमान तिवारीच्या आधी तरी स्वतः धोणी किंवा परेरा का नाही आला?

<< अखेरची आशा धोणीच आहे पुण्यासाठी आता.>> तीही मावळली १९.५व्या चेंडूवर ! पुणे, बॅड लक !!!

.

काल हैद्राबादची बॉलिंग कडक झाली एकदम... लेकाचे ५ सीमर घेऊन खेळतात.. आणि सगळेच जबरी बॉलिंग टाकतात.. नेहरा तर एकदम कात टाकून आल्यासारखा आहे... तरी भुविच्या १८ व्या ओव्हरमध्ये जरा अवस्था गंभीर झाली होती... पण नंतरच्या दोन फिझ आणि नेहराच्या असल्यामुळे वाचले..

तो बरिंदर स्रन येतो ४ ओव्हर टाकतो आणि जातो. कळत पण नाही ओव्हर्स कधी संपल्या त्याच्या.. आणि फार मार प्ण बसत नाही. त्याला.. मिळालीच तर एखादी विकेट मिळून जाते..

कोहलीकडे आतां तिन्ही प्रकारच्या क्रिकेट्चं नेतृत्व सोपवावं, असं पिल्लू सोडलंय आज गांगुलीने !

Pages