रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली तुझी कल्पना शक्ती आणि रांगोळी ह्यांचा छान संगम होताना दिसतो. >>>>> जागू - तुला सायली म्हणायचंय ना ???????

जागु, हेमा ताई, चनस टीना सगळ्यांचे आभार...:)
जागु, मुळ कल्पना माझी नाही ग बाई, बघुन काढली आणि त्यात काही स्वप्रयोग... Happy

जागू - तुला सायली म्हणायचंय ना ???????>>>>>>>>>>.मी मागच्या पानावर पण शोधून आले, शांकलीची पोस्ट. Proud

सर्व रांगोळ्या सुंदर! जागू धन्यवाद! Happy

ओह्हो, आता पारिजातक आठवडा!! हयात विविधता कशी आणणार ते बघायची उत्सुकता आहे, कारण रंग तर वेगवेगळे वापरता येणार नाहीत. त्यामुळे वैविध्य कसे आणणार त्याची उत्सुकता आहे.

रच्याकने, होळीच्या भोवती काढण्यासाठी/ त्या दिवशी काढण्यासाठी कशी रांगोळी काढता येईल? होळीच्या आधीच कल्पना शेयर केल्या तर त्या दिवशी उपयोग होईल..

मस्त! फुले वेचता आली असती तर .. अहाहा!
वाह सायली - तुझ्या कल्पकतेचा बहर जणू ओसंडून वहातोय ! फारच मस्त. शशांक जी>>> +१

सगळ्यांचे खुप खुप आभार...

रच्याकने, होळीच्या भोवती काढण्यासाठी/ त्या दिवशी काढण्यासाठी कशी रांगोळी काढता येईल? होळीच्या आधीच कल्पना शेयर केल्या तर त्या दिवशी उपयोग होईल..+++ माणिक पहिल्या धाग्यावर टीना ने खुप सुरेख
होळीची वार्ली ने रांगो़ळी काढली आहे... तुला शोधावी लागेल.. मला शक्य झाले तर मीच शोधुन टाकते...

कसली भारी आहे ही रांगोळी... मला जमेल का अशी काय माहीत.. टीना, मी ते दोन्ही फोटो डाउनलोड करू का??

ही रांगोळी शोधायच्या निमित्ताने तिथल्या बाकी सगळ्या सुंदर सुंदर रांगोळ्या सुद्धा परत एकदा बघायला मिळाल्या..☺☺

अप्रतिम!! सायुताई, मी रोज नाही काढत.. सणासुदिलाच काढ़ते. रोजच्या रोज एवढ्या नविन कल्पना माझ्या डोक्यात येणे अवघड आहे.. ☺☺ इथल्या एकेक कल्पना नोट मात्र नक्की करूँ ठेवते..

अप्रतिम!! सायुताई, मी रोज नाही काढत.. सणासुदिलाच काढ़ते. रोजच्या रोज एवढ्या नविन कल्पना माझ्या डोक्यात येणे अवघड आहे.. ☺☺ इथल्या एकेक कल्पना नोट मात्र नक्की करूँ ठेवते..

Pages