रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मी एका उडुपी घरात वास्तुशांतीला ही एक वेगळीच रांगोळी पाहिली.
भटजीबुवांनीच काढली होती.
तिला वास्तुकुंडली किंवा नागकुंडली म्हणत होते ते लोक. मास्टर बेडरूममध्ये काढली होती.
बाकी मुख्य पूजेला सेम आत्मुगुरुजी काढतात तशी फुलांची रांगोळी होती.

image_85.jpg

एक अखंड साप, सापाच्या फणीनंतर एक इंग्रजी आठाचा आकडा आणि त्यानंतर गोलाकार समरूप आठ आठचे आकडे. (माझ्या फोटोच्या अँगलमुळे लहान मोठे दिसतायत ते सोडा) अगदी व्यवस्थित अरूंद होत जाणारी सापाची काया आणि शेवटची शेपटी!
सापाच्या अंगावरचे खवलेही रांगोळीनेच किती सुंदर काढलेत!

अर्थात या रांगोळीचा पूजेच्या दृष्टीने अर्थ काय हे आत्मुगुरुजीच सांगू शकतील.

सायु हा धागा सुरु झाल्यापासून मी तुमच्या रांगोळ्यांची विशेष चाहती झाली आहे ..रोज इकडे एक चक्कर असतेच आणि प्रसन्न वाटत आगदी तुमच्या रांगोळ्या बघून ..थीम रांगोळ्यांची आयडीया एकदम भारी आहे.....
फुलपाखरू थीम खूप आवडली ..फुलपाखराच प्रतिबिंब निव्वळ अप्रतिम............

सायु - मागील पानावरील फु पा (शेवटचे) - सुंदरच

डॉ. साती - उडुपी घरात वास्तुशांतीला ही एक वेगळीच रांगोळी >>>>>> जबरदस्त स्कील दिसतंय या गुरुजींकडे - अक्षरशः पेण्ट केल्यासारखी आलीये आणि सुबकता तर ओ हो हो .... फारच सुंदर ... __/\__

शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स .....

व्वा! सर्वच रांगोळ्या मस्त. ती फु.फा. ची प्रतिबिंबवाली तर सुरे़ख आलेय आणि रंगसंगती तर अप्रतिम जमलेय. छानच! १०० मार्क्स! Happy

स्वराली , शोभा छानच आहेत तुमच्या रांगोळ्या.>>>.>>>>ममो., मी नाही गो बाय काढलेल्या. Proud

हि माझी 'प्रथम पारितोषिक' वाली रान्गोळी>>>>>>..स्वरा, अप्रतिम!!!!!!!!!!! रांगोळी आणि लिहीलेलं दोन्ही सुरेख! अभिनंदन! Happy

जबरदस्त स्कील दिसतंय या गुरुजींकडे - अक्षरशः पेण्ट केल्यासारखी आलीये आणि सुबकता तर ओ हो हो .... फारच सुंदर ... __/\__ >>>>>>>>> +१ प्रत्येक सूक्ष्म गोष्ट पण चुकली नाही. खवले, रंग सगळंच उत्तम जमलय. Happy

शांकलीच्या एका बहिणीने (सौ. विद्या) काढलेली दिवाळीतील एक रांगोळी - ती बॉर्न आर्टिस्ट आहे - मेटल कार्व्हिंग, पेंटिंग, रांगोळ्या अशा अनेक गोष्टींमधे तिला जबरदस्त गती आहे ...... Happy

vidya.jpg

साती ताई:- ते वास्तुमण्डल यंत्र आहे.. रांगोळीत काढलेलं. ऋग्वेदाच्या बाष्कल शाखीय पौरोहित्या मधे अशा प्रकारे यंत्र रांगोळीत काढण्याची प्रथा आहे.

अरे व्वा मस्त धावतोय धागा...:)
साती सुंदर रांगोळी, धन्स ईथे शेयर केल्या बद्द्ल.. तसेही ओडीसा चे लोक खुप कलाकार असतात..
शशांक जी, शांकलीच्या बहिणी नी काढलेली रांगोळी कसली सुबक आलीये.. रंगसंगती पण चटकदार..
शोभा मस्त रांगोळ्या शेयर केल्यात.. शेवटची मोराची खुपच क्लास..!

>

सगळ्या रांगोळ्या सुंदर.

मी शुक्रवारी एका प्रदर्शनात गेले होते तिथे फुलांच्या रांगोळ्या होत्या. फोटो कॅमेर्‍यात आहेत. डाउनलोड केले कि इथे टाकेन.

सातीतै .. कसली मस्तयं ती रांगोळी!! खरतरं पेंटिंग वाटतयं

सायु - सुर्रेखच काढलीएस ही रांगोळी ....... सगळी फु पा अगदी एकाच जातकुळीतली ... मस्त>> +१

सायु मस्त रांगोळ्या. रोजरोज किती नविन सुचते तुला !. माझ्या सासूबाई ही दारात रोज नविन नविन डिजाइन्स काढतात. पण त्या फक्त उंबरठ्यावर् च.
सगळ्यांच्याच रांगोळ्या छान.

+१

सायु हा धागा सुरु झाल्यापासून मी तुमच्या रांगोळ्यांची विशेष चाहती झाली आहे ..रोज इकडे एक चक्कर असतेच आणि प्रसन्न वाटत आगदी तुमच्या रांगोळ्या बघून ..थीम रांगोळ्यांची आयडीया एकदम भारी आहे.....
फुलपाखरू थीम खूप आवडली ..फुलपाखराच प्रतिबिंब निव्वळ अप्रतिम............>>>>+१००००००००००००

स्वरा, तुमच्याही रांगोळ्या खुप सुरेख आहेत. आवडल्या. शोभा १, आत्मबंध याम्च्याही रांगोळ्या सुरेख

Pages