रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न काराय नम: शिवाय ॥1॥

मन्दाकिनी सलिल चन्दन चर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै म काराय नम: शिवाय ॥2॥

शिवाय गौरी वदनाब्ज वृन्द सूर्याय दक्षाध्वर नाशकाय।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शि काराय नम: शिवाय ॥3॥

वसिष्ठ कुम्भोद्भव गौतमार्य मुनीन्द्रदे वार्चित शेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै व काराय नम: शिवाय ॥4॥

यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै य काराय नम: शिवाय ॥5॥

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xft1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/12802900_986741711404732_1674873888239289967_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=55934a7776d661a904b3641ac47aa1ba&oe=5755947D

पंचाक्षरमिदं पुण्यं य: पठेत शिव सन्निधौ।
शिवलोकम अवाप्नोति शिवेन सह मोदते ॥6॥

इति शिव पञ्चाक्षर स्तोत्रं सम्पूर्णम्
-----------------------

धन्यवाद आत्मबंध..
कधीकाळी पाठ होतं आता जरा अधे मधे सटपटायला होत..

सायली आजची रांगोळी लवकर टाक गं..
सुप्पर्ब आहे.. आत्ताच सर्वांना सांगुन ठेवते..

सायली - केवळ ग्रेट... तू चांगली प्रोफेशनल चित्रकार आहेस की ... कस्ले भारी रेखाटन आहे हे .... Happy

ॐ नमः शिवाय ||

सायली..लाजवाब, अप्रतिम काय म्हणावं या रांगोळीला... शब्दच फिके पडतात ...ग्रेट कलाकार आहात अगदी

काल महाशिवरात्री झालेली यामपूजा रंगावली (काढायला लागलेला वेळ :- साडेपाच तास )
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xft1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/12799258_982725768480376_8928123153343086100_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dc9dac68c3309cc210b8359776afd78b&oe=576266B6
मन्दाकिनी सलिल चन्दन चर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै म काराय नम: शिवाय ||
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xtl1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/12806259_982725858480367_4880323068930217502_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=61553d70afba12c1a7d117199d880f16&oe=57985235

आत्मबंध पुजेचा आणि रांगोळीचा असा एकुण किती वेळ गेला?

रांगोळी नेहमीप्रमाणे मस्तच आहे. शिवगंधाच्या मधली रेघ जी तुम्ही जरबेराच्या फुलांनी दाखवली आहे ती त्या मरुन गुलाबाच्या फुलांनी दाखवली असती तर जास्त उठुन दिसली असती अस माझ मत..

@ पुजेचा आणि रांगोळीचा असा एकुण किती वेळ गेला? >> काल संध्याकाळी ६ ते आज सकाळी ६ . दर तीन तासाला १ याम पूजा . यात मी रात्रौ ९ ते १२ आणि ३ ते ६ पूजा सांगायला असताना हि रांगोळी केली.

@रांगोळी नेहमीप्रमाणे मस्तच आहे. शिवगंधाच्या मधली रेघ जी तुम्ही जरबेराच्या फुलांनी दाखवली आहे ती त्या मरुन गुलाबाच्या फुलांनी दाखवली असती तर जास्त उठुन दिसली असती अस माझ मत.. ते पांढय्रा भस्मा वर केशरगंध , अशी कॉन्सेप्ट आहे.

ते पांढय्रा भस्मा वर केशरगंध , अशी कॉन्सेप्ट आहे. >>>> ते समजल, पण मला नेमक तेच खटकलय.. केशरगंध उठुन दिसत नाहीये.

सगळ्या रांगोळ्या मस्तच.

नवी मुंबईतील झाडांच्या प्रदर्शनातील खालील रांगोळ्य विविध संस्थांनी आणि कंपन्यांच्या सदस्यांनी काढल्या होत्या.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

प्राची,आत्मबंध्,शशांकजी , मैथिली, जागु, सगळ्याचेच आभार.. रंगोळी आवडली वाचुन खुप आनंद झाला..:)
सायली - केवळ ग्रेट... तू चांगली प्रोफेशनल चित्रकार आहेस की ... कस्ले भारी रेखाटन आहे हे .... स्मित++ शशांकजी तुम्ही नेहमीच खुप कौतुक करता, त्या मुळे खरोखर उत्साह वाढतो आहे...

आत्मबंध खुप प्रसन्न वाटले रांगोळी बघुन..

जागु मस्त ताजा टवटवीत केलास धागा रांगोळ्या टाकुन...

आज रांगोळी मोडावीशी वाटली नाही, उद्या पासुन पुन्हा चेरी थीम.. Happy

पण आले यजमानांच्या मना , तिथे आमचे काही चाले ना! >>> अच्छा अस आहे का ते? मला वाटल तुम्ही तुमच ठरवलय.. मग जाउदे.

Pages