रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरा सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत. मला खास आवडल ते त्या रांगोळ्यांमधला फाईननेस.

शो तै, तु टाकलेल्या रांगोळ्या कुठे काढल्या होत्या? छान आहेत.

शो तै, तु टाकलेल्या रांगोळ्या कुठे काढल्या होत्या? छान आहेत.>>>>>>>>..मुग्धे, त्या गोंदवले इथे वेगवेगळ्या उत्सवप्रसंगी काढलेल्या रांगोळ्या आहेत. Happy

ह्या अजून काही.

१)

२)

३)

मगाशी घाई घाईत माझी रांगोळी पोस्ट केली,बाकीच्यांच्या बघीतल्याच नाही..
स्वरा खुप सुरेख रांगो़ळ्या..ईतके दिवस का नाही आलीस धाग्यावर...

शोभा कीत्ती बहारदार रांगोळ्या, व्वा, प्लीज शेयर करत जा...

स्वराली , शोभा छानच आहेत तुमच्या रांगोळ्या.

सायु, फुलपाखरांची रांगोळी म्हणजे पेंटिंग वाटतय. खूप सुंदर.

@मुग्धटली>> आज १ फुलांच्या सप्तपदीची ऑर्डर होती. तिथे सप्तपदी काढून झाल्यावर फुलं उरली. मग त्याचा वापर मंगळसूत्रपूजेचा चौरंग डेकोरेट करण्यासाठी केला.
----------------

हि ती सप्तपदी.
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xlp1/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/r270/12705359_971836252902661_441407604798249457_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=78bc7099901b45477a094d05af3f646e&oe=572C4E7E

Pages