रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मी दिवाळीत भाऊबिजेला काढलेली.. कुणालातरी आईडिया कामात पडेल.. अजुन आहेत, पण अपलोड होत नाहीयेत.. रोज इथल्या सुंदर सुंदर रांगोळ्या बघुन हुरूप येतो.

सायली - जबरदस्त जमली होती ही फु पा थीम - एकाहून एक ग्रेट अदाकारी .... Happy

माणिकमोती - फारच सुंदर कलाकृती .... Happy

माणिक मोती, मस्त रांगोळी.

सायली फुलपाखरांच्या सर्व रांगोळ्या बेस्ट होत्या. आजपासून नवीन थीम होती ना ? सकाळपासून मी चार वेळा तरी येऊन गेले इथे त्यासाठी (स्मित)

ही मी दिवाळीत भाऊबिजेला काढलेली.. >>>> वा, भाउरायांची मजा आहे माणिक.. मस्त आलीय रांगोळी.

फुल पाखराच्या थीम साठी सगळ्यांचे मनपुर्वक आभार...
असेच उत्साह वर्धन करत रहा.. ----/\----
सायली - जबरदस्त जमली होती ही फु पा थीम - एकाहून एक ग्रेट अदाकारी .... स्मित++ खुप खुप आभार.

सायली फुलपाखरांच्या सर्व रांगोळ्या बेस्ट होत्या. आजपासून नवीन थीम होती ना ? सकाळपासून मी चार वेळा तरी येऊन गेले इथे त्यासाठी (स्मित)++ सॉरी ग हेमा ताई, थोडी बीझी होते, म्हणून उशीर झाला..

. इथे बऱ्याच नविन कल्पना मिळत आहेत..+++ अगदी खरय, मला सुद्धा खुप शिकायला मिळत आहे..

माणिक मोती, काय सुरेख मोर पीसे साकारली आहेत तुम्ही.
आत्म बंध, तुमचे बोटाचे स्ट्रोक्स खुप छान येतात, एक सारखे...

@सायु :- धन्यवाद .

आणि चेरीब्लॉसम ला शुभेच्छा!
येऊ देत अश्याच बहारदार आणखी. Happy

शोभा सगळ्याच रांगोळ्या भारी...
रांगोळी नं ४ काय आहे?+++ ७ ते ४ (दोन्हीबाजुनी, अग खुप सोपी रांगोळी आहे ती)

१)

२)

३)ही खूप मोठी रांगोळी, मोदी गणपती मंदिरात काढली होती. ती संपूर्ण एकाच वेळी दिसत नसल्याने मी खाली ३ भागात देतेय.

१}

२}

३}

Pages