बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक बेसिक प्रश्न : मीनी बाकरवड्या भरडता येतात का? चितळ्यान्च्या मोठ्या बा.वड्या हाताने कुस्करता येतिल ., पण मिनी बा.वड्या कडक असतात असं वाटत.

योकु साध्या श्रीखंडामध्ये ताजी बेताच्या आकारात कापलेली मिळतीजुळती फळं घालायची स्मित>>>>
योकु अगदी बरोबर म्हणुन वेगळी काय रेसिपी लिहिणार या विचारात होते.
मीच फ़्रुट श्रीखंडाचा उल्लेख केला होत काही दिवसांपुर्वी.

साधं श्रीखंड आदल्या दिवशी करुन फ़्रीजमध्ये ठेवलं, दुसर्‍या दिवशी (कार्यक्रमाच्या दिवशी) त्यात आधी दुध मसाला मिक्स केला. नंतर डाळिंबाचे दाणे, चिकु, सफरचंद, केळी (सारख्याच आकाराचे मध्यम तुकडे) , काळी अणि साधी द्राक्ष (मध्ये कापुन अर्धी करुन), काजु बेदाणे (कॅरमल कोट देउन किंवा नुसते पण चालेल). फ़ळे घालुन व्यवस्थीत पण हलक्या हाताने मिक्स केलं, आणि फ़्रीजमधे ठेवलं, लागेल तसं वाढायला घेतलं.
सगळं प्रमाण अंदाजे होत. तरी साधारण सांगते.
चक्का दीड किलो ( घरी केलेला होता) + तेवढीच साखर ( by volume तेवढीच not by weight )
फ़ळं प्रत्येकी पाव किलो + २ मध्यम केळी. द्राक्षं पाव किलोतली थोडी वगळली.
काजु बेदाणे प्रत्येकी ५० ग्रॅम
दुध मसाला एवरेस्ट ५० ग्रॅम ची डबी
अप्रतीम चव येते.

ह कु छान झालं पण सगळ्या बायका-मुलांनी अंदाज साफ चुकवला! Sad

बोरन्हाणातला चिमणचारा बघून मुलं हुरळली नि बाकरवडीचाट कमी खाऊन आयांना ते संपवायचं काम दिलं. दूधही मी जास्त आटवायला जमायचं नाही हे ओळखून ५ लिटरचं केलं, तेही खूप्खूपच उरलं.
(मी एकटी बाजारहाट करून, घर आवरून, रोजचा स्वयंपाक नि लेकीला सांंभाळून दमले होते २ दिवस. त्यात समोर लग्न होतं त्यामुळे सगळे शेजारी लग्नाला जाणार हे समजल्यावर मी ह कु एक दिवस पुढे ढकललं. पण त्या लग्नघरच्या वाजंत्रीच्या आवाजाने लेक घाबरून मला घट्ट चिकटून बसली होता खूप वेळ. तिला कडेवर घेऊन मी निम्मं दूध आटवलं आणि पेशन्स संपले!)

असो. पण तरी इथे मला प्रफेक्ट अंदाज मिळाला. मुलांचं खाल्ल्यामुळे त्यांच्या आया अजून काही जास्त घेऊन खाऊ शकल्या नाहीत. मात्र मेनू छान होता, बाकरवडी चाट प्रकार मस्त आणि वेगळा होता, चवही सुरेख होती असं आवर्जून सांगितलं सगळ्यांनी.
थॅंक्स ऑल! Happy

कृपया फ्रूट श्रीखंडाची कृती नवा धागा उघडून लिहा. मस्त वाटतंय. मी फक्त हिरवी द्राक्षे घालून केलेलं, तीही सोलून आणि चिरून! बाकीची फळे घालायचे कधी डोक्यात नाही आले.

काय सांगता?
कोल्हापूरच्या राजमंदिरचं फ्रूट श्रीखंड खूप छान आहे. कधी संधी मिळाली तर खा नक्की. बाकी फ्रूट श्रीखंडाचा कुठला ब्रांड ऐकला नाहीये.

फळान्मुळे पाणी सुटून फ्रूट श्रीखन्ड एरवीच्या श्रीखंडापेक्षा सैल होऊ शकतं. तसं आवडणार नसेल तर अगदी आयत्यावेळी कापलेली फळं मिसळायची.
आम्हाला श्रीखंड घट्ट/ पातळ कसंही चालतं. थंडगार हवं मात्र.

स्फूर्तीचे फ्रुट श्रीखंड मस्त आहे. पण त्यातली फळे प्रोसेस्ड असावीत असे वाटते म्हणजे अननस, सफरचंद, व इतर न ओळखता आलेली. त्याला बहुतेक व्हॅनिला फ्लेवर असतो..तो पण जरा ओळखता आलेला नाहीये पण ते श्रिखंड मस्त लागते. ती चव काय करून आणता येइल ह्यावर विचार चालू आहे.

अजिनोमोटो नाही घातलं तर चालेलच पण ते घातल्यानी चव एनहान्स होते हे पाहिलंय. वापरू नये असंही आहेच की...

भरत मयेकर ...कृपया फ्रूट श्रीखंडाची कृती नवा धागा उघडून लिहा. मस्त वाटतंय. मी फक्त हिरवी द्राक्षे घालून केलेलं, तीही सोलून आणि चिरून! बाकीची फळे घालायचे कधी डोक्यात नाही आले.>>>>>
http://www.maayboli.com/node/57665

रविवारी येणार्‍या पाहुण्यांनी कोंबडी-वड्यांची फर्माइश केलीये.
वडे + चिकनचा रस्सा+ साधा भात ह्याच्या सोबत गोडाचे काय चांगले वाटेल?

त्याच्यासोबत काय चांगले लागेल ते खरंच कळत नाही कारण अशा चमचमीत जेवणापुढे सगळे गोड पक्वान्न मिळमिळीत वाटतायत. नंतर डेझर्ट म्हणून मस्त थंडगार कुल्फी किंवा फिरनी किंवा स्मूदी किंवा मिल्कशेक किंवा गुलाबजाम विथ आईस्क्रीम किंवा फालुदा ठेवता येईल. ताटातच हवं असेल गोड तर नारळ बर्फी किंवा करंजी किंवा तत्सम सुटं गोड ठेवावे लागेल.

पाटी साठी आदल्या दिवशी ढोकळा करुन फ्रिजमध्ये ठेवला तर चालेल का? त्याचे texture fresh केलेल्या ढोकळ्या सारखेच राहते का?

धन्यवाद.

नाही, तो एकतर कोरडा होईल आणि थंडगार ढोकळा तितकासा चांगलाही नाही लागणार. अगदी फोडणीपासूनची पूर्वतयारी असेल तर बराचसा वेळ वाचवून ताजा ढोकळा नक्की जमेल की!

अगदीच नाही तर अळूवडी, कोथिंबीर वडीचे उंडे आधी वाफवून फ्रीजमध्ये स्टोअर करता येतील. वेळेवर डीप/शॅलो फ्राय करायचे.

हे ही नाही तर फरसाण आयटेम सरळ विकत आणायचे हा का ना का Wink

गुजरात्यांसारखा अगदी हलका, फ्लफी खमण ढोकळा करता आला ज्यावर फोडणीत साखर पाणी घलून ओततात ज्यामुळे तो अगदी मॉइस्ट रहातो तसा ढोकळा मी थंडगार खाल्ला आहे .. चांगली चटणी, तळलेल्या चांगल्या स्वादाच्या हिरव्या मिरच्या असतील तर थंडही चांगला लागू शकेल .. पण ढोकळा अतिशय हलका होणे महत्वाचे वाटते .. तो चांगला मॉइस्ट ही व्हायला हवा .. मग हवाबंद डब्यात ओके राहू शकतो ओव्हरनाईट?

खट्टा ढोकळा बहुधा राहिल चान्गला!
आम्ही ईडियन स्टोअर मधुन कधि मोठा पॅक आणला ढोकळ्याचा तर फ्रिज करतो दुसर्‍यादिवशी खातो लेफ्ट-ओव्हर... चान्गला अस्तो म्हणजे आदल्यादिवशी सन्ध्याकाळी आणलेला दुसर्‍या दिवशी लन्च पर्यत ( त्यापेक्षा जास्त उरत नाही)
फारच शन्का असेल तर बाकरवडी चाट करा..

करायला काय - अळूवडी, कोथिंबीर वडी, कोबी वडी, मेथी मुठीया, पालक वडी इ. मिनी इडली, मिनी समोसा, मिनी बाकरवडी, मिनी कॅप्री/कबाब स्कीवर्स, मिनी थालीपीठ - मस गोष्टी आहेत.

बाकी मेन्यू काय आहे आणि किती लोक्स आहेत सांगा, मग मायबोलीकर बेश्ट बेत सुचवतात

Pages