बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माय्बोलिचा आधार वाततो. माबोवर खुप बागदुन झाल कि माबोमुले कामात चूका केल्या म्हनुन नोतिस मिलते. मग माबोपायि कामावर गेल नाहि म्हनुन काधुन ताकतात. मग माय्बोलिचा खुप आधार वाततो. मग खुप लिहव्सं वाततं. विचरवसं वाततं. बेत काय कलावा ?

साती, Proud शेवट असाच होईल असं काही नाही हां, एवढं सगळं करून पुन्हा मायबोलीवर सल्ला मागायची सोय राहिली नाही असं पण लिहीता येतं. Lol

तर आज या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं की बाकरवडी चाटची पाककृती गेल्या गणेशोत्सवात येता येता (विचित्र नियमांमुळे Proud ) राहिली. तेव्हा या व्यासपीठा वरून मी मंजूडी यांना जाहीर आवाहन करते की ती पाककृती व तोंपासु फोटो त्यांनी लवकरात लवकर प्रकाशित करून वंचितांचा विकास करावा. धन्यवाद. Happy

बाकरवडी चाट हा प्रकार इंटरेस्टिंग वाटत आहे. कृपया बिगारीतल्या लोकांसाठी सविस्तर नीट पाककृती देणेचे करावे.
>>
+१
हा प्रकार माहीतच नव्हता. कधी डोक्यातही आला नाही.
नीट पाकृ द्या मी करते लगेच

गेल्या गणेशोत्सवात येता येता (विचित्र नियमांमुळे :फिदी:) राहिली.
>>
कोण रे ते त्या नियमांना विचित्र म्हणतंय? Proud
(अ‍ॅक्च्युअली मला लूक वू इज टॉकिंग म्हणायचंय पण टिमवर्क टिमवर्क Lol )

इथे काही इस्रायली सहकार्‍यांसोबत पिकनीक आहे .. साधारण २०-२२ जण आहोत... खायला काही तरी घेउन जायचे आहे आणि त्यांना भारतीय पदार्थच खायचे आहेत. काय आणि किती घेउन जाउ?

बटाटेवडे खातील का ते? मध्यम आकाराचे माणशी २ बटाटेवडे तरी किमान लागतील. (पिकनिकला इतरही खाद्यपदार्थ असतील हे गृहित धरून!) वडापाव चटणी किंवा बटाटेवडे व चटणी, सॉस. सोबत गोड म्हणून मँगो शिरा किंवा पायनॅपल शिरा.

आप्पे पण धावतील की!
चिंटू इडली फ्राय
समोसा भेळ पण एक मस्त प्रकार आहे. माणशी एक समोसा आणि बाकी भेळेचं साहित्य. गारही छान लागते.

मंजूडी, प्लॅनिंगच्या पोस्ट्बद्दल सा. न.

माझ्या आईची एक टीप - पदार्थ मोजून ठेवावेत (अगदी चटणी-मिठासकट) आणि वाढल्यावर / बुफे मांडल्यावर मोजून सगळे पदार्थ तिथे आल्याची खात्री करून घ्यावी.

आशुडी Proud मी गेले कित्येक दिवस वाट बघतोय की मंजूडी आज टाकेल उद्या टाकेल. आता मंजूडीला धमकीच दे. तू टाकत्येस का मी टाकू Wink

कुणी टाकायची त्यांनी टाका फक्त त्याला बावचाट वगैरे म्हणू नका प्लीज Proud

"बाव" हा माशाचा तुकडा किंवा चिकन/मटणाचा छोटा तुकडा मुलं लहान असताना लाच म्हणून देण्यासाठी वापरताना जास्त वापरला जायचा व्हर्सेस बाकरवडी Proud बाव म्हटलं की माझी बचपनची यादें तांजा होतात अगदी माझ्या भाच्यांना पण हाच शब्द वापरायचो. अवांतर, माझी मुलं मात्र सरळ चिकन/मटण्/कोळंबी/पापलेट असे स्वच्छ उल्लेख करतात.

>> बावचाट

Lol

पण मी काय म्हणते एखाद्या चाट ची कृती लिहावी लागते का? चाटच तो .. कांदा, कोथींबीर, लिंबू आणि असं सिमीलर साहित्य काय हवं ते घातलं की झाला ना चाट?

ते बरोबर आहे सशल, ते वरचं डिस्कशन नीट वाचलंस तर काहीतरी पाणी (का चाटमसाला) मुरतोय हे लक्षात आलं नाही का Wink

जनरल गम्मत म्हणून लिहितेय पण हवा असल्यास Light 1

कांदा, कोथींबीर, लिंबू आणि असं सिमीलर साहित्य काय हवं ते घातलं की झाला ना चाट? >> मी झाले की चाट Wink
बटाटा, चिंच ते सिमीलर मध्ये टाकलस का? नाहीतर चिंच-खजूर शिवाय कुठलेही चाट नको.

>> बावचाट>> वेका Lol

पण मी काय म्हणते एखाद्या चाट ची कृती लिहावी लागते का? चाटच तो .. कांदा, कोथींबीर, लिंबू आणि असं सिमीलर साहित्य काय हवं ते घातलं की झाला ना चाट?>> नाय सशल! या कॉर्नचाटमध्ये कांदा, कोथिंबीर नाही, शिवाय चाटच्या सुप्रसिद्ध चटण्या पण नाहीत. आणि याव्यतिरीक्त अनेक प्रकारांनी कॉर्नचाट करतात आणि खातात.

मी काय म्हणते, संयोजकांनी जरा ती बाकरवडी चाट लिहून पाठवलेली ईमेल पुन्हा मला ढकलून उपकृत करावे. माझ्या इनबॉक्सात सापडत नाही, आणि फोटो बहुतेक कुठेतरी आठवणीने सुरक्षित ठेवलेल्या बॅकपमधे पहुडलाय.
आणि अजून एक म्हणजे आता नव्या उपक्रमासाठी नवं संयोजक मंडळ स्थापन झालंय. ते 'पारंपरिक मराठी पदार्थांचे फ्युजन' वगैरे टाईप पाकृस्पर्धा घोषित करत आहेत का याची वाट पाहावी का बाकरवडी चाट प्रकाशित करण्यासाठी? Proud

आणि हॉटडॉग मध्ये कुत्रा नसतो, शंकरपाळीत शंकर नसतो तसं या चाटमध्ये (चितळ्यांची ती जगप्रसिध्द) बाकरवडीही नाही! Lol संयोजकांनी जरा ती बाकरवडी चाट लिहून पाठवलेली ईमेल पुन्हा मला ..>> बघा, म्हणजे शेवटी संयोजकांच्या हातानेच त्या चाटचा उध्दार व्हायचं लिहून ठेवलेलं आहे तिच्या नशीबात. Proud

अमा, गेल्या दोन तीन वर्षांत बहुतेक सर्व स्वीट्स शॉप्स, तयार खाऊ ठेवणारे मिनी मार्केट / ग्रोसरी स्टोअर्स / फूड शॉपीज् मध्ये ही मिनी बाकरवडीची पाकिटं विक्रीला ठेवलेली पाहिली आहेत.

योकु, आप्पे, मिनी इडली फ्राय आणि भेळ हीदेखील मस्त सजेशन्स. भेळेतला कच्चा कांदा कितपत आवडेल म्हणून मी भेळ सुचवायला चांचरत होते. पण इडली, आप्प्यांना तसा प्रॉब्लेम नसतो. क्वान्टिटी मात्र २०-२२ लोकांसाठी मजबुतीत लागेल. उडीदवडे-चटणी हाही एक पर्याय आहे.
किंवा जर पोटभरीचा खाऊ हवा असेल तर सरळ आलूपराठे / मेथीपराठे - लोणचं - सॉस - दही - चटणी किंवा बुंदी रायता व दहीभुत्ती.

फूड शॉपीज् मध्ये ही मिनी बाकरवडीची पाकिटं विक्रीला ठेवलेली पाहिली आहेत.
>> पण ती कॉपी कॅट वाटतात. खुद्द पुण्यात आणि दुसृयांची बाकरवडी. चितळे ला पर्याय नाही . मीतर ऑनलाइन मागवून खाते.

मीतर ऑनलाइन मागवून खाते. >>> आणि माझं उलटंच. मला चितळेंची बाकरवाडी इतकी काही ग्रेट वाटत नाही. फार प्रस्थ माजवलं आहे आम्ही पुणेकरांनी असं वाटतं. अगदीच ताजी ताजी आणली तर २-३ खाल्ल्या जातात पण विशेष आवडतच नाहीत. अमा, हे म्हणजे पिकते तिथे विकत नाही याचं उदाहरण. Happy

मला चितळेंची बाकरवाडी इतकी काही ग्रेट वाटत नाही. फार प्रस्थ माजवलं आहे आम्ही पुणेकरांनी असं वाटतं.>> मी बाकरवडी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली तेव्हा लायनीत उभे राहून साडेदहाला वाफाळती ताजी खाल्लेली आहे. लव्ह अ‍ॅट फर्स्ट बाइट. बॅक इन द सेवंटीज. काका हलवाई कॉपी करतो असे तेव्हा ही वाटायचे. आता तर प्रश्नच नाही. तुम्हा आयटीवाल्या पुणेकरांच्या मताचे काही माहीत नाही ब्वा.

चितळे हॅज नो कंपॅरिझन.जर त्या आवडल्या नसतील तर त्या ताज्या खाल्या नसतील.
बाकी एक दोन प्रसिद्ध बाकरवड्या खाऊन पाहिल्यावर मत पक्कं झालं.

मनिमाऊ + १
मला चितळेपेक्षा (उदा.पिवळा पेढा जो गुरुवारी मिळतो तो) रीगल्,कराची च्या मिठाया जास्त आवडतात.बहुधा कॅम्पच्या अतिप्रेमा मुळे. Wink Happy

चितळेंची ताजी बाकरवडी तोंडात शब्दश: विरघळते!!
पिकते तिथे विकत नाही >> पुण्यात चिक्क्क्क्क्क्क्कार खप आहे चितळ्यांच्या बाकरवडीला मनिमाऊ! Happy
काका हलवाईचीही चांगली असते, वेगळी असते चवीला. पण चितळ्यांची चव नाही.
मिनी बाकरवड्या मात्र सगळ्या एकसारख्याच लागतात.
बर त्या मिबावचाटच्या पाककृतीचं काय झालं? मभादि आला. गणेशोत्सवातले मतभेद विसरा आता आणि काय ती कृती प्रकाशित करा ब्वा एकदाची! Proud Light 1

संयोजकांनी (नेहमीप्रमाणे) त्यांची कामगिरी चोख पार पाडलेली आहे आता फक्त त्या दिव्यक्षणाची वाट बघणे एवढेच आपल्या हातात आहे. Wink
चितळ्यांच्या बाकरवडीला काय बोलायचं नाय!

Pages