बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mi-anu क्या बात है. आपने तो दिलकी बात जान ली. छोले चाटचाही किडा वळवळतोय डोक्यात. त्यातही अमृतसरी छोल्यांचा प्रयोग करुन बघायचाय. छोले शिजतानाच तिखट आणि गोड चटणीचे साहित्य वाटून त्यात टाकायचे. वरुन मग दही, कच्चा कांदा, बारीक शेव , कोथिंबीर. चवीसाठी चाट मसाला, काळ मीठ इ. प्रकरण नक्कीच वाईट लागणार नाही.

भेळ सर्व्ह करतानाच काचेच्या छोट्या बोलमध्ये किंवा द्रोणात केल्यास त्यानुसार भेळभत्ता (चुरमुरे, फरसाण, शेव, बुंदी वगैरेंचे भेळवाल्याकडे मिळणारे कोरडे मिश्रण), कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, शेव, पुऱ्या, कैऱ्या, चटण्यांचे अंदाज बांधणे सोपे जाईल. मिरचीचा ठेचा, चिंचेचा कोळ वगैरे. उत्तम उपाय म्हणजे ओळखीच्या भेळवाल्याकडे जाऊन त्यालाच पोर्शनचे प्रमाण, घटकपदार्थांचे प्रमाण विचारणे. तिथे गर्दीच्या वेळी उभे राहून निरीक्षण केल्यास आणखी युक्त्या नजरेत येऊ शकतात. भेळवाल्याकडची भेळ तयार होताना बघणे हा एक संस्मरणीय अनुभव असतो! Happy

* भेळेतील ओले साहित्य (कांदा, टोमॅटो, कोथिंबिर, चटण्या वगैरे) जास्त प्रमाणात उरल्यास ते वापरून बनवायच्या जेवणाचे मेनू आत्ताच प्लॅन करू शकता! Lol

स्वप्नाली बायका आणि मुल धरून साधारण ३५. मी रगडा घेताना प्रत्येकी लहानसर एक मुठ अस प्रमाण घेतलं होत.
सगळ्यांनी हव ते आणि हव तसं स्वतःच घेतलं . मला इंग्रोत बारक्या केशराचा डब्या मिळाल्या होत्या त्या दिल्या .

आत्ता संक्रांत हकुंला सिंपल मिसळ (मटकी बटाटा उसळ + फरसाण + कट), स्लाईस ब्रेड, मँगो शिरा आणि दहीबुत्ती असा मेन्यु होता. उत्तर व दक्शीण Sad भारतीयांना खुप आवडला. वाण - उदबत्ती व छोटे हँड सानिटायझर.......

येत्या रविवारी माझ्याकडे १५ माणसे दुपारी जेवायला आहेत.
मेनु असा आहे:-
पोळ्या ( विकतच्या )
फ़्रुट श्रीखंड ( चक्क्यासहीत घरीच )
तिळाचं पंचामृत
वरण भात
शेंगाची आमटी
मटकी उसळ
पापड, दही-ताक.

अजुन काही सुचवा आणि वरच्या मेनुसाठी साधारण अंदाज सांगा.

आणि संध्याकाळी साधारण ७-८ लहान मुले (अथर्वच बोरनहाण) आहे त्यासाठी आहेत. त्यांना द्यायला काहीतरी सुचवा.

हळदी-कुंकु आहे त्यासाठी ३० बायका +१० नातेवाईक वगैरे येतील साधारण ४०-४५ त्यांना कॉफ़ी देणार त्यासाठी पण अंदाज सांगा.

पोळ्या ( विकतच्या )>>> ३०+५ पोळ्या.
फ़्रुट श्रीखंड ( चक्क्यासहीत घरीच )>> साधारण १ किलो चक्क्याचं पुरेल.
तिळाचं पंचामृत>> अर्धी वाटी चिंचेच्या कोळाचं प्रमाण घे.
वरण भात >> पहिला आणि मागचा भात धरून चार वाट्या तांदळाचा भात पुरेल. एक वाटी तुरीच्या डाळीचं वरण पुरेल, कारण आमटी पण आहे.
शेंगाची आमटी >> आमटीसाठी एक वाटी तुरीची डाळ.
मटकी उसळ >> अर्धा किलो मटकी भिजत घाल.
पापड, दही-ताक.

या मेनूत अजून पदार्थ म्हणजे तळणीचे किंवा फरसाण आयटम नाहीयेत. ढोकळा/ अळूवडी/ सुरळीच्या वड्या/ कोथिंबीर वड्या वगैरे आणता/ करता येतील.
मुलांना द्यायला स्केचपेन्स/ क्रेयॉन्स/ रूमाल/ छोट्या डब्या गोळ्या-चॉकलेटं भरून/ साबणाचे फुगे उडवण्याची पिचकारी (किंवा जे काही म्हणतात ते) इत्यादी बघ.

कॉफीसाठी - एक लिटर दुधात साधारण १० कप (नेहमीचे चहाचे कप) बसतात. कॉफी कशातून देणार, किती देणार, कॉफी पूर्ण दुधाची करणार की दूधपाण्याची करणार यानुसार अंदाज घे.

सोपी अशी एखादी कोरडी भाजी व कोशिंबीर अॅड करता येईल वरच्या मेनूत. गाजराची कोशिंबीर व उकडलेल्या बटाट्याची भाजी??

धन्यवाद मंजिरी ताई आणि अकु,
आमच्याकडे तळणीचं आवडणारी मणसं अगदी मोजकीच आहेत. (म्हणून श्रीखंड असुनही पुर्‍यांपेक्षा पोळ्या बर्‍या असं आहे)
तर ढोकळा करायचा विचार आहे. त्यासाठी पण अंदाज सांगा.
सगळा मेनु एकटीने करायचा आहे त्यासाठी नियोजनाच्या काही अनुभवी टिप्स द्या.

ममो, १५ माणसं आणि हा बेत माझ्याकडे श्रावणात किमान एकदातरी होतोच Wink
कधी मटकीच्या उसळीची जागा बटाट्याची भाजी घेते, कधी पुलाव/ मसालेभात, कधी टो.सार/ सोलकढी अशी अदलाबदल होते, पण एवढीच, ना कम ना ज्यादा Proud

मुग्धा,
शनिवारची कामं-
१. सकाळी मटकी भिजत टाकणे.
२. चिंच भिजत टाकणे.
३. चक्क्यात (जो तू बहुतेक शुक्रवारी करशील) साखर घालून ठेवणे.
४. पंचामृताच्या साहित्याची जमवाजमव करून दुपारी पंचामृत तयार करून ठेवणे. नीट थंड झाल्यावर कोरड्या बाटलीत भरून ठेवणे. गरज वाटल्यास बाटली फ्रिजमधे ठेवणे. दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर काढून ठेवणे.
५. संध्याकाळी मटकी उपसून ठेवणे. उसळ/ आमटीसाठी खोबरं खरवडून ठेवणे. कढीपत्ता मिरच्या कोथिंबीर निवडून ठेवणे. आमटीसाठी शेंगा सोलून तुकडे करून डब्यात भरून फ्रिजमधे ठेवणे.
६. मग श्रीखंड तयार करून फ्रिजमध्ये ठेवणे.
७. रात्री दह्याताकाची विरजणं लावणे.
८. ताटं वाट्या भांडी चमचे इत्यादी सेट तयार करून एका जागी चटकन मिळेल असा ठेवणे.

रविवारची कामं-
१. तुरीची डाळ भिजवणे.
२. नाश्त्याचं काय आहे ते खाऊन घेणे.
३. मटकीची उसळ करणे. बाजूच्या गॅसवर वरणाचा कूकर करून घेणे.
४. उसळ होईतो पोळ्या आल्या असतील तर त्या डब्यात भरून ठेवणे.
५. ढोकळा करून घेणे. (याच्या कृती/ नियोजन/ अंदाजाला माझा पास)
६. तोवर वरणाचा कूकर उघडला असेल. वरण सारखे करून ठेवणे. शेंगांची आमटी करून घेणे.
७. मग भाताचा कूकर लावून जेवणाची तयारी करणे.
८. जमलेल्या मंडळींपैकी कोणाला तरी ताक घुसळायला सांगणे.
९. जमेल तसं एका ट्रेमधे मीठ, तूप, लिंबाच्या फोडी, पंचामृताचा बाऊल, दही वगैरे काढून ठेव. म्हणजे डावी बाजू एका जागी राहिल.

मला लहानपणी शाळेच्या किंवा इतर पुस्तकातलं 'चांगल्या सवयी' हे सचित्र पान वाचायला खूप आवडायचं. आता मंजूडीची वरची पोस्ट वाचून अगदी तसंच वाटलं. चित्रंही दिसली डोळ्यांसमोर. मंजूडे, एक मुजरा स्वीकार व्हावा. Happy

नाश्त्याचं काय आहे ते खाऊन घेणे.>>>> हा माझ्यासाठी हिट आयटेम आहे.:फिदी:

मन्जूडी, अकु आणी पटापट असे सुचवणार्‍या सर्व मायबोलीकरणीना सलाम. असा उरक माझ्यात नाही, पण इथल्या पोस्टी आणी सल्ले वाचुन हुरुप मात्र येतो.

अय्या! पापड राहिले तळायचे. आणि उसळ-आमटी-वरण पुन्हा गरम करायचं राहिलं.
तर, असं होऊ नये म्हणून आपण ठरवलेला मेनू आपल्याच सतत डोळ्यांसमोर राहिल असा लिहून ठेवावा. फ्रिजवर मॅग्नेटने लावता येईल नाहीतर स्टिक इटवर लिहून गॅसच्या मागच्या टाईल्सवर चिकटवून ठेवता येईल.

आशू, थँक्स! Happy
लहानपणापासून आजी-आई-मावश्यांची शिस्तबद्ध कामं पाहिली आहेत. आजी म्हणते आपण त्या दिवशी काय करणार आहोत ती सगळी कामं डोळे बंद करून डोळ्यांसमोर आणावीत. म्हणजे, उसळ करण्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवली, फोडणीसाठी त्यात तेल घातलं, एका ताटलीत फोडणीत घालायचे आयटेम्स तयार आहेत असं कल्पनाचित्र रंगवलं की आयत्यावेळी गोंधळायला होत नाही. Happy

मंजूडी, आजी आईच्या शिस्तीबद्दल अगदी अगदी Happy . कितीही माणसे येणार असली तरी कोणत्या दिवशी कोणती कामे करायची हे ठरलेले असते. आजी ही सगळी लिस्ट मनात तयार करायची, आई पेपरवर लिहायची, मी स्मार्ट फोनवर करते Happy

मंजूडी, तू आजवर लिहिलेली सर्वात मस्त पोस्ट Wink

मी अशी सर्व कामे टायमर लावून करते म्हणजे काही विसरत नाही.

मस्त! अगदी काटेकोर नियोजन्बद्द, आई पण मनातच करते, त्यात तिच एकिकडे सिन्क मधए पडेल ते पण हातावेगळ करण चालु असत सगळ झाल तरी कधी तिच्या ओट्यावर पसारा नसतो...
फिजवर मेनु लावणे मस्ट आहे.

आजी म्हणते आपण त्या दिवशी काय करणार आहोत ती सगळी कामं डोळे बंद करून डोळ्यांसमोर आणावीत. म्हणजे, उसळ करण्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवली, फोडणीसाठी त्यात तेल घातलं, एका ताटलीत फोडणीत घालायचे आयटेम्स तयार आहेत असं कल्पनाचित्र रंगवलं की आयत्यावेळी गोंधळायला होत नाही. >>
हे हेडर मधे घाला वाक्य.

( अवांतर - बार्क्याच्या कॉम्पिटीशन ला जाताना गाडीत जिम्नॅस्टिक रूटीन ची अशीच उजळणी करुन घेत जा असं एका कोचने सांगितलं होतं. बार्क्या अगदी इमाने इतबारे प्रत्येक रूटीन हातवार्‍यांसकट आम्हाला सांगत असतो गाडीत )

फ्रीजवर किंवा सहज दिसेल अशा ठिकाणी मेनू लिहून ठेवणे अगदी मस्ट.

मंजूडी, मस्त मस्त नियोजन!

नेट / पुस्तकातली कोणती पाकृ वाचून करणार असाल तर पाकृचे पान / नेटवरची कृती / स्वहस्ताक्षरांत लिहिलेली कृती याही किचनमध्ये सहज सापडतील व दिसतील अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे!
मुखवासाची तयारीही अगोदरच करावी. विडे लावायचे, ते दोऱ्यात ओवून ठेवायचे किंवा फ्रीजात ठेवायचे, सुबकपणे मांडून ठेवायचे वगैरे.
मी स्वत: एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच कोणता जेवणाचा घाट घातलेला नाही. परंतु नियोजननिपुण आई, मावशी, काकू वगैरे स्त्रियांना असेच काम करताना पाहिले आहे.

Pages