नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .
इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला 
पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?
संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . 
लिंब्या , ती यादी अनादी अनंत
लिंब्या , ती यादी अनादी अनंत आहे... केवळ नमुन्यादाखल काही नावे लिहिलेली आहेत.
लो ... मोगा ... तुझा द्वेस
लो ... मोगा ... तुझा द्वेस कोन करतो?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?>>>
एका जमातिचा आहे म्हणुन राग नाही. पाकीस्तान मध्ये प्रमो केले म्हणुन किंवा आपत्तीच्या वेळी मदत केली नाही म्हणुन पण मला राग नाही. पण वानखेडे वर घातलेला धिंगाणा पाहुन राग येतो. नियम हे सगळ्याना सारखेच असले पाहिजे. आणि झाल्या प्रकाराची मागितल्याचे मला तरी आठवत नाही.
अमिर खान, दिलिप कुमार सारख्या कलाकारानी असे कधी केले नाही. दिलिप कुमार पण पित होते. पण त्यानी असा धिंगाणा नाही घातला.
नंदिनी, पब्लिक फोरमवर शक्य
नंदिनी, पब्लिक फोरमवर शक्य नाही असं म्हणतेस खरं पण मग इकडे जेवढं लिहिलं ते तरी का लिहायचं? लिहायचं तर पूर्ण लिही किंवा पूर्णच मोह टाळ. हा काही डेली सोप नाही जिथे उत्कंठा वाढवायला म्हणतात 'जानने के लिए देखिये सिमरन का ससुराल' वगैरे.
करण जोहर , फराह चे पिक्चर
करण जोहर , फराह चे पिक्चर करुन शाखा पॉप्युलॅरिटीने वाढला पण अॅज अॅ़क्टर म्हणून फारच लिमिटेटेड राहिला, स्वतः सुपरस्टार असल्याच्या तो इतका प्रेमात होता की स्वतःवर वेगळे काही प्रयोग करायचे धाडसच त्याने दाखवैले नाही, जे प्र्योग आमिरने आणी काही प्रमाणात रितिक ने सातत्याने केले तस धाडस शाखाने कधीही दाखवल नाही....त्यामुळे प्र्च्नड क्षमता असुन त्याने स्वतःला फार लिमिटेड केल्याचे दु:ख आहे.
पण तो प्र्चन्ड हुषार आहे, त्याला विचारलेल्या प्र्श्नावर तो नेहमी पॉलिटिकली करेक्ट उत्तर देतो, बाहेरुन येवुन इथे स्थान मिळवले आहेच..
बाकी कुणी म्हटल्याने कुणाचा पिक्चर आपटत नसतोच, ते पब्लिकच ठरवते.
शा खा अभिनेता म्हणून मला
शा खा अभिनेता म्हणून मला क्वचितच आवडला. स्वदेस, चक दे वगैरे एक दोन चित्रपट सोडल्यास त्याचा अभिनय अजिबात आवडला नाही. उलट प्रत्येक सिनेमात तो दुसर्याची हीरवीण पळवायच्या मागे का असतो हा प्रश्न मी नेहमी विचारत असे. असो, पण म्हणून त्याच्याबद्दल द्वेश नाही. मला तो देशद्रोही वगैरे वाटत नाही. अगदी वानखेडे वर केलेला हंगामा पण "डोक्यात हवा गेलेल्या सेलेब्रिटीचा" एवढाच होता. पण हे मात्र मान्य कि तो सेल्फ मेड आहे. इंडस्ट्री मधे इतकी वर्ष टिकून आहे, त्यामागे त्याचे कष्ट निश्चितच आहेत (बाकि पडद्यामागे काय काय भानगडी केल्या असतील देव जाणे)
भारतीय लोकांना फिल्मस्टार व क्रिकेट वाले "सर्वगुणसंपन्न च" असायला लागतात. आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे ज्याची त्याची जी काही असेल ती अपेक्षा पूर्ण करणारा. म्हणून मग सिगारेट ओढतो म्हणून वाईट, आमच्या लोकांना मदत केली नाही म्हणून वाईट, पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं म्ह्णून वाईत असे वैयक्तिक पण साधारण बर्याच लोकांना पटतील असे भावनिक मुद्दे उगाळून त्याला शिव्या घातल्या जातात. क्रिकेट पटूंना नाही का असच केलं जात? जेवढं स्टारडम जास्त तेवढी ही अपेक्षा जास्त. अमिताभ सारख्या अभिनेत्यानी पण त्याचा अनुभव घेतला व तो शिकला किंवा त्याला कोणत्या बाबतीत स्वतःचं नाव पुढे येऊ द्यायचं हे जमलं.
ज्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप
ज्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप आहे ज्याने भरपाई सुध्दा पुर्ण दिली नाही (त्यामागचे सत्य जनतेला ठाऊक आहे) अश्या माणसाचा चित्रपटाला बघू नये ही मागणी कोणी करत नाही अथवा असे आवाहन देखील कोणी "देशभक्ताने" केले नाही पण फक्त अमुक तमुक बोलला म्हणून शाहरुखचे चित्रपट बघू नये असा फतवा महामुर्खांनी लगेच काढला
यावरून देशाच्या लोकांचे ब्रेनवॉश कश्यापध्दतीने केले जात आहे हे दिसून येत आहे.
म्हणुन पण मला राग नाही. पण
म्हणुन पण मला राग नाही. पण वानखेडे वर घातलेला धिंगाणा पाहुन राग येतो. नियम हे सगळ्याना सारखेच असले पाहिजे. आणि झाल्या प्रकाराची मागितल्याचे मला तरी आठवत नाही.
>> हेच मला म्हणायच आहे . त्याने वानखेडे वर केले ते चुकीचेच . पण तेवढ्यावरून त्याचा राग करायचा झाला तर बाकीच्या इंडस्ट्रीला भारताबाहेर काय जगाबाहेर टाकाव लागेल .
याच्यापेक्षा कितीतरी मोठे प्रताप केलेले कितीतरी आहेत , त्यांचा का राग येत नाही हे मला कळत नाही
करण जोहर , फराह चे पिक्चर
करण जोहर , फराह चे पिक्चर करुन शाखा पॉप्युलॅरिटीने वाढला पण अॅज अॅ़क्टर म्हणून फारच लिमिटेटेड राहिला, स्वतः सुपरस्टार असल्याच्या तो इतका प्रेमात होता की स्वतःवर वेगळे काही प्रयोग करायचे धाडसच त्याने दाखवैले नाही, जे प्र्योग आमिरने आणी काही प्रमाणात रितिक ने सातत्याने केले तस धाडस शाखाने कधीही दाखवल नाही....त्यामुळे प्र्च्नड क्षमता असुन त्याने स्वतःला फार लिमिटेड केल्याचे दु:ख आहे.
>> सहमत . त्याने चक दे , स्वदेस केले . पण अगदी थोड हे मान्य .
माझा मुद्दा परत एकदा अगदी
माझा मुद्दा परत एकदा अगदी थोडक्यात मांडतो .
तो अगदी सर्वोत्तम अभिनेता नाहीच , पण अगदी टाकाऊ नाही .
तो परफेक्ट माणूस नाही , पण अगदी दुष्ट अन इतराना त्रास देणाराही नाही
आपल्या फॅमिलीला जपून राहणारा त्याबाबतीत तरी अगदी सामान्य माणूस आहे .
असे असताना त्याचा अकारण राग का ? ( पुन्हा एकदा , अभिनयाच्या मर्यादेबद्दल टीकेला काहीच आक्षेप नाही )
असे असताना त्याचा अकारण राग
असे असताना त्याचा अकारण राग का ?>> सोशल मिडिया नावाचा अत रन्गी प्रकार कारणीब्भुत आहे याला, .. ५ मोजक्या लोकानी हे उठव्याच मग फॉरवर्ड मेसेज मधुन पाचाचे --५०० --५००० व्हायला कितिसा वेळ लागतो? ...फ्ल्युक असतय ओसरत आपोआप काळ गेला की...
राग येणार्यांत अनेक कट्टर
राग येणार्यांत अनेक कट्टर हिंदुत्ववादी असतील. पण इतरही असंख्य असे आहेत ज्यांना तो आवडत नाही. का आवडत नाही हे कसे सांगणार? प्रत्येकाचा चॉईस. त्यांना राग बिग येत नाही (वानखेडे वगैरे सोडल्यास) पण आवडत नाही.
एक तिसरा गट आहे. फक्त चक दे, स्वदेस व इतर एक दोन पिक्चर्स मधे आवडणारा.
मला सुरूवातीला आवडत नसे. रोमॅण्टिक रोल्स करू लागल्यावर आवडू लागला. करीयर मधे आवडण्याचा ग्राफ शाखाचा खालून वर असेल, तर आमिर चा वरून खाली
जय हो" चित्रपट सुध्दा ठरवून
जय हो" चित्रपट सुध्दा ठरवून फ्लॉप केलेला का?
माझ्यापुरता सांगायचं तर
माझ्यापुरता सांगायचं तर त्याचे सुरुवातीचे फौजी, डर, बाजीगर, अधुन मधून चक दे, स्वदेस वगैरे परफॉर्मन्सेस आवडले. करण जोहर - आदित्य चोप्रा कॅटेगरी (दिल तो पागल है, कुछ कुछ होता है ई.) नाही आवडले. मुलाखती मस्त देतो. he is shrewd. अॅरोगन्स हा त्या विश्वाचाच एक भाग आहे, त्याशिवाय त्यांचं सेलेब्रिटीत्व टिकणार नाही. तो अमुक तमुक रोज खाली भाजी घेताना दिसतो ह्या वाक्यात त्या अमुकक तमुक ला सामान्यत्व दिलं जातं. बायकोला आवडतो म्हणून थोडी जेलसी आहे (नाईलाज आहे).
मला वाटतं, सामान्यातून येऊन ईतका मोठा झाल्यामुळेच एक जेलसी / राग आहे का? शाहरुख खान, सचिन तेंडुलकर ही माणसं सामान्यातून येऊन हात न पोहोचण्याईतकी (हे एक परसेप्शन) मोठी झाल्यामुळे त्यांच्याविषयी ही जेलसी येते का? मग उगाच त्यांच्या intangible, qualitative values (उदा. देशभक्ती, समाजाविषयी कळकळ ई.) विषयी गळे काढायचे. रोज कामावर जाताना बाकी माणसं सोडा, पण सैनिक सुद्धा देशभक्तीनं भारून, त्वेषानं छाती पुढे काढून, डोळ्यातून अंगार सांडत वगैरे जात नसावेत / नाहीत. अगदी संत-महंतांचं माहीत नाही, पण सतत समाजाविषयी कळवळा, कणव वगैरे कुणाच्या मनात पाझरत असेल असं मला तरी वाटत नाही. वेळ आल्यावर सगळेच स्वतःच्या कुवतीप्रमाणे, मगदुराप्रमाणे, आणी कधी कधी peer / social pressure मुळे थोडं फार रिअॅक्ट करतात. त्यावरून त्या माणसाचं त्याच्या कार्यक्षेत्रातल्या कामगिरीचं मुल्य-मापन होऊ शकत नाही. आणी नोकरी / व्यवसायातल्या ज्या तडजोडी असतात (हाच रोल का केला, त्या अमुक माणसाबरोबर काम का केलं वगैरे) ह्या गोष्टींवर काठावर बसून दगड मारणं सोपं आहे, पण सगळ्याच गोष्टीत आपल्या किंवा आपल्या क्रिटीक्स च्या मताप्रमाणे करणं शक्यही नसतं आणी योग्यही नसतं.
फेरफटका , छान पोस्ट
फेरफटका , छान पोस्ट
खरं राग येणारे लोकं तरी किती
खरं राग येणारे लोकं तरी किती आहेत? असा प्रश्न पडला पाहिजे कारण त्याचे सिनेमे (काही कितीही टपराट असले) तरी कितिकशे कोटी रुपये ओढत आहेत. म्हणजे त्याचा काही लोकांना खुप राग येत असला तरी ती लोकं इतकीही नाहीयेत की त्यानी त्याच्या बँक बॅलन्स किंवा आयुष्याला (सेफटीच्या दृष्टीनी) काही धक्का लागत असेल.
सलमान खानचे पण तेच.
व्हॉट्स अॅप, फेसबूकवर ह्या खान (मुसलमान हिरो) लोकांवर डुख धरुन विधानं करणारे बरेच लोकं, गृप आहेत. डुख धरायला ते मुसलमान आहेत हे येवढच कारण पुरेसं असतं कधी कधी पण त्याला मग ते त्यांच्या इतर काही कुकर्मांना कनेक्ट करतात आणि मेसेजांची/पोस्टींची रिक्षा पपाँव पपाँव करत फिरवतात.
फेरफटका, पोस्ट आवडली.
फेरफटका, पोस्ट आवडली.
केदार जाधव, सहमत. फेरफटका,
केदार जाधव, सहमत.
फेरफटका, परफेक्ट.
अल्ट्रा हिंदुत्ववाद्यांना कुणीतरी लागतंच झोडपायला. त्यात शाहरुख बरोब्बर फिट होणारा बकरा आहे. एकतर तो सेल्फ मेड असल्यामुळे आणि त्याच्या हुशारीमुळे चांगलाच अॅरोगंट आहे, मुस्लिम आहे, अति यशस्वी आहे, हिंदु बायको आहे, अजुन काय हवं त्याचा द्वेष करायला?
अमुक अॅक्टर ने इतकी मदत केली आणि अमुक ने इतकी कमी, वगैरे सगळा फालतुपणा आहे. एकतर मदत्/दान जर एवढा गाजावाजा/ पीआर करुन केलं जात असेल तर त्यात फारसा राम नाही हे समजायला हवं. दुसरं म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय चॅरिटी ची स्पर्धा थोडीच आहे, प्रत्येकाची इच्छा आहे किती मदत करायची ते. तिसरं म्हणजे शाखा ने मदत केली नाही असं ओरडणारे स्वतः किती मदत केली ते मिडीयामध्ये पब्लिश करतील का?
त्त्याच्या कॉन्फिडन्स साठी आणि witty कमेंट्स साठी मी त्याची फॅन आहे. शाहरुख खान द अॅक्टर ची नाही, शाहरुख खान ह्या व्यक्तीची.
शाहरुख खान नाही आवडत कारण तो
शाहरुख खान नाही आवडत कारण तो शारुख खान आहे.
पैसे देऊन फिल्मफेअर पुरस्कार विकत घेऊन स्वतः ची टिमकी वाजवणारा कसा आवडणार. फॅनफाॅलोईग मध्ये सलमान आणि अभिनयामध्ये आमिरची कधिही बरोबरी करु शकतो का?
बाकी त्याच्या सामाजिक ऋणानुबंधांशी आणि त्याच्या धर्माशी घेणेदेणे नाही.
डबल पोस्ट. म्हणून संपादित.
डबल पोस्ट. म्हणून संपादित.
बोफोर्स प्रकरणामुळे शहेनशाहवर
बोफोर्स प्रकरणामुळे शहेनशाहवर बहिष्कार घाला अशी टुम निघाली होती. तेव्हा फेसबुक , व्हॉट्सँप नसल्याने मोर्चे काढावे लागत. आमच्या कॉलेजातल्या अभाविपच्या पोरांनी पोलिसांच्या छड्या खाल्ल्या होत्या.
भारतीय पब्लिक ला अॅरोगन्स
भारतीय पब्लिक ला अॅरोगन्स आवडत नाही. अमिताभ व सचिन यांची युनिव्हर्सल व इतकी वर्षे टिकलेली लोकप्रियता त्यांचे कौशल्य, व्यावसायिकता इतकीच त्यांच्या नम्रतेमुळेही आहे. याच कारणामुळे विराट कोहलीला ते स्थान अजूनही मिळत नाही.
फिल्म फेअरतर शंकर जयकिशनही
फिल्म फेअरतर शंकर जयकिशनही मँनेज करायचे.
बच्चन पण नंतर त्याच्या
बच्चन पण नंतर त्याच्या डाऊनटर्न नंतर जास्त नम्र झाला असं वाटतं फा. आधी तो ही अॅरोगंट वाटायचा.
प्रेसशी भांडण होते त्याचे.
प्रेसशी भांडण होते त्याचे. ७-८ वर्षे! बाकी नेहमीच नम्र होता. पब्लिक अॅरोगन्स च्या ष्टोर्या नाहीत त्याच्या.
भारतीय पब्लिक ला अॅरोगन्स
भारतीय पब्लिक ला अॅरोगन्स आवडत नाही.>> खरंय. पण ह्युमरस अॅरोगन्स आवडतो.
दुसरं म्हणजे शाखा स्वतःवर किती भयंकर जोक करतो. गट्स पाहिजे त्यासाठी.
हा धागा सुचायच तात्कालिक कारण
हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत . >>> हेडरमधे सुरूवातच या वाक्याने झाल्याने त्या अनुषंगाने चर्चा होणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे विषय कसा काय भरकटतो ? असो.
एकेकाळी तिन्ही खानांमधे मी सर्वश्रेष्ठ आहे अशा गमजा मारल्यामुळे साहजिकच इतर दोन खानांना सहानुभूती मिळायची. कारण शाहरूख सर्वोत्कृष्ट कधीच नव्हता. पण त्याला सिनेमे चांगले मिळाले असतील किंवा बॅनर्स चांगले मिळाले असतील, त्यामुळे काही तद्दन टुकार सिनेमेही चालले. असा चमत्कार यापूर्वी अमिताभच्या बाबतीत झालाय. अमिताभ आणि सलीम जावेद हे समीकरण बाद झाल्यानंतरचे सिनेमे तद्द्न भिकार होते. ते केवळ त्याच्या एकट्याच्या नावावर चालले. शहेनशहा मधला अभिनय तर अमिताभ चांगला अभिनेता आहे या वाक्याशी फटकून आहे. काही प्रसंग तर अगदी नाटकी झालेत. पण चालून गेले.
हे सर्व शाहरूख खानच्या बाबतीत होत गेल्याने त्याने आमीर पेक्षा मी मोठा स्टार आहे असा दावा केला. त्याला उत्तर म्हणून आमीरने आपले सिनेमे बक्कळ धंदा करतात असं दाखवून दिलं, सलमानने गेल्या काही वर्षात शाहरूखखानची जागा घेतली. तेव्हांपासून शाहरूखचे सिनेमे रोहीत शेट्टीच्या बळावर चालत आहेत.
पण सध्याच्या वातावरणात शाखा हा बळी असल्याने आपोआपच त्याला सहानुभूती प्राप्त होते. वरच्या सर्व गोष्टी या इतिहासजमा वाटतात. सलमानने राज ठाकरे आणि भाजपशी जवळीक वाढवून आपली पोळी भाजून घेतली. इतर दोन खानांना मुलाखतीत हटकून विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रामाणिक उत्तरे दिली आणि त्याचा विपर्यास झाला ही वस्तुस्थिती डोळ्याआड करणे अशक्य आहे.
त्यामुळे जर सद्य परिस्थितीवर फोकस अपेक्षित नसेल तर वर म्हटलेल्या गोष्टींसाठी हा धागा दीड दोन वर्षांपूर्वी यायला हवा होता असं वाटून गेलं.
त्याने मोदींबरोबर पतंग उडवला
त्याने मोदींबरोबर पतंग उडवला नाही , हे कारण असेल का ?
फेरफटका छान पोस्ट दुसरं
फेरफटका छान पोस्ट
दुसरं म्हणजे शाखा स्वतःवर किती भयंकर जोक करतो. गट्स पाहिजे त्यासाठी. >>> येस्स ही एक क्वालिटीच आहे त्याची.. पण तो चतुर आहे, एण्ड ऑफ द जोक तोच सुपर्रस्टार आहे हे इम्प्रेशन सोडून जातो.
त्त्याच्या कॉन्फिडन्स साठी आणि witty कमेंट्स साठी मी त्याची फॅन आहे. >>>> अॅक्चुअली, त्याची ही गोष्ट त्याला ईतरांपेक्षा फार पुढे नेऊन उभे करते. आमीर, सलमान या लोकप्रियतेच त्याच्याच टक्करच्या खानांना हे जमत नाही..
वर कोणीतरी म्हणाले की तो फिल्मफेअर अॅवार्ड विकत घेऊन जिंकतो.. खरे तर गेले कित्येक वर्षे तो कित्येक अॅवार्ड फंक्शन अँकरींग किंवा काहीतरी आयटम करत गाजवतोय .. त्याला तोड नाही.
तरी जर तो खरेच अॅवार्ड सेट जरी करत असेल तरी ती त्याची अचिव्हमेंटच आहे.. कारण फिल्म ईंडस्ट्रीच्य बाहेरून येत अशी पोजिशन मिळवणे.. बॉस काहीतरी अंगात असल्याशिवाय हे शक्य नाही, आणि ते जे काही आहे ते पॉजिटीव्हच आहे.
फारएण्ड - सहमत. अरे ला का रे
फारएण्ड - सहमत. अरे ला का रे करण्याच्या कल्पनेनं भारतीय / विशेषतः मराठी मनं छुपेपणानं कितीही तरारून उठत असली, तरी उघडपणे ते कबूल नाही करू शकत (नियती वगैरे गोष्टींची भिती). कोहली चं उदाहरण योग्य आहे. कुठेतरी कुणाला तरी मूहतोड जवाब देण्याची सुप्त ईच्छा मनात दडलेली असतेच.
नरेश माने - पैसे देऊन पुरस्कार विकत घेणं हा प्रकार फिल्मफेअर च्या जन्मापासून चालत आलाय. त्या पुरस्कारांनाच फार महत्व दिलं नाही म्हणजे ह्या प्रकारांचा त्रास होत नाही. एस. डी. बर्मन ना कुणीतरी एक अमुक तमुक रक्कम देत असाल तर ह्या वर्षीचा फिल्मफेअर तुम्हाला देऊ अशी ऑफर दिली होती म्हणे. त्यावर बर्मनदांनी 'पुरस्कार मलाही हवाय, तुम्ही मागताय तितके पैसे देणंही मला जड नाहीये. पण असा पुरस्कार मिळवण्यापेक्षा माझ्या चाहत्यांचं प्रेम मला अधिक महत्वाचं आहे' असं उत्तर दिलं होतं असं वाचलय. तसंही काही काही वेळा पुरस्कारप्राप्त लोकांची यादी पाहिली की आश्चर्यचकीत व्हायला होतं. १९५४ ला दिलीप कुमार, गुरुदत्त, देव आनंद, बलराज सहानी, अशोक कुमार ई. लोकं रेस मधे असताना (https://en.wikipedia.org/wiki/List_of_Bollywood_films_of_1954), भारत भुषण ने फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळवलं होतं. (मुद्दाम ईतकं जुनं उदाहरण घेतलं म्हणजे भावना दुखावण्याची तीव्रता कमी होईल. ही घ्या लिंक https://en.wikipedia.org/wiki/Filmfare_Award_for_Best_Actor)
Pages