शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे माझा ब्रांडेड रुमाल !
सध्या कामात बिजी आहे ..

पण तोपर्यंत एक मुद्दा देऊन जातो विचार करायला,
काही लोकं त्याचा पराकोटीचा द्वेष करतात हे त्याच्या पथ्यावर पडत असेल का? आणि पडत असेल तर तो अधून मधून त्या लोकांना भडकवायला स्वताच दाणे टाकत असेल का?

अरेरे! ऋणम्याचा धागा काढण्याचा विषय केदार नी गटवला. स्मित > Happy Happy

मला मात्र हा अतिशय सिरियसली अन बर्याच दिवसापासून (अगदी माबो वर येण्याआधी ही ) पडलेला प्रश्न आहे .
दिलवाले हे निमित्त झाल इतकच .

शाहरुख खानला मिळालेल्या भूमिकांमुळे असे झाले असावे. डर, बाजीगर, दीवाना, कभी हां कभी ना ह्या चार चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या भूमिकांमध्ये पूर्ण फरक असूनसुद्धा एक समान धागा आढळतो.

डर - खलनायक व प्रेमी
बाजीगर - खूनी, सूड उगवणारा व प्रेमी
कभी हां कभी ना - आततायी प्रेमवेडा व निष्ठावान (वफादार) नसलेला प्रेमी आणि वादक / गायक
दीवाना - भारतीय संस्कृतीला त्या काळी अमान्य असलेल्या 'विधवेवरील प्रेम' ह्या विषयात घुसून बेभान प्रेमी साकारणारा

ह्या चारही भूमिका संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या असल्या तरी त्यात एक समान धागा होता तो म्हणजे कोठेतरी त्या भूमिका नकारात्मक होत्या. त्याने साकारलेल्या पात्रांनी यशासाठी अवलंबलेले मार्ग हे ह्या चार चित्रपटांमध्ये पूर्णतः नकारात्मक तरी होते किंवा पटकन् न पटणारे तरी होते. (अंजामचे नांव ह्या यादीत न घेण्याचे कारण इतकेच की अंजाममध्ये मुद्दामहून त्याची तीच नकारात्मक हिरोची भूमिका उजळवण्याचा व्यावसायिक प्रयत्न केला गेला पण त्यात शाहरुख बोअर झाला).

त्याच्या पात्रांचे हे न पटणारे किंवा नकारात्मक मार्ग त्या काळच्या तरुणाईला एकदम खच्चॅक वाटले व शाहरुख खान टॉपला पोचला. त्या चित्रपटांमधील त्याचा अभिनय लाजवाब होता कारण मुळातच तो तसा असण्याची शक्यता होती. (येथे तसा म्हणजे अतिरेकी प्रयत्न करणारा, बेभान होणारा वगैरे).

पण पुढे जसजसे त्याचे गोडगुलाबी चित्रपट किंवा आजकाल येतात तसे डॉनपट / बाँडपट येऊ लागले तसतसा त्याचा अभिनय मर्यादीत होऊ लागला आणि त्या भूमिका सकारात्मक असल्याने त्याची चेहरेपट्टी, आवाज, संवादफेक वगैरे घटक निगेटिव्ह इम्पॅक्ट करू लागले. हेच घटक नकारात्मक भूमिकेसाठी उत्तम ठरलेले होते.

थोडक्यात, टॉपला पोचलेल्या एका लाजवाब बेभान अभिनेत्याला इंडस्ट्रीने इतके थोर बनवून ठेवले की कोणत्याही भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानाने खुलवलेले चित्रपट हे त्याच्या माथी मारण्यात आले. देवदासनेही दिलीपकुमारसारखी कमाल केली नाहीच.

त्यामुळे शाहरुख व्यक्ती म्हणून स्वतःला मोठा समजत गेला आणि त्याच्यातील अभिनेता मर्यादीत होऊ लागला. दिलवालेमधील कथानक हे शाहरुखपेक्षा पॉवरफुल होते. गीतेही पॉवरफुल होती. त्याचा फायदा शाहरुखला मिळाला हेही लक्षात घ्यायला हवे.

व्यक्ती म्हणून स्वतःला आधीहून मोठा समजत गेल्याने त्याचा अ‍ॅरोगन्स वाढत राहिला आणि भूमिकांची लोकप्रियता आटत राहिली. रसिकांना डर, बाजीगर अश्या चित्रपटांमधला किंवा फौजी मालिकेतला शाहरुख परत कधी मिळालाच नाही. त्यामुळे शाहरुख ह्या 'व्यक्ती'वर लोकांचा राग असावा.

हे असेच अमिताभबद्दल न होण्याचे कारण काय? लार्जर दॅन लाईफ तर त्यालाही बनवले गेले. पण त्याने 'निव्वळ प्रेमकथा' फारश्या केल्या नाहीत. त्याचा चेहरा, आवाज, उंची हे घटक 'सूडकथा' ह्या प्रकारासाठी सर्वाधिक सूट होणारे होते हे वेळीच लक्षात घेऊन त्याने बहुधा तसेच चित्रपट अधिक स्वीकारले. सिलसिलाच्या मागे तात्कालीन अफेअर हा एक टी आर पी वाढवणारा घटक होता. अमिताभने पडद्यावर प्रेम केले नाही असे नाही. पण त्याचे प्रेम किंवा गीतप्रसंग नीट डोळ्यासमोर आणले तर तुम्हालाही आठवेल की बहुतांशी युगुलगीतांमध्ये एरवी प्रेक्षकांचे बहुतांशी लक्ष जसे हिरॉईनच्या सुंदर दिसण्याकडे असते तसे अमिताभ असलेल्या युगुलगीतात होत नसे. त्यात लोकांचे लक्ष अमिताभकडेच अधिक असायचे. ह्याचे कारण त्यावेळी तो डोळे व उंचीचा इफेक्ट कंप्लीटली वेगळा द्यायचा. त्याशिवाय एक गोष्ट! जंजीरमध्ये तो जया भादुरीसमोर जेव्हा 'प्यार का इजहार' करतो तेव्हाची त्याची शैलीसुद्धा प्रेम व्यक्त करण्यापेक्षा एखादी धगधग व्यक्त केल्यासारखी असते. त्याला तेच शोभत असे व तो तेच बहुतेकवेळा करत राहिला. राजेश खन्ना, राजेंद्र कुमार ह्यांच्याप्रमाणे कधीही गोंडस दिसत, माना उडवत, विरहात पोळून घेत वगैरे तो पडद्यावर उतरलाच नाही.

कदाचित ज्याला आपण अमर्याद अभिनय म्हणतो त्यातील त्याच्या मर्यादा त्याला नीट समजल्या असाव्यात आणि शाहरुखला समजल्या नाहीत.

म्हणून शाहरुख एक व्यक्ती म्हणून लोकांना नावडता झाला असावा.

भाषण समाप्त! Proud

सेल्फ मेड जो असतो त्याच्यावर बापजाद्याच्या पुण्याई वर ऐश करणारे नेहमी जळतात.
इतकेच
>>> You nailed it man. No need to write anything more. People are jealous of his success Happy

बेफिकीर ,
प्रतिसाद बर्याच अंशी पटला . त्याने स्वतःला राहुल अन राज मधे कोंडून घेतल हे खरच आहे
अर्थात उतारवयात अमिताभ त्या अमिताभलाही महान अन लाल बादशाह सुटले नाहीत
पण माझा विरोध अशा टीकेला नाहीच आहे .
कारण नसताना देशद्रोही , पाकडा , मुस्लिम धार्जिणा असले इतर आरोप लावण्याला किंवा त्याने तिथे मद्त का केली , इथे का नाही याला आहे . अन उगाच शारक्या वगैरे करण्यालाही

सेल्फ मेड जो असतो त्याच्यावर बापजाद्याच्या पुण्याई वर ऐश करणारे नेहमी जळतात.
इतकेच >> मे बी . तसही नसाव कदाचित . कारण अक्षय कुमार तर कसा आधी कुक की काहितरी होता हे अगदी कौतुकाने बोलतात Happy

पण तो "खान" नाही. त्याने इतक्या पोरी फिरवल्या एक ही झेंडे घेऊन फिरणारे संस्कृती रक्षक त्यावर काही बोलले का ? अर्थात लग्नानंतर कमालीचा सुधारला आणि आदर्श बनला ती गोष्ट वेगळी Wink

सॉफ्ट टार्गेट! आधीच मुसलमान, त्यात हिंदू पोरीशी लग्न परत कोण तो नातेवाइक आय्येस्सायवाला. पुन्हा स्वबळावर सुपरस्टार झाला.

पचत नाहीत हो तथाकथित हिंदुत्ववाद्यांना. त्यांचे सगळे(च) पेट सब्जेक्ट एकातच येउन जातात की नी? कायप्पावर नव्या पोस्टमध्ये आयेनायच्या शाहनवाझ खान ला शाहरुख खानचे आजोबा आणि ते नेहरुंचे खास, म्हणून शाहरुख खान, गांधी घराण्याच्या जवळचा माणूस सांगून टाकलेय. म्हणजे मस्त फोडणी मिळते किनई?

हे लोक मग पद्धतशीर विखार फुलवतात. ट्विट काय केले, शिवसेनेनी सामन्यात टीका करायला सुरुवात केली. . मातोश्रीशी जवळचे संबंध नसतील त्याचे.

आणि हो, आता मार्केटिंग करावी तसे तोही काड्या करत असेलच. त्यामुळे ऋन्मेऽऽषनी वर्तवलेली शक्यता आहेच!

बाकी लेटेस्ट म्हणजे दिलवाले येतोय तर परत उत्तराखंड पूर प्रकरण उगाळायच. त्याचवेळी चेन्नई एक्प्रेसच्या कलेक्शनमधून ३३ लाख आणि इंग्लंड अमेरिकेत चैरीटी शो केले ते सगळ विसरायचं.

आणि हो, पाकिस्तान पूरांसाठी म्हणतात शो केले, तर तर एकही शो त्याने केलेला नाही.

मला आलेल्या मेसेज मध्ये त्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत न करता एका पूरग्रस्त मुस्लीम राष्ट्राला कोट्यवधी रूपये दिले असं म्हटलंय. तेव्हां कळाले की चेन्नई हे स्वतंत्र मुस्लीम राष्ट्र आहे म्हणून, इतके दिवस ते भारतातले एक शहर आहे असाच माझा गैस होता.

मराठी बातम्यात मात्र एका मराठी पक्षाने त्याला महाराष्ट्रातील दुष्काळ्ग्रस्त् सोडून अण्णा लोक आपले वाटत असतील तर त्याचे सिनेमे आम्ही का पहावेत असा प्रश्न विचारला.
यांच्या निवेदनात मुस्लीम राष्ट्राचा उल्लेख नाही. पण तो रहात असलेल्या राज्याचा आहे. पहिल्या उदाहरणात रहात असलेल्या देशाचा आहे. (टिव्हीवर फरक पडत असे का?)

दोन्हीत इथे रहायचं, खायचे, प्यायचे असे उल्लेख आहेतच. शिवाय इवल्या लोकांनी चॅरिटी म्हणून दर पिक्चर मागे दिलेल्या गल्ल्याचा उल्लेख आहे.

फनाच्या वेळी गुजरातेत आमीरबद्दल असेच मेसेजेस फिरत. सत्यमेव जयते च्या वेळी देखील ते फक्त मुसलमान संस्थांना मदत करतो, मुस्लीम समाजसेवक, विचारवंत यांना प्रोजेक्ट करतो असे आक्शेप होते.

२००२ नंतर आम्ही तिन्ही खानांचे सिनेमे पाहणार नाहीत अशा शपथा घेणारे अनेक जण भेट आहेत. एक साहेब तर इथेही भेटत.

दिलवाले फ्लॉप करण्यामध्ये कुठल्या हिंदुत्त्ववादी वगिरे लोकांचा हात आहे का माहित नाही, पण हा पिक्चर फ्लॉप व्हावा म्हणून फिल्म इंडस्ट्रीमधूनच प्रचंड प्रयत्न सुरू आहेत अशी बातमी समजली आहे. त्याचे कारण काय याबद्दल माहिती हवी असल्यास....

त्याच्या मुलाखतीचा विपर्यास नुकताच केला गेला होता. आमीर च्या मुलाखतीचाही. हा योगायोग असू शकत नाही. मनोरुग्ण मानसिकतेतून घडतंय हे सर्व.

वाह बेफी. मस्त पोस्ट आहे.
अमिताभ ला स्वतःला अभिनय करायचा होता म्हणून तो इतका यशस्वी झाला. शाहरूख पब्लिक डिमांडला महत्व देतो शिवाय इतक्या कठिण स्पर्धेत टिकायला कधी कधी काही स्टंट्सचा ही आधार घ्यावा लागला त्याला. मला स्वत:ला शाहरूख चा अभिनय आवडतो, इमोशनल सिन्स करावेत तर फक्त त्याने. पडद्यावर नायिकेवर तो खरंच प्रेम करतोय की काय अशी शंका यायला लागते इतका चपखल अभिनय करतो.

बाकी तो अगदी आवडता ही नव्हता आणि खूप आवडतो अशा कॅटेगरीत कधीच नव्हता.
पण काही लोक धागे काढकाढून शाहरूखच कसा ग्रेट अभिनेता आहे हे गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो आपोआपच नावडत्या कॅटेगरीकडे धाव घेऊ लागतो.

शाहरूख सेल्फ मेड आहे आणि त्याबद्दल त्याचा आदरच वाटतो हे नक्की.
(माझ्या वै मतानुसार) अभिनेता पडाद्यावर कुठेतरी आपल्यातल्या माणूसपणाची झलक सुद्धा दाखवतच असतो. त्यातच बहुधा तो लोकांना अपिल झाला नाही. मला स्वतःला अमिताभ, अक्षय हे लोक व्यक्ती म्हणून बर्‍यापैकी सेन्सिटिव्ह आणि अ‍ॅप्रोचेबल वाटतात. पण शाहरूख नाही वाटत.

(माझ्या वै मतानुसार) अभिनेता पडाद्यावर कुठेतरी आपल्यातल्या माणूसपणाची झलक सुद्धा दाखवतच असतो. त्यातच बहुधा तो लोकांना अपिल झाला नाही. मला स्वतःला अमिताभ, अक्षय हे लोक व्यक्ती म्हणून बर्‍यापैकी सेन्सिटिव्ह आणि अ‍ॅप्रोचेबल वाटतात. पण शाहरूख नाही वाटत +१००००००००००००

बापरे! एवढ्या पोस्टी??? खरंच लोक हीरो-हीरवीणींचा राग करतात? म्हणजे सिरीयसली? राग बीग करण्याचा काय संबंध? एखादा नट नटी आवडते किंवा आवडत नाही हे समजु शकते. पण पराकोटीचा राग, जेलसी म्हणजे माझ्यासाठी टु मच.

मला स्वत:ला शाहरूख चा अभिनय आवडतो, इमोशनल सिन्स करावेत तर फक्त त्याने. पडद्यावर नायिकेवर तो खरंच प्रेम करतोय की काय अशी शंका यायला लागते इतका चपखल अभिनय करतो.
>>>

+७८६

तो महिलांची आणि महिला कलाकारांची ईज्जत करतो, त्यामुळे ते आपसूक घडते.

(माझ्या वै मतानुसार) अभिनेता पडाद्यावर कुठेतरी आपल्यातल्या माणूसपणाची झलक सुद्धा दाखवतच असतो. त्यातच बहुधा तो लोकांना अपिल झाला नाही. मला स्वतःला अमिताभ, अक्षय हे लोक व्यक्ती म्हणून बर्‍यापैकी सेन्सिटिव्ह आणि अ‍ॅप्रोचेबल वाटतात. पण शाहरूख नाही वाटत.
>> हं. हे इंटरेस्टिंग आहे . मे बी त्याची प्रतिमा अ‍ॅरोगंट अशी झाली आहे हेही खर Sad
(तो आहे की नाही हा वेगळा भाग अन तो आतापुरता बाजूला ठेऊ Happy )

बापरे! एवढ्या पोस्टी???
>>>
काय एवढ्या?? ही सुरुवात आहे .. सुप्पर्रस्टार शाहरूखचा धागा आहे बाबा, चर्चा तर होणारच.. आपण तर कौतुक करणार, जळणारे जळोत Happy

बापरे! एवढ्या पोस्टी??? खरंच लोक हीरो-हीरवीणींचा राग करतात? म्हणजे सिरीयसली? राग बीग करण्याचा काय संबंध? एखादा नट नटी आवडते किंवा आवडत नाही हे समजु शकते. पण पराकोटीचा राग, जेलसी म्हणजे माझ्यासाठी टु मच. >> सस्मित , मला आलेले काही फॉरवर्ड अन त्यावरचे प्रतिसाद पाहिले तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल Sad

सस्मित , मला आलेले काही फॉरवर्ड अन त्यावरचे प्रतिसाद पाहिले तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल >>>>>>>> नशीब मला असले फॉरवर्ड येत नाहीत.

ऋन्मेऽऽष , सगळ नीट चाललय कशाला बिघडवतोस>>>>>>>>>>>> Lol

त्याने बरेच चॅरीटी शो केले आहेत. पण ते कधी काऊंट होत नाहीत. पोलिसांच्या कार्यक्रमातही तो भाग घेतो. सुनामीच्या वेळीही कार्यक्रम केलेलेच. मध्यंतरी कुठल्याश्या चॅरीटीला सिनेकलाकार आणि क्रिकेटर यांच्यात फूटबॉल सामना होता.. त्यात तो हिरो लोकांच्या फूटबॉल टीमचा कर्णधार होता.. एकटाच जबर्रदस्त खेळत होता.. तो फूटबॉल सही खेळतो याची नोंद घ्यावी.. असो, तर आताही चेन्नई पूरग्रस्तांना जी काही मदत केली त्यातही लोक स्टंट शोधत आहेत.. चला स्टंटही सही, पैसे तर दान केले ना, आणि ते देखील कष्टाने कमावलेला पैसा, कोण्या राजकारण्यांसारखा जनतेलाच लुटून किंवा कोण्या भ्रष्ट उद्योगपतीसारखा काळाबाजार करून तर नाही ना कमावला..
बरे आता नुकताच तो भारतातील टॉपचा सेलिब्रेटी म्हणून डिक्लेअर झाला.. गेल्या चार वर्षात तीन वेळा झाला.. त्याची कमाई इतरांच्या कैक जास्त आहे.. उघड केलेली कमाई.. याचा अर्थ टॅक्स बुडवेगिरीही करत नसावा..

केदार डोण्ट वरी,
मी शाहरूखचे कौतुक केले तर कोणी त्याचा राग करू लागेल हे लॉजिकच मला पटत नाही.
उद्या अश्या लोकांच्या भितीने एखादी आई आपल्या मुलाचे कौतुक चारचौघात करणार नाही.
तर मी अश्या युक्तीवादांना न जुमानता मला जे बोलायचे ते बोलत राहणार..
एक हुमायुन मेंटेलिटी असते लोकांची, एखाद्याबद्दल कौतुकापेक्षा टिकेची गॉसिपिंग वाचायला जास्त आवडते. अर्थात मी सुद्धा याला अपवाद नसेन.
पण मग यावेळी त्या सेलिब्रेटीच्या चाहत्यांची ही जबाबदारी बनते की कौतुकाच्या तलवारी सप्पासप फिरवाव्यात

ह्या प्रोसेसमध्ये सायमल्टेनियसली 'ऋन्मेषचा लोकांना इतका राग का येतो' ह्याही प्रश्नाची उत्तरे मिळून जातील.

Light 1

Pages