शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय पब्लिक ला अ‍ॅरोगन्स आवडत नाही. अमिताभ व सचिन यांची युनिव्हर्सल व इतकी वर्षे टिकलेली लोकप्रियता त्यांचे कौशल्य, व्यावसायिकता इतकीच त्यांच्या नम्रतेमुळेही आहे. याच कारणामुळे विराट कोहलीला ते स्थान अजूनही मिळत नाही. >>
हे पटल रे . मला पण कोहली फक्त त्याच्या मस्तीमुळे आवडत नाही Happy
पण अर्थात त्यामुळे मी त्याच्या खेळाला किंवा त्यालाही अपशब्द वापरत नाही , किंवा त्याचा द्वेष वगैरे करत नाही

हेडरमधे सुरूवातच या वाक्याने झाल्याने त्या अनुषंगाने चर्चा होणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे विषय कसा काय भरकटतो ? असो.

>> कापोचे ते वाक्य चर्चा कुठल्या धर्मात काय लिहिलय यावर चालली आहे म्हणून होत .

नाहीतर शाहरूखवर होणारी टीका "खान" म्हणून ही काही अंशी आहे हे तर खरच . पण ती तर इतरही खानांच्या वाट्याला येतेच. अर्थात त्यातही शाहरूखवर खास मेहेरेनजर असते , पण असे लोक फारसे असतील अस वाटत नाही

पण मला तशा नाही तर तुमच्या आमच्या सारख्या लोकाबद्द्ल बोलायच होत इतकच Happy

अन हो, ते मेसेज माझ्या मित्रांकडून , ओळखीच्या कडून आले जे आपल्यासारखेच आहेत याचही वाईट वाटल . पण नंतर विचार केला त्यानी इतका विचार केला असेल का ? की आला की केला फॉरवर्ड ? जाऊ दे , मलाच कळत नाही , मी हे फार सिरियसली घेतोय का ? Happy

सध्याचे मेसेजेस मला अशा काही लोकांकडून आलेले आहेत की नवल वाटलं. या दोन्ही खानांनी देशद्रोह केलेला आहे असा समज सध्या लोकांत पसरलेला आहे. पूर्वी असं नव्हतं.

>>असे असताना त्याचा अकारण राग का ?<<

त्याचं काय आहे, लायकि नसताना प्रचंड यश मिळालं कि लोक द्वेश करतात, मनुष्य स्वभाव आहे तो. मला सुद्धा त्याचा अभिनय टुकारच वाटतो. शारुखपेक्शा माझा राग त्याकाळी रोमॅंटिक चित्रपट काढणारे, यश चोप्रा, करण जोहर यांच्यावर आहे. काहि च्या काहि चित्रपट काढुन त्यांनी आमच्या नंतरची बहुतांश पिढी बिघडवलेली आहे. ऋन्मेष त्या पिढीचं प्रातिनिधीक रुप - हे माझं स्पष्ट मत आहे... Light 1

फेरफटका, भारत भिषण हा म्हणून चांगला अभिनेता ठरतो का? मुद्दा तोच आहे शारूखचा राग येण्याचे कारण तो स्वतः ला मीच एकमेवाद्वितीय आहे असे भासवतो.

तो मला ह्या कारणामुळे आवडत नाही. आवडत नाही म्हणजे नाही. बस्स एव्हढंच. ...

फौजी सोडल्यास शाहरुख फारसा आवडला नाही.आतापर्यंत डर, दिलवाले,राणी मुखर्जी+ काजोल असलेला पिक्चर ,हे ३ आणि टी.व्हीवर k.k.k.g ,सोडल्यास बाकी सिनेमे पाहिले नाहीत.तीच ती अ‍ॅक्टिंग ,चेहर्‍यावरची मग्रुरी कधीच आवडली नाही. अमिताभ आणि दिलिपकुमार ,यांच्या स्टाईल्स मारतो.

सुमार अभिनय, तोचतोपणा, फाजील आणि अति आत्मविश्वास, अ‍ॅरोगन्स, खलनायकी ढंगाच्या भुमिका स्विकारणे, इ. कारणांमुळे शून्यातुन वर येऊन देखील शा.खा.चा राग येतो. खुप म्हणजे खुप. अजिबात डोक्यात जातो. बाकी धर्माबिर्माचा, देशभक्तीचा काही संबंध नाही.

झाले ना शंभर.. ते पण बारा तासात .. म्हणून तो सुपर्रस्टार आहे.. म्हणून मी म्हणतो यू कॅन लव हिम, यू कॅन हेट हिम.. पुढचे तुम्हीच पुर्ण करा आता..

मायबोलीवर बारा तासात शंभर व्हायला काहीही टॅलंट लागत नाही. उगाच कायच्या काय भक्त पोस्टी पाडू नकोस ऋन्मेष.
शाहरूख अतिप्रचंड डोक्यात जातो. त्याचं कारण मेंटल आणि सरक डोकं दाखवणारा अभिनय, तोचतोचपणा, अ‍ॅरोगन्सबद्दल कल्पना नाही कारण कधी मुलाखत वगैरे बघायचे कष्ट घ्यावेसे वाटलेले नाहीत. तितकाही तो सहन होत नाही. मुळात माणूस पडद्यावर बघायला आवडत असेल, सहन होत असेल तर त्याचा धर्म बिर्म याने काहीही फरक पडत नाही.

त्याचं काय आहे, लायकि नसताना प्रचंड यश मिळालं कि लोक द्वेश करतात, मनुष्य स्वभाव आहे तो. मला सुद्धा त्याचा अभिनय टुकारच वाटतो.
>> राज , ओके . फक्त "लायकी " या शब्दात काय अपेक्षित आहे ते कळ्ल नाही . जर कष्ट असेल तर त्याच्या इतके कित्येकानी घेतले नसतील . गुणवत्ता म्हणाल तर तीही अजिबात नाही अस नाही . पण अगेन , तुमच मत आहे Happy

. जर कष्ट असेल तर त्याच्या इतके कुणीच घेतले नसतील >>हे कसकाय//? त्याच्यापेक्षा अनेक पटीने मेहनत करणारा रितिक आहे, आप्ल्या रोल साठी झोकुन देवुन कष्ट घेणारा आमिर आहे, बाकी स्त्रगल सुधा अनेक कलाकारापेक्षा कमी आहे , आज या वयात वेगळे लुक वेगळी भुमिका अस काहिही करताना तो दिसत नाही, अमिताभने या वयात्सुधा गेल्या १० वर्शात जेवढे प्रयोग केले तेवढ काहिच मला दिसत नाही,.

धन्यवाद सगळ्यांचे . एकूणच पाहाता तुमच्या आमच्या सारख्याला राग यायची कारणे दिसली ती
१. स्वतःला शहाणा समजणे , अ‍ॅरोगंट असणे
२, खलनायकी भूमिका करणे ( खर तर हे त्याच्या बाजूने जायला हव , की तो डर अन डीडीलजे सारख्याच ताकदीने करू शकतो)
३. तीच ती अ‍ॅक्टींग करणे ( फेअर इनफ पॉईंट .त्याच्याच एका सिनेमात याचा एक स्प्पूफ आहे . फक्त हिरोईन बदलत असते , बाकी सगळ सेम)

या वरच्या कारणासाठी कुणाला राग वगैरे येत असेल तर ठीक आहे . समर्थन नाही , पण इतकच लिहावस वाटत की वरच्या कारणामुळे तुम्हाला आवडत नसेल ठीक आहे . पण राग राग करू नका Happy यातल्या काही त्याने व्यवसायासाठी केलेल्या तडजोडीही असतील . शेवटी इट इज टफ इंडस्ट्री Happy

आणखी काही इंटरेस्टींग कारणे (यावर फारस बोलण्यात काही अर्थ नाही)
१. तो खान असणे
२. तो शून्यातून येऊन यशस्वी होणे
३. बायको हिंदू असणे

जर कष्ट असेल तर त्याच्या इतके कुणीच घेतले नसतील >>हे कसकाय//? >>

प्राजक्ता , हे मी एखाद्या रोल साठी वगैरे नसून फौजीपासून ते इथपर्यंतच्या प्रवासासाठी म्हटल होत .

तरीही Happy

जर कष्ट असेल तर त्याच्या इतके कुणीच घेतले नसतील >> जर कष्ट असेल तर त्याच्या इतके कित्येकाने घेतले नसतील Happy

खान असणे यामुळे विरोध आहे हे फार सिम्प्लिफिकेशन आहे. दिलीपकुमार पासून ते नासिर पर्यंत, नौशाद पासून ते रहमान पर्यंत अनेक मुस्लिम लोक इण्डस्ट्रीत आहेत - त्यातील शबाना वगैरे सोडले तर इतरांचा इतका तिरस्कार केला जात नाही. त्यामुळे शाहरूखचा का केला जातो ते केवळ तो मुस्लिम असल्याने आहे यापेक्षा काहीतरी असणार अजून. यात सध्याच्या फिरणार्‍या मेल्स धरलेल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांच्या पॅटर्न्स वरून धरले आहे.
आमिर खान खरे म्हणजे least hated khan होता इतकी वर्षे, पीके येइपर्यंत.

दिलीपकुमार बद्दल पण तो पाकिस्तानचा एजंट आहे असा प्रचार झालेला होता.
सगळेच असा विचार करतात असं नाही. पण असा प्रचार करणारे लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे. अफवा पसरवण्याला त्या काळात तंत्रज्ञानाची जोड नव्हती. आत्ताच्या काळात दुर्दैवाने मीडीयावर पण याच लोकांचा वरचष्मा आहे आणि सोशल मीडीयाचा वापर याच लोकांकडून सर्वाधिक होतो. या वर्षी तरी दोन खानांना फटका बसेल अशी चिन्हे आहेत.जिरकोळ संख्येने कुणी फेसबुक पोस्ट्वर भाबडेपणे आपले मत मांडणे वेगळे आणि जाणीवपूर्वक मोहीम राबवणे हे वेगळे. सत्यमेव जयते मधे काहीही आक्षेपार्ह नसताना देखील आमीरविरुद्ध मोहीम राबवली गेलीच होती. त्याचा संबंध थेट धर्माशी होता.

फनाच्या वेळी आमीरच्या विरुद्ध हे तंत्र यशस्वी झालेलं आहे. (मेधा पाटकरांना पाठिंबा दिला हा त्या वेळचा गुजरातविरोधी गुन्हा होता).

शाहरुखच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते, गुणांसोबत नशीब आणि आखणी असेल तर कसे भरभरून यश मिळू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. +१००००००००००

आज सकाळी व्हॉटसपवर आलेला हा फेक मेसेज म्हणजे कहर आहे. आपला राजकीय उल्लू सीधा करायला लोकांना कसे भावनिकरीत्या उल्लू बनवले जाते याचे एक उत्तम उदाहरण.

...........................

Almost 80% seats r unsold for 7.30 show at inox. Vr mall. For Dilwale
Proud to be indian.

pls spread all over india 'hamare toothpaste me namak ho na ho hamare khoon me namak jaroor hona chahiye

............................

जणू लोकं आपले कामधंदे सोडून क्रिकेटचा स्कोअर बघावे तसे आता दिलवालेची कमाई बघत आहेत.

शाहरूख खान एक राष्ट्रीय समस्या !

मला काल असा मेसेज आलाय.

शाहरूख खानचा सिनेमा पहायलाच हवा का ? त्या पेक्षा मुलांना मोकळ्या हवेत फिरायला न्या. त्यामुळे मुलांची तब्येत सुधारेल. ऐतिहासिक स्थळांना भेटी द्या. त्यामुळे मुलाला इतिहासात जास्त मार्क्स पडतील. गावाकडे जा. त्यामुळे ग्रामीण जीवनाची माहीती होईल. खरा भारत मुलांना कळेल, ज्यामुळे त्यांची विचारक्षमता विकसित होईल.

दिलवाले पाहून यातलं काय मिळेल ?विचार करा. आवडले तर जरूर शेअर करा.

सायो, मी त्याच्या टॅलेंटचा उल्लेखच नाही केला. 12 तासांत शंभर पोस्टी याचा संबंध त्याच्या प्रसिद्धीशी जोडला आहे आणि ते सत्य आहे. कमॉन, तो सुपर्रस्टार आहे हे त्याचा द्वेष करणारेही मान्य करतातच. जर तो एक गल्लीतला नट असता तर अनुल्लेखानेच मारला गेला असता. पण तो एक ईंटरनॅशनल स्टार आहे. देशविदेशात त्याचे चाहते आहेत. एवढे ईतर कोणा कलाकाराचे नसतील.

दिलवालेची मस्त पब्लिसिटी होत आहे या सर्वात. आता हा चित्रपट कसा आहे यावरही चर्चा झडणार आणि या चर्चेत भाग घेता यावा म्हणून जास्तीत जास्त लोकं हा बघणार.

पण सिनेमा पाहून मुलांचा विकास होणार नाही ना.
शाखा च्या सिनेमाच्या निमित्ताने देशातल्या मुलांचा विकास जोरात होईल अशी आशा वाटते. हा विकास असाच चालू रहावा यासाठी तरी त्याचे सिनेमे येणे गरजेचे आहे.

मी मोदींना पत्र लिहिणार आहे की डिजिटल ईंडियाच्या अंतर्गत शाहरूखचे सिनेमे गावोगावी मोकळ्या शुद्ध हवेत पडद्यावर दाखवायची व्यवस्था करावी. चित्रपटाचे पटांगण स्वच्छ करावे लागेलच ज्यात स्वच्छ्ता अभियान देखील साध्य होईल. तसेच स्वदेस चित्रपटासारखे त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र बसवावे जेणेकरून अस्पृश्यता मिटेल आणि एका मुस्लिम कलाकाराचा चित्रपट हिंदू मुस्लिम एकत्र येऊन बघितल्याने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागून भारत हा सहिष्णू देश असल्याचा संदेश जगभर पोहोचेन.

हो. आणि हा सिनेमा जिथे चालू असेल तिथे गाई म्हशी आणून बांधाव्यात म्हणजे दूध कसं काढतात हे मुलांना कळेल. नाहीतर दूध पिशवीतून येतं एव्हढंच त्यांना माहीत असतं. तसंच जिथे जिथे शेती आहे तिथे हा सिनेमा दाखवण्याची व्यवस्था करावी. म्हणजे पेरण,, कापणी, काढणी, उफाणणी अशा क्रिया मुलांना माहीत होतील. तसेच शेती करताना शेतक-याची बायको गाणे म्हणत नाही हे ही त्यांना कळून चुकेल. अर्थात सिनेमासाठी शेतक-यांना गाणी म्हणायची सक्ती केल्यास आक्षेप असणार नाही. त्यामुळे शेतक-यांचा कान स्वतःच्याच गळ्याने तयार होईल.

जिथे जिथे हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल तिथे त्याच्यापुढे कंसात स्थळदर्शक नाव लिहावे, म्हणजे
दिलवाले (शेतीविशेष), दिलवाले (मेढपाळ विशेष), दिलवाले (दूधधुभतं विशेष) इ.. यामुळे पालकांना आपल्या कार्ट्याचा विकास कुठल्या दिशेने करावा याचा नेमका अंदाज येईल.

ईतर कट्टर पक्ष आणि संघटनांसाठी सुद्धा शाहरूख एक संधी आहे. शाहरूखचा विरोध मागे घेत त्यांनी फक्त वॅलेंटाईन डे विरोधावर कॉन्सट्रेट करावे आणि त्याला पर्याय म्हणून शाहरूखची जन्मतारीख भारतीय प्रेम दिवस म्हणून घोषित करावे. एकाच वेळी मुस्लिम वोट बँक आणि संस्कृतीरक्षकांचा पाठिंबा असा दुहेरी फायदा होईल. तसेच तरुणपिढीला कुठलातरी दिवस मिळतोय म्हणून ते देखील दुखावले जाणार नाही. आताच मी एका धाग्यावर वाचले की विदेशातल्या पोरी सुद्धा शाहरूखच्या फोटोच्या पप्प्या घेतात. तर या शाखा प्रेमदिवसाचे मार्केटींग करून जगभर नेल्यास भारताला परकीय चलन सुद्धा मिळेल.

Pages