शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्यातला अहंकार वा उद्दामपण उपजत नाही. तो त्याने त्याचे सुपर्रस्टारपद टिकवायला अंगी बाणवलाय. त्याच्याबरोबर काम करणारे कलाकारच सांगू शकतात तो किती डाऊन टू अर्थ आहे. जर खरेच घमेंड असती त्याच्यात तर सुरुवातीलाच संपला असता. त्याल कोणी इथे टिकून दिला नसता. त्याचे चमत्कार, राजू बन गया जंटलमॅन, कभी हा कभी ना सारख्या चित्रपटात त्याच्यातील साधेपणा पड्द्यावरही जाणवतो.

ह्या प्रोसेसमध्ये सायमल्टेनियसली 'ऋन्मेषचा लोकांना इतका राग का येतो' ह्याही प्रश्नाची उत्तरे मिळून जातील.

>>>>

माईण्ड ब्लोईंग बेफिकीरजी,
आपण तो दिवा नक्की कोणाला दाखवलाय मला माहीत नाही,
पण माझ्यासाठी ते जबर्रदस्त कॉम्प्लीमेंट आहे.
ज्या कारणासाठी लोकांना शाहरूखचा राग येतो त्याच कारणासाठी माझाही येणे..
चार ईंच हवेत मी आता..
जरा काम करून आलो..
क्रमश:

माबोवरच्या लोकांना शाहरुखचा राग रुन्मेषमुळे येत असावा असा एक अंदाज आहे.

बाकी राजकारण्यांना शाहरुखचा स्पेसिफिकली राग आहे असं वाटत नाही. ते कोणालाही टार्गेट करतात. लता मंगेशकर, अमिताभ, तेंडुलकर,राह्ल द्रविड हे संयमी लोकही त्यातून सुटलेले नाहीत.

जाता जाता, शाहरूखकडून मी एक चांगला गुण घेतलाय, रोज रात्री जेवल्यावर आरश्यासमोर उभे राहायचे आणि बोलायचे "आय अ‍ॅम द बेस्ट!" ... आणि मग एखादा धागा काढून झोपून जायचे.

बाकी राजकारण्यांना शाहरुखचा स्पेसिफिकली राग आहे असं वाटत नाही. >> किमान शिवसेनेला तरी आहे अस वाटत . इतर खानावर ते इतके तुटून पडत नाहीत . आताही ते बाजीराव मस्तानीला पाठिंबा देतायत , मल्हारी अन पिंगा असूनही Sad

चला स्टंटही सही, पैसे तर दान केले ना, आणि ते देखील कष्टाने कमावलेला पैसा, कोण्या राजकारण्यांसारखा जनतेलाच लुटून किंवा कोण्या भ्रष्ट उद्योगपतीसारखा काळाबाजार करून तर नाही ना कमावला..>>> चेन्नईला दिलेले एक कोटी ना? त्याचं राजकारण भलतंच आहे. रेड चिलीजच्या लेटरची इमेज फिरत होती, चेकची इमेज काही दाखवली नाही. पैसे शाहरूख खानने दिले की रेड चिलीजने? दोन्ही सेपरेट एंटीटी आहेत.

त्यानं चॅरीटी शोज बरेच केलेत. पण् ते फ्रीमध्ये केलेले नाहीत याची कृपया नोंद घ्यावी (त्यानंच काय कुठल्याही हीरोने "फुकट" काहीच केलेले नसते.)

सेलीब्रीटी मॅनेजमेंट आणि त्याचं आर्थिक गणित हा विषय बराचसा किचकट आणि सर्वसामान्यांना माहित नसणारा आहे. तो धाग्याचा विषय नाही.

शाहरुखच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते, गुणांसोबत नशीब आणि आखणी असेल तर कसे भरभरून यश मिळू शकते याचे उत्तम उदाहरण आहे.
राग येण्यामागे दुस्वासाचा भाग जास्त असावा. यशस्वी माणसाचे यश त्याला स्वतःला आणि इतरांनाही पचणे अवघडच असते.

अभिनयाचे म्हणले तर त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केलेले बहुतेक चित्रपट २००० पूर्वीचे आहेत. मागच्या पंधरा वर्षात पहेली, स्वदेस आणि चक दे सोडले तर फार नाव घेण्यासारखे काही नाही (काही प्रमाणात चेन्नई एक्सप्रेसही), पण हल्ली इमोशनल सीन्स मधील ओठ थरथरवणे बघवत नाही. त्यापेक्षा एखादी निखळ कॉमेडी बघायला आवडेल कारण त्याचे कॉमेडी टायमिंग सुंदर आहे.

पण whatsapp किंवा मीडीयातील अपप्रचारामुळे कोणी त्याचा राग राग करत असेल तर त्यांनी विचार करण्याची नक्कीच गरज आहे. एक तो मैदानातला प्रसंग सोडला तर त्याने कधीच नाव ठेवण्यासारखे काही केलेले नाही बहुतेक...निदान पब्लिकली.

सेलीब्रीटी मॅनेजमेंट आणि त्याचं आर्थिक गणित हा विषय बराचसा किचकट आणि सर्वसामान्यांना माहित नसणारा आहे. तो धाग्याचा विषय नाही.

>>>

एक्झॅक्टली नंदिनी,
सर्वसामान्यांना माहिती फार कमी असते, याचाच फायदा घेऊन तर त्यांना भडकावले जाते आणि आपली राजकीय पोळी भाजली जाते.

नाही केदार. गेट युवर फॅक्ट्स राईट.

दिलवालेवर बहिष्कार मनसे घालतंय, शिवसेना नाही.

मागच्या महिन्यात शाहरुखने असहिष्णुतेबद्दल स्टेटमेन्ट केलं होतं तेव्हा काही हिंदुत्ववाद्यांनी त्याला टार्गेट केलं होतं तर शिवसेनेने सपोर्ट केलं होतं..गुगल करुन पाहा हवं असल्यास!

पण whatsapp किंवा मीडीयातील अपप्रचारामुळे कोणी त्याचा राग राग करत असेल तर त्यांनी विचार करण्याची नक्कीच गरज आहे. एक तो मैदानातला प्रसंग सोडला तर त्याने कधीच नाव ठेवण्यासारखे काही केलेले नाही बहुतेक...निदान पब्लिकली. >> + १

मैदानात मात्र तो चुकला हे खर Sad

क्र..१
त्याचे चित्रपट पाहू नका असे ठरवून जरी चित्रपट नाही पाहिले तरी त्यात शाहरुखचे काय नुकसान होईल ते कळत नाही झाले तर निर्मात्याचे किंवा पैसे लावणा-याचे होईल, शाहरुखने त्याचे पैसे आधीच घेतले असतील .
क्र.२.
सध्या तरी तो सहिष्णू भारतात राहतो त्यामुळे बोलण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि कोणाला पैसे द्यायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य त्याला आहे. अर्थात देशविरोधी बोलत असेल तर सरळ देशद्रोहाचा खटला चालवावा , मात्र पाकिस्तानच्या गरजवंताना (अतिरेक्यांना नव्हे) मदत करतो हा त्याचा गुन्हा ठरु शकत नाही.
मुळातच आयुष्यात कुठल्याच समाजकार्यासाठी स्वतःच्या खिशातला एक पैसा ही खर्च न केलेली मंडळी त्याने अमूक तमूकसाठी पैसे दिले पाहिजेत असा उपदेश कोणत्या नैतिक अधिकाराने देतात तेच कळत नाही.

क्र ३ आणि महत्वाचे
मी शाहरुखचा अजिबात फॅन नाही,मला त्याची अ‍ॅक्टींग अगदी टूकार वाटते म्हणून मी त्याचे चित्रपट थेटरात जावून पाहत नाही, तरीही त्याचे चित्रपट पाहू नका वगैरे पोस्ट्चा मी निषेध करतो.तुम्हाला अमूक संस्थेला मदत करायची इच्छा असेल तर ती सढळ हाताने करावी त्याला शाहरुखचे चित्रपट पाहण्याशी संबंध लावू नये.

त.टि. मी पोस्ट केलेल्या मताशी मी सर्वकाळ सहमत राहील याबाबत कोणतीही खात्री देता येणार नाही
.
..
क..क..क...क...कक.....ककक...किरणकुमार

तर शिवसेनेने सपोर्ट केलं होतं.. >> हो कर्रेक्ट. मी माझ्या एक सैनिक मित्राला या मतपरीवर्तनाबद्दल टोमणाही मारल्याचे आठवतेय. बेसिकली शाहरूख खान हे एक ब्रांड नेम आहे, त्याची ब्रांड वॅल्यू वापरली जाते. या कोणत्याही राजकीय पक्षाची याबाबत काही ठोस तत्वे नाहीत.

क्र..१
त्याचे चित्रपट पाहू नका असे ठरवून जरी चित्रपट नाही पाहिले तरी त्यात शाहरुखचे काय नुकसान होईल ते कळत नाही झाले तर निर्मात्याचे किंवा पैसे लावणा-याचे होईल, शाहरुखने त्याचे पैसे आधीच घेतले असतील .
>>>
पण असे सतत होऊ लागले तर पुढच्या वेळी कोणी निर्माता त्याच्यावर आपले पैसे लावणार नाही.

किकु, मला त्याची अ‍ॅक्टींग अगदी टूकार वाटते म्हणून मी त्याचे चित्रपट थेटरात जावून पाहत नाही >> हे एवढं सोडुन +१

एक्झॅक्टली नंदिनी,
सर्वसामान्यांना माहिती फार कमी असते, याचाच फायदा घेऊन तर त्यांना भडकावले जाते आणि आपली राजकीय पोळी भाजली जाते.>>> तुला स्वतःला तर काहीच माहित नसते तरी हातभर पोस्टी टाकत असतोसच.

किकु +१
अगदी
मला त्याची अ‍ॅक्टींग अगदी टूकार वाटते म्हणून मी त्याचे चित्रपट थेटरात जावून पाहत नाही
याचाही आदर आहे . शेवटी ते तुमच मत आहे Happy

तुला स्वतःला तर काहीच माहित नसते तरी हातभर पोस्टी टाकत असतोसच.
>>
हा हा अ‍ॅक्चुअली.
पण काय करणार, तुमच्या सारखे या क्षेत्रातील जाणकार मंडळी फक्त हेडलाईन देतात आणि पुढचे इथे सांगता येणार नाही किंवा ते किचकट आहे म्हणत डिटेल देत नाहीत. त्यामुळे मग लोकांना मग माझ्यासारख्यांना झेलावे लागते Wink

लेटरवर सही शाहरुखचीच होती. हे बघायला विसरलात ?
>>
सही तर मी पण नाही पाहिली, ना बघायची गरज भासली, पण
रेड चिलीने उद्या काही गफला केला तर नक्की बिल शाहरूखवर फाटेल Happy

रिलायन्स ने मदत केली (केलेली नाही खरं तर, आणि त्यांच्याबद्दल कुणाला राग नसणार) तर अंबानींचंच नाव होतं तसंच आहे रेड चिलीज आणि शाखा बद्दल.

किमान दिलेत हे खरे आहे. चेन्नई मुस्लीम राष्ट्र आहे किंवा नाही याबद्दल जाणकार बोलतील. या मोहीमेमागए कोण आहेत हे समजणे अवघड नाही. तेच ते नेहमीचेच जे अखलाख च्या आर्मीतल्या मुलाबद्दल अपप्रचार करत होते. त्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी काडीचाही संबंध नाही.

द्वेष हा हिंदुत्ववाद्यांचा लाडका छंद आहे.

...... अकबर .. औरंग्जेब .... गांधी .... नेहरू ..... काँग्रेस ..... सोनियाजी ...... शाहरुख........ मोगा ....

Proud

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

Rofl

>>>>> द्वेष हा हिंदुत्ववाद्यांचा लाडका छंद आहे. अ़कबर .. औरंग्जेब .... गांधी .... नेहरू ..... काँग्रेस ..... सोनियाजी ...... शाहरुख........ मोगा .... <<<<<<
हुमायुन राहिला की हो यात.... Wink

>>>>> एक हुमायुन मेंटेलिटी असते लोकांची ,,,,,
बहुतेक या द्वेषालाच "हुमायुन मेंटेलिटी" असे ऋन्मेष म्हणत असावा. होना ऋन्मेष?

फक्त छंदच आहे ना? एकमेव प्रेषिताने सांगितलेला जीवनाचा मार्ग + धर्माज्ञा तर नाहीना?
छंद बदलता येतो. टाकता येतो. सुधारता येतो.
धर्माज्ञा कशी टाळणार?

धागा भरकटतोय Happy
असेही हिंदुत्ववादी हा एक भाग झाला
पण इतरही असे आहेत जे का चिडतात तेही कळत नाही .

आणखी एक , जसा एक्स्क्युज म्हणा किंवा बेनेफिट ऑफ डाउट म्हणा इतराना (अगदी इतर खानानाही ) दिला जातो तो शाहरूखला दिला जात नाही ( उदा तो व्यक्ती म्हणून कसाही असेल , अभिनेता म्हणून पहा , आणि व्हाईस वर्सा वगैरे )

त्याच्या बाबतीत मात्र तो च ना तू ... तू च ना तो .. Happy

राग येतो खरा...
बेफ़ि व दक्षिणा यांना अनुमोदन.
फ़ौजी मधला शा.खा. हरवला हे खरे. तेच तेच असते त्याचे.
फ़क्त स्वदेस मधे तो आवडला.याचा अर्थ टॅलेन्ट आहे पण त्याने आपल्या गर्वाने घालवले असे वाटतेय.
अतीच अटिट्युड आहे त्याचा जो गर्विष्ठ पणा वाटतो. तो 'आपल्यातला' वाटतच नाही. त्याच्या भुमिकांन मुळे असेल.
तेच अक्षय कुमार आपला वाटतो. आणि अक्षय चा अटिट्युड हा सेलिब्रेटी चा वाटतो.

Pages