शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखचा अभिनय अगदी सुरूवातीपासून कधीच आवडला नव्हता. स्वतःवरच खूष असलेला अभिनेता आहे तो. त्यातच अमिताभ वर पोसलेल्या पिढीला नवे अभिनेते स्विकारणे जड जायचे. सलमानसुद्धा सुरूवातीला आवडला नव्हता. नंतर या लोकांची सवय होत गेली. खटकणे कमी झाले. मात्र शाखा सुरूवातीला बड्या बॅरर्समुळे तरला हे सुद्धा अमान्य करता येणार नाही. कमल हसनच्या मार्गाने आमीर खान जात राहील्याने तो आवडू लागला. अलिकडे स्टारपणा पेक्षा अभिनेते आवडतात. अलिकडे चांगले अभिनेते खूप आहेत आणि त्यांना मुख्य भूमिका मिळतात हा चांगला बदल आहे.

राजकुमार राव, पंकज त्रिवेदी, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान ही मंडळी रूढ अर्थाने स्टार नाहीत. मात्र सहज सुंदर अभिनय आहे. मॅनरिझम्स वर भर कमी आहे.

हे सगळे असूनही शाहरूख खानने मेहनत घेतली हे मान्य करावेच लागते. तसेच त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सलमान किंवा संजय दत्त प्रमाणे उथळपणा दिसला नाही. कुठल्या अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले गेले नाही. त्याचे कुटुंबाला, मुलांना वेळ देणे हे सुद्धा आवडण्यासारखे. चक दे सारखे काही चांगले सिनेमे त्याने केले. त्यात तो नक्की आवडला. निव्वळ मनोरंजनात्मक म्हणून चेन्नई एक्स्प्रेस मधे मात्र त्याने धमाल केली आहे. विनोदी भूमिकाही त्याने चांगली केली आहे. यश चोप्रा किंवा जोहरपटांच्या बाहेर पडून काही सिनेमात मेलो ड्रामाशिवायही मला काही चांगले करता येते असे दाखवले तेव्हां तो आवडलाच.

त्यामुळे त्याचा राग येतो वगैरे म्हणणे आपल्याला लागू होत नाही . कुणाला होतही असेल.

अत्यंत पर्सनल आणि दर्जाहीन कमेंटबद्दल DShraddha यांचा निषेध.
अॅडमिन तुमच्याकडे तक्रार केली आहे.. कृपया योग्य ती कारवाई करावी..

Submitted by किरणुद्दीन on 22 November, 2018 - 08:38
>>>>

छान संतुलित पोस्ट!

मुळात जे शाहरूखचा राग करतात त्यांनी तो तसा करावा यासाठी दाणे शाहरूखनेच टाकले असतात. ते लोकं फक्त ते दाणे टिपत असतात. हा त्याच्या सेल्फ मार्केटींग स्ट्रेटेज्जीचा भाग आहे Happy

https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

१७ वर्षाआधी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'अशोका' चित्रपटात कलिंग लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. या चित्रपटात शाहरुखने इतिहासाची चुकीची माहिती दिली असा त्याच्यावर आरोप आहे. ओडिशात आल्यानंतर शाहरुखच्या तोंडाला काळे फासू, अशी धमकी कलिंग सेनेने दिली आहे. तसेच 'मॅन्स हॉकी वर्ल्ड कप'साठी शाहरुख २७ नोव्हेंबर रोजी कलिंग स्टेडियममध्ये आल्यानंतर त्याला काळे झेंडे दाखवू असा इशाराही कलिंग सेनेने दिला आहे.

सिरियसली?? काय झालंय काय लोकांना!!
रेट्रोस्पेक्टिव्हली भावना दुखवून घेतायंत. बळं बळं..

शाहरूख हा भारतातील सर्वात मोठा लोकप्रिय ब्राण्ड आहे. तर एखाद्या कलीग सेनेला त्याच्यापासून प्रसिद्धी मिळवावीशी वाटली तर यात नवल नाही.

शाहरूख एक चांगला ॲक्टर आहे ..ह्यात वाद नाही...पण समहाऊ रिअल लाईफमध्ये त्याचं स्वभाव खुप अहंकारी वाटतो...

आणि सेल्फमेड म्हणजे नक्की काय??
शाखा च फॅमिली बॅकग्राऊंड बर्यापैकी चांगल होतं...त्या काळात तो चांगला ग्रज्युवेट होता आणि तो इंग्लीश स्कूलमधून पास आऊट झालेला...त्याच्या वडीलांच हाॅटेल व्यवसाय तर आजोबा चीप ईंजिनीअर होते...ज्याचे आजोबा चिप इंजीनीअर होते , ज्याचा वडीलांचा हाॅटेल व्यवसाय आहे ,आजोबा चीप इंजीनीअर आहेत तो बसने स्टुडीओत जायला मित्राकडून 20 रूपये उधार घेतो हे कुठेतरी पटत नाही..
ही सगळी मला तर प्रसिद्धीसाठी रचलेली फेक स्टोरी वाटते..

रजिनीकांतसारखा बस कंडक्टर असता तर त्याचा स्ट्रगल समजला असता..

हा पण फिल्म इंडीस्ट्रीत काम मिळवण्यासाठी स्ट्रगल केला असेल पण अगदीच उधार घेऊन, बसस्टाॅप किंवा ट्रेन प्लॅटफाॅर्म झोपून हालाकीचे दिवस काढले असतील हे पटत नाही..

there is nothing to like in shakha. Salman, shahrukh asalya mandalinchya nadala mee lagat nahi.

Star mandalinchya bhajani lagalelya manasancha mala achamba vatato, itakech.

DShradha - cheap. Very cheap. >>>> her posts often are cheap. One should read her comments on 'Amanviya' for Boklat. The way she insults as if she owns the thread, rather the Mabo itself. Even Mr Gallewale may not insult any user ID that badly.

Nanba - त्यात पण एक मजा असते एखाद्याचा फॅन होण्यात आणि क्रेजी गोष्टी करण्यात. मी स्वतः करीना चा खुशी बँक to बॅक 3 शो पहिला होता कॉलेज मध्ये ☺️

बादवे - अमानवीय वरचे बोकलात विरुद्ध चे कंमेंट्स खूप वाईट आहेत. बोकलत आगे बढो.

आणि सेल्फमेड म्हणजे नक्की काय??
अजयजी , माझ्या मते सेल्फ मेड म्हणजे इंडस्ट्रीमधे कुठल्या गॉडफादर विना तरलेला.
इथे पैशाचा फारसा संबंध नाही .
तुम्ही त्याला वागळे अन फौजीपासून पाहिल असेल. तशा भूमिका करून इथवर पोचण नक्कीच सोप नव्हत इतकच.

Star mandalinchya bhajani lagalelya manasancha mala achamba vatato, itakech.
>>>>

मला तर हे कोणाचे तरी फॅन असणे फार भारी वाटते. कारण कोणाचे तरी फॅन होताना आणि ते सर्वांसमोर कबूल करताना स्वत:तील अहंकार त्या काळापुरता का होईना बाजूला सारावा लागतो. थोडक्यात ती एक अहंकारलेस अशी चांगली स्थिती असते. त्यामुळे प्रत्येकाने एखाद्याचे तरी फॅन बनावे आणि त्याच्याबद्दल न लाजता भरभरून बोलावे.

लिंकबद्दल धन्यवाद हायझेनबर्ग.
लेख अगदी तुंबाड जमलाय. याआधीही वाचलेला, पुन्हा वाचला. त्या लेखात आणखी एका लेखाची लिंक आहे. तो देखील पुन्हा वाचला. लेखकाने स्वत:च प्रश्न निर्माण केले आहेत आणि स्वत:च त्यांची उत्तरे शोधली आहेत. शाहरूख खान नामक नटाला ओळखणारयाने प्रत्येकाने झरूर वाचावाच. पण लेख त्यापलीकडेही बरेच काही सांगून जातो...

मलाही शाहरुख खान खुप आवडतो सातवीत असल्यापासुन आणि शेवट पर्यन्त आवड्त राहणार कुणी काहिही बोलो...

मला फौजीमधेच शाखा आवडला होता.

.डर आणि दि.दु.ले.जा.पाहिलाय. डर,मैत्रिणीच्या आग्रहास्तव आणि दि.दु.ले.जा,दुसर्‍या र्मैत्रिणीबरोबर. डर ठीक होता.दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चनच्या मिश्रणात अ‍ॅक्टिंग होती.तशी बरेचदा असतेच. दिलवालेमधे काजोलमुळे मजा आली.अजून एक सिनेमामधे(बसमधे पाहिला.नाव लक्षात नाही) अमिताभ बच्चनबरोबर होता.त्यात काम चांगलं केलं होतं. पण का कोण जाणे तो आवडत नाहीच.अहंमन्य, उद्दाम वाटतो.सदैव चेहर्‍यावर एक नम्रतेचा खोटा मुखवटा बाळगणारा वाटतो.अर्थात हे.मा.वै.म.
के.बी.सी.मधे तो होता त्यावेळी पहाणे टाळले.ज्या प्रकारे अ.ब, समोरच्याला आदर देऊन कार्यक्रम सादर करायचा/करतो त्याला तोड नाही.इथे कंपॅरिझन नाही,मुळातच शाखा आवडत नाही.

पण का कोण जाणे तो आवडत नाहीच.अहंमन्य, उद्दाम वाटतो.सदैव चेहर्‍यावर एक नम्रतेचा मुखवटा बाळगणारा वाटतो.अर्थात हे.मा.वै.म.
>>>

मला नेमके याच कारणासाठी तो आवडतो.
त्याच्याकडे एटीट्यूड आहे. आणि त्याला विनम्रतेचा मुलामा देऊन तो कसा प्रेजेंट करायचा हे त्याला बरोब्बर माहीत आहे. आणि म्हणूनच तो सुपर्रस्टार आहे. आमीर वा सलमापेक्षा याचमुळे उजवा आहे.

लिंकबद्दल धन्यवाद हायझेनबर्ग.
लेख अगदी तुंबाड जमलाय. याआधीही वाचलेला, पुन्हा वाचला. त्या लेखात आणखी एका लेखाची लिंक आहे. तो देखील पुन्हा वाचला. लेखकाने स्वत:च प्रश्न निर्माण केले आहेत आणि स्वत:च त्यांची उत्तरे शोधली आहेत. शाहरूख खान नामक नटाला ओळखणारयाने प्रत्येकाने झरूर वाचावाच. पण लेख त्यापलीकडेही बरेच काही सांगून जातो...
>>>>>>>आय , मी अन मायसेल्फ़ चालु आहे.

Pages