शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. गजानन्स चॅलेंज....

मै शाहरुख की फिल्म नही देखुंगा... लेकिन कोइ मेरे घर पे आके उसके जैसा मुझे एंटरटेन करेगा , तो मै उसे पचास रु जादा दूंगा /

If nobody is ready to accept this challenge , let me go to watch his movie !

मला तर हाफिज सईद चा पण सपोर्ट शाहरूख अन दिलवाले आलाय स्मित
>>
मलाही
त्यासोबत भला मोठा मेसेज शाहरुख कसा नालायक आहे आणि आपण मराठी संस्कृती जपायला ( Proud ) कसं बाजीराव मस्तानीच पहायला हवा आणि दिलवाले नाही Proud

पण फेसबुकावरचे लोक इतके रीकामटेकडे कसे असतात? आणी त्याना एवढा वेळ कुठुन मिळतो टाईप करायला?:अओ: मी फेसबुक, वॉटसप वा टिवटिव वर पण नाहीये, मायबोलीच इतकी पुरते की हे कुठुन बघणार?

काही लोक कोणाचा तरी द्वेष करण्यात आपले आयुष्य वाया घालवतात,
तर काही लोक कोणावर तरी प्रेम करण्यात सार्थकी लावतात Happy

मला आलेले सर्व मेसेजेस हे २०१४ च्या नायकाच्या भक्तांकडूनच आलेले आहेत. कृपया गैस पसरवू नयेत अन्यथा पुरावे द्यावेत ही नम्र विनंती.

काजोल, रोहीत शेट्टी, चोप्रा कंपनी हे त्याच्य फेवरमधे आहेत. हे लोक कशाला असे करतील ? उर्वरीत खान त्याचे प्रतिस्पर्धी आहेत, फेवरमधले नव्हेत. मग आणखी कोण ?

मी शाखा फॅन नाही पण दिलवाले पाहिला. कारण मनोरंजन.
मी रणवीर फॅन नाही पण जमल्यास (बजेट संपल्याने) बामा सुद्धा पाहीन. कारण यापूर्वी एकाही संस्कृतीरक्षकाला बा वर सिनेमा बनवावासा वाटलेला नाही. बनवला असता तर आत्ता भन्साळीसाठी हा विषय फुलटॉस सारखा सोडून दिलेला नसता. आता भन्साळी त्याच्या पैशाने सिनेमा बनवतोय तर त्यात ४०% का होईना इतिहास असेलच. पुरंदरेंच्या पुस्तकात किती टक्के इतिहास होता ? तरी त्यांना सपोर्ट करणारेच बामा ला विरोध करताना दिसताहेत हे अजब आहे. बामा मधे इतिहासाची मोडतोड झालीये याबद्दल आनंद वाटतोय म्हणून पाहणार नसून, अद्याप भारताच्या मोठ्या भागात बाजीरावाबद्दल माहीती नाहीये. या निमित्ताने सर्वच्या सर्व वाहीन्यांवर बाजीरावाबद्दल माहीती देण्याचा सपाटा लागलाय.

एव्हढं काम तरी या निमित्ताने झालंय. एका सिनेमाने गैरसमज पसरतील आणि नंतर माहीती घ्याविशी वाटणा-याला खरी माहीती मिळणार नाही अशा भयगंडाने पछाडलेल्यांचं काही होऊ शकत नाही. जे या गंडाने पछाडलेले आहेत ते ब-यापैकी सुशिक्षित आहेत हे विशेष !

ज्यांना इतिहासाचे चारपैशाचे ज्ञान नाही अश्यांनी इतरांना इतिहास शिकवू नये इतके साधे ज्ञान भाजप्यांना किमान असावे. Wink

महेश ,
नंदिनी, बरे झाले, आतल्या गोटातली बातमी सांगितलीत. >> तुम्ही विश्वास लगेच कसा ठेवलात ? त्यानी काही पुरावा दिलाय ? लॉजिकली यात त्याचा काहीच फायदा नसताना तो अस का करेल ? की आपल्याला सोयीस्कर ते उचलायच ? उगाच एखाद्याया मागे लागायच म्हणून लागायच ? Sad

त्या पत्रकार आहेत, तुम्ही आम्ही नाही आहोत म्हणुन त्यातल्या त्यात त्यांच्यावर जरा विश्वास दाखविणे अगदीच चूक नाही.

त्या पत्रकार आहेत, तुम्ही आम्ही नाही आहोत म्हणुन त्यातल्या त्यात त्यांच्यावर जरा विश्वास दाखविणे अगदीच चूक नाही. >> महेश , पण पुरावा नको का काही ?

मी गेली १० वर्ष चिप डिजाईन करतोय , तुम्ही नाही म्हणून मी त्या बाबतीत बोललेल सगळ तुम्ही खर मानणार का ?

माझे वाक्य निट वाचले नाही का ? विशेषतः बोल्ड केलेला भाग.
तुमचे चिपबद्दलचे बोलणे चीप नसेल तर त्यावरही जरा विश्वास ठेवू की. Happy

महेश , मला काय म्हणायच ते तुम्हाला चांगलच कळल्य , पण जाऊ दे Happy
झोपलेल्याला उठवता येत , झोपेच सोंग घेतलेल्याला नाही Happy

आणखी एक , या अशा मेसेज ने वा बॅनने मला (कींवा इतर फॅन्सना) फारसा फरक पडत नाही . आम्हाला आवडला , आम्ही पाहिला झाल Happy
शाहरूख ला ही पडत नसावा . कारण इंटरनॅशनल मार्केट मधे सिनेमा धो धो चालतोय .

फक्त जे चाललय ते वाईट आहे . एखाद्या वाक्यावरून (ते बरोबर चूक वेगळा भाग ) जर चित्रपट बंद पाडले जात असतील (त्या चित्रपटात आक्षेपार्ह काहीही नसताना) , उगाच अगदी हाफिज सईद सपोर्टींग पासून चित्रपट पाहणारे आई** असे मेसेज येत असतील तर ते काही बर नाही.
जमेल त्या फोरम वर मी एकटा भांडतोय कारण शेवटी ही माणस वाईट नाहियेत Happy
म्हातारी मेल्याच दु:ख नाही . काळ सोकावतोय Sad

जमेल त्या फोरम वर मी एकटा भांडतोय >>> माझ्या पोस्टी स्कीप केल्यात का ? Lol

शाखाने नेमकं काय म्हटलं होतं याबद्दल अन्यत्र बोटं बडवून झालेली आहेत. मुलाखत घेताना प्रश्नांचा रोख, त्या दरम्यान त्या अनुषंगाने दिलेली उत्तरे आणि विपर्यास करून झालेला वाद. कमल हसन ने देखील असंच वक्तव्य करूनही त्याला मिळणारी सहानुभूती, पेडर रोड ला फ्लायओव्हर झाल्यास दुबईत रहायला जाईन अशी गानकोकिळेने दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर जे काही चाललं आहे ते अत्यंत वाईट आहे असं म्हणता येईल. तीन चार धाग्यावर हे लिहीलेलं आहे.

माझ्या पोस्टी स्कीप केल्यात का ? हाहा >> सॉरी . इथे नाही हो . मी फोरम चुकीचा शब्द वापरला . व्हॉट्सअप ग्रुप म्हणायच होत मला .
पण खरच अगदी वाईट वाटाव अशी परिस्थिती आहे . माझे जवळ जवळ १०-१२ ग्रुप्स आहेत . त्यातला एक फक्त कॉलेज ग्रुप सोडला तर सर्वत्र हेच चालू आहे . Sad

केदार, तुम्ही आता उतरलात का मैदानात? शारुख गळाला लागला तेव्हा? हे असं कधीपासून होतंय. मी ओळखीच्या लोकांशी भांडायचं आणि बोलायचं (ग्रुप्सवर = झुंडीशी) सोडून दिलं, अमीर खान प्रकरणानंतर.

भम
मी आधीही लिहीलंय . पुन्हा लिहीतो.
गुजरात मधे फना बॅन झाला (गैरसरकारी पण स्टेट स्पॉन्सर्ड बॅन ) त्या काळातच तिन्ही खानांचे सिनेमे पाहणार नाही अशा शपथा घे/ देणारी मोहीम चालू होती. इथे सत्यमेव जयतेच्या काळात आमीरबद्दल चालू असलेल्या मोहीमेचा उल्लेख झालेला आहे. त्या वेळी देश सोडून जाण्याचा मुद्दाही अस्तित्वात नव्हता.

Pages