शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं तेव्हा व्हॉट्सँप नव्हतं त्यामुळे शपथा आमच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या. पण शपथा घेऊन पाळायच्या असतात ना? गल्ला तर रेकॉर्डब्रेक जमतोय. बेबीला प्रमोट करायचे पीकेच्या तुलनेत हेही पाहिलं. पण परिणाम?

बहुधा डाएट करताना जाऊ द्या आजच्या दिवस खाऊ.. अशा बेताने शपथा घेतल्या जात असाव्यात. बंदीचं आवाहन करणा-यांमधे ते पथ्य पाळण्याचा ताण असह्य होऊन उतारा म्हणून ....

ओशोंनी एक उदाहरण दिलं होतं. १२० फूट रस्त्यावर सायकल शिकत असतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर जाऊन आदळू अशी भीती वाटली तर त्या स्वाराचं मन त्या दगडावर केंद्रीत होतं आणि १२० फुटी रस्ता त्याला दिसेनासा होऊन त्याचा शेवट त्या दगडावर जाऊन आदळण्यात होतो.

बंदीच्या बाबतीत असं होत असावं. त्यामुळे बंदीचं टेण्शन नसणारे एक वेळ जाणार नाहीत पण...

(संदर्भ - संभोगातून समाधीकडे )

भरत मयेकर , हं पटल तुमच . मे बी जोवर स्वतःला झळ लागत नाही तोवर आपण जागे होत नाही Happy

देशद्रोही , नमकहराम वगैरेही जुन झाल
आताच एका मित्रांच्या ग्रुप वर ( सगळे बर्यापैकी सुशिक्षित , किमान पदवीधर ) चित्रपट बघणारे " हे कसले दिलवाले , हे तर आई*ले " मेसेज आला . धू धू धुतलाय त्याला . नंतर स्पष्टीकरण , मी तर फक्त आलेला फॉरवर्ड केला , माझ काय चुकल ?
म्हटल मी पाहिलाय , मग हे मला लागू होत का , तर मग तंतरली Sad

माझे जवळ जवळ १०-१२ ग्रुप्स आहेत . त्यातला एक फक्त कॉलेज ग्रुप सोडला तर सर्वत्र हेच चालू आहे.
>>
हो हे खरेय. पण बरेचदा ग्रूपमधील सर्वच यात सामील असतात अशी परिस्थिती नसते. काही जण फक्त अश्यांना विरोध करत नाहीत ईतकेच. तसेच तुम्ही विरोध केला तरी बघ्याची भुमिका घेतात. अर्थात त्यात काही जणांचा असाही विचार असतो की या वादात आपल्या ग्रूपचे वातावरण का बिघडवा. पण येस्स यामुळेच काळ सोकावतो.

बाकी बरेचदा हे फॅड तात्पुरते येते आणि नाहीसे होते. हल्ली हे वारंवार होऊ लागलेय. खड्ड्यात गेला हिंदू-मुस्लिम, सहिष्णू-असहिष्णू वाद, पण एण्ड ऑफ द डे यात नुकसान देशाचे, समाजाचेच आहे जो सर्वांनी मिळून बनला आहे आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक वा शारीरीक फटका याचा बसणार तो सर्वसामान्य माणसांनाच बसणार.

वर शिव्यांचे गलिच्छ मेसेज जे फिरत आहेत ते शाहरूख हा केवळ तोच तोच अभिनय करणारा सुमार आणि अहंकारी अभिनेता आहे म्हणून याच द्वेषातून फिरत आहेत, आणि याचा संबंध कट्टरतेशी नाहीये असे कोणी म्हणत असेल तर त्यांना माझा सलाम नमस्ते!
आशा करतो हा ही भर ओसरेल, लोकं या ब्रेनवॉशमधून बाहेर येतील, अन्यथा लोकशक्ती विध्वंसक कारणासाठीही एकत्र आणता येते असा चुकीचा पायंडा पडेल.

New ISI chief shares tenuous link with Shah Rukh Khan
http://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/New-ISI-chief-shares-t...

तो नेहमी पाकिस्तानी लोकांना सपोर्ट करतो. अभिनेते आणि खेळाडू .
तो म्हणजे राहतो भारतात , खातो भारतात पण "फिर भी दिल ही पाकिस्तानी" असा आहे ..
माणसाच्या डोक्यावर एकाच टोपी पाहिजे. अभिनेता म्हणून मी याव करतो , भारतीय नागरिक म्हणून वेगळेच करतो, खेळ कंपनीचा मालक म्हणून माझी भूमिका अजून वेगळी ... हा सगळा ढोंगी पणा आहे. सार्वजनिक जीवनातील माणसाची भूमिका एकच पाहिजे.

२०१२ ची बातमी आता Rofl यातूनच दिसून येते. आता इथल्या कित्येक जनांचे नातेवाईक पाकिस्तानात आहे सगळे पाकिस्तानी झाले का?

कैच्याकै

हो ना. अमीर खानचे कोकाकोला, गोदरेज होम्स यांच्याबरोबरचे करार संपलं या बातम्या पण रिसर्क्युलेट केलेल्या. नव्या बातम्या मॅन्युफॅक्चर करायला जरा वेळ लागेल हो. Wink

सध्या व्हॉटसवपर एक विडीओ फिरतोय शाहरूखच्या ईंटरव्यूचा. त्याला शीर्षक असे दिलेय की शाहरूखने देशाशी तुलना बाथरूमशी केली. शब्द पकडून त्याचा चुकीचा अर्थ पसरवणारे हे लोकंच खरे तर देशाची तुलना बाथरूमबरोबर असा अपप्रचार करून देशाचा अपमान करतात हे त्यांना समजत नाही.

एक व्हिडीओ पाहिला व्हॉए वर. मजेदार बोलला आहे तो ("आज मी व्हल्नरेबल आहे, माफी मागतो. उद्या ३०० कोटी मिळाल्यावर...." वगैरे). पण त्यात बाथरूम वगैरे आठवत नाही.

Watched it
Loved it
Somwari punha family sobat baghanar.
Kedar ignore such ppl and enjoy shaharukh's success Happy
He is the 'badshah' of Bollywood and he is gonna be king always
Let ppl say whatever they wants to.. They just can scream and cry as they don't hv any other choice. Cause-
he was king
He is king
He will always remain king.
Let haters hate him, our love and blessings will always protect him from this all Wink

केदार फिकर नॉट!
दिलवाले सुपरहीट झालाय आणि बाजीराव-मस्तानीची तिकिटं सहज उपलब्ध असताना दिलवालेची मात्र मिळत नाहीयेत. शाहरुखने पत राखली बाबा स्वतःची बॉक्स ऑफिसवर.

शाहरुखने पत राखली बाबा स्वतःची >> त्याने नाही, पब्लीकने स्वतःची पत राखली. मोहीम चालवणा-यांना न बोलता दिलेलं थुफो उत्तर आहे हे, दिल्ली-बिहार प्रमाणेच. आता चेहरे काळे ठिक्कर पडले असतील.

आज आमच्या शेजारचा मुस्लिम मुलगा बाजीराव मस्तानी चित्रपट बघून आला आणि मला येऊन खूप कौतुकाने सांगू लागला, भैय्या बहोत सही पिक्चर है.
धर्म खरेच नाही येत कलेच्या मध्ये. जे आणतात ते मूठभर लोक आहेत. दोन्हीकडे. कुठे कमी असतील कुठे जास्त असतील, पण ते चुकीचेच आहेत आणि आपणही तसेच बनायचे का हे आपल्यालाच ठरवायचे आहे.

बरेच जणांना असे वाटते की आपण शाहरूखचा राग करतोय पण खरे तर ते मनोमन प्रेम करत असतात आणि हे कबूल करायला नाकारत असल्याने स्वताचाच राग करत असतात.. हे नातेच काहीसे असे आहे .. Happy
उद्या जर शाहरूख हेट क्लब आणि शाहरूख फॅन क्लब असे दोन वेगवेगळे क्लब काढले तरी तेच तेच सभासद दोन्हींकडे दिसतील कारण आपण सारेच शाहरूख क्लबच्या अंडर येतो Happy
प्रभाव !!!! Happy

Watched it
Loved it
Somwari punha family sobat baghanar. >> सही रीया Happy

एक व्हिडीओ पाहिला व्हॉए वर. मजेदार बोलला आहे तो ("आज मी व्हल्नरेबल आहे, माफी मागतो. उद्या ३०० कोटी मिळाल्यावर...." वगैरे). पण त्यात बाथरूम वगैरे आठवत नाही. >> फा , मीही पाहिला तो . Happy
अगदी बरोबर बोललाय . आणि देशाची बाथरूमशी तुलना वगैरे अगदीच काहीही . ते बोलणे त्याने चेन्नईत मदत का केली , इथे का नाही असे विचारणार्यासाठी होते ( देशभक्त , स्टेट भक्त वगैरे ...)

चेन्नई हे मुस्लीम राष्ट्र आहे.
त्याने मुस्लीम पूरग्रस्त राष्ट्राला मदत केलीय असा मेसेज आहे. बातम्यांमधे चेन्नईला मदत केली असं दिसतंय. त्यामुळे त्याच न्यायाने चेन्नई हे मु.रा. आहे हे सिद्ध होतंय.

मी कालपासून शाखा चे ट्वीट्स वाचतेय.
असे फॅन्स असल्यावर शत्रूंची काय गरज आहे शाखाला! दिवसेंदिवस बकवास सिनेमे करून सुद्धा त्याला डोक्यावर घेऊन नाचतात त्याचा जास्ती राग येतो. चक दे नंतर एकतरी बरा सिनेमा आहे का शाखा च्या नावावर? 50 years down the line who's going to watch these stupid movies like happy new year or Dilwale? SRK's fans have ruined him as an actor. I used to be a fan, not anymore. I still have great expectations from Raees. I hope to see SRK the actor again!

भरत साहेब कशाला त्याची बाजू घेताय तुमची गोष्ट वेगळी आहे खरं तुम्ही स्ट्रगल केले आहे त्यांनी नाही

तो काही एवढा चांगला कलाकार नाहीये … नुसता ह

हिंदी सिनेमा श्रुष्टी वशिल्याची आहे याची आपणास कल्पना असायला हवी

कारण ते यडं आहेच तसं...
कसा बघतो तो हिराॅईनकडे... यक्स..>>
काय हा मुर्खपणा! नवर्‍याचं जगण नकोसं करणारी दिसते

Pages