शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सगळ्यांचे . एकूणच पाहाता तुमच्या आमच्या सारख्याला राग यायची कारणे दिसली ती
१. स्वतःला शहाणा समजणे , अ‍ॅरोगंट असणे
२, खलनायकी भूमिका करणे ( खर तर हे त्याच्या बाजूने जायला हव , की तो डर अन डीडीलजे सारख्याच ताकदीने करू शकतो)
३. तीच ती अ‍ॅक्टींग करणे ( फेअर इनफ पॉईंट)
>>>>>>

पण तरीही यातलं एकही कारण त्याचा 'द्वेष' करायला पुरेसं नाही. त्याचा राग/द्वेष करण्यापेक्षा त्याला इग्नोर करा (जे मी सलमान आणि अक्षयकुमारबाबत करते)

मला वाटतं महाराष्ट्रात शाहरुख द्वेष वाढायला आणखी एक कारण विशिष्ट राजकिय पक्ष देखील आहे.
त्यांचे आंधळे फॉलोअर्स 'शाहरुखला हेटा' म्हणलं की हेटतात आणि त्याला लव्हा म्हणलं की त्याला लव्हतात (पर्सनल अनूभव)

तो कोणासाठी माणूसकी दाखवतो, कुठे दान करतो यावरून त्याला भारत द्वेषी वगैरे म्हणणं इज टू मच. पण असो

तीच ती अ‍ॅक्टिंग , माकड चाळे, गर्व इत्यादी फार कमी सुपरस्टारांना चुकलंय. माणूस म्हणलं की चुका होणारच. गुण दोष असणारच.
मला त्याच गुणदोषांसकट शाहरुख फार फार आवडतो.
उद्याची तिकिट्स बूक करण्याच्या प्रयत्नांमधे

रिया...यू सेड इट. त्या विशिष्ट राजकिय पक्षाने केलेलं आवाहन बघून तर हसावं कि रडावं हेच कळेना. लोक पण किती ब्लाईंडली फॉर्वर्ड करतात असे मेसेजेस.

बाकी, मागच्या पानावर एक कमेंट आहे की...बायकोला आवडतो म्हणून जेलसी आहे त्याच्याबद्दल.
हे सेम आहे आमच्या नवरोबांच्या बाबतीत. बायको त्याची फॅन आहे म्हणून हेटायचं.

हम तो फॅन थे, हैं और रहेंगे.

रीया +१ . माझं परवाचं तिकीट बुक्ड.

बाकी ह्रितिक, आमिर आणि शाहरूखची तुलना केली गेली आहे तर त्यावर मी इतकंच म्हणेन की त्या दोघांची घरची प्रॉडक्शन हाउसेस आहेत. शाहरूखचं मात्र तसं नाही.

बापरे या धाग्यावरही शाहरुखचे द्वेष्टे म्हणुन हिंदुत्ववादीना धरुन झोडपलेले बघुन आश्चर्य वाटले. सगळे शाखादेव्ष्टे हिण्दुत्ववादी आहेत म्हणुन तसे आहेत, बाकीचे लोक शाखाच्या प्रेमात डुबक्या मारताहेत हे चित्र उभे राहते वरचे प्रतिसाद वाचुन.

जेव्हा लोक अब्दुल कलाम, रेहमान, फरहान, जावेद, सलमान, सैफ, मो. अझरुद्दिन, इर्फान, झहिरखान ह्यांना डोक्यावर घेऊन नाचतात तेव्हा ते नाचणारे हिन्दुत्ववादी नसतात आणि कोणालाही 'हे लोक मुसलमान असुनही यांना एवढे प्रेम कसे मिळते' हा प्रश्न पडत नाही.

मुळात असे प्रश्न पडायला नकोतच, पण कोण्या मुसलमानावर जेव्हा टीका होते तेव्हा काही लोकांना आणि टीका झेलणा-यालाही टीकाकार् हिण्दुत्ववादी आहेत याचा साक्षात्कार होतो व "केवळ मी मुसलमान म्हणुन माझ्यावर टीका होतेय" असे बोलायला सुचते तेव्हा असले प्रश्न माझ्या डोक्यात येतात. हल्ली तर खुप वेळा यायला लागलेत.

एनी वेज, मी वरच्या लिस्टीत दिलेत त्यातले सगळेच मला आवडतात असे नाही, जे आवडत नाहीत त्याचे कारण त्यांचा धर्म हे नाही. ते कारण असते तर त्या लिस्टीतल्या सगळ्यांवरच मला काट मारावी लागली असती.

जेव्हा तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या फेसबुक ट्विटर पेज वरून मेसेज पसरवले जातात तेव्हा त्यांना तेच म्हणायचे असते.

आणि सेल्फमेड एकटा शाहरुखच नाहीय. खुप जण आहेत. अमिताभही तसा सेल्फमेडच होता. त्याला सुरवातीला त्याच्या दिसण्यावरुन किती ऐकुन घ्यावे लागले आणि किती नकार पचवावे लागले याच्या कहाण्या इथे माबोवरही भरपुर सापडतील. त्याचे बाबा कवी असले तरी त्या नावामुळॅ अमिताभला चित्रपट मिळाअयला लागले असे काही झाले नाही. सचिन, सुनिल, कपिल, अझहर, रेहमान, सगळे सेल्फ मेड. कोणाचेही बापजादे इथे तंबु गाडून बसले नव्हते पोरांना चान्स द्यायला. त्यामुळे सेल्फमेड आहे म्हणुन लोक जळताहेत म्हणणा-यांची किंव कराविशी वाटतेय.

त्याला सुरवातीला त्याच्या दिसण्यावरुन किती ऐकुन घ्यावे लागले आणि किती नकार पचवावे लागले
>>>
पण त्याला कोणी दहशतवादी,पाकड्या,देशद्रोही वगैरे म्हणून हिणवल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
अमिताभला गर्व नाही का? तो साच्यात आडकला नव्हता का?

कोणाचेही बापजादे इथे तंबु गाडून बसले नव्हते पोरांना चान्स द्यायला. >>> सिरिअसली? Proud

सचिन, लता मंगेशकर वगैरेंचा द्वेष करणारा एक समाजही अजुन शाबूत आहेच आपल्याकडे. फक्त त्यांना कोणत्याही राजकिय पक्षाचा सपोर्ट मिळत नसल्याने फुस मिळत नाही इतकंच.

बाकी गर्व, अहंकार, नितिमत्ता याबाबतच बोलायचं असेल तर शाहरुख सलमानपेक्षा सरस आहे तरीही शाहरुखचेच सिनेमे बंद पाडा वगैरे गदारोळ होतो आणि सलमान मनुष्यवधाच्या गुन्ह्यातुनही सहज सुटतो.

अहंकारी असल्याने शाहरुख द्वेषला पाठिंबा देणार्‍या व्यक्तीने 'मी आजपर्यंत कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व /अहंकार बाळगला' हे लिहून द्या बरं.

म्हणजे? रीया, तुला सचिन, रेहमान हे लोक केवळ त्यांच्या बाबाने त्यांच्यासाठी जोरदार वशिला लावला म्हणुन एवढे पुढे आले असे म्हणायचेय?. असो, मी तरी आजवर कुठेही वाचलेले नाही.

रीया, तुला सचिन, रेहमान हे लोक केवळ त्यांच्या बाबाने त्यांच्यासाठी जोरदार वशिला लावला म्हणुन एवढे पुढे आले असे म्हणायचेय?
>>
नाही. पण अगदीच कोणीच इंडस्ट्रीमधे विशिल्याशिवाय फिरतंय हे ही चुकीचंच
सचिन, रेहमान, शाहरुख तिघेही आपल्या टॅलेंटच्या जोरावरच पुढे आलेत

मुळातच तथाकथिक कट्टर हिंदूत्ववाद्यांना एक खान आडनावाचा सुपरस्टार भारतात आहे आणि त्याला बहुतांशी लोकांकडून भरभरून प्रेम मिळते पाठिंबा मिळते हे सहजासहजी पचनी पडत नाही Wink

साधना, लकी यू
रेहमानला अनुभवून घे मनमुराद.
शाहरुखकडे तू दुर्लक्ष कर Happy माझ्यासाठी एखादा फोटो पाठव जमलं तर Proud

अमिताभ संस्कारी पुरूष आहे. शाखा टिपीकल दिल्लीवाला आहे. अ‍ॅटीट्युड नावाचे प्रकरण चंदीगढला जास्त अनुभवायला मिळते. अर्थात विशिष्ट शहराची सर नाहीच.

नाही. कधीच नव्हता > रेखाबद्दल प्रश्न विचारले की.. >> होय एक तेवढे सोडून बोला :). पण सिरीयसली, मला तरी आठवत नाही त्याने कोणाचा अपमान वगैरे केलेला, किंवा अ‍ॅरोंगन्स दाखवलेला. आता त्याने जन्मात एकही भांडण केले नसेल असे शक्य नाही.

पण सिरीयसली, मला तरी आठवत नाही त्याने कोणाचा अपमान वगैरे केलेला, किंवा अ‍ॅरोंगन्स दाखवलेला. आता त्याने जन्मात एकही भांडण केले नसेल असे शक्य नाही. >>

आयला मी त्याच्यानंतरच्या पिढीतला असुन सुध्दा बरेच काही माहीत आहे आणि आपण त्यांच्या आधीच्या पिढीतले असून सुध्दा ठाऊक नाही म्हणतात ? कमाल आहे बुवा Uhoh Light 1 Wink

मग ठिक आहे. मायापुरी वाचत नसाल आपण
बरेच काही होते. तो आणि शशी कपूर, जयाप्रदा, विनोद मेहरा (रेखाचा नवरा Wink )

सकाळी ७ च्या शोला चिंचवडला १९० रू तिकिट असूनही चिक्कार गर्दी होती . Happy
माझ्यासारखे अनेक लोक सहकुटुंब आले होते .
उगाच काहीही पसरवायचे Happy

सकाळी ७ च्या शोला >> इतका लवकर शो. ? Uhoh

मी इतका आळशी आहे की खुद्द शाहरुख जरी आला असता तरी बोललो असतो १२च्या शो ला येतो रे. थंडी मधे झोपू दे जरा Happy

हो . मी तर कायमच पहिल्या दिवशी पाहतो . पण शुक्रवारी सकाळी ७ वाजता ती गर्दी पाहून भरून आल Wink

बहुतेक आमच्या खून मधे नमक नाहिये Happy

अर्थातच सारेच शाखाद्वेषी हिंदुत्ववादी नाहीत पण बहुतांश हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक शाखाद्वेषी आहेत.
हे मात्र खरे आहे.
त्याचे तसे प्रॉपर ब्रांडीग केले गेले आहे.
माझ्या धाग्यावर सुद्धा मी म्हटलेले की त्याच्या याच निगेटीव्ह ब्रांडींगचा वापर करून "मोदी पंतप्रधान झाले की मी देश सोडून जाईन" हे वाक्य त्याच्या तोंडी घालून मते उकळली गेली, लाटेची उंची आणखी वाढवली गेली.

बाकी जे ईतर कारणासाठी त्याचा प्रचंड द्वेष करतात ते लोक्स मला आणखी ईंटरेस्टींग वाटतात. कारण दुर्लक्ष करणे समजू शकतो पण थेट द्वेष करणे आणि तावातावाने त्याच्यावर टिका करण्याच्या पोस्ट टाकणे हे गंमतीशीर आहे. आणि हेच त्याचे सुपर्रस्टार असणे आहे. लोकांना आवडते बोलायला त्याच्यावर Happy

Pages