Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, आईस्क्रीमच बरं वाटतंय.
हो, आईस्क्रीमच बरं वाटतंय. मिल्कशेकचा पसारा नकोच. थँक्स गं. करंज्यांऐवजी साटोर्या बघते मिळतायत का. पण पातळ काहीच नाही होत आहे मेनूत. कोरडं वाटेल का?
अर्ध्या तासात राईस आणि सुंदल
अर्ध्या तासात राईस आणि सुंदल करणार? __/\__
दोन कूकर वापरले तर शक्य आहे.
दोन कूकर वापरले तर शक्य आहे. आणि राईससाठीचे मसाले तयार आहेत मग भाज्या चिरायला किती वेळ लागतो! फुप्रो केव्हा मदतीला येणार नाहीतर?
सुंदल होऊन जाईल. राईसमध्ये
सुंदल होऊन जाईल. राईसमध्ये चित्रान्ना त्याहूनही पटकन होइल.
मेनु लय भारी!
मेनु लय भारी!
रायतं कर पातळसर पदार्थ
रायतं कर पातळसर पदार्थ म्हणून! बुंदी रायता / टोमॅटो रायतं / पालक रायतं पटकन् होणारं व जास्त पिटपिट नसणारं. पराठे, राईस व सुंदलबरोबर चांगलं वाटेल.
निल्सन, मेथीची पीठ पेरून
निल्सन, मेथीची पीठ पेरून भरपूर तेलाच्या फोडणीत केलेली परतून भाजी बऱ्यापैकी टिकते. पूर्ण गार करून फॉईलमध्ये पॅक करायची. पोळी भाजीऐवजी मेथीपराठे, दही, लोणचे, शिरा, मुगाच्या डाळीची खिचडी, वाटली डाळ (परतून केलेली) असा मेनू ठेवता येईल. सोबत, चिरलेले काकडी, टोमॅटो, गाजर. (आयत्या वेळी चिरायचे.)
मूडाखि व शिरा घरून कोरडे तयार करून न्यायचे. (मूडाखिसाठी तांदूळ डाळ मसाला जरा जास्त तेलाच्या फोडणीत खमंग परतून). तिथे गरम पाणी व जमल्यास दुधाचा हबका मारून गरम करायचे व वाफ आणायची.
मुलांसाठी मिडटाईम स्नॅक म्हणून कोरडा भेळभत्ता किंवा भडंग वा चिवडा, फळं, सुकामेवा, लाडू, चिप्स, चिक्की असे काही पदार्थ नेता येतील. (त्यांना उपास नाही हे गृहित धरलं आहे.) सोया स्टिक्स, चकली स्टिक्स, उपासाची भेळ वगैरे अनेक पर्याय आहेत. घरगुती पदार्थच हवा असेल त तिखटमिठाच्या पुऱ्या वा भोपळ्याचे घारगे.
मस्त झाला भोंडला! सामान आणून,
मस्त झाला भोंडला! सामान आणून, फुप्रो न वापरता पाऊण तासात तयार झाला मेनू. व्हेज पुलाव, मेथी पराठे, सुंदल, फरसाणपैकी मसाला पुरी, चितळ्यांच्या साटोर्या आणि शेवटी मसाला दूध.
सुंदल हिट झाले. योग्य तिथे पोस्ट टाकतेच.
__/\__ मी ऑफिसातून घरी
__/\__
मी ऑफिसातून घरी गेल्यावर कोणी पाहुणे यायचे आहेत या कल्पनेतच पहिला अर्धा तास माझं काय करू कस्सं करू होईल.
_/\_
_/\_
आशू, तू धन्य आहेस! शि सा दं
आशू, तू धन्य आहेस!
शि सा दं तुला!
कोजागिरी साठी कुणी पदार्थ
कोजागिरी साठी कुणी पदार्थ सुचवेल का? माझा मेनू पुढीलप्रमाणे आहे.
मसाला दूध
भेळ
शेवपुरी
छोटे समोसे
ओल्या खोबर्याच्या वडया
चॉकलेट्स
दूध पोहे
करंजी पापड्या
फळे
मला वरील मेनूला सूट होतील अशा अजुन २-३ खिरापति सुचवा प्लीज..
भूईमुगाच्या उकडलेल्या
भूईमुगाच्या उकडलेल्या शेंगा
वेफर्स किंवा तसंच काहीतरी कुर्रुम कुर्रुम
खाकरा चाट/ मसाला पापड
काकडी-गाजर-टोमॅटोचे तुकडे चाट मसाला भुरभुरवून
सुका मेवा
छोले चाट बाकरवडी कट
छोले चाट
बाकरवडी
कट फ्रूट्स्
जेली स्वीट्स् किंवा श्रीखंडाच्या गोळ्या
तळलेले बटाटा पापड / साबुदाणा पापड्या / कुरडया / मिरगुंडं
खारेदाणे फुटाणे साखरफुटाणे
अरुंधतीताई, त्या फळे ठेवणार
अरुंधतीताई, त्या फळे ठेवणार आहेत ना? माग अजून कट फ्रूट्स कशाला?
वाचनात गडबड झाली!!
सायो ची पनीर केपसिकम करणार
सायो ची पनीर केपसिकम करणार आहे त्या बरोबर अजुन एक भाजी करायची आहे काय करू?
पुलाव बरोबर ग्रेवी असते रेस्टोरेंट मधे ती कशी करतात माहिती आहे का? हा प्रश्न दुसरीकडे विचारू का?
धन्यवाद...
व्हेज कोल्हापुरी. ग्रेवी
व्हेज कोल्हापुरी. ग्रेवी नसलेली भाजी आहे पण एक गोडसर असेल तर दुसरी जरा मसालेदार बरी वाटते.
४० जणांसाठी स्नॅक्स पार्टी
४० जणांसाठी स्नॅक्स पार्टी ठेवायची आहे. मिक्स मेनु आणि केटरर दोन्ही सुचवा. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पार्टी असेल.
पार्टी कुठे असेल ते लिही ना
पार्टी कुठे असेल ते लिही ना नियती... त्याशिवाय कॅटररविषयी कशी माहिती देता येईल?
मिक्स मेनू म्हणजे व्हेज + नॉनव्हेज का?
सॉरी ..... पार्टी मरोळ,
सॉरी ..... पार्टी मरोळ, अंधेरी इथे ऑफिस मध्येच द्यायची आहे. मेनू व्हेज ह्वा पण वरायटी हवी. शक्यतो ड्राय मेनू.
साबुदाणा किंवा बटाटा वडा,
साबुदाणा किंवा बटाटा वडा, कटलेट्स, चटणी, रसमलाई/ मलई सँडवीचेस, भेळ/चाट, पियुष किंवा जलजिरा.
रगडा पॅटीस , गुलाबजाम.
चाटचे पापु, रगडा पॅटिस, समोसा
चाटचे पापु, रगडा पॅटिस, समोसा चाट यांसारखे २-३ प्रकार, कच्छी दाभेली, बटाटेवडे-चटणी, व्हेज सँडविच, फिंगर चिप्स, सोबत फ्रूट पंच / मॉकटेल्स / फालुदा /आईसक्रीम -- हा स्ट्रीट फूड मेनू.
साखि, उपासाची मिसळ, काकडीची कोशिंबीर, फ्रूटसॅलड, उपवासाची कचोरी, पॉप्पडम् (मोठ्या आकाराचे तळलेले पापड), अंजीर बर्फी, आईसक्रीम.
सौदिंडियन मेनूत इडली सांबार चटणी, मोळगापोडी इडली, दोसई / उथ्थप्पम् (उत्ताप्पा), पेसरट्टू किंवा सेट डोसा, काराभाथ (उपमा), केसरभाथ (शिरा), आप्पे, दहीवडा, इडियप्पम् व व्हेज स्ट्यू. दालवडा. मैसूरपाक किंवा पालपायसम्. मज्जिग्गे (दाक्षिणात्य मठ्ठा)
येत्या २३ तारखेला
येत्या २३ तारखेला चि.वैद्यांचा वा.दि. आहे.. पाळणाघरात २२ मुलांना पुरेल असा काय खाऊ देता येईल ते सुचवा प्लिझ..
मुलांचा वयोगट ३ ते ८ वर्ष
बाजारी चिप्स आणि ब.वडा , इडली वगेरे नकोय..
मी घरीच केक बनवून पाठवणारे.. दुसरा चटपटीत पण पोट भरीचा असा काय आयटम देता येइल?
फ्रँकी रोल्स, ब्रेड रोल्स
फ्रँकी रोल्स, ब्रेड रोल्स , आलू टिक्की , मोमो, स्टर फ्राय नूड्ल्स, मिनी पिझ्झा , मिनि उत्तप्पा, अप्पे ,
भेळ.
भेळ.
तिखटमिठाच्या पुर्या किंवा
तिखटमिठाच्या पुर्या किंवा साध्या पुर्या चटणी / सँडविचेस - जॅम सँडविच - चीज सँडविच - चटणी सँडविच / भेळ / पास्ता / मॅक अन् चीझ / व्हेजी रॅप्स / व्हेजी रोल्स.
जेली सँडविचेस आणि अजिबात तिखट
जेली सँडविचेस आणि अजिबात तिखट नसलेली चटणी सँडविचेस. खाऊ शाळेत पाठवणं, वाढणं आणि खाणं सगळं सोपं पडेल. गार-गरम भानगड नाही.
वहीनी चे "चा न्द न्या त ले
वहीनी चे "चा न्द न्या त ले डो।हा ळे जे व न" करायचा प्लान आहे..मेन्यू काय ठेवावा ? घरी मोजक्या लोकन्सोबत ..३-४ लहान मुले, ८-१० मोठे लोक..सजावट कशी करावी ?
Pages