Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय सारखी दाबेली दाबेली चर्चा
काय सारखी दाबेली दाबेली चर्चा चालवलीये. मला पण खावी वाटायला लागलीये आता दाबेली. इथे कुठे मिळणारही नाही दिल्ली हाटशिवाय. आता वर्कींग डेजमध्ये दिल्ली हाट कसं जमवावं? मसाला पण नाहीये माझ्याकडे नाहीतर घरी केली असती. (मसाल्याची आणि दाबेलीची दोन्हीची खात्रीशीर रेसेपी कुठे मिळेल का? )
http://www.tarladalal.com/Dab
http://www.tarladalal.com/Dabeli-2812r
ही घे लिंक अल्पना, मगाशीच मी वाचून आणि मनातल्या मनात खाऊन बघितलीये
मला बाहेरची खाता ही येणार
मला बाहेरची खाता ही येणार नाहीये
दाबेली मी घरी केली नाही ,
दाबेली मी घरी केली नाही , माझी नणंद बनवते आणि रेडिमेड मसाला कपोल वगैरेच वापरते
माझ्ह्या एका गुज्जु कलिगकडची दाबेली अप्रतिम लागते,तीने सान्गितलं - रेडिमेड आणलास तर मसाला चन्दूभाईचा वापरून बघ.
बाकी ठिकाणी माहित नाही , मुम्बईत छेडा स्टोर्स मध्ये मिळावा .
फक्त तुमच्या माहितीसाठी
मला पण पाहिजे आता
मला पण पाहिजे आता दाबेली..
आरती.. फक्त कशी झाली ते लिही..फोटो टाकायचे कष्ट अजिबात घेऊ नकोस
अरे काय हे! दाबेली खायला
अरे काय हे! दाबेली खायला आरतीकडे जाव की काय आता?
काय मुली आहेत! कशाला त्या
काय मुली आहेत! कशाला त्या दाबेलीचं एवढं वर्णन! आता पापु खाऊ की दाबेली हा प्रश्न पडलाय!

काल पापु खायचं ठरवलं होतं. पण राहिलं. ते डोक्यात एकदम फिट्ट बसलं! त्याचा परिणाम काय? तर, दुपारी मी जागे-झोपेच्या मधे कुठेतरी असताना लेकीने माझे केस ओढले. तिची झोप झाल्यामुळे मी झोपू नये याची ती काळजी घेत होती. डोळे उघडत नाहीत इतका मला थकवा असूनही मी तिला नावाने ओरडण्याऐवजी "अगं ए पाणीपुरी! काय चाल्लंय!" असं म्हटलं वैतागून!
(ही अतिशयोक्ती नाही.)
या बरे सगळ्याजणी, माझी एक
या बरे सगळ्याजणी, माझी एक ट्रायल पण होईल त्या निमीत्ताने
दाबेलीमधे कच्ची केळी पण उकडुन
दाबेलीमधे कच्ची केळी पण उकडुन घालतात बटाट्याबरोबर (एका दाबेलीवाल्यानेच सांगितल होतं)
दाबेलीमधे कच्ची केळी पण उकडुन
दाबेलीमधे कच्ची केळी पण उकडुन घालतात बटाट्याबरोबर >>> ह्म्म्म .
अवांतर ,"आम्ही बटाटे खात नाही , आई फार कट्टर आहे म्हणून ती आलू पराठे करतात तसे कच्ची केळी घालून करते .
खाणार्याला कळत ही नाही की बटाटा नाही कच्च केळं आहे " ........ ईति एक जैन कलिग.
येत्या रविवारी संध्याकाळी
येत्या रविवारी संध्याकाळी नवरात्री निमीत्त मी ८-१० कुवारणींना/ कुमारिकांना ( वयोगट अर्थातच ४ ते ८ ) बोलावल आहे, एक गोड आणि एक तिखट ( कांदा लसुण विरहीत ) पदार्थ असं कॉम्बिनेशन सुचवा काहितरी. वरती घरी केलेलं (टिकाऊ) ऑरेंज सरबत आहे.
कुमारीकांना इडली चटणी आवडेल,
कुमारीकांना इडली चटणी आवडेल, काजूकतली किंवा खोबर्याची/ खव्याची बर्फी
गोड शिरा आणि ढोकळा/ अळूवडी
साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा, चटणी आणि रव्याचा केक
बटाटेवडा (लसूणविरहीत) आणि फळांचे तुकडे
उपमा आणि मऊ गोड बुंदी
कुमारीका पेद्र्या असतात, दोन्ही पदार्थ हेवी केले तर अजिबात खाणार नाहीत.
पेद्र्या >>
पेद्र्या >>
धन्यवाद मंजुडीदी, आंबा पल्प
धन्यवाद मंजुडीदी,
आंबा पल्प घालुन रवा केक, आणि ( मुग आणि ईडली बॅटर ) ग्रीन आप्पे चटणी असा बेत मनात आहे आता, वर ऑरेंज कलरचं सरबत. छान रंगीत बेत होईल. मुली आवडीने खातील अस वाटतय.
पुरण्पोळी + बटाटावडा
पुरण्पोळी + बटाटावडा
गावात नवीन इंडियन फॅमिली
गावात नवीन इंडियन फॅमिली आलेय त्यांना उद्या जेवायला बोलावले आहे. ती मंडळी तमीळ आहेत.
मटार घालून मसाले भात, टोमॅटो सार , पोळ्या, अननस घालून शीरा, कोबीची भजी, चटणी, बीटची कोशिंबीर, बटाट्याची भाजी कसुरी मेथी घालून अणि मटकीची उसळ गोडा मसाला घालून हा बेत कसा वाटतोय?
माझ्याकडे जर नॉन मराठी फॅमिली
माझ्याकडे जर नॉन मराठी फॅमिली जेवायला येत असेल तर मी सगळं जेवण मराठी न करता थोडं मिक्स करायचा प्रयत्न करते. म्हणजे मी तुमच्या जागी असेन तर म भात, टो सार, पोळ्या तशाच ठेवून गोडाला गुलाबजाम, फ्रूटसॅलड वगैरे, बीटाच्या कोशिंबीरीऐवजी गाजर, टोमॅटो मिक्स कोशिंबीर, बटाट्याची कसुरी मेथी भाजी आणि बरोबर बघारे बैंगन वगैरे काहीतरी केलं असतं.
सायो, बैंगन नाही कारण देशी
सायो, बैंगन नाही कारण देशी टाइप वांगी आणायला दुसर्या गावी जावे लागेल. कोशींबीर गाजर-टोमॅटो जमू शकेल. भाज्या कोबी, फ्लॉवर, पालक , फोजन ग्रीन बीन्स एवढ्याच उपलब्ध आहेत. पनीर आहे.
यंग कपल आणि त्यांचे बाळ आणि आम्ही दोघं एवढीच मंडळी त्यामुळे गुलाबजामचा घाट नको वाटतोय. फ्रुट सॅलड आम्ही दोघही खात नाही. रसमलई चालेल का?
गेल्या आठवड्यात एकांकडे या फॅमिलीशी ओळख झाली. तिथे साऊथ इंडीयन मेनू + छोले, पुरी असे झाले. त्यामुळे छोले नाही.
रसमलाई चालेल की. देशी टाईप
रसमलाई चालेल की.
देशी टाईप वांगी म्हणजे कशी? मी अमेरिकन ग्रोसरी मधलीच वापरते.
भाज्या खुप जास्ती होत नाहीयेत
भाज्या खुप जास्ती होत नाहीयेत का? त्या ऐवजी पनीर चिली, कोबीची भजी किंवा असं काही तरी एक करता येईल. म्हणजे स्टार्टर किंवा तोंडी लावायला. पालक पनीर किंवा मटर पनीर पण सोपे आहे करायला. मला तरी वाटते की मटकीची उसळ आवडेल त्यांना पण.
आमच्या कडे अमेरीकन स्टोअरमधे
आमच्या कडे अमेरीकन स्टोअरमधे कधी कधी भली मोठी वांगी विकायला ठेवतात. जून असतात. त्याचे भरीतली चांगले होत नाही.
स्वाती, जास्त ओळख नसेल आणि
स्वाती, जास्त ओळख नसेल आणि खूपच "कट्टर तमिळ" असतील तर रस्सम करच.
माझ्या अनुभवानुसार, मटकीची उसळ तमिळी लोकांना फारशी आवडत नाही, त्याऐवजी एखादी मिक्स भाजी अथवा पालक पनीर टाईप काहीतरी बनवू शकतेस.
स्वाती मटर आणि बटाटे दोन्ही
स्वाती मटर आणि बटाटे दोन्ही आहेत. आलु मटर करता येईल का? आणि मसाले भात न करता जीरा राईस किंवा साधा पांढरा भात . त्याबरोबर टोमॅटोच सार.
बीन्सची भाजी अगदी प्लेन , मिरची आणि ओल खोबर घालून बरोबर. (नो काळा मसाला)
पायनॅपल शिरा अगदी परफेक्ट आहे. आवडतो.
मेन्यू इतका छान आहे स्वाती२,
मेन्यू इतका छान आहे स्वाती२, पाहुणे बदल
धन्यवाद सगळ्यांना. कोबीची
धन्यवाद सगळ्यांना.
कोबीची भजी, हिरवी चटणी, गाजर -टोमॅटो कोशिंबीर, जीरा राईस, रसम, पोळ्या, कसुरी मेथी घालून बटाटा भाजी, पालक पनीर आणि पायनॅपल शिरा.
आंबा पल्प घालुन रवा केक,
आंबा पल्प घालुन रवा केक, ग्रीन आप्पे चटणी, ऑरेंज कलरचं सरबत >> सोबत कसलेसे चिप्स नाहीतर पापड हवे.
कुमारिका पेद्र्या असल्या तरी नाठाळ असतात बरं कुणी कुणी. काही नसेल आवडलं तरी चिप्स गपगुमान खातात. चिप्स मनसोक्त खाऊ देणारी काकू आवडते 
लहान बाळ काय वयाचं आहे ?
लहान बाळ काय वयाचं आहे ? १ वर्ष + असेल तर दही असू दे. एरवी सुद्धा बर्याच तमिळ लोकांना दही भाता शेवाय जेवण अपुरं वाटतं.
माझ्या अनुभवानुसार, मटकीची
माझ्या अनुभवानुसार, मटकीची उसळ तमिळी लोकांना फारशी आवडत नाही>> सहमत! डेव्हिसला एक स्टुडन्ट गायडन्स साठी नवर्याकडे यायचा, त्याला जेवण करुनच पाठवणे हा नवरोजिचा शिरस्ता होता, मटकिची उसळ पोळिच्या कोनात भरुन खात होता बिचारा,
स्वाती बदलेला मेनु छान आहे!
>>स्वाती बदलेला मेनु छान
>>स्वाती बदलेला मेनु छान आहे!>> +१
जनरली साउथ इंडीअन ना काळा
जनरली साउथ इंडीअन ना काळा मसाला आवडेलच अस नाही. जसा त्यांचा उग्र आल्याचा मसाला आपल्याला आवडत नाही.
त्यांना आपल्या तिखट मिठाच्या पुर्या एक फार आवडतात. माझा ग्रुप सगळा साउथ इंडिअन आहे , कायम डिमांड असते. आणखी म्हणजे भडंग आवडतो फार त्यांना.
Pages