बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी व्हानीला केक, ईड्ली साम्बार,शे॑वयाची खीर अनि मसाले-भात्/तोण्द्ली भात , च ट नी डीन्र्\र असल्याने सोप्प अनि हलके असावे असे...अनि एक्टी च आहे करनारी...

काराभाथ (उपमा), केसरभाथ (शिरा),>>> अकु, साऊथ इंडियन लोकं टीएच असे स्पेलिंग लिहत असले तरी उच्चारी "त" असंच म्हणतात. तमिळ बाराखडीमध्ये "थ" "ध" वगैरे शब्द नाहीच आहेत.

व्हॅनिला केक / व्हाईट फॉरेस्ट केक
शेवयांची खीर
व्हेज पुलाव
इडली-चटणी-सांबार
हा तुमचा मेन्यू; यात आता बाकी पदार्थ अ‍ॅड-रिमूव्ह करून एका थीमचा मेन्यू करतायेऊ शकेल.
- सोलकढी (स्टार्टर म्हणून किंवा अ‍ॅपेटायझर म्हणून)
- खट्टा ढोकळा
- रोटी + काजू च्या ग्रेव्हीतली एखादी भाजी (किंवा काजू उसळही जमेल पण मग बाकी पदार्थ पूरक ठेवावे)
- दहीबुत्ती
- शाही तुकडा + रबडी
- जिलेबी + रबडी
- बासुंदी / मसाला दूध
- काकडीची चक्क्यातली कोशिंबीर
- आलू पराठा / काही भाज्यांचा पराठा

योकु, त्या एकट्याच आहेत करणार्‍या. आता आणखी कशाला काही अ‍ॅडिशन?

नारळाच्या करंज्या मिळाल्या तर त्या किंवा पांढरा ढोकळा चालेल. दोन्ही गोष्टी ऑर्डर देउन मागवता येतील.

मी उस-गावात आहे....पोळ्या /रोत्टी/ नान टाळ्ते आहेएकत्टीच करनारी असल्याने....म्हनुन ईडली चा विचार करते आहे..."भाजी/करी" मिस्सिन्ग तर नाही ना वाटनार...शक्यतो सगळे सफेद पदार्थ असावे असे वाटते आहे...पुलाव >>१ न. पन सगळे फिके नाही ना वाट्नार ? Uhoh

शक्यतो सगळे सफेद पदार्थ असावे असे वाटते आहे>>

सुन्दल/पापडीचाट
ईडलि-चटणी-साबार
अवियल
पुलाव्/योगर्ट राइस्/जिरा राइस
शेवई-खिर
केक
तुमच्या मेनुत सोपे अ‍ॅड करता येइल असे सजेशन दिलेत , पोळी-करी मिसिन्ग नाहि होणार.

डोहाळेजेवणाला खीर आणि लाडू/पेढा वाटीत झाकून ठेवतात. वुड-बी-मॉमने एक वाटी उघडावी लागते. (त्यावरून मुलगा-मुलगी होणार याचा अंदाज करतात.) कुणी ज्ये.ना. ह्या प्रथेचा आग्रह करायला लागल्या तर खीर आणि केक ठेवू शकतेस Happy नाही त्यांना केक चालला तर दोन-तीन तरी लाडू लागतील. वेळेवर धावपळ नको.

(अशा कुचकामी प्रथा खरतर बंद व्हायला हव्या, पण पसंद अपनी अपनी. एका मैत्रिणीला माहिती होते बेबी गर्ल आहे तरी वाट्या प्रकार केला होता Happy )

सिनीयर पिढीच्या मते - नसेल गोड दोन दोन करायचे तर खिरीच्या दोन वाट्या करून एकात रूपया/क्वार्टर आणि दुसर्‍यात अंगठी टाकावी. Biggrin

अशा कुचकामी प्रथा खरतर बंद व्हायला हव्या,>>ती फक्त गंमत असते. ज्येना पिढीतही दिग्गज शास्त्रज्ञ विचारवंत होउन गेलेतच की. बेसिक जेनेटिक्स माहिती असतेच. तसेही सातवा महिना इज अ बिट लेट टू डिसाइड द आउटकम्म. Happy

गुलकंद आइस्क्रीम हा हिट आयट्म आहे. प्लेन व्हाइट वॅनिला मध्ये गुलकंद मिसळून परत फ्रीज करायचे.

पनीरचे बारिक चौकोनी तुकडे तळून घेउन पुलाव करता येइल तूप जिरे फोडणीचा. बरोबर दही रायते. सायो ची काजू ग्रेव्हीतली भाजी बघून घ्या. बरोबरीने लुची करता येइल. पण ती मैद्याची असते. गोर्‍या गोर्‍या दोन पुर्‍या खायला काही हरकत नसावी. पण तुम्हाला तळावी लागेल आयत्या वेळी.

नाही त्यांना केक चालला तर दोन-तीन तरी लाडू लागतील. >>लाडूच पाहिजेत असं काही नसतं. (ती) बांगडी/ (तो) हार, (ती) माळ/ (तो) तन्मणी, (ती) अंगठी/ (तो) रुपयाही चालतात दडवून ठेवायला. हौसेचे प्रकार आहेत हे, जबरदस्ती नसते त्यात.

मुलींनो, सुनेने बर्फी काढली / खाल्ली म्हणून नऊच्या नऊ महिने फुगुन बसलेल्या सासवा पाहिल्यात का तुम्ही? नसेल तर या आमच्याकडे आहेत अशा एक मामी साहेबा!
इथे फारच अवांतर झालं पण प्रथा बंद व्हाव्यात म्हणण्यामागे हे कारण असेल बहुदा.

नऊच्या नऊ महिने फुगुन बसलेल्या सासवा >>> पण सुनेने बर्फी काढली/ खाल्ली असेल सातव्या महिन्यात, त्यानंतर नऊ महिने म्हणजे सुनेला झालेलं बाळ रांगू लागलं असेल तोपर्यंत!!

सुनेने बर्फी काढली / खाल्ली म्हणून नऊच्या नऊ महिने फुगुन बसलेल्या सासवा पाहिल्यात का तुम्ही? >> आँ Uhoh

मंजुडी, सॉरी मला ९ वर्ष म्हणायचं होतं.नंतर दुसरा मुलगा झाल्यावर मग आनंदी आनंद आणि मग सून जगात प्यारी वगैरे!
नी, एक्झॅक्टली!

तर ते असो!

सुनेने बर्फी काढली / खाल्ली म्हणून नऊच्या नऊ महिने फुगुन बसलेल्या सासवा पाहिल्यात का तुम्ही>> बेबी आत्या का?

Kahi ghala ani uchala pan to dagina adhi seachch duvoon vateet taka.nahit
ar bolata bolata hatatali angathi kadhoon khireet takali jail.

पिच इन डिनरसाठी साधारण २० जण असतील. मेन डीश म्हणून हॅम वगैरे असेल. साईड डिश आणि डेझर्ट न्यायचे आहे. १३ x ९ वाला पंपकिन केक नेणार आहे, जोडीला कॉर्न आणि बॅक बिन्स घालून किन्वा . बर्‍याच साईड डीश असतील. तर १ कप (ड्राय) किन्वा पुरेसा होईल का?

देवकी बरोबर आहे तुमचं, बर्‍याच बायका असतात आणि सगळ्याच पुढे पुढे करत असतात, आणि हीच गोष्ट लक्षात ठेवुन मी आधीच माझ्या (माहेरच्या डोहाळेजेवणाच्या वेळेला) बाबांना आणि नवर्‍याला (सासरच्या डोहाळेजेवणाच्या वेळेला) सांगुन ठेवलेलं की मला पेढा आणि बर्फ़ीच हवी आहे वाटीत, घरात आणुन ठेवा.

नंदिनी, असं आहे का? मी आपली मेनूकार्डाचा व मेनूबोर्डाचा अभ्यास मन लावून करणारी! Lol त्यामुळे त्यांत लिहिलेल्या स्पेलिंगचे उच्चार जसे होतात तेच तिथले प्रमाण मानून चालणार! तरी ते स्पेलिंगनुसार 'बाथ'ही होतं कधीकधी! पहिल्यांदा नाव वाचलं तेव्हा 'काराबाथ', 'केसरबाथ' वाचून सॉलिड दचकले होते! Lol

अपडेट- १ कप ड्राय किन्वा, एक कप कॉर्न आणि १५ औस कॅन ब्लॅक बिन्स वापरुन केलेली डीश व्यवस्थित पुरली.

बड्डेसाठी मेनू सुचवा मंडळी. अगदी सुटसुटीत कोरडे पदार्थ हवे आहेत. सगळ विकत आणायचय. घरी काहीही घोळ घालायचा नाहीये. भारतातच आहे.

केक, वेफर्स
समोसे / दाबेली /ईडली -चटणी /ढोकळा
कोरडे गुलबजाम/ बंगाली मिठाई / बर्फी
आईस्क्रीम कप

कोणाचा बड्डे, त्याचं वय काय, किती पाहुणे, त्यांचा वयोगट काय, कुठल्या वेळी पार्टी आहे, भारतात राहण्याचं नेमकं ठिकाण काय हे न कळल्याने एक वाईल्ड कार्ड एंट्री टाकत आहे -

समोसे - छोटे, मोठे, पंजाबी, मराठी, चायनीज
बटाटेवडे - छोटे, मोठे, उपासाचे
साबुदाणे वडे - छोटे, मोठे
मटार करंज्या,
अळूवडी,
सुरळीची वडी,
ढोकळा - पांढरा, पिवळा, सँडविच, स्टफ्ड, वाटी
कचोरी - सुरती, उपासाची, राजस्थानी, राज, शेगावची
पॅटीस - कॉर्न, बटाटा, मटार, पूना बेकरीचे
कटलेट - व्हेज., कॉर्न, मटार, गोल, हृदयी
ब्रेडरोल - बेक्ड, तळलेले, बटाट्याचे, मटाराचे, व्हेज
इडल्या - छोट्या, मोठ्या
वेफर्स - बटाट्याचे, नाचणीचे, सळी, पालक, पुदिना, चीज, टोमॅटो, लेज,
चिवडे - बटाट्याचा, कच्च्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा, नाचणीचा, पापडांचा, खाकर्‍यांचा, ज्वारीचा, गव्हाचा
फरसाण - हॉट मिक्स, सुरती, गाठीचे, तिखट गाठींचे, बुंदी
जिलबी, वड्या, बर्फ्या, कोरडे गुलाबजाम, गुलबुंदी, गोड बुंदी

कोणाचा बड्डे, त्याचं वय काय, किती पाहुणे, त्यांचा वयोगट काय, कुठल्या वेळी पार्टी आहे, भारतात राहण्याचं नेमकं ठिकाण काय हे न कळल्याने एक वाईल्ड कार्ड एंट्री टाकत आहे >>

_/\_

मंजिरी ताई खरचं धन्य आहात. एवढं कसं सुचतं?
एवढे प्रकार त्याचं एवढं वर्गीकरण मला माहिती पण नव्हतं.

Pages