Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खामकरांचा कलाकंद खाऊन बघ प्र९
खामकरांचा कलाकंद खाऊन बघ प्र९
ह्म्म्म बासुंदी पण
ह्म्म्म
बासुंदी पण
पुणेरी भेळ ... फारच भंपक सपक
पुणेरी भेळ ... फारच भंपक सपक प्रकार वाटला.
पण तुम्ही बे.का.क.वर विविध
पण तुम्ही बे.का.क.वर विविध हलवायांची आणि त्यांच्या प्रसिद्ध पदार्थांची नावं का घेताय? इथे कोणी विचारलं आहे का की चितळ्यांचं श्रीखंड आणू की काकाची रसमलई की खामकरांचा कलाकंद ठेवू का जेवणात?
वारणा श्रीखंड आणि आम्रखंड मला
वारणा श्रीखंड आणि आम्रखंड मला प्रचंड आवडतं.
चितळे श्रीखंड खरच बकवास आहे
१ किलो बटाट्याच्या किती कच्छी
१ किलो बटाट्याच्या किती कच्छी दाबेली होतील ?
किंवा
१२ मोठे आणि १० छोटे असतील तर कच्छी दाबेली साठी किती बटाटे लागतील ?
मसाल्याच्या पाकिटावर, एक किलोचे प्रमाण दिले आहे त्याप्रमाणे करायचा विचार आहे.
आरती, ४ मोठे बटाटे घेतले तर
आरती,
४ मोठे बटाटे घेतले तर त्यात ८ दाबेली होतील.
मोठे, छोटे, मध्यम थोडे
मोठे, छोटे, मध्यम थोडे कन्फ्युसिंग होते, किलोचे प्रमाण कोणी सांगु शकेल का ?
मी पहिल्यांदाच करते आहे त्यामुळे अजिबातच अंदाज नाही.
४ मोठे बटाटे घेतले .>>>>>>
४ मोठे बटाटे घेतले .>>>>>> आरती,ह्या प्रमाणानुसार ,बटाटे अर्धा किलोच्या आसपास होतात. ८ मोठे बटाटे = १ किलो बटाटे.
ओके. म्हणजे एक किलोच्या १५-१६
ओके. म्हणजे एक किलोच्या १५-१६ होतील.
धन्यवाद देवकी, स्वाती२
मुलीचा वाढदिवस आहे, ९-१० वर्ष
मुलीचा वाढदिवस आहे, ९-१० वर्ष वय असल्याला ५-६ मुली येणार आहेत. मुलीच्या डोक्यात बिच (हवाई) थिम डेकोरेशन करायच आहे. बाकी सगळ सजावटीच सामान, गेम्स, केक वैगरे तश्या थिमच मिळतय. पण बाकी बेत काय करावा. मुलींना चाट आणि पिझ्झा पास्ता असे प्रकारच हवे आहेत . मला त्या थिम मध्ये बसेल अस करायचय... म्हणजे शेव पुरी पण कॉन चिप्स आणुन त्यात बोटीच डिझाइन करुन ठेवणार आहे.
अजुन अस काय करता येईल?
आरती, एक किलो बटाट्यांचे
आरती, एक किलो बटाट्यांचे २५-२८ बटाटे वडे होतात, त्याच प्रमाणात दाबेल्या होतील.
अनुश्री, गेल्या वर्षीच्या
अनुश्री, गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात सेलर बोट्स नावाची पाकृ आली होती. करायला सोपी आणि हेल्दी. माबो सर्च केलीस तरी मिळेल. उकडलेल्या गरम शेंगा, चना जोर गरम आणखी पोटभरीचं काहीतरी आणि शेवटी अमूलची कुल्फी.
हो बघते सेलर बोटस. चना जोर
हो बघते सेलर बोटस. चना जोर गरम चा पर्याय पण छान आहे. आमच्या इथे बर्यापैकी थंडी पडेल अजुन १-२ आठवड्यात त्यामुळे थंड काहीच नकोय.
वाढदिवस पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे.
व्हाइट चॉकोलेट शिंपल्याच्या
व्हाइट चॉकोलेट शिंपल्याच्या मोल्ड मध्ये घालून त्या शिंपल्यात चॉको चिप्स ठेवता येतील. मुलींना गंमत वाटेल. शंखाच्या आकाराचे कॅनपे मिळाले तर त्यात फळांचे तुक डे भरून देता येइल. हवाई थीम असेल तर लुआउ, ज्वालामुखी चे डेकोरेशन, स्ट्रॉ स्क्रर्ट्स व फुलांच्या माळ हे रेडि मेड मिळतच असेल.
@ आरती अर्धा किलो बटाट्याच्या
@ आरती अर्धा किलो बटाट्याच्या १५ दाबेल्या होतात मी परवाच केल्या होत्या, त्यात एका डाळिंबाचे दाणे, आणि एक वाटीभर खारे दाणे, हे पण घातले होते.
मी कपोलचा मसाला वापरला छान आहे.
अनुश्री, कॅनपीज् वापरून त्यात
अनुश्री, कॅनपीज् वापरून त्यात कॉर्न, सिमला मिरची बारीक चिरून, गाजराच्या उभ्या कापाचे शीड करून कॉर्न चाट करता येईल.
टोमॅटो बास्केट्स देखील करता येतील. पास्ता, सलाद, चाट वगैरे छोट्या बीच बकेट्स् मध्ये ठेवता येईल व छोट्या फावड्यासारखे चमचे वाढणीसाठी.
कलिंगडाची क्रूझ शिप बनविता येईल. वेगवेगळे कट फ्रूट्स्, रंगीत जेली वापरून त्यात स्विमिंग पूल, लॉन वगैरे दाखवता येईल.
पिझ्झ्यावर रंगीत सिमला मिरचीचा बेस कापून ती कापलेल्या बाजूने खाली अशी उपडी ठेवता येईल. त्यावर तळाच्या बाजूला चीज स्लाईस व ब्लॅक ऑलिव्ह चकत्या वापरून ऑक्टोपसचे डोळे. दुसऱ्या सिमला मिरचीचे उभे काप करून त्यापासून ऑक्टोपसच्या अष्टभुजा बनवता येतील व पिझ्झ्यावर अरेंज करता येतील.
कट फ्रूट्स् माशांच्या आकारात सर्व्ह करता येतील.
जे पेय सोबत देणार असाल त्यात बीच थीम पेपरची छत्री खोचायला विसरू नका.
हवाई थिमला अननस हवा!
हवाई थिमला अननस हवा!
पिनाकोलाडा /नारियल पाणि /
पिनाकोलाडा /नारियल पाणि / फ्रुट पन्च,
फ्रुट कबाब
कॅनोपी
रगडा-पॅटिस
रन्गिबेर्न्गी भाज्या वापरुन पुलाव( योकुची रेसिपि आहे)
मार्शमेलॉ पुन्डिन्ग .मॅन्गो पाय,
अकु रॉक्स अगेन
अकु रॉक्स अगेन
अकु रॉक्स अगेन >>>> +११११११
अकु रॉक्स अगेन >>>> +११११११

अकु,सीमंतीनी,प्राजक्ता छान कल्पना आहेत खूप कल्पना सुचल्या
मंजूडी, मुग्धा म्हणजे
मंजूडी, मुग्धा
म्हणजे प्रत्येकी २ जरी पकडल्या तरी १ किलो बटाटे पुरायला हवे १० बायका आणि १० मुलांना. दिड किलो उकडुन ठेवेन.
डाळींब आणि दाणे पण घालणार आहे.
चांगली कृती कुठे आहे दाबेलीची ?
धन्यावद.
डाळिंब, दाणे क्वांटीटी
डाळिंब, दाणे क्वांटीटी वाढवायला उपयोगाचे नाहीत आरती
मसाला रेडीमेड आहे का? घरी करणार असशील तर तरला दलालच्या साईटवर तिने लिहिलाय तो एकदम परफेक्ट चवीचा होतो. नेहेमीच्या बटाटा भाजीपेक्षा दाबेलीच्या भाजीला तेल जास्त लागतं. बाकी दाबेलीची माझी कृती म्हणजे पाव कापून आतल्या दोन्ही बाजूंना चिंचेची चटणी लावायची, दाबेलीची भाजी घालून त्यावर डाळींब, मसाला दाणे, बारी चिरलेला कांदा घालायचा, पाव बंद करायचा. दोन्ही बाजूंना व्यवस्थित अमूल बटर लावून दाबेली खमंग भाजायची.
दीड किलो बटाटे पुरतील.
नाही वाढवायला नाही, चवीसाठी
नाही वाढवायला नाही, चवीसाठी घालणार आहे
दीड किलो फाय्नल करते आता.
मसाला रेडिमेड आहे. फक्त चिंचेची चटणी पुरेल ना ? की हिरवी चटणी पण लागते तिखट्पणा साठी ?
कृतीसाठी धन्यावाद
हिरवी चटणी नको. भाजी पुरेशी
हिरवी चटणी नको. भाजी पुरेशी तिखट असते. तिखट गोड अशी चव असते आणि त्याबरोबर ती कोथिंबीर पुदिन्याची चव अजिबात चांगली लागत नाही. मसाल्यात लवंग आणि दालचिनीचा स्वाद जास्त असतो. मसाला थोडा आधी वगळ, गरज वाटली तरच उरलेला मसाला भाजीत मिसळ. नुसत्या भाजीची चव जरा पुढे तिखट लागायला हवी, पावात बंद केल्यावर आणि चिंगुमुळे तिखटपणा बॅलन्स होतो. बटर एकदम प्रेमाने लाव
इथलं वाचून मला केडी बनवाविशी
इथलं वाचून मला केडी बनवाविशी वाटतेय
मला पण
मला पण
मला खावीशी वाटतेय.. आमच्या
मला खावीशी वाटतेय.. आमच्या कॉलेजच्या समोरचा गाडीवाला चीज सढळ हाताने घालायचा. तेव्हा साधी दाबेली दहा रू व चीज दाबेली पंधरा रू एवढाच फरक असायचा तरी काचकूच व्हायची. सेलिब्रेशन म्हणून चीज दाबेली.
मला पण आवडते गरम गरम दाबेली.
मला पण आवडते गरम गरम दाबेली. पण एकदा खाल्ली की रोज खावीशी वाटते.
ओके, म्हणजे फक्त मसाल्याचा
ओके, म्हणजे फक्त मसाल्याचा तिखट्पणा पुरेल तर.
बाकी, बटरवर प्रेम आहेच, तु म्हणतेच आहेस तर लावेनही प्रेमानेच ...........
बारीक सारीक सुचनांसाठी धन्यावाद
कशी झाली ते कळवेनच.
Pages