बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरणफळांमधेही भाज्या घाल भरपूर.
तुरीची डाळ, मिक्स पिठे आणि भाज्या.. एकदम मस्त होईल आणि चमच्याने गरमगरम ओरपता येईल. हाताने खायला नको.

बिसीबेळे भात देता येईल, पांढरा रस्सा मसाला + दोन तीन प्रकारच्या बीन्स घालून बीन्स-चिली करता येईल.
kedgeree ची वरिजिनल खिचडी - भाज्या घालून, दलिया + भाज्या, पराठे, धपाटे , थालिपीठ असं देता येईल.

तुरीच्या डाळीची सरसरीत आमटी करायची आणि लाटलेल्या पोळीचे शंकरपाळ्यासारखे तुकडे करून त्यात सोडायचे. ते शिजेतो खदखद उकळू द्यायचे.
ही बेसिक आयड्या आहे.
पोळीचे पीठ कशाचे किंवा कशाकशाचे घ्यायचे? ते प्लेन ठेवायचे की त्यात पण चवील ति मी घालायचे? डाळ तुरीचीच घ्यायची की अजून कशाची? आमटी करताना कशा प्रकारची करायची? कुठले मसाले वापरायचे?
एवढ्या सर्व ठिकाणी प्रयोग करायला जागा आहे. Happy

पांढरा रस्सा मसाला सातार्‍याहून आयात करण्यात येईल. Happy बीन्स चिली भातावर घालून खायचे का?
धपाटे/ थालीपीठ हे गार होऊन जातील. तिच्याकडे तवासदृश काही आहे का बघते.
--
लिहायचा राहिलेला मुद्दा म्हणजे मी बुधवारी संध्याकाळी स्वयंपाक करणार. आणि ते लोक गुरुवारी संध्याकाळी ५.३०ला तो जेवणार. ते ५.३० ला जेवतात आणि आम्ही कोणीच तोवर ऑफिसातून येत नाही, त्यामुळे आदल्या दिवशी करायचे असे ठरले आहे.
--

सध्या यादीतः भाज्या घालून पास्ता, भा.घा. वरणफळे (प्रयोग केल्यावर), बीन्स चिली (भारतातून परतल्यावर).

केजरीची पाकृ मी पाहिली हल्लीच. त्यात मासे वगैरे प्रकार आहेत. व्हेज व्हर्जन असेल/ करावे काय? की मासे हँडल करायला शिकायची हीच वेळ आहे असे समजून सुरू करावे? Wink

दलिया गूगल केले. बघितलेले नाहीत कधी आधी. ओट्सच्या जातीत वाटतायत पाकृ.

व्हेज व्हर्जन असेल/ करावे काय? << अगं म्हणजे खिचडीच की डाळतांदूळाची. हो ना?

मिक्स दलिया देसी स्टोरमधे मिळेल कदाचित. पण २४ तासाने खायला अजिबात योग्य नाही. पाणी आळत आळत घट्ट गोळा बनत जातो.

पास्ता केलास तर सॉस मिक्स करून देऊ नकोस. हवंतर भाज्या शॅलो फ्राय कर आणि मग पास्ता घालून , ईटालियन सिझनिंग घाल.

भाज्या घालून किन्वा+मुगडाळ खिचडी, तोंडी लावायला एखादी कोशिंबीर.
पास्ता + गार्लिक ब्रेड + ग्रिल्ड व्हेजीज.
ग्रिल्ड व्हेजी रॅप्स. ते ग्रिलवर, तव्यावर किंवा अवनमध्ये गरम/ग्रिल करू शकतील.
सूप + सॅलड + ब्रेड.
टॉमॅटोचं सार + जीरा राइस + एखादी परतलेली कोरडी भाजी.

मस्त यादी सिंडरेला.
शेतकर्‍याने बटरनट स्क्वॉश पाठवलेत, तर नेक्ष्ट टाइम सूप + गार्लिक ब्रेड + कोशिंबीर-सॅलड नक्की. गा ब्रे विकतचा दिला तर चालेल की नाही यावर बराच विचार करत होते गेल्या आठवड्यात. चालेल असे ठरवून टाकते आता.

@ मृदुला,

पोंगल स्टाईल खिचडी, परतलेली कोणतीही भाजी, सलाद, पापड.

दुधीची व्हाईट सॉस मधील भाजी (व्हाईट सॉस करून त्यात दुधीचे शिजवलेले तुकडे घालून जरा शिजवायचे, मिरपूड, मीठ, चिली फ्लेक्स हवे असल्यास वरून शिवरून). सोबत ब्रेड / पोळ्या चांगल्या लागतात. बेक करूनही ही डिश मस्त लागेल.

भाज्या घालून उपमा?? सोबत दह्यातली कोशिंबीर, लोणचे, पापड.

इडली, चटणी, सांबार.

खतखते कर. मिळतील त्या भाज्या/ कंद वापर. खतखते तसेही दुसर्‍या दिवशी जास्त मस्त लागते. सोबत गार्लिक ब्रेड किंवा टॉर्टिया किंवा भात.

~ अवियल / वलवल टाईप भाजी आवडेल का त्यांना? अवियल व सोबत साधा भात. लोणचे, तक्कू वर्गातले काहीही सोबत चवीला.

~ मोड आलेली कडधान्ये / मिश्र डाळी / मिश्र भाज्या घालून तांदळाची मऊसूत खिचडी.

~ बेक्ड कॉर्न + व्हाईट सॉस + चीज, वरून आवडती हर्ब्ज भुरभुरून व गार्लिक ब्रेड.

~ पावभाजीमधील 'मुन्ना पावभाजी' (अगदीच कमी मसाला असलेली भाजी) व सोबत ब्रेड / लादीपाव. पावभाजीत बटाटा टाळायचा असेल तर कॉलीफ्लॉवर, सिमला मिरची यांना एकत्र शिजवून त्यांचा अगदी बारीक लगदा करायचा. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे. मटार वगैरेही ऑप्शनल. तेलात आलेलसूण पेस्ट, मिरची पेस्ट परतायचे, कांदा सोनेरी रंगावर परतायचा, त्यात टोमॅटो घालून तेल सुटेस्तोवर परतायचा. मॅश केलेल्या भाज्या, पावभाजी मसाला व मीठ घालून एकजीव करायचे. वरून आवश्यकतेनुसार पाणी व आवडीनुसार लोणी घालायचे. चीझ ऑप्शनल.

~ मॅक अँड चीझ

दोन व्यक्ती ब्रंचसाठी येत आहेत. फार दूरवरचा र्पवास करून येनार आहेत त्यामुळे फार हेव्ही नको आणि फार सुटसुटीत नको असा सुवर्णमध्य साधायचा आहे. भाताचे आयटम्स नकोत. कांदा लसूण नको. शिवाय एखादी तरी आधी करून ठेवता येण्यासारखी स्वीट डिश हवी.

पायसम् किंवा शेवयांची खीर
ब्रंचसाठी
साबुदाणा खिचडी, वरून ओलं खोबरं कोथिंबीर, लिंबाची फोड वगैरे साग्रसंगीत सजावटीसह, काकडी कोशिंबीर, नारळाची चटणी, बटाटा / पोहा पापड.

किंवा आलू / मेथी / पालक पराठे, रायता, लोणचे. टोमॅटो रस्सम.

अकुंनी लिहिल्यावर लिहायचं पाप करतोय.

साबुदाणा खिचडी पोटभरून खायची भीतीच वाटते.
कांदा-बटाटापोहे खूप सुटसुटीत वाटत असतील तर त्यावर इंदुरी पद्धतीने डाळिंबाचे दाणे, शेव घालून नटवायचे.बरोबर बुंदी रायतं. ब्रंच पोटभर होण्यासाठी स्वीट लिक्विडपेक्षा सॉलिड...रव्याचा शिरा ग्लॅमरस वाटत नसेल तर शेवयांचा शिरा.

ब्रंच साठी, आप्पे, मिक्स व्हेज उपमा ,(रवा किंवा शेवयाचा), मेथी/पालक ठेपले किंवा पराठे, गाजर हलवा

थालिपिठ दही, थेपले-दही,
पालक-पराठे-मुगाची डाळ( आतल्या फोडणिची) -चटणी

ह्या बाफावरच्या अकुच्या पोस्टी वाचणं हा एक सुखद पोटभरीचा अनुभव असतो
काय ते मेनूची कॉम्बिनेशन
डोळे तृप्त होतात अगदी . भले मग डब्यात भेंडीची भाजी असू देत . भरून पावलं जात अगदी :फ़िदी: :p

आतल्या फोडणीची म्हणजे >> सासरचा शब्द आहे, फार वेगळ काही नाही, पातेल्यात हळद-हिन्गाची फोडणि करुन टाकलेला लसूण कुरमुरला की धुतलेली मुगाची डाळ घालायची,जरा परतुन तिखट्,मसाला घालायचा , आणि अगदी डाळ बुडेल इतक पाणी घालायच ,एक उकळी आली की मध्यम आचेवर झाकण ठेवुन डाळ शिजवाय्ची लागेल तस थोड पाणि घालाय्च यात डाळ शिजुन गिच्च नाही झाली पाहिजे मोकळी मौ राहायला हवी, अन्गाशी रस असतो थोडा.

सासरी ही डाळ (तिखट जास्त पाहिजे असेल तर वरुन लसणीच तिखट) आणी गरम पराठा ,सोबत दही- चटाणी हिट आयटेम आहे.

कोणी काही विचारायचाच अवकाश किती ऑप्शन्स येतात !! ग्रेट आहात सगळ्याजणी
मृदुला, नंदिनी काय केलत ते लिहा हं इथे इंटरेस्ट वाटतोय फायनली काय केलत ह्यात

Pages