निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यवतमाळ शहराला लागुनच ५ ६ किमी च्या अंतरावर चौसाळा म्हणुन एक ठिकाण आहे..
शंकराच देऊळ आहे तिथं..
त्या डोंगरावरुन काढलेले काही प्रचि..
काहि वर्षांपूर्वीचे आहे जुलै ऑगस्ट दरम्यान चे..
एवढ्यात जाण झाल नै..

डोंगरावरील देवळामागे पसरलेला परिसर..

हि वाट दुर जाते..

अय्या माणसाच्या अस्तित्वाचा बिलकुल मागमूस नसलेला, पूर्णपणे झाडांनी व्यापलेला भूभाग असू शकतो हेच विसरायला झालेले!
मस्त फोटो टीना Happy

दिनेशदांनी १२व्या पानावर जो चाफ्याचा फोटो टाकलाय त्याला मॅग्नोलिया म्हणतात. मोठा वृक्ष असतो आणि भली मोठी फुलं असतात. वास नसतो यांना. रंगही विविध असतात.

वृक्षाची पानं मात्र सतत गळत असतात त्यामुळे झाडाखाली नेहमी पाचोळा. कॅलिफोर्नियात खूप आहेत.

या फुलांची सुंदर सुंदर पेंटिंग्ज नेटवर सापडतील. सर्च करून बघा.

१३व्या पानावर आहे ती सुबाभूळ.

ममो, सुबाभूळ बारीक पानांची असते चिंचेसारखी.. कोकणात खूप पसरलीयेत ती झाडं.. अशीच बाहेरून आलेली पण खूप पसरून बाकीच्या झाडाना मारक ठरतात..

वर्षुताई belated कुठेत. माझं फेसबुक आजचीच डेट दाखवतंय.

मस्त शुभेच्छा, चाफ्याची फुलं कित्ती गोड वर्षुताई.

मी दिनेशना म्हटलेलं की हे मॅग्नोलीया आहे तर त्यांनी हा तिथला चाफा आहे आणि मॅग्नोलिया वेगळा म्हटलेले. दोघांचेही फोटो त्यांच्याकडे आहेत म्हणे. आता जेव्हा फोटो टाकतील तेव्हा कळेल खरे काय ते.

जिप्स्या वादिहाशु.

आवडतील ती फुले घे रे उचलुन -

सुप्रभात निगकर्स
कशात तरी बीझी आहे. पण रोमात आहे.
माझ्या आत्याने हे जास्वंदीच रोप दिलं होतं (तिला हिरवा अंगठा आहे!...:फिदी: She has green thumb!) तिने काहीही कुठेही लावलं की ते मस्त फुलतंच.

जिप्सीभौंना वादिहाशु!

जिप्सी, वा.दि. हा,शु.
IMG_20150824_120829.jpg

टीना खुप सुंदर फोटो..

अय्या माणसाच्या अस्तित्वाचा बिलकुल मागमूस नसलेला, पूर्णपणे झाडांनी व्यापलेला भूभाग असू शकतो हेच विसरायला झालेले!++++१००%

वर्षु दी, चाफा म्हणजे जीव की प्राण.. कसली पी़ळदार फुलं टाकलीस.. व्वा!
साधना त्यातली एक कमळाची कळी मी आधीच उचलली ...:)

(तिला हिरवा अंगठा आहे!...फिदीफिदी She has green thumb!) तिने काहीही कुठेही लावलं की ते मस्त फुलतंच. Happy + खुप आवडल... हा सेम जास्वंद आहे माझ्याकडे..

आणि माझ्याकडे पन आहे सेम जास्वंद Wink

आज रसलिंबु केलं तयार..
कसले चुम्मेश्वरी लिंब होती..व्वाह..कस झाल टेस्ट नै केल पण Wink

हे घ्या लिंब..
हिम्मत असेल तर उचलुन दाखवा..
अर्रे आपला दराराच एवढा आहे..देखते रह जाओगे

disappointed-488.gif

लिम्बु खुपच भारी दिसताहेत. एकही डाग न पडलेले. रसलिंबु मस्तच झाले असेल.

मामी, मला त्या फुलाबाबत सेम तुझ्यासारख्या भावना आहेत. आता बघु दोन्ही फोटू आल्यावर..
पण मॅग्नोलिया ग्रँडिफ्लोरा आणि फोटोतला चाफा ही मॅग्लोनियासी या कुळातली दोन वेगवेगळी फुले असु शकतात.

सायली, आज सकाळी तुज्झ्यासाठी मी सगळे तळेच दिलेय गं कमळांनी भरलेले. Happy
माझे तळे इथे टाकता येत नाही, फोटो मोबाईलवर आहे. तोवर हे काश्मिरचे दाल लेक घे.

व्वा साधना... कायम आठवणीत राहील हा फोटो.. Happy

टीना, लिंब भारीये, रच्याकने, रस लिंबुचा पण फोटो टाक ना!

जिप्सी, वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!

टीना हिरवाई सुंदर.

चाफा, जास्वंद आणि प्राजक्त तिन्ही लाडके त्यामुळे लै आवडले.

हो. असू शकतं साधना तसं. बघूयात.

साधना, तो कमळाचा फोटो जबरदस्त आहे. अँगल आणि कॉम्पोझिशन आणि कलर काँबिनेशन जबरदस्त.

Pages