क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिन्नी ऐवजी पुजारा यायला हवा होता आज आत. ५ बॉलर स्ट्रॅटजी चांगली आहे पण तुम्ही जर १७५ धावाही करू शकत नसाल तर मग ..

रोहित आजच्या इनिंग मुळे परत तरणार. १५ इनिंग मधून एक ५० मारली की बास. ग्रेस वगैरे ठिक पण कन्सिस्टंसी टेस्ट मधी हवीच.

टेस्ट क्रिकेट हा पार्ट टाईम / बिट्स अ‍ॅण्ड पिसेस खेळाडूंचा प्रकार नसून, प्रॉपर खेळाडूंचा खेळ आहे. हे वाक्य मी रविंद्र जडेजा विषयी पण लिहीलं होतं. बिन्नी हा वन-डे / टी२० प्रकारातला थोडी बॅटींग, थोडी बॉलिंग मोड मधला खेळाडू आहे. भुवनेश कुमार हा अधिक चांगला पर्याय आहे, जो पूर्ण गोलंदाज आहे आणी त्याचं बॅटिंग टेंपरामेंट बिन्नी पेक्षा कांकणभर सरसच आहे

नोहिट ला खेळवायचच असेल, तर, भुवनेश, ईशांत (हे मी लिहीन असं कधीच वाटलं नव्हतं), मिश्रा आणी अश्विन हे ४ गोलंदाज आणी नोहिट / बिन्नी (एकाच माळेचे मणी) पैकी एकजण ६ वा फलंदाज (?) म्हणून संघात खेळायला हवे.

नोहिट ने अर्धशतक केल्याचं फार कौतुक नाही. त्याला यशस्वी करून दाखवायचच असा चंग बांधला असल्यासारखं त्याला संधी मिळताहेत. मुळात प्रश्न ३ र्या क्रमांकाच्या फलंदाजीचा होता आणी तो सुटला नाहीच, उलट,छा॑न सेटल झालेल्या अजिंक्य रहाणे ला उगाचच बळी दिला.

अर्थात, बिन्नी सारख्या पार्ट टाईम खेळाडूकडून खूप अपेक्षा ठेवणं, नोहिट सारख्या खेळाडू ला यशस्वी करून दाखवायचच असा निर्धार करणं (ईतक्या संधींनंतर कदाचित शंकर दयाळ शर्मा देखील एखादी चांगली ईनिंग खेळून गेले असते) हे रवी शास्त्री ला पर्सनली चॅलेंजिंग वाटणं ह्यात नवल नाही. शेवटी माणसं स्वतःवरून जग ओळखतात

राहुलच्या खेळीमूळे अजून गुंता वाढणार आहे. धवन, विजय, राहुल ह्यात तिघांमधल्या कोणाला बसवणार. तिघांनाही घ्यायचे तर रोहित ला बसवायचे का ? ५ बॉलर्स strategy आपल्याबरोबर कधीच चालली नाही. अजून काही मॅच हरलो कि कोहलीही धोनीच्या 'let's aim not to lose test first' ह्या मार्गाला लागेलच.

भुवीच्या बॉलिंग ची मधे वाट लागली होती बॅटींग वर लक्ष देऊन. मारून मुटकून बॉलर्स ना all rounder बनवणे ह्यासारखा मूर्खपणा नाही. बॉलर्स नी थोडेफार बॅट्समन सारखे खेळणे नि all-rounder म्हणून खेळणे ह्यामधला फरक लक्षात घेतला तर बरे होईल. त्यापेक्षा आपल्याकडे all rounder नाही हे मान्य करून domestic cricket मधे जे कोणी होतकरु वाटत असतील त्यांच्या तयारीकडे लक्ष द्यायला हवंय.

आजचा खेळ पाहिला नाही, पण राहुल कसोटीत ईंटरनॅशनल लेव्हलला तरणारा लंबी रेसका घोडा वाटतो.

भुवीच्या बॉलिंग ची मधे वाट लागली होती बॅटींग वर लक्ष देऊन. मारून मुटकून बॉलर्स ना all rounder बनवणे ह्यासारखा मूर्खपणा नाही. बॉलर्स नी थोडेफार बॅट्समन सारखे खेळणे नि all-rounder म्हणून खेळणे ह्यामधला फरक लक्षात घेतला तर बरे होईल. त्यापेक्षा आपल्याकडे all rounder नाही हे मान्य करून domestic cricket मधे जे कोणी होतकरु वाटत असतील त्यांच्या तयारीकडे लक्ष द्यायले हवंय. >>> + १०००००० पठाणचे तरी वेगळे काय झाले? शेवटच्या चार बॅट्समनना प्रत्येकी सरासरी १५ धावा करायला शिकवले तरी ५०-६० उपयुक्त धावा मिळतात. तेवढे आधी करा आणि ७ ला कोणीतरी खरा ऑल राउंडर बघा.

असामी, सहमत. बॉलर्स नी मुख्यतः विकेट्स काढाव्या आणी पडझड झाल्यास उरलेल्या बॅटींग ला साथ द्यावी. सद्ध्या तरी भारतीय संघाची अवस्था आधीच कोहली, त्यात शास्त्री भेटला अशी आहे.

आधीच कोहली, त्यात शास्त्री >> Happy फार दिवस नसणार आहे तो असे आज BCCI म्हणालेय. काहितरी split coach चा weird funda आहे. इथे वाचा.
http://www.espncricinfo.com/india/content/story/911307.html

ह्यातले "I think it is very important to have a full-time coach for any team." हे अनुराग ठाकूरचे वाक्य वाचून एकदम भडभडून आले मला. केव्हढा तो अभ्यास, केव्हढा तो व्यासंग. Lol

रोहित च्या खेळीमूळे पुढच्या टेस्ट मधे त्याची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पुजाराने शहाण्यासारखे काऊंटी मधे परत जावे.

नोहिट एक महान खेळाडू म्हणून रिटायर होण्याच्या मार्गाला लागला आहे ऑलरेडी. शास्त्री जर एक ऑल-राऊंडर (चँपियन ऑफ चँपियन्स) म्हणून नावाजला गेला, तर रविंद्र जडेजा, रोहित शर्मा तर उच्च दर्जाचेच आहेत. (तेव्हढं त्या युसूफ पठाण ला चुकचुकल्यासारखा वाटत असणार!)

नोहिट एक महान खेळाडू म्हणून रिटायर होण्याच्या मार्गाला लागला आहे ऑलरेडी. >>> Lol

असाम्या - ते २००७ मधे काही दिवस 'कोचलेस' सिच्युएशन मधे चांगले खेळले होते ना आपले लोक? कर्स्टन यायच्या आधी? त्याला सांगायला पाहिजे.

असामी, त्या वेगवेगळ्या कोचेस च्या बातमीत एक धोक्याचा कंदिल पाहीलाच नव्हता. शास्त्री म्हणे टेस्ट टीम च्या कोच च्या स्पर्धेत आहे. अरे देवा!! तसं झालं तर, त्या "FTII च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान" प्रकारचा एखादा धागा काढावा लागेल.

फारएण्ड च्या लक्ष्मण वरच्या लेखातल्या वाक्याचा आधार घेत असं म्हणावं लागेल की, "बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण निदान टेस्ट मॅचेस च्या बाबतीत तरी जरा क्रिकेट चे कुळधर्म पाळा" Happy

ते २००७ मधे काही दिवस 'कोचलेस' सिच्युएशन मधे चांगले खेळले होते ना आपले लोक? कर्स्टन यायच्या आधी? त्याला सांगायला पाहिजे. > फा इतिहास पाहणारे इतिहासात जमा होतात, believe in future हा BCCI motto तुला माहित नाही का ? Wink

शास्त्री म्हणे टेस्ट टीम च्या कोच च्या स्पर्धेत आहे. >> मी ह्या बाबतीमधे फेन्सवर आहे रे. सविस्तर नंतर लिहितो.

आज मला मिश्राजींची बॅटिंग आवडली. बघायला मजा आली. नाहीतर ६ गेले म्हणजे उरलेल्या चारांनी २५-३० धावात गाशा गुंडाळलाच.

फेरफटका Happy सही.

केदार 'मिश्राजी' म्हंटल्यावर ई है बम्बई नगरिया मधल्या बच्चन सारखे एक बनारसी पान तोंडात टाकून स्क्वेअर लेग कडे जाउन एक पिचकारी टाकून मग शॉट मारल्यावर नॉन स्ट्राईकर ला "सुक्लाजी, जल्दी क्या है, रन वन निकालेंगे फुर्सत मे" म्हणणारा खेळाडू डोळ्यासमोर आला.

"'मिश्राजी' म्हंटल्यावर ई है बम्बई नगरिया मधल्या बच्चन सारखे एक बनारसी पान तोंडात टाकून स्क्वेअर लेग कडे जाउन एक पिचकारी टाकून मग शॉट मारल्यावर नॉन स्ट्राईकर ला "सुक्लाजी, जल्दी क्या है, रन वन निकालेंगे फुर्सत मे" म्हणणारा खेळाडू डोळ्यासमोर आला." Happy क्या बात है!!

तिकडे स्टीव्हन स्मिथच्या ११ सेंचुर्‍या झाल्या टेस्टसमध्ये ... ११ पैकी १० मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये, तर उरलेली ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आणि मॅचच्या दुसर्‍या इनिंगमध्ये!

टॉम ग्रॅव्हेनी आणि अ‍ॅशवेल प्रिन्स ह्यांनीदेखील त्यांच्या करीयरची सर्व ११ शतके त्यांच्या टीमच्या पहिल्या इनिंगमध्ये ठोकली आहेत.

मिश्राजी Lol मी आणि माझा रूममेट रोहित शर्माला शर्माजी म्हणतो. शेवटी सासरकडचा पाहुणा असल्यासारखा मान तर दिला पाहिजे Proud

"सुक्लाजी, जल्दी क्या है, रन वन निकालेंगे फुर्सत मे" >> LOL

शास्त्री म्हणे टेस्ट टीम च्या कोच च्या स्पर्धेत आहे. >> भारतीय कोचेस हवे असतील शास्त्री हा चांगला choice वाटतो. तो स्वतः प्रचंड naturally talented नव्हता त्यामूळे अमाप कष्ट नि जिगर ह्या जोरावर राहिलेला हे आठवा. एकंदर भारतीय मानसिकतेला star खेळाडूंपेक्षा hardworking limited talented खेळ असेलेले कोचेस जास्त मानवतात. कदाचित त्यांच्या star image चा problem येत नसावा. त्याचे एकंदर cricket बद्दलचे thinking चांगले वाटते नि तो सहनशीलही वाटतो. BCCI च्या whims ना सांभाळून आपले काम करवून घेण्याइतका चाणाक्ष नि सुलझा हुआ वाटतो. त्यामूळे he may not be such a bad choice.

कालचा दिवस छान झाला. मॅच मस्त चाललीये.It's still anybody's game. अशी टेस्ट बघायला मजा येते.

अ‍ॅशेस मात्र ह्यावेळी निराशाजनक झाली. सगळ्याच मॅचेस एकतर्फी झाल्या.

मिश्राजीने काढलेला बोल्ड खतरनाक होता. मजा आली. क्रिकैंफो वर हायलाईट्स करणारा लंकेचा असावा एव्हढा लंकेच्या हाय्लाईट्स असतात. म्हणजे पहिल रन, पन्नासावा, शंभरावा, शंभर पार्टनरशिप, लागोपाठ फोर वगैरे. ह्याउलट भारताचे शोधा., रँडम नंबर जनरेटर Happy

या सामन्यातही तिथेच येऊन उभे राहिलोय जिथे पहिल्या सामन्यात होतो.
पुन्हा ईथूनही आपला अचानक ढासळलेला खराब खेळच आपल्याला हरवू शकतो.
फक्त सामना अनिर्णित राहण्याचीही एक शक्यता आहे, पाऊसही हातभार लावू शकतो.

पहिले सत्र फारच महत्वाचे कारण ते चिकाटीने खेळलो तर मात्र आपण हरणार नाही या स्थितीत येऊन जाऊ आणि ती पराभवाची शक्यता जशी कमी होत जाईल तसे दुसर्‍या सत्रात टेंशनफ्री झाल्याने आणखी खुलून खेळू शकू.

India lead by 266 runs with 7 wickets remaining
मस्त !
चहापर्यंत याच पेसने खेळत ३५० च्या आसपास
आणि मग थोडी फटकेबाजी करत ४०० चे टारगेट !
मॅच आपल्यासाठी सेट आहे Happy

कोहली इन धोणी'ज शूज ! कधी डिक्लेअर करायचे हा प्रश्न Happy माझ्या मते ४०० आतबाहेर किंवा टी नंतर १ तास खेळूनच. आत्ताचा रेट पाहतात तो पर्यंत ४०० सहज होतील.

गेली एक विकेट..
संगकारा आला..
त्याला घ्या लवकर.. भरवसा नाही.. लास्ट मॅच म्हणत जिंकाविंकायचा प्रयत्न करेल .. आणि मारून जाईल आपली

Pages