क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या बॅटींग लाईनअपमध्ये ३५० पण चेस करण्याची क्षमता आहे!
पण आमच्या बॉलींग लाईनअपमध्ये तेवड्या रन्स समोरच्या टीमला काढून देण्याची क्षमता आहे!

म्हणून बॉलींग बॅटींगला पूरक होणं आवश्यक आहे.

Lol स्पार्टा

असे एवरेज काढून २५० चांगला स्कोअर आहे असे डिक्लेअर नाही करू शकत, त्यासाठी त्या पर्टीक्युलर सामन्यातील परिस्थितीच बघावी लागणार. > >आणि त्या सामन्यामधे अशी नक्की काय परिस्थ्ती होती कि तू छातीठोकपणे २५० धावा इंग्लंडने काढल्याच असत्या असे म्हणतोयस ?

पहिल्या डावात फलंदाजी कशी होते ह्यावर गेम सेट केला कि नाही हे साहजिक आहे. जर कमी धावात कारभार आटोपला तर बॉलिंगने सामने जिंकून दिले असतनेअसे किती वेळा झाले आपल्याबाबत वर्ल्ड कप मधे तर दोनदा (तेही एकदा ने दर लँड विरुद्ध) ह्याउलट पहिल्यांदा बॉलिंग करायची वेळ आली तेंव्हा पाच पैकी फक्त एकदा आपण २०० च्या आत गुंडाळले (केनिया सुद्धा दोनशे करून गेला होता). अशा वेळी फलंदाजी गोलंदाजीला पूरक होती म्हणून चांगले खेळलेलो कि उलट हे माझ्यासाठी उघड आहे.

फलंदाजी गोलंदाजीला पूरक असलेले पर्फेक्ट उदाहरण शास्त्रीवाला बेन्सन अँड हेजेस होते.

असो, ह्यापुढे मला ह्यावर लिहायचा कंटाळा आलाय. We agree to disagree म्हणून सोडून देउ.

असो, ह्यापुढे मला ह्यावर लिहायचा कंटाळा आलाय. We agree to disagree म्हणून सोडून देउ.
>>>

छ्या : छ्या: ....
मायबोलीवर असे कुठे सोडून देता येते काय? ::फिदी:

वर्ल्ड कप यु एस मधे इ एस पि एन वर आहे म्हणे? "वॉच इस एस पि एन" अ‍ॅप वर मॅचेस दिसतील का? माझ्याकडे कॉमकास्ट आहे पण त्यात इ एस पि एन १ नाही मात्र इ एस पि एन ३ आहे. तस असेल तर मला वर्ल्ड कप मॅचेस दिसु शकतील का? का मला कॉमकास्ट ला कॉल करुन माझे पॅकेज अप्ग्रेड करायला लागेल?

जाणकारांनी प्लिज खुलासा करावा.. बाकी यु एस मधली मंडळी मॅचेस कुठे बघणार आहेत? विलो टिव्हीच्या वेबसाइटवर वर्ल्ड कप बद्दल काहीच माहीती नाही अजुन... वर्ल्ड कप २ आठ्वड्यावर येउन पोहोचला आहे..

आमच्या बॅटींग लाईनअपमध्ये ३५० पण चेस करण्याची क्षमता आहे!
पण आमच्या बॉलींग लाईनअपमध्ये तेवड्या रन्स समोरच्या टीमला काढून देण्याची क्षमता आहे!

म्हणून बॉलींग बॅटींगला पूरक होणं आवश्यक आहे.

>>>>>>>

जेव्हा आपली बॅटींग ३५० चेस करत असते, तेव्हा समोर ऑस्ट्रेलियासारख्या संघाची बॉलिंगसुद्धा चोपली जात असतेच ना. !

पण तेव्हा कोणीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर टिका न करता भारतीयांच्या फलंदाजीचेच कौतुक चालू असते.

का? ?

कारण आपण भारतीयांसाठी क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे. आपण त्याच नजरेने सामने बघतो. आपण शतके मोजतो पण कोणी ४-५ बळी काढत असेल हे आपल्यासाठी तितकेसे कौतुकाचे नसते. कदाचित ते फोर-सिक्स एवढे ग्लॅमरस नसावे.

आणि त्यामुळेच आपण विजयाचे श्रेय सर्वप्रथम फलंदाजांनाच देतो. एखाद्या खेळपट्टीवर ३०० धावा शक्य असताना जर आपल्या गोलंदाजांनी समोरच्या संघाला २६० वर रोखले तरी मग ते २६० मारताना आपल्यात जो शतक ठोकेल त्यालाच आपण विजयाचा शिल्पकार समजतो. तोंडदेखले म्हणतही असू की २६० वर रोखणेही चांगली कामगिरी होती, पण ते दुसर्‍याच क्षणाला विस्मरणात गेलेले असते, आणि काही वर्षांनी तो सामना आठवताना शतक मारलेला फलंदाज आठवतो, पण त्यात कोणी १० ओवरमध्ये ४० धावा देत ४ बळी घेतलेले असतील ते नाही आठवत.

कटू आहे पण एक काळे सत्य आहे. याच कारणामुळे आपल्याला चांगले गोलंदाज मिळत नाहीत.

मायबोलीवर असे कुठे सोडून देता येते काय? :फिदीफिदी
अहो त्यांनी सिनेमा उपनिषदांमधले पडोसन हे उपनिषद वाचले नाही. त्यांना
हम छोडेगा नही जी, हम पकडके रखेगा! यक चतुर नाSर ही रुचा माहित नाही.
विशेषतः क्रिकेटमधे आपल्याकडे झेल आला की हा मंत्र स्मरण करावा
असे मी माझ्या उपनिषदांचे महत्व या आगामी ग्रंथात लिहीले आहे.
एकूणच आपल्या कडे सर्व ज्ञान असूनहि लोक परकीय ज्ञानाच्या मागे का लागतात?

येरे येरे पावसा.. आजचा सामना अनिर्णित राहण्याची लक्षणे .. ऑस्ट्रेलियासमोर दोन गुण आयते मिळणे पथ्यावर.. आता पुढचा सामना सेमीफायनल..

"Since, December 2013, Dhawan has played 13 inning in ODIs played in Aus/NZ/SA/England and averages 19.9 with one score of above 40. If one takes into account only ODIs in Aus & NZ he averages 13 with a highest scroe of 32 in 7 innings. How does he even make it to the probables list? High time that India recognizes the difference between domestic and overseas batting success - each requires a different skill set!"

>>>
कालपर्यंत मीच बोलत होतो, आता जगदुनिया बोलायला लागली.. का अश्या अडनाड्या घोड्यावर जुगार खेळत आहोत..
सेहवागची कारकिर्द संपवली, युवराजसारखा मॅच विनर फॉर्मात असताना तो संभाव्य ३० मध्येही नाही.. रहाणेने हिंमतीने सिद्ध केले अन्यथा त्याचीही टोपली होती..
पण लाडके मात्र खेळत आहेत..

स्पार्टाकस.. ती साइट बहुतेक कायदेशिर वाटत नाही.. व्हायरस वगैरेची भानगड असेल अस वाटत..

अजुन कोणालाच थांग पत्ता नाही की काय की आपण अमेरिकेत रितसर मॅचेस कुठे बघु शकतो ?

सर रविंद्र जाडेजा ची कमाल टीम मधे आल्याबरोबर काहीही न करता इतकेच काय मॅच देखील न खेळता भारताला २ पॉईंट दिले.

शतशः नमन प्रणाम आदाब सलाम सॅल्युट Happy

मला पण विलो वर असेल असे वाटले होते पण पॅकेज प्राइसेस, अ‍ॅड्स वगैरे दिसत नाहिये काहीच विलो वर ! मुकुंद ने दिलेली लिन्क बघते आता. काय मुकुन्द आहे का ओळख ! Happy गेल्याच्या गेल्या की त्याच्याही आधीच्या वर्ल्ड कप साठी माबो चॅट/ ईमेल ग्रुप केला होता आपण त्याची आठवण झाली Happy

विलोवर दाखवणार नाहीयेत. वॉच espn वर अपकमिंग मॅचेस मधेही उल्लेख नाहीये. त्यामुळे ९९ डॉलर्स भरणे हा एकमेव मार्ग दिसतोय.

नेट वर तर दिलय डारेक्ट स्ट्रीमिन्ग उपलध्द असेल वीलो क्रिकेट वर म्हणुन म्हणजे असेल बहुतेक वीलो क्रिकेट वर. मी आताच चेक केले

नेट वर तर दिलय डारेक्ट स्ट्रीमिन्ग उपलध्द असेल >> नेट वर म्हणजे कुठे नक्की ? willow.tv वर अजूनही काहीही दिसत नाहीये World Cup बद्दल.

espn चे फक्त streaming असणार आहे कि ESPN 3 वर पण हे कळत नाहिये.

मैत्रेयि.. अशी जुनी ओळख कसे काय विसरेन?:) निराकार कसा आहे?

असामी व इतर क्रिकेट्प्रेमी.. मी स्वतः इ एस पि एन ला कॉल केला व त्यांनी मला सांगीतले की जरी तुमच्याकडे फिऑस किंवा कुठल्याही केबल कंपनीकडुन इ एस पिन , इ एस पि एन २ व इ एस पि एन ३ असेल तरी त्यावर तुम्हाला वर्ल्ड कप क्रिकेट दिसणार नाही .. तसेच विलो टिव्ही वर सुद्धा दिसणार नाही

इ एस पि एन ने बिलीअन्स ऑफ डॉलर्स देउन वर्ल्ड कप राइट्स बाय केले आहेत. त्यामुळे तुम्हाला मी दिलेल्या लिंक वरुन ९९ डॉलर्स देउनच वर्ल्ड कप च्या मॅचेस दिसतील. तुम्ही ईदर कंप्युटर वर बघु शकता किंवा रोकु असेल तर टीव्ही वर बघु शकता किंवा स्मार्ट फोनवर त्यांचे अ‍ॅप डाउनलोड करुन स्मार्ट फोन किंवा टॅब्लेट वर बघु शकता.

स्मार्ट फोन किंवा टॅब्लेट साठी त्यांचे अ‍ॅप हे १२ फेब्रुवारीनंतरच गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल आय ट्युन्स वर तुम्ही डाउन लोड करु शकता. तोपर्यंत त्यांचे अ‍ॅप उपलब्ध नाही... पण कंप्युटर वर तुम्ही उद्या पासुन सुरु होणार्‍या वॉर्म अप मॅचेस पण बघु शकता.

होप धिस हेल्प्स!मी घेतले ते पॅकेज काल..

आणी करा रे कोणीतरी धागा सुरु गेल्यावेळेसारखा..:) पण गेल्यावेळच्या त्या रावण नामक आय डी ला त्यात प्रवेश देउ नका रे....( जस्ट किडींग.... Happy )

धन्यवाद मुकुंदा ह्या माहितीबद्दल. मॅचेस च्या वेळा नि रिप्ले मिळणार आहे का हे बघून घ्यावे लागले पॅकेज.

२०११ ला देखील अशीच चर्चा होत होती का ? तेव्हा कोणी असे वेगळा धागा विश्वचषक क्रिकेटवर काढलेला? त्यांनाच सांगा यंदाही धागा काढायला.
कधी कधी अंधश्रध्दाही ठेवावी (यावेळी जास्त गरज आहे)

हा हा हा खरयं कबीर.

( मी ज्या ज्या वेळी (दौर्‍यात) धागे काढले त्यात भारताचा सक्सेस रेट जास्त आहे हा निव्वळ योगायोग. पण इथे योगायोगच हवा. नाहीतरी आपले शिंगरू लोकं तिकडे भलतेच उघडे पडले आहेत.)

यंदा दवा की कम दुवा की ज्यादा जरुरत है.
मागच्यावेळेला कसलीच गरज नव्हती. सगळेच शेर होते ते ही आपल्याच मातीत.
आता असे नाही म्हणुन म्हणालो. काय किमान मनाला एक समाधान राहिल की आधीच्यानेच धागा काढलेला.

काल पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सिरीज मध्ये बांग्लदेशनी सलग तिसरा विजय मिळवून ३-० असा व्हाईटवॉश पाकिस्तानला दिलेला आहे.

Pages