Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिंकलो रे जिंकलो! कोहलीचे
जिंकलो रे जिंकलो!
कोहलीचे युग सुरू झाले एकंदरीत!
भास्कराचार्य, कोहलीयुगाशी
भास्कराचार्य, कोहलीयुगाशी सहमत. अर्थात, खरी परीक्षा पुढे आहे.
पहिली कसोटीसुद्धा जिंकायला हवी होती. आजीबात अशक्य नव्हतं.
आ.न.,
-गा.पै.
खरेय कोहलीयुग सुरू झालेय.
खरेय कोहलीयुग सुरू झालेय. इशांत शर्माला बघून समजत होते
५ बॉलर्स घेऊन त्यांच्यावर
५ बॉलर्स घेऊन त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात कोहलीचे यश नक्कीच आहे. होपफुली बेटर थिंग्स आर अहेड नाऊ ...
५ बोलर्स ही नक्कीच डेअरिंग
५ बोलर्स ही नक्कीच डेअरिंग आहे. फार क्वचित झालेले आहे पूर्वी. सिरीज जिंकली हे जबरी. आजकाल एकूणच कोणत्याही संघाने "अवे" सिरीज जिंकणे कमी झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर हे उठून दिसते.
काल फेकिंग न्यूज मधे इशांत च्या नवीन हेअर स्टाईल(!) मुळे त्याच्या स्विंग ला फायदा होतो असा एक डोक्याची आयाळ वार्यावर उडणारा फोटो असलेला जोक आला होता
http://my.fakingnews.firstpost.com/2013/11/26/ishant-sharmas-new-hair-st...
टोटल लोल
खरी परीक्षा पुढे आहे >>
खरी परीक्षा पुढे आहे >> अनुमोदन.
पण त्यामुळे आजचा आनंदही का सोडा. मला इशांतची बोलिंग खूपच आवडली. एकदम व्हिंटेज वाटला. ऑसीसोबत जसे स्पेल होते तसेच. जबरदस्त टेस्ट क्रिकेट होते ते.
५ बोलर्स ही नक्कीच डेअरिंग
५ बोलर्स ही नक्कीच डेअरिंग आहे. >> +१
आफ्रिकेविरुद्ध काय टीम असेल ह्याची उत्सुकता आहे. विशेषतः बॅटींग ५ बद्दल. पुजाराचे त्या इनिंग नंतर काय होते हे रोहित च्या दोन पन्नासनंतर येणारा यक्षप्रश्न असणार
मिश्रा सेकंड स्पिनर म्हणून नक्की असल्यामूळे जडेजा चे टेस्ट करीयर संपल्यात जमा धरायला हरकत नसावी. नवा left arm orthodox spinner शोधायला सुरूवात करा रे. अब्दुल्ला, नेगी ?
बेदी as usual बरळलाच ....
मिश्रा सेकंड स्पिनर म्हणून(च)
मिश्रा सेकंड स्पिनर म्हणून(च) चांगला आहे. तो बॅटींगही बरेच वेळा करतो. युजफुल टेलएंडर आहे.
पुजाराच्या अवघड विकेट वर बॅट कॅरी करून १४५ रन्स करण्याला नोहिट च्या सेशन संपता संपता आऊट होत ५० रन्स काढण्यामुळे मोठं आव्हान ऊभं राहीलय हे मात्र खरय
जिंकल्यामुळे छान वाटलं. सवय
जिंकल्यामुळे छान वाटलं. सवय सुटली होती.
मोठं आव्हान >> मुकुल केसवन ने
मोठं आव्हान >> मुकुल केसवन ने मस्त शब्द वापरलाय, we all are seemingly awaiting for volcanic explosion of Rohit's virginal talent
असामी,
असामी,
सातवा म्हणून बिन्नीचा रोल काय
सातवा म्हणून बिन्नीचा रोल काय नि कसा असणार हेही उत्सुकतेचे कारण आहे विशेषतः आफ्रिकेच्या दौर्यामधे. आपण लंकेसारख्या सिमिंग विकेट्स बनवणार नसू तर बिन्नी बॉलर म्हणून कितपत उपयोगी पडेल ? त्याच्या ऐवजी त्याच्या एव्हढाच accurate भुवी योग्य ठरेल का ? कि तिसरा बॉलर स्पिनर असावा ? जर स्पिनिंग विकेटस असतील तर तिसर्याची गरज तरी लागेल का ? आफ्रिका पण transition मधून जात आहे. ओपनिंग अजून नक्की नाहिये, अमला च्या फॉर्ममधे डीप आलाय. मॉर्केल येतोय कि नाही माहित नाही. It will be interesting series for sure.
रोहीत शर्मा तंत्रात कच्चा
रोहीत शर्मा तंत्रात कच्चा असला तरी तो जम बसवणार कसोटीत एवढे नक्की..
धोनीसारखा गावठी तंत्राचा माणूस टेंपरामेंट आणी अॅडजस्टमेंटच्या जीवावर एवढा खेळलाच ना..
हल्ली रोहीतच्या खेळात किंबहुना मानसिकतेत एक सुधारणा दिसून येते, ती म्हणजे तो धावा होत नसताना वा चाचपडत असतानाही फारसा फ्रस्ट्रेट होताना दिसत नाही.
परदेश दौरे सांभाळून घेतले आणि भारतातल्या सामन्यात अधूनमधून झबर्रदस्त पार्या खेळला तरी त्याची जागा वाचून राहील..
पण मला त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, म्हणजे एखादी धडाकेबाज इनिंग खेळून परदेशातील ऐतिहासिक विजय .. भले अशी इनिंग एखादीच असली तरी यादगार असेल..
धोनीसारखा गावठी तंत्राचा
धोनीसारखा गावठी तंत्राचा माणूस टेंपरामेंट आणी अॅडजस्टमेंटच्या जीवावर एवढा खेळलाच ना. >> धोनी त्याच्या street smartness च्या जीवावर ही adjustment करू शकला रे. रोहितकडे तो नाहीये. त्याची बॉलची judgement इतरांपेक्षा चांगली असल्यामूळे त्याला शॉट्स खेळायला अधिक वेळ मिळतो इतरांपेक्षा त्यामूळे तो भयंकर effortless वाटतो. "हल्ली रोहीतच्या खेळात किंबहुना मानसिकतेत एक सुधारणा दिसून येते" हे बरोबर आहे फक्त ह्यात लोचा असा आहे कि रोहितच्या एका कारकिर्दीमधे पुजारा, राहाणे नि कदाचित राहुल असे तीन गाडले जाणार आहेत. जेंव्हा निकाल आपल्या बाजूने असतात तेंव्हा रोहितच्या ४-५ मधे एक मोठी inning प्रकाराला सहज सामावून घेता येते पण तसे होत नसेल तर काय हा प्रश्न आहे. मूळात test team चा निकष test साठी लागणारे temperament नि patience कोणाकडे अधिक आहे हा असायला हवा ज्यामधे रोहित फार शेवटी येतो विजय, पुजारा, राहुल, राहणे, कोहली, धवन ह्या यादीत.
राहाणे गाडला जाणार नाही
राहाणे गाडला जाणार नाही बहुधा. त्याच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मॅचेस (पहिली सोडून) परदेशात आहेत. त्यात ४५ च्या आसपास सरासरी म्हणजे त्याचा पत्ता काही कट होऊ शकत नाही लगेच. आता भारतातल्या मॅचेस आहेत त्यात ते कमी होण्याची शक्यता कमीच वाटते.
बाकी बेदी काहीही बोलतो. "They (the Indians) are going to town about the five-bowler theory. Where are the five bowlers? There is only one bowler that we have," said the left-arm spinner. (referring to Ashwin) " लास्ट मॅच कोणत्या बॉलरने जिंकवली बाबा? इतके सस्टेन्ड प्रेशर किती वेळा बॉलर्सनी क्रिएट केलेले म्हणे?
त्यात ४५ च्या आसपास सरासरी
त्यात ४५ च्या आसपास सरासरी म्हणजे त्याचा पत्ता काही कट होऊ शकत नाही लगेच. >> पत्त कट म्हणजे त्याला योग्य त्या जागेवर न खेळवता रोहितला accommodate करण्यासाठी इतरत्र फिरवणॅ अशा अर्थाने बोलत होतो. राहाणे ३ वर ढकलला गेला तर अर्थात पुजारा बाहेर किंवा ओपन करणार. तिथे आधीच तीन जण आहेत. एकंदर सावळा गोंधळ.
बाकी बेदी काहीही बोलतो. >>
प्रश्न योग्य जागी योग्य
प्रश्न योग्य जागी योग्य खेळाडूने खेळायचा आहे, रोहित शर्मा ला accommodate करण्याचा नाही. आणी तो कुठल्याच क्रमांकावर योग्य ठरत नाही.
असामी शी सहमत
बेदी ला विचारायला जातात का (का जातात हा देखील प्रश्न तितकाच वाजवी आहे).
बेदी ला विचारायला जातात का >>
बेदी ला विचारायला जातात का >> जातात कि तोच येऊन सांगतो देव जाणे. पण मनमोकळेपणाने कौतुक केले समजा कधी तर काय बिघडणार आहे का त्याचे ? उगाच परखडपणा नि स्पष्ट्वक्त्येपणाच्या नावाखाली उगाचच ठोकत असतो.
बीसीसीआय अध्यक्ष दालमियांचे
बीसीसीआय अध्यक्ष दालमियांचे हृदयविकाराने कोलकाता येथे निधन..
मॅच बघतंय का कोणी? क्लासिक
मॅच बघतंय का कोणी? क्लासिक वन-डे चालू आहे!
हो, आज धोनी नीट कप्तानाची
हो, आज धोनी नीट कप्तानाची इनिंग खेळला. पण तरिही आधीच्या मॅच मधे दिसलेले problems solve झाले आहेत असे नाही. कोहली चार वर चाचपडतोय. shouldn't your best batsman be batting at his best position ? रोहित, कोहली, धवन, राहाणे हे सगळे एकाच प्रकारात खेळणारे खेळाडू आहेत. They need little bit of time to get set and then they can ramp up strike rate close to 100, putting up big scores. (Raahane actually slows down after start as ball gets soft) None of them can be explosive from get go and that essentially means fielding restrictions in first 5 overs are always not utilized best. फिनिशर म्हणून काम करणारे रैना किंवा धोनी दोघेही त्या रोलमधे हल्ली सूट होत नाहियेत त्यामऊळे शेवटच्या ओव्हर्स मधे हवा तसा explosion मिळत नाहिये. मयांक अग्रवाल नि नमन ओझा are in form of their life so at least one of them should be playing right now.
धोनीचे पुढचे प्लॅन्स काय आहेत ह्यावर कीपर नि कप्तान पदाबद्दल काय करायचे, विशेषतः पुढच्या World Cup निमित्ताने हे ठरवायला हवे जेणेकरून settled team तयार होउ शकेल.
वन ऑफ द बेस्ट इनिंग बाय धोणी.
वन ऑफ द बेस्ट इनिंग बाय धोणी.
पूर्ण मॅच मस्त झाली.
धवन , कोहली आणि रैना पैकी दोघांना जरी फॉर्म सापडला तर अफ्रिका सिरिज नक्की हारणार. रैना अजून एखादीच मॅच खेळू शकेल. त्यातही तो जर ० वर आउट झाला तर त्याच्याजागी रायडू येईल.
झहीर खानची आंतरराष्ट्रीय
झहीर खानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा.औपचारिकताच उरली होती तरीपण...दुखापतींशी झगडत घडवलेली कारकीर्द. २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा. आता त्याला बोलिंग कोच म्हणून पाहायला आवडेल
खरे आहे. आपण गेल्या दशकात
खरे आहे. आपण गेल्या दशकात जिंकलेल्या मॅचेस मधे फार महत्त्वाचा वाटा होता त्याचा. वर्ल्ड कप मधे सुरूवातीला व शेवटी स्पेल्स मधे हमखास विकेट्स काढायचा तो.
द आफ्रिकेचा स्मिथ त्याचा आवडता 'बनी'
https://www.youtube.com/watch?v=kzLjja3Obck
एक फास्ट बोलर करीयर मधे उत्तरोत्तर जास्तच इफेक्टिव्ह व भेदक झालेला आहे असे फार क्वचित झाले असेल झहीर सारखे.
अक्षर पटेल हा भविष्यात आपल्या
अक्षर पटेल हा भविष्यात आपल्या फिरकीचा मुख्य आधार ठरेल असं कालच्या सामन्यावरून पुन्हा जाणवलं. देहयष्टीत खूप फरक असला तरीही विनु मंकड व त्यांच्यातलं 'बेरकीपणा' हें साम्य जाणवतं. तो क्षेत्र्रक्षण व फलंदाजीही चिकाटीने करतो हेंही आधीच्या कांही सामन्यात दिसून आलंय.
द. आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षणाचा इतका दबदबा असूनही आपले महत्वाचे फलंदाज घाई करून धांवचित होतात, हें अक्षम्य आहे.
काल कोहली व रैना यांनी घेतलेले झेल आपल्या क्षेत्ररक्षणासाठी खूपच आश्वासक वाटतात.
अरेरे झहीर गेला .. आवडता बॉलर
अरेरे झहीर गेला ..
आवडता बॉलर .. खास करून त्याची बॉडी लँगवेज आवडायची
हो,
स्मिथ अक्षरशा गंडायचा त्याला. बॉल आत जातोय की बाहेर काहीच अंदाज यायचा नाही.
अक्षर पटेल हा खरा "फिरकी"
अक्षर पटेल हा खरा "फिरकी" गोलंदाज नाही. त्याचे बॉल खूप वळत नाहीत. मोस्टली तो रविंद्र जडेजाची चांगली कॉपी आहे. स्ट्रेट बॉलिंग मध्ये थोडे व्हेरिएशन . जडेजा सारखाच पटेल बॅटिंगही करतो त्यामुळे तो ऑलराउंडर म्हणून जास्त आणि हुकूमाचा फिरकी म्हणून कमी आहे.
मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स.
सध्या हातभर वळवणारा एकच बॉलर आहे. तो म्हणजे मिश्रा. पण तो फेव्हरेट नाहीये. जेंव्हा जेंव्हा त्याला संधी दिली जाते तेंव्हा तो नक्कीच चांगला टाकतो.
मला तो बरा वाटतो. पण ही हॅज
मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स. >> +१. बेरकीपणा नक्की आहे. पण फिरकीचा मुख्य आधार हे धाडसी वाटले. गेल्या आयपील मधे त्याला ठरवून टारगेट केल्यावर बरीच धांदल उडाली होती, अर्थात हा अनुभव नसण्याचाही तेव्हढाच भाग आहे. पण लिमिटेड ओव्हरस मधे नक्कीच मह्त्वाची कामगिरी बजावू शकेल.
धवन, रैना आणी कोहली, तिघंही
धवन, रैना आणी कोहली, तिघंही आऊट ऑफ फॉर्म आहेत. धवन च्या जागी रहाणे ओपन करू शकतो, कोहली वन-डाऊन, रायडू चौथा असा बदल संभवतो.
अक्षर पटेल, युटिलीटी प्लेयर वाटतो, पण लिमिटेड आहे. त्यामुळे, भरवशाचा विकेट-टेकिंग बॉलर होईल असं वाटत तरी नाही.
मयांक अग्रवाल ला ओपन करण्याची
मयांक अग्रवाल ला ओपन करण्याची संधी देऊन बघायला हरकत नाही. तो जबरदस्त फॉर्म मधे आहे नि गेल्या वर्षापासून मॅच्युअर झाल्यासारखा इनिंग build करतोय. Pretty much every score is three digits scors in last few months. Worth a shot !
Pages