क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोलंदाजांची कामगिरी बघायची असल्यास २००३ चा विश्वचषक बघा. अंतिम सामन्यातील पिटाई वगळता सचिन नामक फलंदाज आणि आफिकेच्या कंडीशनमध्ये चालणारे डावखुरे वेगवान गोलंदाज यांच्या जीवावर आपण सर्वच सामने जिंकलो होतो..

त्या विश्वचषकातील आपली एकंदरीत कामगिरी २०११ च्या विश्वचषकापेक्षा बरेच उजवी होती. बस २००३ ला अंतिम सामना जिंकता आला नाही आणि २०११ ला धोनीने षटकार मारून जिंकवले म्हणून लोकांना २०११ चे कवतुक जास्त वाटते.

बस २००३ ला अंतिम सामना जिंकता आला नाही आणि २०११ ला धोनीने षटकार मारून जिंकवले म्हणून लोकांना २०११ चे कवतुक जास्त वाटते. >> बस २००३ ला अंतिम सामना जिंकता आला नाही आणि २०११ ला धोनीने षटकार मारून जिंकवले(च) म्हणून लोकांना २०११ चे कवतुक जास्त वाटते. ह्यातला बोल्ड केलेला शब्द मह्त्वाचा आहे Happy

फेरफटका म्हणूनच मी कंसातले प्रश्नचिन्ह टाकले आहे. निवाळ बॅटींग च्या जोरावर आपण काही सामने जिंकूही पण बॉलिंग क्लिक झाल्या शिवाय काही खरे नाही नि सध्या तरी तसे होण्याचे चान्सेस फारसे दिसत नाहीयेत. दिड बॉलर्सच्या जोरावर नव्या रुल्स प्रमाणे पन्नास ओव्हर्स defend करणे अशक्यप्राय वाटते. Finally balling wins tournaments.

कुठले नवे रुल्स ? >> गेल्या World Cup नंतर बदलेले रुल्स रे .
Among the significant changes made to the rules governing ODI cricket since October 2012, five fielders are mandated to be within the 30-yard circle at all times in the course of an innings. Only two fielders are allowed outside the circle for the first 10 overs while three are permitted for the chunk of five Powerplay overs to be taken by the batting team before the 40th over.
http://www.espncricinfo.com/icc-cricket-world-cup-2015/content/current/s...

असामी,

ते प्रश्नचिन्ह पाहिलं आणी समजलं सुद्धा. पण ३ महीन्यांनी मायबोली वर आल्यावर जर फटकेबाजी करण्याचा मोह आवरला नाही. Happy

ऋन्मेष,

२००३ च्या विष्वचषकाच्या वेळी भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली असली तरी गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकले असं नाही म्हणता येत. जेव्हा फलंदाजी कोलमडते अशा कमी धावसंख्येच्या (low scoring) सामन्यांमधे भारतीय गोलंदाजी ने सामना जिंकला किंवा चुरशीचा केला असं घडलं तर गोलंदाजीला श्रेय देता येईल (उदा. १९८३ विष्वचषक अंतिम सामना).

ईंडिया २०४ - नेदरलॆंड १३६ ... श्रीनाथ ३०-४, कुंबळे ३२-४
इंडिया २५० - ईंग्लंड १६८ ... आशिष नेहरा २३-६ (त्याच्या आयुष्यातील बेस्ट स्पेल)
न्यूझीलंड १४६ - ईंडिया १५०-३ (४१ षटके) ... झहीर खान ४२-४
ईंडिया २९३ - श्रीलंका १०९ सर्वबाद .... श्रीनाथ ३५-४, नेहरा ३५-४

सेमीफायनलला,
ईंडिया २७० - केनिया १७९ सर्वबाद ... झहीर खान १४-३, नेहरा ११-२

सहज जुन्या आठवणी चाळवायला हे आकडे गूगाळले, पण ओवरऑल आपल्या बॉलिंगबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता त्या काळी, ते देखील वेगवान गोलंदाजांबद्दल, जी फारच दुर्मिळ गोष्ट आहे.

दुर्दैवाने म्हणा किंवा ऑस्ट्रेलियाच्या सरस खेळाने म्हणा अंतिम सामन्यात झहीरची पहिलीच ओवर बेक्कार झाली आणि सुरुवातीपासूनच सामना हातातून निसटतच गेला.

तरीही इथे गोलंदाजांचे श्रेय नाकारल्यास हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल, आणि भारतीयांसाठी क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ आहे असे म्हणावे लागेल, कारण इथे लोक कैफ हा सुमार फलंदाज होता यालाही असहमती दर्शवतात,पण नेहरा, झहीर, इशांत यांच्यावर तोंडसुख सहजगत्या घेतात Wink

भारतीय गोलंदाजी ने सामना जिंकला किंवा चुरशीचा केला असं घडलं तर गोलंदाजीला श्रेय देता येईल >> १९९९ च्या World Cup मधले England, pakistan विरुद्धचे सामने, 1987 चा Australia Cup चा सामना हि प्रातिनिधिक उदाहरणे होतील. अपवादच म्हणायला हवेत.

भारतीयांसाठी क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ आहे असे म्हणावे लागेल >> हे जर तू नाकारत असशील तर तू वेगळ्याच दुनियेमधे राहतोस असे मी म्हणेन. फे.फे. चे २००३ च्या World Cup मधल्या बॉलिंग बद्दल जे म्हणणे आहे "बॅटींग ने सामने जिंकून दिले होते" ते बर्‍यापैकी बरोबर observation आहे. एक नेदरलॆंड विरुद्द चा सामना वगळता बाका मुष्किल परिस्थिती नव्हती. साउथ आफ्रिकेमधे general defend करायला जेव्हढे रन्स हवेत तेव्हढे होतेच. त्यावर चांगली बॉलिंग हा नक्कीच कळस झाला होता असे समजू. Australia विरुद्ध पहिला सामना आठव म्हणजे हा पॉईट क्लियर होईल.

कमाल आहे, एकीकडे आपण म्हणायचे जोपर्यंत परदेशात गोलंदाज विकेट काढत नाहीत तोपर्यंत आपण जिंकू शकत नाहीत आणि त्यांनी ते केल्यावरही फलंदाजांनीच धावा जमवल्या म्हणत श्रेय द्यायचे हे चुकीचे आहे.

आता वरच्या लिस्टमध्ये ईंग्लंडविरुद्ध ईंडियाच्या २५० धावा पुरेश्या वाटल्या कारण ईंग्लंडला १६८ ला गोलंदाजांनी गुंडाळले. न्यूझीलंडला तर पहिल्या बॅटींगला १४६ ला सर्वबाद केले अन फलंदाजांचे काम सोपे केले. दोन्ही वेगळ्या केसेस आणि दोन्हीमध्ये त्यांचे श्रेय नाकारले तर खरेच अन्याय आहे हा.

गंमत बघा, सचिन आपल्याला जिंकवून देत नाही या आरोपावर मात्र आपण सचिन ओपनिंगला येतो तर त्याने केलेले शतक हे जिंकवण्यासाठीच असते असा युक्तीवाद करत त्याची पाठराखण करतो.

आकडे वगैरे सगळे बाजूला ठेवले तरी जमल्यास तेव्हाची कॉमेंटरी वगैरे ऐका, भारतीय गोलंदाजांना सिरीअसली घेतले जाऊ लागली होते त्या विश्वचषकात..

तुला मूळात मुद्दाच कळत नाहिये. गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल कौतुक नाही असे कोणी म्हटलेले नाहि पण तुझा गोलंदाजांनी हे सामने जिंकून दिले हा जो सूर आहे तो चूक आहे. हे फे.फे. चे विधान परत एकदा शांतपणे वाच "२००३ च्या विष्वचषकाच्या वेळी भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली असली तरी गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकले असं नाही म्हणता येत." आफ्रिकेत २५० हा winning score होता तेंव्हा हे जर तू गूगल केलेस तर लगेच लक्षात येईल.

आफ्रिकेत त्या विश्वचषकात आपण पाकिस्तानला २७०-२७२ चेस केले होते, तर अंतिम सामन्यात आपली ३५० ची तिरडी बांधली गेली होती.
त्यामुळे आफ्रिकेत अमुक तमुक विनिंग स्कोर असतो या विधानाला अर्थ नाही..

अरे हो, आणि तो आफ्रिका - ऑस्ट्रेलिया ४३४ चा विक्रमी सामनाही आफ्रिकेच्याच भूमीवरचा ना..
परवाच डिविलिअर्सनेही ४९ चेंडूत १४९ मारायचा भीष्म पराक्रम आफ्रिकेतच केला ना..

खरय बाबा तुझे, आफ्रिकेमधल्या प्रत्येक सामन्यामधे ४०० च्या खाली रन्स निघतच नाहित. अपवाद वगैरे गोष्ट जगात नसतातच.

http://en.wikipedia.org/wiki/2003_Cricket_World_Cup इथले स्कोर्स घे, त्यातले non test playing बाजूला ठेव, नि आफ्रिके मधल्या मॅचेस चा average score काय येतो ते बघ.

एवरेजचा प्रश्न नाही, तीच मॅच नेमकी एवरेज स्कोअरने का मोजायची हा प्रश्न आहे.

आपण ईंग्लडला १६८, न्यूझीलंडला १४६, आण श्रीलंकेला १०९ मध्ये गुंडाळले हे देखील कधी पहिली बॅटींग तर कधी दुसरी असे असताना तेही दुर्लक्षले जातेय. हे कुठल्या एवरेजमध्ये येते.

४३४ च्या स्कोअरला अपवाद म्हणताना तेव्हाच पाकिस्तानचे २७२ आपण चेस केलेच ना.
२५० हा काही असा स्कोअर नाहीये की त्याच्या दबावाखाली गोलंदाजांचे काम इतके सोपे होईल की आपण ईंग्लंडला १६८ ला गुंडाळू.

किंबहुना हे सारे उलटेही बोलता येईल, गोलंदाजांनी फलंदाजांचे काम सोपे केले.
फरक इतकाच की आपल्याला आपल्या सो कॉलड महान फलंदाजांच्या दृष्टीकोनातूनच विचार करायची सवय झालीय.

२५० हा काही असा स्कोअर नाहीये की त्याच्या दबावाखाली गोलंदाजांचे काम इतके सोपे होईल की आपण ईंग्लंडला १६८ ला गुंडाळू. >> बंधू त्यासाठीच "आफ्रिकेत २५० हा winning score होता तेंव्हा हे जर तू गूगल केलेस तर लगेच लक्षात येईल" हे लिहिले होते. टेस्ट प्लेयिंग देशांचा त्या World Cup मधे साउथ अफ्रिकेमधे झालेल्या सामन्यांचा average 230 येतो. "आपण ईंग्लडला १६८, न्यूझीलंडला १४६, आण श्रीलंकेला १०९ मध्ये गुंडाळले हे देखील कधी पहिली बॅटींग तर कधी दुसरी असे असताना तेही दुर्लक्षले जातेय. हे कुठल्या एवरेजमध्ये येते." ह्याची दुसरी बाजू बघ कि पहिल्या नि तिसर्‍यामधे बॅट्समन नी आधीच अर्ध्याहून अधिक काम केलेले होते. न्यूझीलंड चा सामना हा एकमेव सामना जो गोलदांजीच्या जोरावर खिशात घातला. ह्या उलट, पाकिस्तान नि अंतिम सामन्यामधे गोलंदाजांना at par score ठेवता आला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या पहिल्या सामन्यामधे १२५ का १२८ ला defend करता आले नव्हते. परत एकदा 'गोलंदाजांची कामगिरि सुमार होती किंवा वाखाणनीय नव्हती हा मुद्दा नाहीये तर "२००३ च्या विष्वचषकाच्या वेळी भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली असली तरी गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकले असं नाही म्हणता येत." ' हा नि एव्हढाच मुद्दा आहे.

तुला गोलंदाजीच्या जोरावर भारताने जिंकलेली tournament हवी असेल तर १९८५ चा बेन्सन अँड हेजेस बघ. तिथे गोलंदाजांनी सामने सेट केले नि फलंदाजांनी ते खिशात घातले होते.

माझ्या मते भारताच्या सगळ्या विजयांचे श्रेय हे क्षेत्ररक्षकांना, यष्टीरक्षकांना, पीच बनवणार्‍यांना व मायबोलीवरून खेळाडूंना उपदेश करणार्‍यांनाच द्यायला पाहिजे.
Proud

बंधू त्यासाठीच "आफ्रिकेत २५० हा winning score होता तेंव्हा हे जर तू गूगल केलेस तर लगेच लक्षात येईल" हे लिहिले होते.

>>> बंधू आवडले असामी. Happy एकदम गावाला पोचलो मी. Wink

आफ्रिकेत २५० हा winning score होता तेंव्हा हे जर तू गूगल केलेस तर लगेच लक्षात येईल
>>>>
आफ्रिकेत असे सरसकट कसे म्हणता येऊ शकते?
प्रत्येक खेळपट्टी वेगळी असताना
आणि म्हणून मी ४३४ चा विश्वविक्रमी सामन्याचे आणि परवाच्या डिविलिअर्सच्या धुमाकुळचे उदाहरण दिले. तर त्याला अपवाद घोषित करण्यात आले, ते अपवाद नसून बॅटींग पीच होता. जर एवढा सपक बॅटींग पिच आफ्रिकेत असू शकतो तर २५० वाला नसू शकतो का? त्याच मालिकेत इतर २५०+ स्कोअर नव्हते का? अंतिम सामन्यात प्रेशर गेममध्ये ३५० नव्हते का?

आता इथे अस म्हणायचे आहे का की २०० धावा होतील अश्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करत २५० मारले?

जेव्हा तुमचे बॉलर फॉर्मला असतात तेव्हा कोणताही स्कोअर बोर्डवर चांगलाच वाटतो, अन्यथ तिथे ३०० देखील पुरले नसते, जे आपल्या फलंदाजांनी समोरच्या गोलंदाजांना मारले असते ते समोरच्या फलंदाजांनीही मारले असतेच.

ऋन्मेऽऽष, मला कल्पना नाही की २००३ चा वर्ल्डकप तुम्ही प्रत्यक्ष पाहीला होतात की नाही (हे ऊपहासात्मक विधान नाहीये, खरच म्हणतोय), पण तुमची आकडेवारी बरोबर आहे. हे देखील सत्य आहे, की कुंबळे, श्रीनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली भारताची गोलंदाजी खूप प्रभावी होती. माझा मुद्दा मी कदाचित स्पष्ट नाही करू शकलो.

ईंग्लंड विरुद्ध नेहराचा स्पेल भन्नाट होता. त्या ऊंचीला तो परत कधीच नाही पोहोचू शकला. न्युझीलंड विरुद्ध चा सामना जर आठवत असेल, तर बॉलिंग कंडिशन्स खूप चांगल्या होत्या आणी शेन बाँड ने आपल्या सुरुवातीच्या ३ विकेट्स फार स्वस्तात काढल्या होत्या. त्याच स्पेल मधे त्याच्या बॉलिंग वर जर द्रविड चा कॅच सुटला आणी तो त्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. बाँड अचानकपणे त्याची भेदकता हरवून बसला आणी द्रविड ने कैफ ला बरोबर घेऊन तो सामना जिंकून दिला. पाकिस्तान विरुद्ध सचिन-कैफ, आणी नंतर द्रविड-युवराज ह्यांनी ती मॅच जिंकवली. ष्रीलंकेच्या मॅच च्या वेळी सेहवाग आणी सचिन ने त्या सामन्याचा मोमेंटम भारताच्या बाजूला फिरवला होता आणी गोलंदाजांनी त्यांना चांगली साथ देत, तो परत लंकेच्या बाजूने झुकू दिला नाही. त्या स्पर्धेत श्रीलंकेचे टॉप ऑर्डर बॅट्स्मेन (जयसुर्या) फॉर्म मधे नसणं हे सुद्धा त्यांना नडलं होतं.

आकडेवारी पेक्षा प्रत्येक मॅचमधे घडणार्या गोष्टी, impact players हे वेगळे असू शकतात. उदा. ढाक्यामधे पाकिस्तान विरुद्ध जिंकलेल्या सामन्यात गांगुली आणी रॉबिनसिंग ची भागीदारी आणी कानिटकरचा शेवटचा चौकार जितका महत्वाचा आहे, तितकाच सचिन ने सुरुवातीला चढवलेला हल्ला (२५-२६ चेंडूत ४५ धावा बहूदा) महत्वाचा आहे. किंवा कधी कधी एका बाजूने एखाद्या गोलंदाजानं टाकलेल्या दबावामुळे दुसर्या बाजूच्या गोलंदाजाला बळी मिळता॑त (उदा. अ‍ॅलन डोनाल्ड - शॉन पोलॉक, कुंबळे - हरभजन, स्टेन-फिलँडर), पण आकडेवारी ते तितकसं स्पष्ट करत नाही.

असामी, तुम्ही माझा मुद्दा माझ्यापेक्षाही अधिक चांगला मांडला आहे.

शिरीष कणेकरांनी फटकेबाजीत सांगितलेली एक महत्वाची गोष्टं -

फिगर्स आर लाईक बिकिनी बेदींग कॉस्ट्युम्स! व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टींग, व्हॉट दे कन्सील इज मोअर व्हायटल!

९९.९९ ही सरासरी कोणत्याही फूटपट्टीने मोजली तरी श्रेष्ठच ठरते जेव्हा ती ५२ टेस्टमध्ये आणि ८० इनिंग्जमध्ये असते. उद्या २ टेस्टमध्ये २०० काढून नंतर काही कारणाने त्याची निवडच झाली नाही (भारतात अशक्यं नाही!) तर १०० चं अ‍ॅव्हरेज म्हणून लगेच तो ब्रॅडमनपेक्षा ग्रेट होत नसतो.

आफ्रिकेत असे सरसकट कसे म्हणता येऊ शकते?
प्रत्येक खेळपट्टी वेगळी असताना
आणि म्हणून मी ४३४ चा विश्वविक्रमी सामन्याचे आणि परवाच्या डिविलिअर्सच्या धुमाकुळचे उदाहरण दिले. तर त्याला अपवाद घोषित करण्यात आले, ते अपवाद नसून बॅटींग पीच होता. जर एवढा सपक बॅटींग पिच आफ्रिकेत असू शकतो तर २५० वाला नसू शकतो का? त्याच मालिकेत इतर २५०+ स्कोअर नव्हते का? अंतिम सामन्यात प्रेशर गेममध्ये ३५० नव्हते का?
>> तुला माहित नाही हे उघड आहे पण अंतिम सामना जिथे ३५०+ स्कोर झाला तो New Wanderers Stadium, Johannesburg इथे झाला. आफ्रिकेमधले दोन्ही ४००+ स्कोर्स इथेच आले आहेत. तिथल्या दोन पिच मधील एक बॅटींगला अतिशय धार्जिणे धरतात. ह्याच स्टेडियमवर २००३ च्या World Cup मधे झालेला तो एकमेव सामना होता. असेच Centurion बद्दल आहे जिथे एका बाजूच्या पिचवर जिथे ODI खेळवल्या जातात तिथे अधिक स्कोर होतो. (आपला पाकिस्तान विरुद्धचा सामना इथे झाला होता). World Cup बाजूला ठेवून जनरल ODI matches मधला आफ्रिकेमधला average score बघण्यासाठी हे वापर (१२ तल्या चार मधे ५ पेक्षा अधिक RPO आहे. ह्यावरून आफ्रिकेमधला average ODI score 250 का हे लक्षात येईल असे धरतो.)
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;host=3;...

आता मूळ विधानाकडे वळतो
'गोलंदाजांची कामगिरि सुमार होती किंवा वाखाणनीय नव्हती हा मुद्दा नाहीये तर "२००३ च्या विष्वचषकाच्या वेळी भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली असली तरी गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकले असं नाही म्हणता येत."

११ सामन्यांमधे ७ वेळा आपली पहिली बॅटींग होती. ४ वेळा दुसरी. Common sense प्रमाणे आधी बॅटींग करणार्‍या संघानी जर चांगल्या धावा केल्या तर त्यांच्या बॉलिंग ला त्या defend करायला मदत होते. पुरेशा धावा नाही केल्या तर बॉलिंग ला सामना जिंकून देण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. बॅटींग करणार्‍यांनी गोलंदाजांना सामना सेट करून दिला असे ह्याला मी म्हणतोय. म्हणून भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली हे फे.फे. चे विधान मला पटते. (अर्थात ह्यात प्रत्येक सामना फलंदाजांनीच जिंकून दिला नि गोलंदाजांनी एकही सामना जिंकून दिला नाही अशी तर्कटे माझ्या विधानात नाहि आहेत) .

ऋन्मेऽऽष, मला कल्पना नाही की २००३ चा वर्ल्डकप तुम्ही प्रत्यक्ष पाहीला होतात की नाही (हे ऊपहासात्मक विधान नाहीये, खरच म्हणतोय),
>>>>>>
हो पाहिला होताच, किंबहुना तोच माझा पहिला वर्ल्डकप म्हणू शकता. तसेच तेव्हा मित्रांमध्ये चाललेली चर्चा आठवतेय म्हणूनच ठामपणे बोलू शकतो तेव्हा आपली गोलंदाजी फॉर्मला होती आणि फलंदाजीबाबतही सचिन खेळला तरच त्याच्या आजूबाजुने सारे खेळतील अन्यथा कोसळतील अशीही परिस्थिती होती कारण इतरांच्या फॉर्ममध्ये कन्सिस्टन्सी नव्हती आणि सचिन भन्नाटच फॉर्मात होता. आकडेवारी म्हणाल तर ती इथे मांडण्यापुरतेच आणलीय, आणि ती शोधायलाही गेलो कारण ते तसे झालेय हे आठवणीत पक्के होते.

असामी एका सामन्यात आपण २९३ मारले आणि श्रीलंकेला १०९ ला गुंडाळले तर त्या खेळपट्टीच्या एवरेज स्कोअरबद्दल काय बोलाल?

असामी एका सामन्यात आपण २९३ मारले आणि श्रीलंकेला १०९ ला गुंडाळले तर त्या खेळपट्टीच्या एवरेज स्कोअरबद्दल काय बोलाल? >> बाबारे एव्हढेच बोलेन, sample size ह्या शब्दावर थोडा अभ्यास कर.

अभ्यास करून इथे बोलायचे म्हणजे मला आता इथे कधी लिहायलाच नको!
तेंव्हा निदान मी लिहीले तरी अ‍ॅडमिन ना सांगून मला मायबोलीवरून हा़अलून देऊ नका ही विनंति.
धन्यवाद.

अरे देवा अभ्यासाला घाबरून पळून तर इथे माबोवर येतो, आणि इथेही अभ्यास ..
जगात इतक्या गोष्टी आहेत की त्यातल्या एक टक्का अभ्यासायचे म्हटले तरी शंभर जन्म पुरणार नाही आणि त्यातही प्रत्येक जन्माची सुरुवात पुन्हा ज्युनिअर केजीपासून करायची असते. Wink

असो,
sample size या शब्दाचा भावार्थ मतितार्थ लक्षात घेता एक आकडी उदाहरण टाकतो.

समजा एका मैदानावर वा एका देशात वा एका मालिकेत,
१० डावात खालीलप्रमाणे स्कोअर आले.

265 125 236 147 133 201 292 268 222 149
Average - 204 धावा

तर आता इथे २१५-२२० हि धावसंख्या विनिंग स्कोअर समजायची का?

sample size या शब्दाचा भावार्थ मतितार्थ लक्षात घेता एक आकडी उदाहरण टाकतो. >> कदाचित असा विचार करून्बघ, २००३ चा वर्ल्ड कप भारतात झाला असे धर नि २५० धावा पहिल्या संघाने काढल्या नंतर त्या तिथे डीफेंड करणे नि हेच आफ्रिकेमधे करणे ह्यात काय जात प्रोबेबल आहे हे तूच ठरव.

परत एकदा (हे परत परत लिहितोय कारण तू अजूनह मूळ मुद्द्याला बगल देऊन एका सामन्यामधल्या २५० वरच अडकला आहेस)
'गोलंदाजांची कामगिरि सुमार होती किंवा वाखाणनीय नव्हती हा मुद्दा नाहीये तर "२००३ च्या विष्वचषकाच्या वेळी भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली असली तरी गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकले असं नाही म्हणता येत."

नि हे त्याचे स्पष्टीकरण
११ सामन्यांमधे ७ वेळा आपली पहिली बॅटींग होती. ४ वेळा दुसरी. Common sense प्रमाणे आधी बॅटींग करणार्‍या संघानी जर चांगल्या धावा केल्या तर त्यांच्या बॉलिंग ला त्या defend करायला मदत होते. पुरेशा धावा नाही केल्या तर बॉलिंग ला सामना जिंकून देण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. बॅटींग करणार्‍यांनी गोलंदाजांना सामना सेट करून दिला असे ह्याला मी म्हणतोय. म्हणून भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली हे फे.फे. चे विधान मला पटते. (अर्थात ह्यात प्रत्येक सामना फलंदाजांनीच जिंकून दिला नि गोलंदाजांनी एकही सामना जिंकून दिला नाही अशी तर्कटे माझ्या विधानात नाहि आहेत) .

पण हे सगळे कशाला करायचे? प्रत्येक सामना हा पूर्णपणे वेगळा असतो.
तसे पुष्कळदा चांगले फलंदाज शून्यात जातात नि त्याच डावात फलंदाजीसाठी प्रसिद्ध नसलेले गोलंदाजसुद्धा भरपूर धावा काढून जातात.

पण नेहेमी असे होइलच असे नाही.

आता सध्या ऑस्ट्रेलियातील बीसीसीआय नि ऑस्ट्रेलिया चा पराक्रम पहाता ऑस्ट्रेलिया बीसीसीआय हा सामना खेळायची गरजच नाही. खरे तर इंग्लंडने ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बीसीसीआय ला हरवले त्यावरून आता बीसीसीआय नि इंग्लंड चा सामना तरी कशाला?

पण आपण तेव्हढ्याच उत्साहाने नि आशेने सगळे सामने बघतोच ना?

Common sense प्रमाणे आधी बॅटींग करणार्‍या संघानी जर चांगल्या धावा केल्या तर त्यांच्या बॉलिंग ला त्या defend करायला मदत होते. पुरेशा धावा नाही केल्या तर बॉलिंग ला सामना जिंकून देण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. बॅटींग करणार्‍यांनी गोलंदाजांना सामना सेट करून दिला असे ह्याला मी म्हणतोय.
>>>>>>>>>>>

अहो पण एण्ड ऑफ द डे त्या केलेल्या २५० धावा हा चांगला स्कोअर आहे या गृहितकावरच फलंदाजांनी सामना सेट करून दिला हे विधान आले आहे ना. जर ते गृहितकच खोडले तर विधान वेगळे खोडायची गरज नाही. आणि मी तेच करतोय. पण मी पुर्णता खोडत नाहीये तर त्यावर शंका उपस्थित करतोय. असे एवरेज काढून २५० चांगला स्कोअर आहे असे डिक्लेअर नाही करू शकत, त्यासाठी त्या पर्टीक्युलर सामन्यातील परिस्थितीच बघावी लागणार.

(इथे फक्त सोयीचे जावे म्हणून २५० चे उदाहरण घेतोय, त्याच आकड्यावर वा सामन्यावर अडकलो नाही, हाच फंडा सर्व सामन्यांना लागू)

गंमत बघा,. नेदरलॅंड सारख्या दुर्बळ संघाविरुद्ध या फलंदाजांना फक्त २०४ धावा मारता आल्या. आता यालाही सामना सेट करून दिला म्हणता येईल का?

म्हणून भारताची गोलंदाजी, फलंदाजी ला पूरक झाली हे फे.फे. चे विधान मला पटते.
>>>>>>>>>>>>

याच विधानावर तर आक्षेप आहे,
फलंदाजी हि गोलंदाजीला पूरक झाली असे विधान का नाही मग..
कारण आपल्याला फलंदाजाच्या द्रुष्टीकोनातूनच मॅच बघायची सवय झालीय..

Pages