क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यूझीलंड त्यांच्या गेल्या वर्षातल्या आणि वर्ल्डकपमधल्या परफॉर्मन्समुळे एकदम भारी वाटत होते. आता परत मूळपदावर जायला लागलेत की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. अ‍ॅग्रेसिव्हनेस असला तरी ते अजून की मोमेंट्स सिझ करू शकलेले नाहीत फार.

कोहली च्या कॅप्टन्सी मधला आक्रमक पणा चांगला आहे. पण त्याचं नोहिट शर्मा ओव्हर पुजारा हे प्रेमप्रकरण (शर्मा?) काही फारसं झेपत नाहीये. ५ गोलंदाज थिअरी ठीक आहे, पण तसे गोलंदाज हवे. ५ मिडिऑकर बॉलर्स ही मोठी लायेबिलिटी वाटते. बघू काय होतं ते.

पण त्याचं नोहिट शर्मा ओव्हर पुजारा हे प्रेमप्रकरण (शर्मा?) काही फारसं झेपत नाहीये > +१. शर्मामधे स्पेशल टॅलेंट आहे म्हणून तो नं. ३ वर फिट आहे. तो खेळला तर initiative खेचून घेईल हे सगळे मान्य असले तरी त्याच्याकडे नं ३ वर खेळण्याचे तंत्र आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही होकारार्थी देता येत नाहिये. पुजाराचे ग्रह खराब आहेत, दुसरे काय.

पुजाराचा भारतीय उपखंडाबाहेरचा रेकॉर्ड काय आहे असावा.. कधी बाहेर फारसा खेळल्याचे आठवत तरी नाहीये.. लोक उगाच द्रविडची रिप्लेसमेंट भेटला म्हणून आरडाओरडा करत होते..

माझे दोन पैसे -

वन डाऊनला रोहीत ऐवजी कोहलीनेच यावं. रहाणे ४ आणि मग रोहीत ५ व्या नंबरवर.
५ बॉलर्स घेऊन खेळणार असला तर विकेटकीपर हा बर्‍यापैकी बॅट्समन हवा जो दुर्दैवाने सहा नाहीये. त्याच्या ऐवजी पार्थिव पटेल / दिनेश कार्तिक योग्य ठरले असते.

इथे इंग्लंडात अ‍ॅशेसचा फीव्हर जोरात आहे. ट्रेंट ब्रिजच्या टेस्टची शनिवारची तिकीटं काढली आहेत. होप इट्स नॉट अ थ्री डे अफेअर अगेन.

बहुतेक ५ गोलंदाज खेळवणे म्हणजे आक्रमकता दाखवणे या विचारात गुरफटलेत..
कधी ऑस्ट्रेलिया नाही खेळली ५ फलंदाजासह ..

पण एका अर्थी परदेशात वेगवान खेळपट्ट्यांवर तसेही आताचे फलंदाज गंडतातच, तर शेपटावर वळवळायचा भरवसा टाकत ५ गोलंदाज, .. ३ वेगवान आणि २ फिरकी घेऊन जुगार खेळायला हरकत नाही..

भारतीय उपखंडात मात्र २ वेगवान आणि २ फिरकी पुरेसे ठरावे ..

पुजाराचा भारतीय उपखंडाबाहेरचा रेकॉर्ड काय आहे असावा.. कधी बाहेर फारसा खेळल्याचे आठवत तरी नाहीये.. >> साऊथ आफ्रिका नि न्युझिलंड मधे चांगला खेळला होता. इंग्लंडमधे नि डाऊन अंडर अर्धवट सिरीज खेळलाय नि तिथे फ्लॉप गेलाय. पण त्यानंतर त्याने काऊंटी क्रिकेट्मधे जाऊन चांगला खेळ केलाय.

५ बॉलर्स घेऊन खेळणार असला तर विकेटकीपर हा बर्‍यापैकी बॅट्समन हवा जो दुर्दैवाने सहा नाहीये. > कोहली चे म्हणणे अश्विन, भज्जी नि भुवी ह्यांनी पण जबाबदारी घ्यावी. लंके विरुद्ध चालूनही जाईल हा डावपेच.

आत्ता पावसाळ्यात श्रीलंकेत जाऊन खेळणे हा बावळटपणा आहे.. एक तरी मॅच पूर्ण झाली तरी खूप होईल.. साधारण आपल्याकडे पडतो तसाच पाऊस तिकडे पण पडतो..

सध्याची श्रीलंकेची फलंदाजी बघता ५ गोलंदाज खरच पाहिजेत का हे पहिल्यांदा विचारात घेतले पाहिजे.. कसोटी बॅटींग मध्ये ते संगकारा, जयवर्धने आणि तिलकरत्ने निवृत्त झाल्यामुळे चाचपडतच आहेत..

ट्रेंट ब्रिजच्या टेस्टची शनिवारची तिकीटं काढली आहेत. होप इट्स नॉट अ थ्री डे अफेअर अगेन.
>>>>
सोबत पिक्चरची तिकीटेही काढून ठेवा .. ऑस्ट्रेलियाचे पहिल्या तासातच हम सात साथ है

जबरी झालेली दिसते.

बाय द वे, दुसरी बातमी. वासिम अक्रम वर गोळी झाडली. ओके आहे असे दिसते. 'रोड रेज' म्हणे. पाक मधे अक्रम ला असे काही होईल असे वाटले नव्हते. पब्लिक चा त्याच्यावर राग आहे की काय सारखा भारतात असतो, भारतीय खेळाडूंची तारीफ करतो म्हणून.
http://www.espncricinfo.com/pakistan/content/story/906539.html

पब्लिक चा त्याच्यावर राग आहे की काय सारखा भारतात असतो, भारतीय खेळाडूंची तारीफ करतो म्हणून.
>>>>>>
शक्यय, मला तर हा प्रश्न नेहमी पडतो, तो ईंडियन क्रिकेटला एवढे फेव्हर करून तिथे सेफ राहतो कसा..
तसे खरेच असेल तर त्याने सरळ भारतात सेटल व्हावे, इथे त्याचे स्वागतच आहे

५५५

Broadly speaking Aussies were reduced to Ashes. >>> Happy

Butcher cuts Australia to size - मार्क बुचर ने एकदा दीडशे मारले होते तेव्हा आली होती ही कॉमेण्ट Happy

Voges चा घेतलेला कॅच कहर होता. सगळ्या विकेट्स स्लिप / विकेटकीपर मधे गेल्या. क्लार्क ने मारलेला शॉट हा आत्महत्येचा अजून एक मार्ग म्हणून नॉमिनेट करता येईल.

प्रॅक्टीस मॅच मधे रहाणे ची सेंच्युरी. नविन भिंत (क्र. ३ चा बॅट्स्मन, आळशी-शिरोमणी, उद्धटकुमार, नोहिट शर्मा) ७ रन्स वर कोसळली. पुजारा ४०+.

फा अशा quotes चा बाफ पाहिजे रे एक.

सचिन ने पहिल्यांदा NZ मधे open केले तेंव्हा सत्तरेक मारलेले धूमधडाक्यामधे तेंव्हा आऊट झाला त्यावर लार्सन म्हणालेला 'highlights over'.

Voges चा घेतलेला कॅच कहर होता. >> हो परत तो पाठीमागे उडी मारत घेतलेला. आज सहज उठल्यावर live match टाकली तर पैसा वसूल झाला.

विजय का खेळला नाही प्रॅक्टिस मॅच मधे ? injured वगैरे आहे का ?

"विजय का खेळला नाही प्रॅक्टिस मॅच मधे ? injured वगैरे आहे का ?" - हो.

मला २००३ च्या वर्ल्ड कप च्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सचिन मॅन ऑफ द मॅच घ्यायला आल्यावर रॉबिन जॅकमन चं 'थँक यू सचिन' आवडलं होतं. एकदम appropriate बसलं होतं.

हो असाम्या. काढतो.

रॉबिन जॅकमन चं 'थँक यू सचिन' आवडलं होतं. एकदम appropriate बसलं होतं. >>> हो आठवते ते. त्याचा तो कॅच अब्दुल रझाक ने त्याच गेम मधे सोडला होता, तेव्हा रॉबिन जॅकमनच बहुधा ओरडला होता - "ohhh, how Pakistan will live to rue this moment..."

भारत श्रीलंका सराव सामन्यात.. आज श्रीलंकेची टीम अगदीच ऑस्ट्रेलिया सारखी खेळली.. त्यांची १०० पेक्षा जास्त रन्स झाले हेच काय ते नशीब.. आणि चांगली संधी मिळूनही परत एकदा... कोहली आणि रोहित कमीत कमी धावा करुन बाद झालेले आहेत..

I love NoHit Sharma, since he proves me right time and again! Occasionally, he has done otherwise, but then 'to err is a human'.

श्रीलंका १८३ मधे ऑल आऊट.

नोहिट वर मी लावलेले सगळे पैसे वसूल. पुजारा वगळून नोहिट हे गणितच उमगत नाही.

साहा ने सोडलेला कॅच पाहून, तो दुसर्या कुठल्या टीम चा विकेटकीपर असता तर मी खदाखदा हसलो असतो. ह्यापेक्षा वाईट ड्रॉप फक्त दीप दासगुप्ता नावाच्या गोलकीपर ला जमला असता.

अश्विन मस्त. हरभजन हा श्रीलंकेतला प्रुव्हन फेल्युअर आहे. अ‍ॅरोन त्या मालामाल मधल्या नसिरुद्दीन शहा पैसे उधळायला कढतो, तसे रन्स उधळतो.

रोहीत बहुधा धोनी विरुद्ध कोहली युद्धात कोहलीच्या गटात असावा जे तो अचानक मंडळाचा लाडका झाला आहे.
वनडे मधील तो एक उत्तम फलंदाज किंबहुना मॅचविनर असला तरी कसोटीतला चांगला पर्याय वाटत नाही.

आश्विनची गोलंदाजी कोहलीच्या कप्तानीत आणखी आक्रमक होईल असे वाटते.

अ‍ॅरोन त्या मालामाल मधल्या नसिरुद्दीन शहा पैसे उधळायला कढतो, तसे रन्स उधळतो. >> अ‍ॅरोन कडे पेस वगळता अजिबात कंट्रोल नाही. टेस्ट्मधे सुद्धा ५ च्या वर average असतो.

पुजारा वगळून नोहिट >> एकंदर कोहली नि शास्त्रीच्या मुलाखतींमधून 'पुजारा strike rotate न करता बरेच dot balls घेतो हे कारण त्याच्या विरुद्ध जाते' ह्याउलट 'रोहित जेंव्हा in असेल तेंव्हा काय करू शकतो ह्याची चुणूक त्याने ODI मधे दाखवली आहे त्यामूळे तो game changer आहे' हे त्याच्या बाजूने जाते. एकंदर aggressive approach ला पूरक म्हणून रोहित आत असे मला वाटतेय. हे सगळे वरवर ठीक असले तरी हे टेस्ट क्रिकेट आहे नि इथे dot balls हे पातक नाही हे कमीत कमी शास्त्रीला तरी आठवायला हवे होते. स्वतःचे खेळण्याचे दिवस आठवले असते तरी पुजारा का उपयोगी आहे हे आठवले असते.

असामी, खरं आहे. शास्त्री ने संथ फलंदाजी बद्दल नकारात्मक बोलणं म्हणजे भारत भुषण ने एखाद्या प्रदीप कुमार च्या चेहेर्यावरच्या भावांच्या अभावाविषयी बोलण्यासारखं आहे,

रोहित वन-डे मधे जे करू शकतो, ते टेस्ट मधे करण्याचं तंत्र त्याच्याकडे नाहीये. वन-डे मधे सुद्धा जेव्हा बॉल मूव्ह होतो, तेव्हा पॉईंट ते स्लिप च्या अधे-मधे कुठेतरी त्या बॉल ला पोहोचवण्याची शर्मा कुरिअर सर्व्हिस असते.

Pages