क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॉर्ड्सवरील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना रंगतदार अवस्थेत! आज अखेरच्या दिवशी न्यूझीलंडास जिंकावयास ५० षटकांत २७० धावा हव्या आहेत. मात्र त्यांचे ५ गडी ६१ धावांतच तंबूत परतलेत. कोरे अँडरसनने धावा चोपायला सुरुवात केलीये. न्यूझीलंड आव्हान स्वीकारणार का?

http://www.espncricinfo.com/england-v-new-zealand-2015/engine/match/7439...

-गा.पै.

इंग्लंडास विजयास एकोणीस षटकांत तीन बळी हवे आहेत. तेव्हढ्या संधीत न्यूझीलंडास एकशे अठ्ठेचाळीस धावा जमवता येणार नाहीयेत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सामना अनिर्णीत ठेवण्याकडे चालले आहेत.

-गा.पै.

जिंकले एकदाचे इंग्लंड! छाप पडणारा विजय एकंदरीत (ओव्हरऑल इम्प्रेसिव्ह विन). एकशे चौतीस धावांची पिछाडी भरून काढत एकशे चोवीस धावांनी विजय.

-गा.पै.

इंग्लंड न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर! शेवटची जोडी खेळते आहे. पाचवा दिवस आहे आणि जिंकायला २१ षटकांत २०१ धावा हव्या आहेत.

तरी इंग्लंडने ५ बाद १०२ वरून ९ बाद २५० ची मजल मारली बुवा!

-गा.पै.

जिंकले एकदाचे न्यूझीलंड. शेवटी १८ षटके उरली होती. इंग्लंडच्या फलंदाजांनी जरा बारा खेळ केला असता तर सामना अनिर्णीत राखता आला असता. असो. कालची दोन सत्रे पावसाने धुवून नेली तरी सामना निकाली झाला. त्याबद्दल न्यूझीलंडचं विशेष अभिनंदन.

-गा.पै.

न्यूझीलंड मस्त खेळलो दोन्ही मॅचेस मधे.. पहिल्या मॅच मध्ये जरा नीट खेळले असते तर ती पण जिंकू शकले असते..

दुसर्‍या मॅच मध्ये तर सेकंड इनिंग्स तुफान खेळले.. मॅकलम ऐन वेळेस योग्य खेळला.. वॉल्टींग हा फाईंड आहे ह्या सिरीज मधला...

एक महत्त्वाची सिरीज आज पासून सुरु झाली आहे.. आयसीसी इंटरकाँटीनेन्टल सिरीज.. टेस्ट सिरीज आहे.. तीन वर्ष चालणार्‍या ह्या सिरीज मध्ये आयर्लंड, स्कॉटलंड, युएई, अफगाणिस्तान, नेदरलंड्स, पापुआ न्यू गिनी, नामिबिया आणि हाँगकाँग ह्या देशांमधली टेस्ट मॅच सिरिज आहे.. ह्यातील विजेता संघ ११ वा कसोटी खेळणारा संघ होऊ शकतो.. जर त्या टीमनी सगळ्यात शेवटी असणार्‍या टीमच्या विरुद्ध होणारी टेस्ट सिरिज जिंकली तर..

आपले सामने लवकर सुरू करा रे .. बांग्लादेश तर बांग्लादेश.. बोअर झालेय.. पहिलाच सामना आपण हरलेलो बघायला आवडेल् . जेणेकरून उर्वरीत मालिकेत रंगत भरेल..

स्टीव्ह आणि मार्क - वॉ (जुळे) बंधू ५० वर्षांचे झाले! दोघांनाही शुभेच्छा. इतरांविरूद्ध खेळताना पाहताना क्रिकेटचा प्रचंड आनंद व आपल्याविरूद्ध अनेकदा डोक्याला ताप दिलेला आहे दोघांनी. पण दोघेही ग्रेट. रिस्पेक्ट!

हिम्सकूल,

वॉटलिंग हा या सिरीजचा फाईंड नाही. आधीही तो अनेकदा मोक्याच्या वेळेस अप्रतिम खेळून गेलेला आहे. इनफॅक्ट टेस्टमध्ये ६ व्या विकेटसाठीच्या दोन सर्वोत्तम भागिदार्‍या वॉटलिंगच्या नावावर आहेत. २०१३ मध्ये भारताविरुद्ध मॅक्कलमने दुसर्‍या इनिंगमध्ये ट्रीपल सेंच्युरी मारली तेव्हा त्याचा जोडीदार वॉटलिंगच होता. दोघांनी द्रविड-लक्ष्मणची आठवण यावी अशी ३००+ पार्टनरशीप केली होती. ६ व्या विकेटसाठीचा हा पार्टनरशीप रेकॉर्ड गेल्या वर्षी केन विल्यमसनच्या जोडीने वॉटलिंगनेच श्रीलंकेविरुद्ध मोडला. कालची त्याची सेंच्युरी ही त्याची ५ वी टेस्र्ट सेंच्युरी होती. मजेदार गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने वॉटलिंग, मॅक्कलम या दोघांना बॅट्समन म्हणून खेळवून ल्यूक राँचीला ३४ व्या वर्षी टेस्टपदार्पणाची संधी दिली!

बच्चे अब बच्चे नही रहे..

घेतला आडे हाथ बांग्लादेशींनी आपल्याला..

कर्णधार म्हणून पदार्पणातच मालिकाविजय आणि तोही व्हाईटवॉश नोंदवल्याबद्दल अजिंक्य रहाणेचे अभिनंदन Happy

स्वरुप, मी आहे ना. कुठल्याही प्रकारचं क्रिकेट असलं, तरी मी प्रेक्षक असतो. Happy

एका स्टेज ला वाटत होतं की टफ होईल मॅच. पण अगदीच एकतर्फी झाली.

ऐन पावसाळ्यात दाफ्रिकेचा कसोटी दौरा आयोजित केल्याबद्दल बांगलादेशी क्रिकेट संघटनेचं अभिनंदन! दोन्ही सामने मस्तपैकी धुवून निघाले. बंगाली बाबा बोलावून पाऊस थांबवायचा प्रयत्न करून बघायला काय हरकत होती?

-गा.पै.

काल झिम्बाब्वेनी न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करुन हारवले.

इतक्या शांतपणे खेळताना झिमवाल्यांना पहिल्यांदाच बघितले.. व्यवस्थित पेस केली इनिंग... कोणे एकेकाळी झिम आणि न्यूझीलंद एका पाठोपाठ होते.. पण आता न्यूझीलंड बरेच वरती गेले आहेत. त्यामुळे तर कालचा विजय झिमला नक्कीच सुखावणारा असेल.

कालपरवा मी पण हा धागा वर काढायचा विचार करत होतो..

मजेशीर रिजल्टस येताहेत..

एशेस धमाल चालू आहे.. ईंग्लंड त्यांच्या स्विंग कंडीशन्समध्ये नक्कीच सरस वाटतेय.. फलंदाजी खूप सरस नसली तरी शेपूट लांब आहे..

पण येस्स एंडरसनच्या अनुपस्थितीचा फार मोठा फरक पडू शकतो, त्याच्या स्विंगसमोर अक्षरशा गंडल्यासारखे वाटतात ऑसीज..

झिम्बाब्वे आणि एनझेडचा सामनाही रंगरदार झाला.. अश्या सामन्यात तुलनेत दुबळा संघ जिंकतो तेव्हा जास्त मजा येते.. ती आली..

बांग्ला आफ्रिका पाऊस निराश करतोय.. कारण ते सामनेही रंगतदार होण्याची आणि कसोटीमध्ये सुद्धा बांग्लादेशने आफ्रिकेला धक्का देण्याची शक्यता दिसत होती..

पाकिस्तान श्रीलंका शेवटची 20-20 मस्त झाली.. पण एकंदरीत त्यांचे सामने बघायला एवढी मजा येत नव्हती..

आपला श्रीलंका दौरा सुद्धा मला थोडा बोअरच वाटतोय.. सध्या तरी फारशी उत्सुकता जाणवत नाहीये..

आपल्या श्रीलंका दौर्‍यामध्ये कोहली कसोटी कप्तान म्हणून काय करेल ह्याची उत्सुकता आहे. पाच बॉलर्स घेऊन खेळणार म्हणतो. बांगलादेश-द. आफ्रिकेबद्दल 'मम' म्हणतो. पावसामुळे ड्रॉ झालेल्या सीरीजमुळे आफ्रिकेचे रँकिंगमध्ये पॉइंट्स गेलेत. Sad

Pages