क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झहीर चा वॉला बोल्ड करणारा यॉर्कर अजूनही आठवतो. त्याच्या injuries अजून नीट manage झाल्या असत्या तर त्याचे पूर्ण potential वापरले गेले असते.

<< अक्षर पटेल हा खरा "फिरकी" गोलंदाज नाही. त्याचे बॉल खूप वळत नाहीत.मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स.>> << मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स. >> +१. बेरकीपणा नक्की आहे. पण फिरकीचा मुख्य आधार हे धाडसी वाटले. >> केदारजी व असामीजी, पटेल हा फिरकीचा आधारस्तंभ होईल, हें माझं ठाम भाकीत नसून एक अंदाज आहे ; अर्थात सध्या त्याच्या गोलदाजीला मर्यादा आहेतच. पण त्याचा चेंडु खूप वळत नाहीं, हें कारण मात्र तितकंसं योग्य नसावं. ज्या तर्‍हेची गोलंदाजी तो करतो त्या तर्‍हेची गोलंदाजी करणारे डावरे गोलंदाज सहसा चेंडू खूप वळवणारे नसतातच; फलंदाजाचं तंत्र व कल हेरून 'लाईन, लेन्ग्थ, फ्लाईट व पेस ' यातील विविधता प्रभावीपणे वापरणं व 'आर्मर' यावरच त्यांचा भर असतो, असं मला वाटतं. त्याकरतां लागणारी हुषारी [ 'बेरकी'पणा] पटेलकडे असल्याचं जाणवलं म्हणून जरा तसं धाडसी विधान केलं, इतकंच.
आणि हो, फिरकीचा मुख्य आधार होण्यासाठी चेंडू खूप वळवता यावा लागतो ह्या संकल्पनेला अनिल कुंबळे याने केंव्हांच सुरूग लावून टाकलाय ! Wink

भाऊ, तुम्हाला बर्याच दिवसांनी ह्या धाग्यावर पाहून छान वाटलं. फिरकी काय किंवा कुठल्याही गोलंदाजाकडे भेदकता हवी. ज्याची बॉलिंग खेळताना बॅट्समन सतत सतर्क आणी दबावाखाली रहातो, तो चांगला गोलंदाज. 'अनिल कुंबळे ची बॉलिंग खेळताना, दिवसातल्या शेवटच्या बॉलला सुद्धा सतर्क रहावं लागायचं' - ईति स्टीव्ह वॉ.

<< कुठल्याही गोलंदाजाकडे भेदकता हवी. ज्याची बॉलिंग खेळताना बॅट्समन सतत सतर्क आणी दबावाखाली रहातो,>> १००% मान्य. पण ही भेदकता प्रत्येक गोलंदाज वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गोलंदाजीत आणत असतो. कुंबळे आपला फसवा 'टॉप स्पीनर' हुकमी अस्त्र म्हणून वापरत असे व म्ह्णूनच फलंदाजाना नेहमी सावध व सतर्क रहावं लागत असे. प्रसन्ना हातभर चेंडू वळवूं शकत असे पण तो 'फ्लाईट व लेंग्थ' यांच्या विविधतेचाच प्रभावी उपयोग करून फलंदाजाना सतत दबावाखाली ठेवत असे. त्यामुळे, 'चेंडू खूप वळवणे' हा भेदकतेचा एकमेव निकष मानणं तितकंसं योग्य नसावं, इतकंच मला सुचवावसं वाटलं. [ बापू नाडकर्णी तर केवळ 'नॅगींग लेंग्थ'वर षटकांमागून षटकं टाकून फलंदाजाना हैराण करत असत ! ]

बापू नाडकर्णी तर केवळ 'नॅगींग लेंग्थ'वर षटकांमागून षटकं टाकून फलंदाजाना हैराण करत असत !

नाडकर्णी - ४५ - ४३ - २ - ० असे त्याचे आकडे असत. तसे आकडे असणारा कुणि असेल तर २०-२० मधे नि ५०-५० मधे आपल्याला फारशी चांगली फलंदाजी करायला नको.

छान माहिती भाऊ! बर्‍याच दिवसांनी तुमची पोस्ट दिसली. पूर्वी भारतात स्पिन बद्दल खूप लिहीले बोलले जात असे. फ्लाइट, लूप वगैरे टर्म्स खूप ऐकल्या होत्या. मला फास्ट बोलिंग बघण्याची जेवढी आवड आहे तेवढी स्पिन ची नाही, त्यामुळे माहितीही फारशी नाही. पण वाचायला आवडेल. शास्त्री चा बहुधा एक 'आर्म' बॉल फेमस होता. कुंबळे चा बहुधा फ्लिपर जास्त भारी ना सर्वात?

भाऊ रणजीमधे अक्षर फारसा effective ठरत नाहिये ( 'चेंडू खूप वळवणे' ह्यापेक्षाही) ह्यामूळे मला ते धाडसी विधान वाटले होते. बघूया पुढे काय development होते का ? तशीही फारशी आशादायक स्थिती दिसत नाहिये फिरकीची आपल्याकडे. जास्त revs टाकता येत नसतील तर England, Africa वगैरे मधे प्रभाव कमी होतो. (इथे मी normal spinners धरतोय फक्त, मुरलीसारखे फ्रिक नाही) म्हणून केदार बॉल जास्त वळवण्याबद्दल म्हणत असावा.

कुंबळे चा बहुधा फ्लिपर जास्त भारी ना सर्वात? >> मला वाटते Top spinner होता. फ्लिपर शेन वॉर्न चा होता, त्याने कलिननला काढलेला आठवत नाहि का ? हेराथ वापरतो आर्म बॉल तो बघ. जबरदस्त आहे.

रणजी मधे कर्नाटक चा श्रेयस गोपाल जरा प्रॉमिसिंग वाटतोचादुसरा म्हणजे हरियाणा चा जयंत यादव. but it's too early to comment.

नेगी पण आहे. हे सगळे फारच तरूण आहेत, थोडे वर्ष झाली कि नक्की कोण किती consistent आहे ते लक्षात येईलच.

बरे झाले सगळे इकडे वळले. उगाच त्या धोनीच्या धाग्यावर धो धो फाल्तु चर्चा.

काल मस्त झाली मॅच. ABD ची इनिंग मस्तच.

'चेंडू खूप वळवणे' हा भेदकतेचा एकमेव निकष मानणं तितकंसं योग्य नसावं >>

मी जेंव्हा तो "त्याचे बॉल खूप वळत नाहीत.मला तो बरा वाटतो. पण ही हॅज लिमिटेशन्स" लिहिले तेंव्हा फक्त 'फिरकी' हाच निकष नव्हता. (जरी तो लिहिण्यात वाटत असेल तरी) त्यामुळेच, 'ही हॅज लिमिटेशन्स' लिहिले. त्याच्याकडे भेदकता नाही. तो भारतीय पिच वर देखील 'ओके' कॅटॅगिरी बॉलर आहे. अजून इतर देशात कसा चालेल हे माहित नाही. जडेजाशी त्यामुळेच मी कम्पेअर केले. भज्जी जसा त्याच्या उमेदीच्या काळात होता, किंवा अश्विन देखील तसा अक्षर अजून वाटत नाहीये. अर्थात येणारा काळच ठरवेल. तो यशस्वी ठरला तर भारतालाच जास्त विकेटस मिळतील त्यामुळे मलाही आनंदच होईल.

कम्पेअरच करायचे असेल तर कालची भज्जीची पहिली स्पेल पाहणे केवळ अप्रतिम होते. भज्जीच्या त्या ६ ओव्हर्स भेदक होत्या. तुलनेत अक्षरची बॉलिंगही मस्तच होती, पण थोडी फिकी वाटत होती. इतकेच.

काल मिश्राचे काही बॉल्स पण काय सुंदर येत होते. जबरदस्त लेग स्पिन , अगदी वॉर्नची आठवण यावी असे, पण बरेचसे बॉल ढिले होते. Happy

पूर्वी काही मासिकांतून व काही जाणकारांकडून ज्याच्याबद्दल खूप ऐकले होते त्या पांडुरंग साळगावकर बद्दल हा एक सुंदर लेख
http://www.espncricinfo.com/blogs/content/story/930939.html

त्या वर्षीच्या दुलीप ट्रॉफी मधे इतकी चांगली कामगिरी करूनही तो का सिलेक्ट झाला नाही याची कल्पना नाही. त्यावेळ्ची सिलेक्शन प्रोसेस वगैरे पाहता काहीतरी कोटा सिस्टीम ची भानगड असणार हे नक्की. गावसकर आणि सोलकर म्हणे चेंडू ची शाईन घालवायला ओपनिंग बोलिंग करत म्हणे.

पांडुरंग साळगावकर नि राजिंदर गोयल हि वेंकट चे समकालीन होते नि काहि विशिष्ट पक्षांच्या हितसंबंधांमूळे नेहमीच बाहेर राहिले असे वाचलेले.

"काहि विशिष्ट पक्षांच्या हितसंबंधांमूळे नेहमीच बाहेर राहिले असे वाचलेले." - हे क्रिकेट मधे अनादी काळापासून चालू आहे आणी अनंत काळापर्यंत चालणार आहे. ईतकं मागे जायचंअ कारण नाही. मुरली कार्तिक ईतक्या कमी टेस्ट्स का खेळला? शेवटच्या टेस्ट मधे मॅन ऑफ द मॅच असून सुद्धा नंतर एकही मॅच का नाही खेळला?

मुरली कार्तिक बद्दल काही कळत नाही. आधी वाटायचे दादाशी जमत नाही. पण नंतर इतर कप्तानांच्या बरोबर सुद्धा संधी मिळाली नाही फारशी.

जडेजाशी त्यामुळेच मी कम्पेअर केले. >> BTW जाडेजा चे rehab पूर्ण झाल्यापासून त्याची बॉलिंग परत भरात आली आहे. आफ्रिकेमधे टेस्ट मधे अश्विन, मिश्रा नि जाडेजा हा स्पिनिंगचा पूर्ण spectrum बघायला मजा येईल.

मुरली कार्तिक ईतक्या कमी टेस्ट्स का खेळला?>> त्याच्या फटकळ स्वभावामूळे त्याचे फारसे कोणाशी पटत नसे असे वाचलेले. नंतर तो इंग्लंड मधे जाऊन परत आला तोवर ओझा settle झाला होता नि ओझा जाता जाता जडेजा आला त्यामूळे कार्थिक मागे राहात गेला. IPL मधे मागे ढकलला गेल्यावर मग पुढे घुसणे कठीण होतेच.

कार्तिक विषयी माहीत नव्हतं. धन्यवाद. द्रविड च्या कॅप्टन्सीखाली चांगला खेळला होता तो. पण असामी ने सांगितलेला क्रम लक्षात नव्हता आला.

ते डिकॉक डुप्लेसिस आणि आता तो अबड्या डिविलिअर्स भारताला आणि धोन्याला अरबी समुद्रात भिरकावून देत आहेत Lol

पण त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पावसाचे पाणी पडण्याची शक्यता आहे..
इथे मला खिडकीतून क्षितिज थोडेफार अंधारलेले दिसतेय.. जोरदार वाराही सुटलाय.. जर पाऊस आला तर तो तूफान असेल .. जर २० ओवरच्या आत आला तर कदाचित उरलेली मॅच डब्यात जाऊ शकेल

भूवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा ह्यांना आता घरी बसवावे. सिरियसली. गेल्या अनेक मॅचेस भुवीला स्विंग मिळत नाहीये.

४३९ चेस सुरू झाला..
रोहित शर्मा वानखेडेचा शाहरुख खान आहे, त्याने २०० मारायला हवेत.. तो लवकर गेला तर मॆच बघण्यात काही अर्थ उरणार नाही.

रोहित गेला. आता आपण जिंकने अवघड आहे. तो असे पर्यंत परत एकदा २०० ची आशा नक्कीच होती. Happy

विराटही गेला. दोघेही स्वतःच्या चुकीच्या शॉट सिलेक्शन मुळे गेले.

मे बी १८० रन्स नी हारू असे दिसतेय. ( जनरली मी निगेटिव्ह लिहित नाही, पण सध्या कोणीच फॉर्म मध्ये नाही. )

गेल्या अनेक मॅचेस भुवीला स्विंग मिळत नाहीये. >> त्याने पेस वाढवायच्या नादात त्याचे मुख्य अस्त्र घालवलय Sad

३०० ट्च करू रे .... जिंक्स जबरी खेळतोय.

कोण म्हणाला होता रे कि जिंक्सला फास्ट खेळता येत नाही ?

रैनावरून गाडी पुढे सरकावयची वेळ झाली आहे राव. भारतीय खेळपट्ट्यांवर पण शॉर्ट बॉल मूळे फूटवर्क गंडत असेल तर काही राम नाही.

जिंक्स खेळतोय पण त्याला साथ द्यायला कोणितरी पाहिजे ना. >> ती ओव्हरच्या आत आलाय तेंव्हा धोनी खेळायला हवा.

Pages