आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
निरु गुलजार छान फोटो.
निरु गुलजार छान फोटो.
लय गॅप पडली.. आत्तापर्यंतचे
लय गॅप पडली..
आत्तापर्यंतचे सर्वच प्रचि आणि माहिती सुंदर
एकेकाचे नाव पत्ता लिहित बसली तर निबंध व्हायचा म्हणुन थोडक्यात निपटवतेय..पण जाऊदे..क्रेडीट दिल्याशिवाय राहवतही नै आहे..
बाप्पा बाप्पा.. २२व्या पानापासुन पडलीय गॅप.. हो जाओ शुरु..
निरु गु. , बारतोंडीच फळ नव्यान कळल..पहिल्यांदाच बघतेय. पोपटाचे प्रचि लय झ्याक..
ओ नोनी नोनी काय करता..फटू टा़का कि कोणतरी ..
वर्षू नील, उशीराने का होईना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..तसा उशीर जास्त झाला नै म्हणा..फारफारतर २ ३ दिवसांनीच मोठी झाली तु जास्त नै
. दिवा घे..
तु टाकलेली मधुमालतीची बहिण छानच..रंग गोड्डे..गणपतीला तिथ बघुन मस्त वाटल..चिंगराय छानच.. आणि त्या चिंचा बघुन बसल्याजागीच दात आंबले माझे
शशांक, बारतोंडीचे फुल मस्तच..
अबोल, दोन्ही जास्वंद सुरेख. दुसरा अबोली रंगाच्या जास्वंदाच्या पाकळ्या कसल्या गोल आहेत..माझ्या एका नातेवाईकाकडे आहे तो पण इतक्या गोल पाकळ्या नैत त्याच्या..
ससा, गुलाब छानच..
सायली, केना चे फुल मस्तच.. हरतालिकेसाठी लावलाय का गं ?
जागु, ते गुलाबी फुलांच झुडूप .. आहाहा ! क्या बात..
मानुषी.. पाकिस्तानी मुलीचा किस्सा म्हणजे खुपच हं.. तिला म्हणाव जरा वाचन करत जा.. शेजारी देशाबद्दल जो त्यांचा शत्रु म्हणुन ते वागवतात त्यांच्याबद्दल इतकी कमी माहिती म्हणजे काय..तु आणि दिनेशदा ने आपल्या देशाबद्दल लोकांमधे असलेली प्रतिमा दाखवली ते वाचुन मन सुखावल अगदी..
स्वती२, मेडीकल म्युझियमची बाग..फिल्डट्रिप..लक्की यु
निरु..सागरगोट्यांचे झाड, शेंग यांचे प्रचि झकास.. हळद्या पन मस्त..
सौ पेक्षा श्री जास्त सुंदर दिसतात. माझ्या अभ्यासाप्रमाणे एक मानवजात सोडली तर निसर्गातील सर्वच प्राण्यांमधे नर हा मादी पेक्षा जास्त सुंदर असतो ना..
ना ना! Don't panic.. इथे असणार्या सर्व पुरुष मित्रांना माझे नम्र निवेदन कि मी लिहिलेल्या वरील वाक्यात मानवजातीमधे स्त्रीया सुद्धा सुंदर असतात असा अर्थ काढावा
शशांक, कॉमन आयोरा मस्तच..
हुश्श..सरला बा निरोपसमारंभ.. _/\_
खुप सारे प्रचि टाकायचे
खुप सारे प्रचि टाकायचे राहिलेत..
सुरुवात पावसापासुन करते..
२०१० साली जेव्हा कार्ल्याच्या लेण्या माणसात होत्या ( लाक्षणिकरित्या शब्दाचे अर्थ घेणे टाळावे ) मे महिन्याची अखेर होती तेव्हा टिपलेले प्रचि.. सेकंदाच्या अंतरावर..
ओ नोनी नोनी काय करता..फटू
ओ नोनी नोनी काय करता..फटू टा़का कि कोणतरी ..
ओ टिनाबाय, बारतोंडी म्हणजेच नोनी.
फोटो मस्त, टीना.
निलु गुलजार चालेल. सिजन आला
निलु गुलजार चालेल. सिजन आला की सांगा, मी येते बिया गोळा करायला.
दिनेश, प्रसार होत असेल कदाचित पाण्यातुन पण आता तसे झाड शोधणे आणि त्यावर लक्ष ठेऊन हंगामात बिया शोधणे मुश्किल. मी ब-याच ठिकाणी वाचले की स्थानिक शेतकी सामान मिळणा-या ठिकाणि या बियाही मिळतात. पण मी अजुन शेतकरीण झालेच नाहीये तर शेतकी सामान मिळणा-या दुकानाची गाठ कुठुन पडायची????
सौ पेक्षा श्री जास्त सुंदर दिसतात. माझ्या अभ्यासाप्रमाणे एक मानवजात सोडली तर निसर्गातील सर्वच प्राण्यांमधे नर हा मादी पेक्षा जास्त सुंदर असतो ना..
ना ना! Don't panic.. इथे असणार्या सर्व पुरुष मित्रांना माझे नम्र निवेदन कि मी लिहिलेल्या वरील वाक्यात मानवजातीमधे स्त्रीया सुद्धा सुंदर असतात असा अर्थ काढावा
स्त्रिया सुंदर असाव्यात ही अपेक्षा चुकीची आहे हा संदेश निसर्गात जागोजागी आढळतो. त्यांचे जे कार्य असते त्यासाठी त्यांना सुंदर असण्याची गरज नाही तर मजबुत असण्याची गरज आहे आणि ही गरज निसर्गाने त्यांची रचना करताना पुर्ण केलीय. बहुतेक पक्ष्यांच्या किंवा किड्यांच्या माद्या नरापेक्षा मोठ्या असतात. अगदी मी हल्लीच पाहिलेल्या मलबार बेडकाची मादीही तिच्या नव-यापेक्षा बरिच मोठी होती.
बाकी मानवात जी उलटी गंगा वाहते त्यावरुनही माणुस हा पृथ्वीवर जन्मला नसुन ही ब्याद लांबच्या कुठल्यातरी दुस-या ग्रहावर तिथल्या शांतताप्रेमी रहिवाश्यांना नको झालेली असल्यामुळे त्याला इथे आणुन टाकण्यात आला ह्या माझ्या थिअरीला बळकटी येते.
(विज्ञानवाद्यांनी दिवे घ्या हो)
आजचे पक्षी आख्यान
आजचे पक्षी आख्यान सुंदर.
सायली, पाहिली, वाचली, आवडली.
आजचे पक्षी आख्यान
आजचे पक्षी आख्यान सुंदर.
सायली, पाहिली, वाचली, आवडली.
It's "NIRU" and Not niLu....
It's "NIRU" and Not niLu.... Please..
@ Sadhna... निलु गुलजार
@ Sadhna... निलु गुलजार चालेल. सिजन आला की सांगा, मी येते बिया गोळा करायला...<<<<<
सिझनला अवकाश आहे.. आधीही बागेला भेट द्यायला आलात तर आवडेल...
.
.
निरु, सागरगोट्याची शेंग
निरु, सागरगोट्याची शेंग पहिल्यांदाच बघितली. हळद्या पण खासच!
साधना , अग सुंदरतेची व्याख्या
साधना , अग सुंदरतेची व्याख्या तशी नव्हती करायची मला..आणि हो त्यात आकार हा मुद्दा पण म्हणायचा होताच मला..मी त्यांना निसर्गाने सजवण्याबाबत म्हणत होती..
बाकी मानवात जी उलटी गंगा वाहते त्यावरुनही माणुस हा पृथ्वीवर जन्मला नसुन ही ब्याद लांबच्या कुठल्यातरी दुस-या ग्रहावर तिथल्या शांतताप्रेमी रहिवाश्यांना नको झालेली असल्यामुळे त्याला इथे आणुन टाकण्यात आला ह्या माझ्या थिअरीला बळकटी येते. >> हे १ नंबर हं ..

मानुषी -तो वि डिओ प्रायवेट
मानुषी -तो वि डिओ प्रायवेट आहे असा मेसेज येतोय्. ......
कॉलेजात असताना हॉस्टेलसमोरची
कॉलेजात असताना हॉस्टेलसमोरची फुलं ( शब्दशः अर्थ घ्यावा )
एक तर सदाफुली आहे..

हे दुसर कोणत ?

हि घ्या घरची पांढरी लिली ..

हा जट्रोफाच न ? जाणकारांनी
हा जट्रोफाच न ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
ओके शशांक करते पब्लिक.
ओके शशांक करते पब्लिक.
अरे काय चाल्लय काय? तो
अरे काय चाल्लय काय? तो व्हिडीओ आयपॅडवर च्या माझ्या यू ट्यूब अकौंटवर दिसतोय. पण तिथे तो पब्लिक करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजर इ.इ. काहीच सापडत नाहीये.
आणि लॅपटॉपवरच्या यू ट्यूबवरच्या माझ्या अकौंटात हा व्हिडिओच नाहीये. तिथे व्हिडिओ मॅनेजर आहे. सगळी सेटिन्ग्ज बदलता येताहेत.
हा जट्रोफाच न ?>>>>जट्रोफा
हा जट्रोफाच न ?>>>>जट्रोफा जिनस आहे, आॅस्ट्रेलिअन बाॅटल प्लांटही म्हणतात....
Common name: Australian bottle plant, Physic nut, Buddha belly plant
Botanical name: Jatropha podagrica Family: Euphorbiaceae (Castor family)
टीना,हॉस्टेलसमोरची फुलं छान
टीना,हॉस्टेलसमोरची फुलं छान आहेत.
हे दुसर कोणत ? >>>> Deccan
हे दुसर कोणत ? >>>> Deccan Hemp, Kenaf, Brown Indian Hemp म्हणजेच
Botanical name: Hibiscus cannabinus Family: Malvaceae (Mallow family) आहे का ते गुगलून चेक करणे...
कृपया पूर्ण उमलेल्या फुलाचा फोटो टाकणे ....
चाफा वाटतोय तो.
चाफा वाटतोय तो.
सुप्रभात
सुप्रभात निगकर्स
टिने.......फोटो मस्त गं!
कालच्या व्हिडिओचं काही जमत नाहीये..............शशांक. असो...
अंगणातल्या पेरूच्या झाडाला अगणित पेरू आलेत. पण सगळ्यात आळ्या तरी, किंवा कापल्यावर आतून लिब्लिबीत खराब तरी. उपाय सुचवा.
पावसाळ्यात पेरुंची हीच दशा
पावसाळ्यात पेरुंची हीच दशा लागते असे मला वाटते. आमच्या गावी एक पाऊस पडुन गेला की कोणीही पेरुंना हात लावत नाही.
पावसाळ्यात पेरुंची हीच दशा
पावसाळ्यात पेरुंची हीच दशा लागते असे मला वाटते. << अजोबांच्या घरी होती पेरूची झाडे, पावसाळ्यातील अनुभव असाच आहे
खुप छान गप्पा रंगल्या
खुप छान गप्पा रंगल्या आहेत.
अरे माझा प्रॉब्लेम कोणीतरी सॉल्व्ह करा. माझे ऑफिसमध्ये आता पिकासा बॅन झाले आहे. मला फोटो शेअरींग कसे करू ते सांगा. माबोवरून डायरेक्ट करताना साईझ कमी करण्यात वगैरे वेळ जातो. काय करावे आता?
ओक्के............पण तसे
ओक्के............पण तसे पावसाळ्याच्या आधी पेरू येतच नाहीत फारसे.
आमच्या झाडाला पेरू लागलेत. आज
आमच्या झाडाला पेरू लागलेत. आज घरी जाऊन फोटो काढते.
maayabolivarun photo
maayabolivarun photo takayacha pratyatn karat hote pan nahi jamat.
जागू आधी माझ्या प्रश्नाचं
जागू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.(पेरू ????)
आणि माबोवरून फोटो टाकणं अवघड नाही. पण कालांतराने ते फोटो गायबतात.
मानुषी काय झाले? वरची साधनाची
मानुषी काय झाले? वरची साधनाची आणि ससा यांची पोस्ट पाहून मी टाकलेय.
पण फोटो साठी दुसरा कोणताच पर्याय नाही का?
Pages