आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

great... interesting....! need to explore and understand bit more. But liked the overall perspective.

लेख वाचला. सगळ्या टर्म्स समजल्या असे नाही पण विषय पूर्ण समजला व लॉजिक व्यवस्थित समजले. काही शंका:

१. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?)

२. ह्यावर नेमके नियंत्रण काहीच असू शकत नाही ना? म्हणजे मानव योजना आखून, त्यानुसार जोड्या बनवून अधिक चांगली पिढी तयार करू शकेल असे, नसणार ना? मग हा एक चान्स घेणेच नाही का ठरणार?

३. एकाच जातीत, धर्मातही उंची, इम्युनिटी, बौद्धिक क्षमता व तत्सम सर्व घटकांमध्ये भरपूर वैविध्य जाणवते. तसेच, इतर जातीतील / धर्मातील माणसांत व आपल्यात साम्यही असू शकते. मग आपण असे म्हणू शकतो का की जोडीदार निवडताना मुळातच सर्व प्रकारे उत्तम जोडीदार मिळवणे हे पुरेसे आहे? परजातीत, परधर्मात विवाह नाही केला तरीही आधीहून चांगली पिढी निर्माण होऊ शकेल ना? (मला इतके नक्की माहीत आहे की अगदी आपल्या पारंपारीक विवाह पद्धतीतसुद्धा एकमेकांना शोभणारे जोडीदार पसंत केले जातात ह्यामागे मुळातच 'पुढची पिढी सुपिरियर असावी' हा निसर्गाचा संकेत व मानवाची सहजप्रवृत्ती असते. शोभणारा ह्या शब्दात उंची, रंग, व्यक्तीमत्त्व, वय, आर्थिक स्थिती, बौद्धिक क्षमता वगैरे वगैरे सर्व घटक आले. त्याचप्रमाणे समजातीय व समधर्मीयही त्यात समाविष्ट असणार कारण समजातीत व समधर्मात विवाह केल्यामुळे स्त्री व पुरुष दोघांनाही त्यांच्या जडणघडणीपेक्षा खूप वेगळे काही झेलावे लागत नाही, ते कंफर्ट झोनमध्ये राहतात).

बेसिकली, इतर जाती किंवा इतर धर्म असे म्हणण्यापेक्षा 'शक्य तितक्या निकषांवर शक्य तितका शोभणारा जोडीदार' इतकेच म्हंटले तर काय बिघडले? (असे मला म्हणायचे आहे).

टीप - आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह होऊ नयेत वगैरे मताचा मी नव्हे. ते ज्या कारणांसाठी व्हावेतच असे वर लेखात म्हंटले आहे त्याबाबत माझा प्रतिसाद आहे.

बर्‍याच वर्षा पुर्वी ओशो चे या विषया वर एक पुस्तक वाचले होते खुप छान माहिती शास्त्रीय पद्धतिने समजाऊन सांगितले होती.

जेवढ्या जास्त अंतरावर मुलांची लग्न करू तेवढी संतती शारिरीक व मानसिक रित्या सुदृढ जन्मते.म्हणुन नात्यात लग्न करु नये असे डॉ.ही सांगतात. ‍

विज्ञानातील नवे संशोधन असले तरी ही माहिती माझ्या वडिलांच्या पिढीलाही, साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वीही होती व आहे. इनफॅक्ट माझ्या आईवडिलांच्या तोंडून मी लहान असल्यापासून आंतरजातीय, आंतरप्रांतीय, आंतरधर्मीय, आंतरराष्ट्रीय व आंतरवंशीय लग्ने केल्याने निपजणारी संतती ही अधिक बुध्दीमान, सुदृढ व सरस असते असा छातीठोक दावा ऐकत आले आहे.

जातीधर्मापेक्षासुद्धा भौगोलिकतेबद्दल जास्त महत्वाचा मुद्दा आहे हा.
उदा. केरळ आणि हिमाचल प्रदेश मधे राहणार्‍या व्यक्तींची जनुके वेगळी असणार भौगोलिक परिस्थितीशी जमवुन घेण्यासाठी.
या अनुषंगाने विचारमंथन व्हावे ही विनंती.

आपापसातील विवाह, जवळच्या / रक्ताच्या नात्यातील विवाहांमध्ये काही प्रमाणात व्यंग असलेली संतती जन्माला येण्याची भीती असते असे म्हणतात. याचेही कारण हेच असू शकेल का? अर्थात याला इतर घटकही (जसे वय, जीवनपद्धती, आरोग्य इ.) कारणीभूत असू शकतात.

हो .ड्रीमगर्ल याला inbreeding म्हणतात ,यातुन रिसेसीव्ह पॅटर्नने फॉल्टी जनुके एकत्र येतात व व्यंग असलेले अपत्य जन्माला येते.यासाठीच एखाद्या लोकसमुहाचा Gene pool हा diverseअसणे ठीक असते ,लेख त्यासंदर्भातच आहे.

सध्या हिंदू धर्मातल्या कोणत्या जातीत, कोणती जनुके काय परिमाणांकरीता विशिष्ट प्रमाणात जास्त करुन आढळतात यावर काही संशोधन/अभ्यास झालेला आहे का?
असल्यास त्याचा तपशील व संख्यात्मक गुणोत्तरासहित आकडेवारी पुरवाल का?

मात्र तसा अभ्यास झालेला नसल्यास वरील लेख निव्वळ तात्विक व वैज्ञानिक दृष्ट्या तार्किक आधारावर असेल, तर यातुन वैज्ञानिक अंधश्रद्धेव्यतिरिक्त काहीही नि:ष्पन्न होणार नाही असे माझे मत आहे.

व असा अभ्यास झालेलाच नसेल, म्हणजे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये नेमकी काय किती कशी आहेत हे समजलेलेच नसेल, तर मात्र वर बेफिकीर यांचा एक नंबरचा मुद्दा चपखल लागू पडतो... जसे की:
>>>> १. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?) <<<<<
यातुन विपरीत घडले तर कोण जबाबदार ?

शिवाय असा अभ्यास झालेला नसतानाच आंतरजातीय विवाहांचे निव्वळ समर्थनार्थ अर्धवट अभ्यासाच्या वैद्यानिक मुद्यांचे समर्थन "जातीभेद" नष्ट करण्यास वापरणे चूकीचे आहे असे मला वाटते.
माझ्यामते तर जातीभेद नष्ट करण्यास जाती सरमिसळ करीत "मोडूनतोडून" टाकण्यापेक्षा, आहे त्या जातीतील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मास प्रतिष्ठा मिळवून देणे अधिक महत्वाचे आहे. असो.

+विज्ञानाने एखादी गोष्ट सिद्ध केली/ सांगितली म्हणून ती ग्राह्य असेलच असे काही नाही. उदाहरणार्थ - भूगर्भातील क्रूड तेलाचा साठा मर्यादित असल्याने पेट्रोल चा वापर मर्यादित करावा , खाजगी कार्स अतिशय मर्यादित प्रमाणात वापरुन पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करावा असे शास्त्रज्ञ गेली कित्येक दशके सांगत असूनही केवळ खोट्या प्रतिष्ठेच्या अन अति-सुखासीनतेच्या हव्यासापायी अधिकाधिक लोक अत्याधुनिक अन महागड्या चारचाकी गाड्या खरेदी करून मिरवत असतातच !

तद्वतच , विज्ञान हे सतत अपूर्ण असते ,कारण जसजसे नवीन संशोधन होते, तसतसे जुने सिद्धान्त बदलावे लागतात जनुकीय शास्त्र आज काहीही सांगो, उद्या त्यांचे निष्कर्ष बदलू शकतात . पण म्हणून हजारो वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे एका फटक्यात खोटी ठरू शकत नाहीत. प्रत्येक जातीची विशिष्ट जीन्स बँक असते व त्यांची संतती चांगली हवी असेल तर स्वजातीतच विवाह करणे इष्ट होय ....

पश्चिमी देशांतील तथाकथित संशोधना चे अंधानुकरण करून आंतरजातीय /आंतर धर्मीय विवाहाचा पुरस्कार करण्याच्या प्रयत्नाविरोधात जाहीर निषेध नोंदवतो !

तद्वतच , विज्ञान हे सतत अपूर्ण असते ,कारण जसजसे नवीन संशोधन होते, तसतसे जुने सिद्धान्त बदलावे लागतात जनुकीय शास्त्र आज काहीही सांगो, उद्या त्यांचे निष्कर्ष बदलू शकतात . पण म्हणून हजारो वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे एका फटक्यात खोटी ठरू शकत नाहीत. प्रत्येक जातीची विशिष्ट जीन्स बँक असते व त्यांची संतती चांगली हवी असेल तर स्वजातीतच विवाह करणे इष्ट होय ....>>

मस्तं.
+१.

पश्चिमी देशांतील तथाकथित संशोधना चे अंधानुकरण करून आंतरजातीय /आंतर धर्मीय विवाहाचा पुरस्कार करण्याच्या प्रयत्नाविरोधात जाहीर निषेध नोंदवतो !>>

अशी निषेध नोंदवनारी लोक हजारो वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीने सांगितचल्या प्रमाणेच जगत आहेत का?

शोध आनी निष्कर्श आपल्या जागी ठीक आहे,पन "देव,देश आनी,धर्म" बुडेल त्याचे काय?>>>

"देव,देश आनी,धर्म" मध्ये आंतरजातीय /आंतर धर्मीय विवाह झाले नाहित का?

मंकु.,

तुम्ही वर दिलेल्या इन्ब्रीडिंग डिप्रेशनच्या दुव्यावर जाऊन बघितलं. पाहिलंच वाक्य हे आहे :

>> Inbreeding depression is the reduced biological fitness in a given population as a result of
>> inbreeding - ie., breeding of related individuals.

त्यातल्या inbreeding चा अर्थ असा आहे :

>> Inbreeding is the production of offspring from the mating or breeding of individuals
>> or organisms that are closely related genetically,

हिंदूंच्या जातीव्यवस्थेत जवळच्या नात्यात लग्ने केली जात नाहीत. जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाज inbreeding depresion ला बळी पडल्याच्या तुमच्या दाव्यात तथ्य नाही. अपवाद फक्त मामेबहीण-आतेभाऊ विवाहाचा आहे. मात्र ही समाजव्यापी समस्या नाही. हिंदूंमध्ये सगोत्र विवाहास inbreeding समजतात.

जवळच्या नात्यात लग्ने केल्याने निर्माण होणारी कुलविकृतीची उदाहरणं हिंदू समाजात फारशी आढळून येत नाहीत. अशी उदाहरणे मुस्लिमांत भरपूर आढळून येतात (संदर्भ : http://wikiislam.net/wiki/Cousin_Marriage_in_Islam )

इथे इंग्लंडात ब्रॅडफर्ड व लीड्स मध्ये मुस्लीमंची संख्या सर्वोच्च आहे. काही वर्षांपूर्वी एक बातमी प्रसृत झाली होती : http://www.dailymail.co.uk/news/article-1392217/Muslim-outrage-professor...

आ.न.,
-गा.पै.

गापै ,मर्यादीत लोकसंख्या असलेल्या आपल्या जातींमध्ये काही प्रमाणात प्रत्येकजण लांबचा नातेवाईक असण्याची शक्यता जास्त असते. आजही अनेक जातीत लग्न ठरवताना पदराला पदर लागतो का हे पाहतात,म्हणजे ठराविक जनुकेच सर्क्युलेट होत राहतात. त्यामुळे जातीची सिमीत लोकसंख्या काही प्रमाणात inbreeding depresion ला बळी पडते, थोडे गुगलून पाहिल्यास कळेल.

जवळच्या नात्यात लग्ने केल्याने निर्माण होणारी कुलविकृतीची उदाहरणं हिंदू समाजात फारशी आढळून येत नाहीत.

...

कुणी सांगितले ?

एकाच जातीत लग्न केल्याने inbreeding depresion प्रभाव जेवढा हवा तितका दिसत नाही.पारशी समाजात हा इनब्रिडींगचा प्रश्न जटील झाला आहे. एकाच जातीत ठरावीक जनुके फिरत राहिल्याने ओव्हरॉल जेनेटीक फिटनेसला मर्यादा येतात, हे लेखात दिलेलेच आहे, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे गामा.

मंदार कुमठेकर.,

तुम्ही दिलेलं पारश्यांचं उदाहरण बरोबर आहे. त्यांच्यात सख्ख्या भावाबहिणीचं लग्नं लागतं. जगात इतर कुठेही असा विवाह केला जात नाही.

आ.न.,
-गा.पै.

माझ्यामते तर जातीभेद नष्ट करण्यास जाती सरमिसळ करीत "मोडूनतोडून" टाकण्यापेक्षा, आहे त्या जातीतील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मास प्रतिष्ठा मिळवून देणे अधिक महत्वाचे आहे. असो.>>>>.

हे वाचुन मनात एक कल्पना चमकुन गेली.प्र्त्येक जातितील वैशिष्ट्य समजन्यासाठी निसर्गानेच काही वैशिष्ट्यपुर्ण खुणा ठेवल्या असत्यातर( म्हणजे क्षुद्रांला शेपुट ब्राम्हणाला पंख क्षत्रिला मुकुट वैश्यला असेच काहितरी किंवा ब्राम्हणाचे रक्त लाल क्षत्रिय चे भगवे वैश्य चे हिरवे क्षुद्रांचे काळे) किती बरे झाले असते. असे असते तर आंतर जातीय/धर्मीय विवाहाचा प्रश्न च आला नसता.

रेल्वे नी प्रवास करताना डब्यातिल किती लोकांच्या रंग, रुप ,आकार बघुन आपन त्यांची जात सांगु शकतोका?
घाटावर कितितरी ब्राम्हण काळे सावळे असतात.तसेच नागपुर विदर्भात गोरेपाण दलित पाहिलेत हे असे का?
आणि मग यांचे त्यांच्या कशावरुन वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म ओळखायचे /ठरवायचे.

Pages