आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

e-bliss,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> मामाची मुलगी केल्याने काही जेनेटिक प्रॉब्लेम नाही, हे हिंदूधर्मसुसंगत आहे,

मामाची मुलगी करणे चुकीचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे याला हिंदूंच्या धर्मग्रंथात शास्त्राधार नाही.

२.
>> गोत्रफित्रासारख्या हास्यास्पद बाबींना 'शास्त्रीय' ठरवत खाप पंचायतीस्टाईल लॉजिक लढविण्याची गम्मत वाटत
>> नाही, कारण त्यामुळे तरुण जोडप्यांचे जीव घेतले जातात.

जीव घ्यायचाच असेल तर काहीही निमित्त पुरतं. Happy

इकडे एक (इंग्रजी) लेख सापडला : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y-...

या लेखावरून दिसतं की, गोत्रपद्धतीचा यथोचित अभ्यास व्हावा.

आ.न.,
-गा.पै.

>>> सध्या हिंदू धर्मातल्या कोणत्या जातीत, कोणती जनुके काय परिमाणांकरीता विशिष्ट प्रमाणात जास्त करुन आढळतात यावर काही संशोधन/अभ्यास झालेला आहे का?
असल्यास त्याचा तपशील व संख्यात्मक गुणोत्तरासहित आकडेवारी पुरवाल का? <<<<

पहिल्या पानावरील माझ्या या प्रश्नाचा अनुल्लेख का बरे होतोय? Wink
अन जर अभ्यास झालाच नसेल, तर लेखात व्यक्त केल्याप्रमाणे हिंदु धर्मियात आंतरजातीय, व इतर धर्मांसोबत आंतरधर्मीय विवाह व्हायलाच हवेत नैतर जनुकीय दु:ष्परिणामांना तोंड द्यावे लागेल अशा आशयाचा लेखातील आग्रह किंनिमित्ते?

@limbutimbu विशीष्ट जातीत विशीष्ट जनुके सापडतात हे जरी खरे असले तरी ती जनुके मर्यादीत असणार,यापैकी काही जनुके निश्चितच लाभदायक ठरत असली ,तरी संपुर्ण जनुकीय संचाच्या अभावाने त्या जातीतील व्यक्तीच्या पुर्ण विकासाला खिळ बसते. कारण कोणत्याच जातीत सर्व लक्षणे विकसीत करणारी जनुके सापडणार नाहीत. त्यामुळे diverse gene pool हवा असेल, कि जो जेनेटीक फीटनेसला पोषक आहे तर आंतरजातिय धर्मिय विवाहांना पर्याय नाही.

माफ करा, शंकांचे निरसन समाधानकारक झाल्यासारखे वाटत नाही आहे. स्वतःच्या प्रतिसादाबाबत मी आग्रह धरतो असे मानू नयेत पण मला निदान इतके तरी सांगा की मी माझ्या पहिल्या प्रतिसादात विचारलेल्या शंका वेडगळ आहेत का?

तसे असले तर अगदी अवश्य तसे म्हणावेत Happy

बर्‍याचदा नाइलाजानेदेखील नात्यात विवाह करावे लागतात. सोलापुर्,उस्मानबाद्,लातुर अशा दुष्काळी
भागात मुली द्याय्ला कुणी तयार नसते तेव्हा आस्पासची ओलखीतली मुलगी करने हाच पर्याय उप्लब्ध अस्तो.

तिथल्या तिथे आंतर जातीय विवाह झाले तर चांगलेच , तेव्हडाच दुष्परिणाम कमी.
--

नात्यात लग्न केलेल्या लोकांमधे अती तीव्र मधुमेह आढळुन येतो.

आंतरजातीय वा धर्मीय विवाहांना अटकाव असू नये, स्वागतच असावे, त्याबद्दल समाजाचे घोडे मारले गेल्यासारखे कुणी बरळत राहू नये असेच मला वाटते.
पण सामाजिक ते जेनेटिक असल्या कुठल्याही कारणांसाठी आंतरजातीय वा आंतरधर्मीय वा आंतरप्रांतीय वगैरे विवाह व्हायला हवेत हे मला प्रचंड भाबडं आणि सरकारी वाटतं.
विवाह हा दोन सज्ञान व्यक्तींमधला मामला असतो. आपला जोडीदार कसा असावा याचे प्रत्येकाचे आडाखे असतात. ते अमुकच असावेत आणि तमुक नसावेत याला काहीही अर्थ नाही. तो प्रत्येकाचा (जोडीदार निवडणार्‍याचा/ रिचा. त्याच्या/तिच्या आईबापांचासुद्धा नाही) खाजगी प्रश्न आहे.

जे काय थोडंफार एस्वायबीएस्सीपर्यंत जेनेटिक्स शिकले होते त्यातून गोत्र संकल्पना ही फसवी व एकांगी आहे हे मला समजते.
गोत्र संकल्पनेमधे पित्याकडूनच फक्त वंश बघितला जातो. मातेचा वंश हा मुद्दाच गोत्र संकल्पनेत नाही.
आत्ये मामे भावंडांचे लग्न हे इन्ब्रिडींग नाही आणि चुलतभावंडे हे इन्ब्रिडींग इथेच डबल ढोलकी लक्षात येते.

जेनेटिक्स माझ्या माहितीप्रमाणे मातेकडून येणार्‍या २३ गुणसूत्रांना पित्याकडून येणार्‍या २३ गुणसूत्रांच्याइतकेच समान स्थान देते तेव्हा उगाच आम्च्याक्डेपण सगोत्र चालत नाही. आमच्या पूर्वजांना जेनेटिक्स पण येत्तच होतं असली सनई वाजवण्यात काहीही अर्थ नाही.

पण केवळ हिंदू धर्मालाच झोडपण्यात अर्थ नाही. एका ठराविक वर्तुळाच्या आतच लग्ने होण्यास मान्यता, वर्णसंकराची भिती हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक धर्मांच्यात रिफ्लेक्ट झालेले आहेच. तेव्हा धर्म हा मुद्दा इथे फक्त मारामार्‍या करण्यास उपयुक्त ठरेल.

<< | 5 June, 2015 - 13:44
माफ करा, शंकांचे निरसन समाधानकारक झाल्यासारखे वाटत नाही आहे. स्वतःच्या प्रतिसादाबाबत मी आग्रह धरतो असे मानू नयेत पण मला निदान इतके तरी सांगा की मी माझ्या पहिल्या प्रतिसादात विचारलेल्या शंका वेडगळ आहेत का?>>

विरोधी मत मांडणार्‍या किंवा शंका विचारणार्‍या सर्वांचाच अनुल्लेख होतोय. कारण मुळात चर्चा करणं हा उद्देश नसून गोबेल्सनीतीने आपली मतं आणि खोटी/एकतर्फी माहिती लोकांना पुन्हा पुन्हा सांगणं, त्यातून कोणी भुलला तर तो फायदा समजणं असा उद्देश दिसतोय. मागील १-२ पानांवर कालपरवा बॅन केलेले trolls दुसर्‍या दिवशी नवीन आयडी घेऊन आलेत त्यांच्या पोस्टी आहेत. Trolls/ Duplicate IDs कडून काय अपेक्षा ठेवणार!!! अ‍ॅडमिनना त्यांची नोंद घ्यावी लागते यातच सर्व काही आलं!

मी विचारलं होतं-
<<आणि यातील दुसरी बाजू तुम्ही सोयिस्कर लपवत आहात की तुमच्या जातीत न आढळणारा एखादा अनुवंशिक रोग किंवा निगेटिव्ह गुण आंतरजातीय विवाह करुन तुमच्या संततीत व पुढील सर्व पिढयांत येऊ शकतो. >>

यावरही काही उत्तर नाही.

अमितव यांची पोस्टही चांगली होती. पण त्यात चक्क लॉजिकल मुद्दे-बिद्दे असल्याने त्यालाही जंप केलं गेलं.

विवाह हा दोन सज्ञान व्यक्तींमधला मामला असतो. आपला जोडीदार कसा असावा याचे प्रत्येकाचे आडाखे असतात. ते अमुकच असावेत आणि तमुक नसावेत याला काहीही अर्थ नाही. तो प्रत्येकाचा (जोडीदार निवडणार्‍याचा/ रिचा. त्याच्या/तिच्या आईबापांचासुद्धा नाही) खाजगी प्रश्न आहे. >> इथे कुणाचेही दुमत नाही.

फक्त ठरवुनच करताय तर सगळ्याच जाती consider करा असे सुचवावेसे वातते.
माझा अनुभव हेच सांगतो की एकाच जातीत्ले लोक/कुटुंबे हे बर्‍याचदा खुप वेगळे वागतात.सजातीय विवाहा पेक्षा सप्रांतीय आणि समान आर्थिक परिस्थिती असलेल्या विवाहात मला जास्त comfort zone जाणवतो.
अर्थात हे विधान १००% बरोबर आहे असाअ माझा दावा नाही.

आता नीधप यांच्या पोस्टमधील गोत्रवाला मुद्दा उचलून धरला जाईल आणि या मुद्दयांकडे दुर्लक्ष केलं जाईल-

<<आंतरजातीय वा धर्मीय विवाहांना अटकाव असू नये, स्वागतच असावे, त्याबद्दल समाजाचे घोडे मारले गेल्यासारखे कुणी बरळत राहू नये असेच मला वाटते.
पण सामाजिक ते जेनेटिक असल्या कुठल्याही कारणांसाठी आंतरजातीय वा आंतरधर्मीय वा आंतरप्रांतीय वगैरे विवाह व्हायला हवेत हे मला प्रचंड भाबडं आणि सरकारी वाटतं.
विवाह हा दोन सज्ञान व्यक्तींमधला मामला असतो. आपला जोडीदार कसा असावा याचे प्रत्येकाचे आडाखे असतात. ते अमुकच असावेत आणि तमुक नसावेत याला काहीही अर्थ नाही. तो प्रत्येकाचा (जोडीदार निवडणार्‍याचा/ रिचा. त्याच्या/तिच्या आईबापांचासुद्धा नाही) खाजगी प्रश्न आहे.>>

मीही हेच म्हणत आहे की तुम्ही कोण लागून गेलात लोकांवर आंतरजातीय विवाहासाठी दबाव / सक्ती करणारे? तुम्ही आणि खापवाले यात काय फरक? ते प्रेमी जिवांना जातीच्या बाहेर लग्न करुन देत नाहीत. तुम्ही प्रेमी जिवांना जातीच्या आत लग्न करुन देत नाही. पण एकूण ही खाजगी बाब आहे हे त्यांनाही कळत नाही आणि तुम्हालाही. खाप पंचायत आवरा आता इथली!

इथे आंतरजातीयच करावे असा दबाव करतायत लोक असे का वाटते तुम्हाला?
मला तसं काही वाटलं नाही.

आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाचे फायदे सामाजिक ते जेनेटिक सगळेच योग्य आहेत पण त्या कारणासाठी कुणी लग्न करू नये इतकेच.

एआरसी, कम्फर्ट झोनची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि त्यामुळे प्रत्येक जोडप्यामधला कम्फर्ट झोन हा फॅक्टर कसा वर्क होतो याची जातकुळीही वेगळी. कुठलेच आडाखे मांडता येणार नाहीत यात.

भारतात जाती पातीत असले इनब्रीडिंग (?) झाल्याने काही दोष झालेत का तयार? अजूनतरी वाचनात असलं काही आलं नाही. मग ओढून ताणून कशाकरता हे सगळे सोपस्कार?

बाकी असल्या कारणांपेक्षा एकमेकांच्या संमतीने आणि मने जुळल्यास लग्नाचे सनई चौघडे वाजवून टाकावे.

बाकी असल्या कारणांपेक्षा एकमेकांच्या संमतीने आणि मने जुळल्यास लग्नाचे सनई चौघडे वाजवून टाकावे.>>

पुढचा धागा "लग्न थाटामाटात न करता काटकसरीने करावे" असा असेल (त्यात ध्वनीप्रदूषण वगैरे वगैरे आलंच) Lol

आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाचे फायदे सामाजिक ते जेनेटिक सगळेच योग्य आहेत पण त्या कारणासाठी कुणी लग्न करू नये इतकेच.>>>>>>>>>>> विवाह करताना फक्त आप्ल्या जातितिल स्थळ॑ बघु नयेत ,ज्या॑ना अरे॑ज लग्न करायचि आहेत त्या॑नि सर्व जातिधर्मा॑चा विचार करावा.तरच उपरोक्त फायदे मिळ्तिल

विवाह करताना फक्त आप्ल्या जातितिल स्थळ॑ बघु नयेत ,ज्या॑ना अरे॑ज लग्न करायचि आहेत त्या॑नि सर्व जातिधर्मा॑चा विचार करावा.तरच उपरोक्त फायदे मिळ्तिल.
>>
हे फायदे फारच मोघम वाटतात. ह्यातून मला वैयक्तिकरित्या काय फायदा होईल ते काही कळत नाहीये. बाकी तुमचा विचार स्तुत्य आणि फारच लांबचा आहे!

काश मैनेभी शादी के पेहेले ऐसा सोचा होता! पण … जाऊ द्या आता … झाल लग्न.

सुप्रजा निर्माण करणे हा विवाहाचा एकमेव उद्देश नाही ना?
>>

मला एकदम पार प्राचीन काळात पोचल्यासारखे वाटले … सुप्रजा Rofl !!
अवांतर: Immortals of Meluha मधल्या मायकाची आठवण झाली! इक्ष्वाकू वाचावयास हवे!

>>>> सुप्रजा निर्माण करणे हा विवाहाचा एकमेव उद्देश नाही ना? <<<<
धर्म, अर्थ, काम, व मोक्ष या चार बाबी जगणे व प्राप्त करणे याकरता अग्नि व देव-ब्राह्मणाचे साक्षीने लग्न विधी करून स्त्रीपुरुष एकत्र येतात व मरेस्तोवर एकमेकांशी एकनिष्ठ रहाण्याची प्रतिज्ञाही करतात.
यातिल धर्माचे अंतर्गतच सुप्रजा अर्थात (मानवी) वंशविस्तार व त्यांची सुयोग्य जडणघडण/वाढ अपेक्षित असते.

(माझे सांगणे पटत नसेल, तर कोणच्याश्या हिंदी सिनेमात शम्मीकपुर पद्मिनी कोल्हापुरेला जे विश्लेषण सांगतो, ते डॉयलॉग्ज संदर्भावेत Wink )

नीधप,

१.
>> जे काय थोडंफार एस्वायबीएस्सीपर्यंत जेनेटिक्स शिकले होते त्यातून गोत्र संकल्पना ही फसवी व एकांगी आहे हे
>> मला समजते.

म्हणूनच अधिक संशोधन व्हायला हवं.

२.
>> गोत्र संकल्पनेमधे पित्याकडूनच फक्त वंश बघितला जातो. मातेचा वंश हा मुद्दाच गोत्र संकल्पनेत नाही.

अपत्य मुलगा असेल तर त्याचं वाय गुणसूत्र फक्त पित्याकडूनच येतं. याउलट अपत्य मुलगी असेल तर तिचं एक्स गुणसूत्र पिता आणि माता दोघांच्या मिश्रणातून येतं. म्हणूनच गोत्राचा संबंध फक्त पित्याशी आहे.

३.
>> जेनेटिक्स माझ्या माहितीप्रमाणे मातेकडून येणार्‍या २३ गुणसूत्रांना पित्याकडून येणार्‍या २३ गुणसूत्रांच्याइतकेच
>> समान स्थान देते

२३ च्या जागी २२ हवं होतं. Happy लिंगनिर्देशक १ गुणसूत्र समान नसतं.

४.
>> आत्ये मामे भावंडांचे लग्न हे इन्ब्रिडींग नाही आणि चुलतभावंडे हे इन्ब्रिडींग इथेच डबल ढोलकी लक्षात येते.

आतेमामे भावंडांत लग्न इन्ब्रीडिंग आहे. जरी तशी चालरीत असली तरी ती चुकीची आहे. जरी तिचे परिणाम तितकेसे दृग्गोचर नसले तरीही ही रीत चुकीचीच आहे.

५.
>> आमच्या पूर्वजांना जेनेटिक्स पण येत्तच होतं असली सनई वाजवण्यात काहीही अर्थ नाही.

सहमत. तसेच पूर्वजांनी जे नियम घालून ठेवले आहेत त्याची आधुनिक जनुकशास्त्राशी सांगड घालून पाहायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

सुप्रजा शब्दाने एकदम वंदनाजी बर्वे यांचा 'घट्स्फोट' हा लेख आणि सोलापूरची सुप्रसिद्ध सुप्रजा पावभाजी हे दोन्ही आठवले, दोन्हीही सारखेच मनोरंजक.

<आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाचे फायदे सामाजिक ते जेनेटिक सगळेच योग्य आहेत पण त्या कारणासाठी कुणी लग्न करू नये इतकेच.>

मला हेच म्हणायचं आहे. लेखाचा सूर व समर्थकांचा सूर प्रचारकी वाटला. या कारणांसाठी लग्न करा असं सुचवणं चूक आहे. त्यातही हे लोक इथे केवळ 'सुप्रजा'- genetically diverse and superior progeny- निर्माण करण्यासाठी इंटरकास्ट करायला सुचवत आहेत. क्रॉस ब्रीडिंग करुन मुले जन्माला घालणं हे थोडंसं कुत्रा, घोडा यांच्या क्रॉस ब्रीडिंगसारखं वाटलं. तिथे कुत्रा-कुत्री अनोळखी असतात. केवळ ब्रीडिंग हाच उद्देश असतो. पण आपण माणसं आहोत. लग्न करताना प्रेम, मनोमिलन हे निकष असावेत.

आणि आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाचे तोटेही आहेत. तडजोड जास्त करावी लागते- दोघांनाही पण जास्त करुन मुलीला. अगदी गाढ प्रेम असेल, पूर्वपरिचय असेल तर तडजोड सोपी जाते. पण ठरवून लग्न करताना एखादी हिंदू मुलगी तिच्या जातीत लग्न करुन जितकी सहज अ‍ॅडजस्ट होईल तितकी कट्टर मुस्लिम मुलाशी अरेन्ज्ड मॅरेज करुन होईल का? शिवाय तुमच्या जातीत न आढळणारा अनुवंशिक रोग किंवा निगेटिव्ह गुणधर्म संततीत येऊ शकतो. सामाजिक फायदे होतील ,एकात्मता वाढेल असं वाटत नाही- जातीच्या ऐवजी आर्थिक स्तरावर विषमता निर्माण होईल. क्लास सिस्टीम तयार होईल. ती झालीच आहे. जेनेटिक बेसिसवर जोडीदार निवडणं हे योग्य नाही. केवळ मूल व्हावं यासाठी माणसं लग्न करतात का? हे मुद्दे न मांडता लेखात केवळ एकांगी मुद्दे मांडले आहेत.
अर्थात आंतरजातीय विवाह फायदा-तोटयाचा विचार न करता प्रेम असेल तर जरुर करावेत त्याला कोणी विरोध करु नये. पण असंच करा असा दबाव आणू नये. तो खाजगी मामला आहे त्यात सरकारीपणा आणू नये.

@limbutimbu धर्माचा उद्देश जर सुप्रजा निर्माण करणे असेल, तर उपरोक्त विज्ञानाने अशी सुप्रजा निर्माण होते हे सिद्ध झाले आहे. आता सुप्रजा निर्माण करायची असेल तर धर्म आंतरजातिय विवाहांना मान्यता देणार का? हा खरा प्रश्न आहे.
जर धर्ममार्तंडांनी आधुनिक जनुकिय विज्ञानाशी सुसंगत भुमिका घेतली तर काहीच अडचण येणार नाही व आंतरजातीय विवाह वाढीस लागतील, पण धर्ममार्तंड अशी भुमिका घेतील काय??

१. आते-मामे भावंडात लग्न करू नयेच. बर्‍यापैकी जवळचे नाते आहे ते. अशा लग्नानंतर पूर्वीचे चांगले भावंडाचे नाते हे कटकटीच्या नवरा-बायको नात्यात बदलले जाते. तसेच आजूबाजूची इतर जैवीक नातीही कायदेशीर नात्यात रुपांतरीत होतात.

२. 'गोत्र' ही कल्पना जर काही हजार वर्षापूर्वी निर्माण झली असेल तर आज त्याचा विचार करणे हास्यास्पद आहे. समजा आज दोन सगोत्र व्यक्ती लग्नाचा विचार करत असतील तर त्याच्यातील ''नाते'' हे आज खूपच weak झालेले असते. अशा संकरातून रोगट संततीची शक्यता जव ळ जवळ नाही.

पैलवान बुद्दीवर जोर द्या आणि नीट वाचा.
२३ जोड्या असतात. त्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र आईकडून व एक बापाकडून येते. त्या दोन्हींना जेनेटिक्स समान वागवते. वाय गुणसूत्र म्हणून ग्रेट आणि एक्स म्हणून कमी अशी भुक्कडगिरी जेनेटिक्स करत नाही असे म्हणले आहे. सर्व गुणसूत्रे समान असतात असे म्हणलेले नाही.
अर्थात एक्स आणि वाय यामधे एक ग्रेट आणि एक कमी असे काही नसते हे तुम्हाला समजणे, मान्य होणे अंमळ अवघडच आहे. तेव्हा वाद घालायला येऊ नका.

>>>> तर उपरोक्त विज्ञानाने अशी सुप्रजा निर्माण होते हे सिद्ध झाले आहे. <<<<
वर बेफिकीर व अन्य कोणी व मी देखिल प्रश्न विचारला आहे कि, विज्ञानाने असे सिद्ध झाले आहे का की "केवळ सुप्रजाच निर्माण" होईल? दु:ष्परिणाम/कूप्रजा निर्माण होतच नाही / झालेलीच नाहीये असे विज्ञान छातीठोकपणे आकडेवारीनिशी प्रयोगशाळेत सिद्ध करुन म्हणू शकते आहे का?

हो

Pages