आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> हायब्रीड जातीच्या झाडाचे त्याच जातीशी पॉलिनेशन होऊन जे बियाणे तयार होईल(म्हणजे पुढची पिढी) त्यामधे हायब्रीड जातीची वैशिष्ठ्ये असलेले गुणधर्म मिळणार नाहीत हा दुसरा नियम. <<<<
हा दुसरा नियम जरा विस्तारुन सांगणार का?
काये ना, माझ विन्ग्रजी कच्च हे... जरा मायबोलितुन विस्कटून सांगा ना!

तू दुकानातून हायब्रीड बियाणे विकत घेतलेस आणि लावलेस. त्यातून जे झाड उगवेल त्यामधे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम, भरपूर पीक.... आखूड शिंगी, बहुदुधी प्रकारचे गुणधर्म मिळतील. पण खाण तशी माती या नियमाने ते सगळे गुणधर्म असतीलच असे गृहित धरून त्या झाडावर निर्माण झालेले बी पेरून नवीन रोप केलेस तर येणार्‍या झाडामधे यातले सगळे गुणधर्म असतील अशी सुतराम शक्यता नाही.

एक्झॅक्टली तसेच दोन दूरचे जीन पूल असलेल्या पतिपत्नींचे अपत्य उत्तम गुणधर्माचे निपजेल हा नियम आहे. पण म्हणून त्या अपत्याने जातीतच लग्न केले तर त्याचे अपत्य सगळे गुणधर्म घेऊन निपजेलच याची शक्यता नाही. त्यासाठी परत दूरचा जीन पूल शोधून त्यातला जोडीदार निवडला पाहिजे.

हुश्श.. याहून मला जमणार नाही. तज्ञांनी सांगावे.

. हा कमला सोनटक्केचा प्रतिसाद... कमला म्हणजे काउची मावशी ...

जेनेटिक्सही त्याला मान्यता देते पण गोत्र व्यवस्थेत एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे गोत्र व्यवस्था फक्त पित्याच्या वंशाकडेच बघते (त्यामुळे आत्ये-मामे भावंडं सगोत्र होत नाहीत).

एक्झॅक्टली... आणि म्हणुनच गोत्राचा विचार म्हणजे आपल्या संस्कृतीने जेनेटिक्सचा विचार केला आहे, आपला धर्म किती महान आहे, हा खोटा गळा काढू नये.

दोन सख्ख्या भावंडात जीन्स अगदेच सारखे असतात ( यांचे गोत्र सारखेच असणार, कारण आईबाप तेच.. अशा लग्नाला मान्यता नसतेच.)

दोन चुलत / मावस भावंडात जीन्स सारखे असणार, पण सख्ख्यापेक्षा कमी. ( चुलत असतील तर गोत्र तेच. मावस असतील गोत्र बदलले... काका - पुतण्या असे असेल तरी गोत्र तेच. मामा - भाचे जेनेटिकली तितकेच साम्य, पण गोत्र वेगळे.)

यापलीकडे कोणतेही नाते असेल तर साम्य आणखी कमी कमी होत जाते. ( यात गोत्र वेगळेच असण्याची शक्यता जास्त.)

( यासाठी इंग्रजीत फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री असे शब्द वापरतात. या पलीकडच्या अगदी लांबच्या नाते संबंधाला जेनेटिक्सही फारशी किंमत देत नाही.. दोन चार पिढ्यात कसलाही संबंध नाही, पण पत्रिकेत एकच गोत्र आहे, तर धर्म गोत्र एक आहे म्हणून मान्यता देत नाही.. पण अशा केसेस मध्ये रक्ताचा नाते संबंध दृश्य नसेल, फार लांबचा असेल तर जेनेटिक्स त्याला कन्सिडर करत नाही.. सारांश, गोत्र आणि जेनेटिक्सचा विचार यात बराच फरक आहे.. उगाच आपली संस्कृती किती वैज्ञानिक असा खोटा गळा काढू नये..... डिग्री सांगण्यात काही गफलत झाली असेल तर तज्ञानी त्यात दुरुस्त्या कराव्यात.. जेनेटिक्स वाचून लई वर्षे झालेली आहेत. )

....

http://www.maayboli.com/node/35415?page=6

जामोप्या ती चर्चा सामाजिक अनुषंगाने झाली आहे,ही वैज्ञानिक आधार घेऊन चाललेली चर्चा आहे.

नीधप यांनी लिहिलेले आहे त्यावररुन ईतकेच समजले की उत्तम गुणधर्माचे वाण निपजण्यासाठी प्रत्येकाने आंतर_____ विवाह केला तरच शक्य होईल. बरोबर कां नीधप??

>>>> यासाठी इंग्रजीत फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री असे शब्द वापरतात. या पलीकडच्या अगदी लांबच्या नाते संबंधाला जेनेटिक्सही फारशी किंमत देत नाही.. दोन चार पिढ्यात कसलाही संबंध नाही, पण पत्रिकेत एकच गोत्र आहे, तर धर्म गोत्र एक आहे म्हणून मान्यता देत नाही.. पण अशा केसेस मध्ये रक्ताचा नाते संबंध दृश्य नसेल, फार लांबचा असेल तर जेनेटिक्स त्याला कन्सिडर करत नाही.. <<<<
हे वाक्य व ठळक केलेला मजकूर मला महत्वाचा वाटला आहे. नोंदवून ठेवतो आहे. जर ठळक केलेला मजकुर खरा मानला, अगदी लांबच्या नाते संबंधाला जेनेटिक्सही फारशी किंमत देत नसेल, तर मुद्दामहून विजातीय/विधर्मिय जोड शोधायचा अट्टाहास का? ते देखिल "विज्ञानाचा" आधार(?) घेत?

(इथे रॉबिनहूड अस्ता तर नक्की म्हणला अस्ता की "लिम्ब्या लेका बालिष्टर का नाय रे झाला तू?")

नीरजे, तुझे विवेचनही समजुन घेतलय. नोंदवले आहे.

जेनेटिक्स १+१ =२ इतकं सोप्पं नाही.
एवढंच या निमित्ताने दोन्ही बाजूंना सांगू इच्छिते.

१+१ = ? या प्रश्नाचे उत्तर मायबोलीत , मायबोलीवर आणि सगळ्याना समजेल अश्या भाषेंत देणे मला सध्या शक्य नसल्याने लिहित नाही.
केव्हातरी याचे उत्तर नक्की देईन.

>>>तू दुकानातून हायब्रीड बियाणे विकत घेतलेस आणि लावलेस. त्यातून जे झाड उगवेल त्यामधे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम, भरपूर पीक.... आखूड शिंगी, बहुदुधी प्रकारचे गुणधर्म मिळतील. पण खाण तशी माती या नियमाने ते सगळे गुणधर्म असतीलच असे गृहित धरून त्या झाडावर निर्माण झालेले बी पेरून नवीन रोप केलेस तर येणार्‍या झाडामधे यातले सगळे गुणधर्म असतील अशी सुतराम शक्यता नाही.

एक्झॅक्टली तसेच दोन दूरचे जीन पूल असलेल्या पतिपत्नींचे अपत्य उत्तम गुणधर्माचे निपजेल हा नियम आहे. पण म्हणून त्या अपत्याने जातीतच लग्न केले तर त्याचे अपत्य सगळे गुणधर्म घेऊन निपजेलच याची शक्यता नाही. त्यासाठी परत दूरचा जीन पूल शोधून त्यातला जोडीदार निवडला पाहिजे. <<<

==============

शेवटी एकदा मला असे वाक्य मिळाले जे माझ्या शंकेबाबत काहीतरी ठाम मांडत आहे.

>>>एक्झॅक्टली तसेच दोन दूरचे जीन पूल असलेल्या पतिपत्नींचे अपत्य उत्तम गुणधर्माचे निपजेल हा नियम आहे.<<<

ह्याच विधानावर मला (कधीचे वगैरे) विचारायचे आहे की हा 'नि य म' आहे का? म्हणजे 'दोन दूरचे जीन पूल असलेल्या पतीपत्नींचे अपत्य' दोघांपेक्षा कमी सुदृढ असूच शकत नाही का? (ह्यातून मुळात असलेल्या व्याधी, गरोदरपणातील कुपोषण / दुर्लक्ष वगैरे गोष्टी सोडूनच विचारत आहे).

==============

वरील शंकेचे 'थेट' निरसन होईल अशी आशा बाळगून पुढचे विचारत आहे.

आणि जर हा शात्रीय नियम आहे ह्यावर आजच्या युगात का चर्चा होत आहे? हा विचार तर केव्हाच सर्वसामान्यांना व्यवस्थित ज्ञात असायला हवा होता ना?

मुळात असे फायदे आहेत म्हणून आंतर____ विवाह करायला हवेत हा फंडा मला पटत नाही.

विवाह हा दोन व्यक्तींमधला असतो आणि लग्नासाठी कुठल्या फॅक्टर्सना प्रायोरिटी द्यायची आणि कुठल्या फॅक्टर्सना नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

माझ्या पुरत मी ठरवले.

मुलाला अमेरिकेत कुणी जापनिज ,अमेरिकन ,चायनिज ,कोरियन ,ऑस्ट्रेलियीन मुलगी आवडली प्रेम-बिम झाल तर

गळे काढायच नाही विरोध करायचा नाही आनंदाने स्विकार करायचा.

तसेच मुलिच्याही बाबतित.

(आमच्या वेळेस असे काही शक्य नव्हते)

मुळात असे फायदे आहेत म्हणून आंतर____ विवाह करायला हवेत हा फंडा मला पटत नाही.

विवाह हा दोन व्यक्तींमधला असतो आणि लग्नासाठी कुठल्या फॅक्टर्सना प्रायोरिटी द्यायची आणि कुठल्या फॅक्टर्सना नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

*

हे ब्रह्मवाक्य ठरायला हरकत नसावी Wink

आजची पॉप्युलेशन डेन्सिटी लक्षात घेता, ठरवून असे विवाह करायलाच हवेत असे अजिब्बात नाही. त्याचवेळी अशा विवाहांना विरोध करण्याच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नवी पिढी अधीक सशक्त निपजण्याची शक्यता, हे आहे, इतका अर्थ या लेखावरून काढला तरी पुरे.

प्राचीऽन काळी जेव्हा मानवजात भटक्या अवस्थेत होती, शेकडो मैलांवरही माणसांची दुसरी टोळी सापडेलच असे नव्हते, त्याकाळी ठरवून, परका प्रवासी भेटला, तर त्याला टोळीसाठी 'बीजदान' करायची विनंती केली जात असे. अशाच प्रथा अनेक भूप्रदेश व समाजांत अगदी अत्ता-अत्तापर्यंत टिकून होत्या. त्याच वेळी, वंशशुद्धी वगैरे तद्दन भंपक संकल्पनांपोटी राजवंशात सख्ख्या भावा बहिणींची लग्ने लावून देत राजघराणी नष्ट झाल्याच्याही सत्यकथा आहेत. पारशी समाजासारखा संपूर्ण समुदाय नष्ट होण्याच्या मार्गावर असण्याची परिस्थिती आपण पाहतोच आहोत.

याउलट प्रागैतिहासिक काळी निअँडरथाल अन होमो सेपिअयन यांच्यातही असा संकर झाल्याचे शास्त्रीय पुरावे आहेत, व हा संकर नुसता आंतरजातीय वा भिन्नगोत्री नसून, (घोडा गाढवाच्या संकरासारखा) ऑल्मोस्ट इंटरस्पेसीज (बी यांच्या भाषेत दोन वेगळ्या पेशींत Wink ) झालेला आहे.

सगोत्री विवाह करू नये, हे ज्या काळी खर्‍याखुर्‍या गायी एकाच टोळीच्या ४ घरां(फॅमिली हाऊस)पैकी प्रत्येकाच्या खर्‍याखुर्‍या वेगळ्या गोठ्यांत(गोत्रात) बांधल्या जात, त्या काळी ठीक होते, आजकाल त्याचा खापपंचायती अतिरेकही चुकीचाच आहे.

जनावरांचेच उदाहरण द्यायचे, तर अगदी सगोत्री अन पराकोटीचे इन्सेस्चुअस इनब्रीडींग केले, तरी बहुतेकदा बरी अपत्ये जन्मतात असे निरिक्षण येते, पण, त्याचवेळी अंडे व शुक्राणू बनवितांना, जनुके स्वतःच स्वतःचे मिक्सिंग, पर्म्युटेशन काँबिनेशन करीत असतात हेही खरेच आहे. जेव्हा नव्या जीवाची सुरुवात होते, त्या आधीचे व त्यावेळचेही जनुकांचे हे जीवनदायी नृत्य समजावून घेताना जो थक्क अन नि:शब्द करणारा अनुभव येतो, तो लिहिण्यासाठी खरेच, शब्द अपुरे आहेत!!

वरचे वाचून लक्षात येईल की मी दोन्ही बाजूंनी बोलतो आहे. कारण सातीअक्का म्हटल्यात तसे इथे १+१=२ हे प्रत्येकदाच होत नाही. जेनेटिक्स इज मच मोअर काँप्लिकेटेड.

तरीही, जेनेटिक पूल मिक्सिंग करत राहिले, तर जास्त चांगले भविष्य निर्माण होते, हा जेनेटिक्सचा, अर्थात सृष्टीचा नियम आहे, इतके समजून घेतलेत तरी पुरे.

@बेफीकीर,एक लिँक देत आहे ती नीट वाचल्यास जातीअंतर्गत विवाह तितकेसे फायदेशीर नसतात हे तुमच्या लक्षात येईल. लिंकमधला कंटेँट नीट वाचा,व समजून घ्या.
http://science.howstuffworks.com/life/evolution/big-gene-pool-evolve.htm

ही अजुन एक लिंक नीट् वाचा
http://www.wikipedia.org/wiki/Population_bottleneck

population bottleneck (or genetic bottleneck) is a sharp
reduction in the size of a population due to environmental
events (such as earthquakes, floods, fires, disease, or
droughts) or human activities (such as genocide ). Such
events can reduce the variation in the gene pool of a
population; thereafter, a smaller population (of animals/
people) with a correspondingly smaller genetic diversity,
remains to pass on genes to future generations of offspring.
Genetic diversity remains lower, only slowly increasing with
time as random mutations occur. [1] In consequence of such
population size reductions and the loss of genetic variation,
the robustness of the population is reduced and its ability to
survive selecting environmental changes, like climate
change or a shift in available resources, is reduced.

Conversely, depending upon the causes of the bottleneck,
the survivors may have been the fittest individuals, hence
improving the traits within the gene pool while shrinking it.
This genetic drift can change the proportional distribution of
an allele by chance and even lead to fixation or loss of
alleles. Due to the smaller population size after a bottleneck
event, the chance of inbreeding and genetic homogeneity
increases and unfavoured alleles can accumulate.

>>> मंदार कुमठेकर. | 10 June, 2015 - 21:58 नवीन

@बेफीकीर,एक लिँक देत आहे ती नीट वाचल्यास जातीअंतर्गत विवाह तितकेसे फायदेशीर नसतात हे तुमच्या लक्षात येईल. लिंकमधला कंटेँट नीट वाचा,व समजून घ्या.<<<

>>> मंदार कुमठेकर. | 10 June, 2015 - 22:15 नवीन

ही अजुन एक लिंक नीट् वाचा<<<

दोन्ही लिंक्स वाचल्या. बेसिकली नैसर्गीक आपत्तींमध्ये पॉप्युलेशन बॉटलनेक (म्हणजे, माणसेच कमी झाल्यामुळे समृद्ध पिढ्या निर्माण न व्हायची शक्यता पुढे आणणारी परिस्थिती) होऊ शकते ह्याबाबतचे विवेचन आहे.

ह्या दोन्ही लिंक्समध्ये 'इतर धर्म किंवा जातीमध्ये विवाह केला तर आधीपेक्षा कमी समृद्ध अपत्य जन्माला येऊच शकत नाही का' ह्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नाही आहे.

ते असो किंवा नसो (किंबहुना आत्तापर्यंत तर मी असे ठामपणे मान्य करू लागलो आहे की त्या प्रश्नाचे उत्तर असेच असणार की इतर धर्मात किंवा जातीत विवाह केला तर आधीपेक्षा कमी सुदृढ अपत्य जन्मणार नाहीच असे काहीच नाही), बेसिकली मानवसृष्टीच्या पुढील वाटचालीसाठी 'ही अशी वैविध्यपूर्ण काँबिनेशन्स होत राहावीत' इतपत मुद्दा समजला. पण जर (येऊन जाऊन) हाच मुद्दा असेल तर नीधप जे काही म्हणत आहेत त्याच्याशी संपूर्ण सहमत आहे. येथे विवाह वैयक्तीक आवडीनिवडीप्रमाणेच केले गेले पाहिजेत.

टीप - अडीचशे प्रतिसादांनंतरही (जी मला आता जरा जास्तच व्हॅलिड वाटू लागली आहे Happy त्या माझ्या) शंकेचे नेमके निरसन केले गेलेले दिसत नाही. (कोणतीही नैसर्गीक आपत्ती आली नाही तरीही केलेल्या) आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहांमार्फत झालेले अपत्य आधीच्या पिढीपेक्षा कमी सुदृढ असेल असे होऊ शकतच नाही का?

Happy

माफ करा. केवळ चर्चा म्हणून प्रतिसाद देत आहे. आपल्याला वाटले की मी विषय ताणत आहे तर कृपया स्पष्ट सांगावेत, प्रतिसाद थांबवेन. Happy

मुद्दा क्रमांक एक - (मूळ लेखातील विधान) >>>जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. <<<

(येथे भारतीय समाजात जनुकीय दुर्बलता आहे व त्यावरील तोडगा म्हणजे आंतरजातीय विवाह असे म्हणण्यात आलेले आहे)

मुद्दा क्रमांक दोन - (लेटेस्ट दोन लिंक्समधील मुद्दा) >>>काही आपत्तीमुळे अचानक लोकसंख्या घटली तर उरलेला लोकसंख्येकडे जीन पूल मधील पुरेसे वैविध्य नसेल हा एक प्रॉब्लेम असून ते वैविध्य तेव्हाही असावे म्हणून आंतरजातीय विवाह केलेले बरे<<<

(येथे संभाव्य नैसर्गीक आपत्तीमुळे येऊ शकणारे प्रॉब्लेम्स अ‍ॅड्रेस होत आहेत)

मुद्दा क्रमांक तीन - (नीधप ह्यांचे म्हणणे) >>>कोणाशी लग्न करावे हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, त्या मतावर लग्न करणार्‍या दोघांशिवाय इतर कोणाचाही प्रभाव असण्याचे कारण नाही<<<

(येथे भारतीय समाजात जनुकीय दुर्बलता आहे की नाही ह्याचा विचार पूर्णपणे दुर्लक्षिला गेलेला असून वैयक्तीक निवडस्वातंत्र्याला महत्त्व आहे)

मुद्दा क्रमांक चार - (माझी शंका) >>> आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह झाले तर दांपत्यापेक्षा अपत्य सुदॄढ नसण्याची शक्यता आहे की नाही?

(ह्यात 'वैविध्य निर्माण होईल' हे अर्थातच मान्य केले गेलेले आहे पण वैविध्यापैकी सगळेच वैविध्य चांगलेच असेल का की काही अपत्ये आई वडिलांपेक्षा जेनेटिकली कमी सबल असू शकतील अशी विचारणा आहे)

धन्यवाद Happy

मी मुळ प्र्शनाला बगल दिली नवती. माझा data extrapolate केला तर तुमचे उत्तर मिळेल.

१.म्हणजे आत्ये मामे भावंडाच्या लग्नाच्या १० जोड्या आणि नात्याबाहेरील लग्नातल्या १० जोद्या घेतल्या तर पहिल्या १० जोद्यापैकी जर ३ जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.
२.आत नात्याबहेरील लग्नातय)सगोत्र नाही() पण एकाच जातीतल्या १०० जोड्या ग्या आणि आंतर्जातीय १०० जोड्या घ्या तर पहिल्या १०० पैकी ५ जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.
३.आता १०़०० जोड्या एकच धर्मातल्या आंतर्जातीय ग्या आणि दुसर्‍या १००० जोड्या भरतीय हिंदु आणि युरोपीय क्रिश्च्न अशा ग्या.पहिल्या १००० पैकी २० जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.

आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहातून पुढची पिढी 'अधिक' चांगलीच होईल असे कसे सांगता येईल?>>

चांगलीच होइल अशी कुनीच खात्री देउ शकत नाही. वैध्यकीय शात्रात च वापरणे अवघड असते.
Anything under sun including Sun can prove to be allergic ,this is punch line of medical profession.
कितीतरी औषधे हजारो clinical trials नंतर safe declare झाली तरी प्रत्य्क्ष वितरीत झाल्या नंतर medicine toxicity च्या थोड्याफार केसेस reportहोतातच , पण म्हनुन बाजारतुन ते औषध मागे घेतले जात नाही

बरेचस रोग जसे मधुमेह,थ्य्थायरोइद ,thyroid,cancer,maansika ajaarमानसिक आजार , हे जितके inherited असतात तितकेच stress / lifestyle induced पन असतात, त्यामुळे नकी कशाने काय झाले हे काय झाले हे ठरविने अवघड असते.

भारतीय बायकाम्मधे calcium deficiency आहे म्हणून दुधाच्या पदार्थाम्चा वापर वाधवा असे सांगणे जितके सोपे त्या चालीवर genetic pool मजबुत व्हाव म्हणुन आंतर्जातीय विवाह करा हे सांगता येत नाही.

सांगितले तरी कोणी ऐकणारही नाही.

acr +१

बेफिकिर ,जातिव्यवस्थेमुळे जेनेटिक डाय्वर्सीटी कमी झाली आहे हा मुद्दा तरी तुम्हाला मान्य आहे का?

>>> मंदार कुमठेकर. | 11 June, 2015 - 10:29 नवीन

बेफिकिर ,जातिव्यवस्थेमुळे जेनेटिक डाय्वर्सीटी कमी झाली आहे हा मुद्दा तरी तुम्हाला मान्य आहे का?
<<<

म्हणजे आता तुम्हाला 'इतकेच फक्त' म्हणायचे आहे का?

माझे बाकीचे मुद्दे तुम्हाला मान्य झाले आहेत असे समजावे का?

सुरेख, दोन्हीबाजूंनी एकच कॅसेट वाजते आहे १० वेळा.

तुम्हीही दुसर्‍याला नावे ठेवायची कॅसेट १०० वेळा वाजवलेली आहेच.

Pages