आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>अश्या परिस्थितीत आपल्या घरात जसे वातावरण/ विचार वगैरे आहेत त्याच्या जवळ जाणारे वातावरण/ विचार वगैरे निवडणे हे फार साहजिक आहे.<<< +१

ह्यालाच मी कंफर्ट झोन म्हणालो होतो.

>>>जर मुलीने जोडीदाराबद्दल हे ठरवले असेल तर ते तुम्ही चूक ठरवणार का?<<<

हे पटले नाही. ते म्हणत आहेत की मुलीवर समजातीची सक्ती व्हायला नको. मुलीनेच तसे ठरवले तर (बहुतांशी) पालक कशाला खो घालतील?

महत्त्वाचे - मुळात मला मंदार कुमठेकरांचा लेटेस्ट प्रतिसाद (मंदार कुमठेकर. | 5 June, 2015 - 23:06) आणि त्यांचा मूळ लेख ह्या दोहोंतील टोनमध्ये, आग्रहीपणामध्ये व मूळ भूमिकेमध्ये बराच फरक जाणवू लागला आहे.

ते म्हणत आहेत की मुलीवर समजातीची सक्ती व्हायला नको. <<<
ते नक्की काय म्हणत आहेत याबद्दल कन्फ्युज होऊनच तो प्रश्न विचारला होता.

मुलीने समजातीय जोडीदार निवडला असेल तर त्यात चूक काहीच नाही ,पण तीने समजातीय जोडीदारच निवडावा अशी तिच्यावर सक्ती करणे चूक आहे. समजातीत कंफर्ट झोन असतो हा गैरसमज आहे ,दहा मैलावर भाषा ,आहार, रितीरिवाज बदलतात. विदर्भाताल्या मुलीचा कोकणातल्या समजातिय मुलाशी विवाह झाला तर भाषेपासुन स्वयंपाकापर्यंत तिला अनेक तडजोडी कराव्या लागतील, एका जातीत लग्न हा कंफर्ट झोन नव्हे.

कंफर्ट झोन हा 'नेति नेति' करत ठरवला जातो.
तो असतोच असे नाही पण 'नोन डेव्हिल बेटर दॅन अननोन' अश्या पातळीवरही तो कंफर्ट झोन निवडला जाऊ शकतो.
पण कंफर्ट झोन समजातीत नसतोच आणि विषमजातीत असतोच असे कुठल्याच बाजूने १००% छातीठोकपणे सांगता येणार नाही.

अरे कसला वाद सुरुये रे...आता जमाना समलिंगी लोकांचा येऊन राहीलाय आणि अजून लोक गोत्र, गुणसुत्रे मध्येच अडकलेत....

विज्ञानवाले आणि परंपरावाले - दोघांनीही आपापली भूमिका स्पष्ट करा पाहू....

मामे भाऊ - भाऊ, चुलत बहीणी-बहीणी यांच्यांत संबध प्रस्थापित होणे चुकीचे की नाही. त्यातही आंतरजातीय, एकाच गोत्राचे वगैरे लफडी असणार आहेत का... Happy

मामे भाऊ - भाऊ, चुलत बहीणी-बहीणी यांच्यांत संबध प्रस्थापित होणे चुकीचे की नाही. त्यातही आंतरजातीय, एकाच गोत्राचे वगैरे लफडी असणार>>

ये लगा सिक्सर!
Wink

ते लोक 'संतती निर्माण करणे एवढाच विवाहाचा अर्थं नाही' या मताचे असतील तर प्रश्न नाही. Wink
कुठल्याही नात्यातले भाऊ भाऊ असतील तर संतती निर्माण करताना वेगळ्या स्त्रीच्या ओव्हमचा आधार घ्यावा लागेल म्हणजे जर ती स्त्री नात्यातली नसेल तर जीन पूल वेगळा असेल. मात्रं दोघी स्त्रिया असतील आणि एस सी एन टी (सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर) टेक्निकने त्या दोघींचे मूल जन्माला घालायचा प्रयत्न केला तर मात्रं जीन पूल सारखा असेल.

एकंदर खरंच इतका विचार करण्यासारखी परिस्थिती ओढवलीय.

१. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?)>>>>>

माझ्या अल्प बुद्धीला समजतय त्या नुसार हे घडण्याची शक्यता तितकिच आहे.

दोन वाईट स्वभाव गुणसुत्रा च्या व्यक्ती एकत्र आल्यातर परिणाम वाईट. तसेच
दोन चांगल्या गुणसुत्राच्या व्यक्ती एकत्र आल्यातर परिणाम चांगला . मग चांगली आणी वाईट व्यक्ती कुठल्याही जाति-धर्माची असु शकते.

निसर्गाचा एक नियम आहे माणुस आपल्या सारख्या स्वभावाच्या व्यक्तिकडे जास्त आकर्षित होतो..एखाद्या सभारंभा मध्ये आपण गेल्यास आपल्या हे लक्षात येईल.
म्हणुन कदाचित आंतरजातीय /धर्मिय /प्रातिय विवाहचे प्रमाण वाढले आहे,

एकउदा.सम्राट अशोक ची आई दासी होती पण तिचा स्वभाव खुप चांगला होता

कलाकार लोकांच्या बाबतित तर हे स्पष्ट जाणवत.

२. ह्यावर नेमके नियंत्रण काहीच असू शकत नाही ना? म्हणजे मानव योजना आखून, त्यानुसार जोड्या बनवून अधिक चांगली पिढी तयार करू शकेल असे, नसणार ना? मग हा एक चान्स घेणेच नाही का ठरणार?>>>>>

मानव योजना आखून, त्यानुसार जोड्या बनवून अधिक चांगली पिढी तयार करू शकेल तर? खरच खुप चांगले होईल

अमेरिकेत असे प्र्योग चालु आहेत असे वाचन्यात आले आहे.

हल्ली विर्य बँकेत विर्यदात्याचे सगळे तपशिल ठेवतात असेही वाचले आहे.

हल्ली विर्य बँकेत विर्यदात्याचे सगळे तपशिल ठेवतात असेही वाचले आहे

आता हे पण वाचा

Brahmin sperm in high demand among childless couples

Mansi Choksi & Sharmila Ganesan Ram,TNN | May 13, 2012, 02.14AM IST

http://m.timesofindia.com/city/mumbai/Brahmin-sperm-in-high-demand-among...

३. एकाच जातीत, धर्मातही उंची, इम्युनिटी, बौद्धिक क्षमता व तत्सम सर्व घटकांमध्ये भरपूर वैविध्य जाणवते. तसेच, इतर जातीतील / धर्मातील माणसांत व आपल्यात साम्यही असू शकते. मग आपण असे म्हणू शकतो का की जोडीदार निवडताना मुळातच सर्व प्रकारे उत्तम जोडीदार मिळवणे हे पुरेसे आहे? परजातीत, परधर्मात विवाह नाही केला तरीही आधीहून चांगली पिढी निर्माण होऊ शकेल ना? (मला इतके नक्की माहीत आहे की अगदी आपल्या पारंपारीक विवाह पद्धतीतसुद्धा एकमेकांना शोभणारे जोडीदार पसंत केले जातात ह्यामागे मुळातच 'पुढची पिढी सुपिरियर असावी' हा निसर्गाचा संकेत व मानवाची सहजप्रवृत्ती असते. शोभणारा ह्या शब्दात उंची, रंग, व्यक्तीमत्त्व, वय, आर्थिक स्थिती, बौद्धिक क्षमता वगैरे वगैरे सर्व घटक आले. त्याचप्रमाणे समजातीय व समधर्मीयही त्यात समाविष्ट असणार कारण समजातीत व समधर्मात विवाह केल्यामुळे स्त्री व पुरुष दोघांनाही त्यांच्या जडणघडणीपेक्षा खूप वेगळे काही झेलावे लागत नाही, ते कंफर्ट झोनमध्ये राहतात). >>>>>>

'पुढची पिढी सुपिरियर असावी' हा निसर्गाचा संकेत व मानवाची सहजप्रवृत्ती असते. शोभणारा ह्या शब्दात उंची, रंग, व्यक्तीमत्त्व, वय, आर्थिक स्थिती, बौद्धिक क्षमता वगैरे वगैरे सर्व घटक आले.

अगदी आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह होताना हाच निसर्गाचा नियम काम करत असतो.म्हणुन सगळ्यांचा विरोध
पत्करुन ते एकामेका कडे आकर्षित होतात व विवाह करतात.

हल्ली मुंबई सारख्या शहरात सगळा मध्यम वर्ग एकसारखी जिवनशैली जगतो यापेक्षा कंफर्ट झोन काय असु शकतो.

Brahmin sperm in high demand among childless couples>>.

चांगलेच आहे ना मग ब्राम्हणानी भरपुर विर्यदाण करावे.

आंतरजातीय विवाहाला अडचणीची माझ्या मते एकच गोष्ट आहेत ती म्हणजे लहानपणापासुन एका ज्ञातीत जन्माला आल्यानंतरचे संस्कार वैवाहीक बंधनाला बांधुन ठेवताना त्रासदायक होणारे त्या ज्ञातीतले संस्कार.

उदाहरणादाखल शाकाहार/ मांसाहार हा संस्कार घेऊ. अजुनही भारतात अनेक ज्ञाती मांसाहार निषेध करतात तर काही ज्ञाती नाही. अश्यावेळी फार विचार न करता केलेला आंतरजातीय विवाह एखाद्या शाकाहारी मुलीला सासरी मांसाहार निषेध नसेल तर त्रासदायक वाटु शकतो.

परदेशात ( माझ्यामते ) खाणे - पिणे, व्यवहार यात कदचीत कमी वैवीध्य असेल. भारतात मात्र ज्ञातीतच काय पन्नास मैलावर खाण्यापिण्याच्या सवयीत अंतर आहे.

यामुळे कितीही फायदेशीर असले तरी आंतरजातीय विवाह किती वेगाने समाजमनाला पटतील याबाबत मी साशंक आहे.

@नितीनचंद्र मी वरती लिहलेल्या कमेंटनुसार समजातीत कंफर्ट झोन असतो हा गैरसमज आहे हे पुन्हा एकदा नमुद करु इच्छितो.
@आप्पाकाका ,वीर्यदान करणारे ब्राह्मण diverse gene pool साठी एकाअर्थी मदत करत आहेत, त्याचे स्वागतच केले पाहिजे.

>>>समजातीत कंफर्ट झोन असतो हा गैरसमज आहे ,दहा मैलावर भाषा ,आहार, रितीरिवाज बदलतात. विदर्भाताल्या मुलीचा कोकणातल्या समजातिय मुलाशी विवाह झाला तर भाषेपासुन स्वयंपाकापर्यंत तिला अनेक तडजोडी कराव्या लागतील, एका जातीत लग्न हा कंफर्ट झोन नव्हे.<<<

तुम्ही शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशी दोन्ही विधाने मिसळण्याचे ठरवले आहेत का?

वर कोट केलेली तुमची जी विधाने आहेत त्याला काही शास्त्रीय आधार आहे का? 'समजातीत कंफर्ट झोन असतो हा गैरसमज आहे' हे विधान शास्त्रीय आहे की तुमचे मत आहे?

दहा मैल, विदर्भ, पंजाबी, सिंधी वगैरे जाऊदेत.

समजा हिंदू मुस्लीम आणि मराठा-मराठा असे दोन विवाह घेतले तर मराठा-मराठा (भले ते कोठेही राहणारे असोत) ह्या काँबिनेशनमध्ये मुलगा व मुलगी ह्यांना आपापली जीवनशैली विशेष बदलावी लागणार नाही हे समजायला फार अवघड आहे का? आणि हिंदू मुस्लीम विवाह झाला तर वधुवरांना अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागतील हेही समजायला फार अवघड आहे का? कंफर्ट झोन नसतो हे विधान कुठून आणले आहेत तुम्ही? सायन्समधून की स्वतःच्या विचारांमधून?

एक पे रैना जी! या तो सायन्स या तो अपनी सोच!

परजातीय धर्मीय विवाहात कंफर्ट झोन असतो असे कोणतेही विधान मी केलेले नाही, कंफर्ट झोन फक्त स्वजातीतच असतो या विधानाला माझा आक्षेप आहे, त्याचे कारण वर दिलेलेच आहे.

हे तुमचे एक विधानः

>>>समजातीत कंफर्ट झोन असतो हा गैरसमज आहे <<<

आणि हे दुसरे विधानः

>>>कंफर्ट झोन फक्त स्वजातीतच असतो या विधानाला माझा आक्षेप आहे<<<

अश्या प्रकारे विधाने बदलण्याला मी शाब्दिक खेळ समजतो. पहिल्या विधानाचा स्पष्ट अर्थ असा होतो की समजातीत कंफर्ट झोन नसतो. दुसर्‍या विधानाचा स्पष्ट अर्थ असा होतो की कंफर्ट झोन फक्त समजातीत नसतो. ही दोन्ही विधाने पूर्णपणे भिन्न मथितार्थाची विधाने आहेत.

हेच तुमच्या कालच्या त्या विशिष्ट प्रतिसादावरही म्हणत होतो की धाग्यातील टोन आणि त्या प्रतिसादातील टोन भिन्न झालेले आहेत.

कृपया फक्त शास्त्रीय भूमिका घेऊन आपले म्हणणे मांडा किंवा फक्त वैचारीक भूमिका मांडा अशी प्रामाणिक विनंती!

सध्याची समाजव्यवस्था बघता तुलनेने स्वजातीत/ धर्मात/ प्रांतात कंफर्ट अधिक असण्याची शक्यता आहे.
हे पटतंय का?

स्वजातीत 'तुलनेने' अधिक कंफर्ट असतो हे मान्य, पण स्वजातीत तडजोडी कराव्याच लागतात, तशा त्या आंतरजातीय विवाहातही कराव्या लागतील, फक्त थोड्या अधिक.

आता आपल्या मुलीला या अधिक तडजोडी कराव्या लागू नये अशी पालकांची इच्छा असेल तर त्यांना चुकीचे का म्हणायचे? कुणीही आईबाप आपल्या मुलीला कमीतकमी त्रास होईल असाच विचार करून निवडतात स्थळ.

एकतर सर्व जाती, धर्म, प्रांत यांच्या स्वतःच्या चालीरिती पुसल्या जाऊन छापाच्या गणपतींप्रमाणे सगळे एकसारखे असायला हवे किंवा मग मुलीसारखेच मुलानेही घरदार सोडून बाहेर पडायचे आणि दोघांनी आपले वेगळे कुटुंब, आपल्याला सोयीच्या चालीरिती वगैरे बनवायच्या, आपापली कुटुंबे, जात, धर्म वगैरे त्रिज्येच्या बाहेर ठेवायची.
या दोन्हीपैकी एक व्यवस्था अस्तित्वात येईल तेव्हाच या अट्टाहासाला अर्थ असेल.

नाहीतर तोवर हा भाबडा सरकारी आदर्शवादच राहील.

काही मुठभर श्रीमंतासाठी, राजनेत्यांसाठी, चित्रपट व्यवसायाकासाठी कसलाच आट्टाहास नाही

आट्टाहास आहे तो पापभिरु गोर-गरिब सामान्य जनतेसाठी.(उदा. खाप पंचायत )

विशिष्ट जातीय स्पर्म्स ची मागणी अधिक - ह्या स्वरूपाच्या बातम्या येथे दिल्या जाणे उचित वाटत नाही. जे वाटले ते लिहिले.

अजुन एक निरिक्षण उच्चपदावरिल मुलासाठी कसल्याही तडजोडी चालतात जातिपातिच्या भिंती आडव्या येत नाहित. एका दलित आय ए एस अधिकार्‍याला मी ओळखते. अगदिच सुमार दिसनार्‍या सामान्या कुटुंबातिल उच्चवर्णिय मुलिशी त्याने लग्न केले.एका शेतकरी मुलाशी तिने लग्न केले असते का?तिच्याच जातित.

उच्चवर्णियांची मानसिकता वर चेतन गुगळेच्या पोस्टमधे येउन गेली आहे दुप्पटीपणा ची.

ओके आता इथे ज्यांनी हेडरमधल्या मुद्द्याला किंचित जरी विरोध केलाय त्यांना लाथाळी सुरू झालीये.

तस्मात बाफचा हेतू म्हणावा तितका सरळ वाटत नाही. आता लिहिण्यात अर्थ नाही.

तुम्ही जा आणि सरकारातून या सक्तीची मागणी करा. कुणी सांगावं होईलही तुमचे म्हणणे मान्य.

>>>आता इथे ज्यांनी हेडरमधल्या मुद्द्याला किंचित जरी विरोध केलाय त्यांना लाथाळी सुरू झालीये.<<<

शास्त्र्योक्त अधिष्ठानाचे क्षणिक मुखवटे ढासळत आहेत. खरा चेहरा दिसू लागला आहे.

शुभेच्छा!

अहो ,इथे सरकारी आदेश काढुन आंतरजातिय विवाह लावा असे कुणीही म्हंटलेले नाही, तसेच हा लेख तथाकथित पुरोगामी ब्रिगेड बामसेफी विचारसरणीच्या मार्गानेही जाणारा नाही .मी फक्त वैज्ञानिक तथ्य मांडले आहे ,त्यावर चर्चा व्हावी. सामाजिक परिणाम वगैरे नंतरचा मुद्दा आहे किंवा नीधप यांनी सुचवल्याप्रमाणे अशा जोडप्यांनी त्रीज्येच्या बाहेर राहणेच योग्य.

शास्त्र्योक्त अधिष्ठानाची चर्चा कृपया जरुर करावी.

निधप, विरोध केलेला नाही हीपण एक बाजु दाखवन्याचा प्रयत्न होता.चुकिचे काही असेल तर संपादित करते.

नीधप,

>> तस्मात बाफचा हेतू म्हणावा तितका सरळ वाटत नाही.

सहमत. पण, त्यासाठी प्रतिसादाची पाच पानं उलटून जाण्याची काय आवश्यकता होती? Biggrin अस्मादिकांना हे ज्ञान पहिल्या पानावरच झाले होते :

>> जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाज inbreeding depresion ला बळी पडल्याच्या तुमच्या दाव्यात तथ्य नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages