आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा वंश चांगला व्हावा म्हणून प्रयत्न केले .. की तो चांगला कसा राहील ह्या दृष्टीने प्रयत्न होतील Lol
मी बापुडा त्याला वंशशुद्धी म्हणालो!

वंशविस्तार हा विवाहाचा एक मुख्य उद्देश आहे हा मुद्दा तरी मान्य आहे काम तुम्हाला? <<
नाही. आताच्या काळात हा मुख्य उद्देश मानताच येणार नाही.
एकेकाळी नक्कीच हा मुख्य उद्देश होता. कारण तेव्हा संख्या भरपूर असणे गरजेचे होते. आठ पुत्रांचे आशीर्वाद, मुलीच्या प्रत्येक न्हाणाबरोबर तिच्या बापाच्या डोक्यावर चढणारे पाप वगैरे समजुती त्यातूनच तर निर्माण झाल्या.

आता तुमची कंपेटिबिलिटी नसेल ’सुदृढ’ संतती जन्माला घालण्याची तर तुम्ही जगात आलेल्या आणि अनाथ असलेल्या कुणालाही घर देऊ शकता.

प्रत्येकाने वंशविस्तार ह्या उद्देशाने लग्न करून पॉप्युलेशन एक्प्लोजनला हातभार लावलाच पाहिजे असे नाही.

असेच करा असे नाही पण ऑप्शन्स आहेत.

मुळात आंतर____ विवाहाचे जेनेटिक ते सामाजिक अनेक फायदे आहेत हे खरे असले तरी ते फायदे/ कारणे हे दोन माणसांना एकत्र सुखाने नांदता यावे यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी मनांचे जुळणे, एकमेकांबरोबर प्रचंड कम्फर्ट लेव्हल तयार होणे हेच गरजेचे आहे. आणि याचे समीकरण मांडता येणार नाही ते प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते असते.

मी परत तेच वेगळ्या शब्दात सांगितले

निधप, मुद्दा पटला नाही. आजही वंशविस्तार हा मुख्य उद्देश ठेऊनच बहुतांश विवाह होतात. लग्न झालेल्या जोडप्याला एक दोन वर्षात मूल झाले नाही कि त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते तेच याच कारणाने.
आजही विवाह झालेली 99.99% जोडपी मुलांना जन्म देतातच ,अगदी युरोप अमेरिकेतही हेच प्रमाण आहे. फक्त एकत्र राहणारी व मुलंबाळ न होऊ देणारी तुरळक जोडपी असतील.

नीधप सहमत.

विवाह न करता देखिल एखादी स्त्री स्पर्म्स बॅकेतुन हवे तसे स्पर्म्स घेऊन गर्भधारणा करु शकते की.

निसंतान दपंती टेस्टट्युब बेबी मध्ये हेच करत तर आहेत.

कुमठेकर तुम्ही मुद्दा वाचलात, विचार केलात तर पटेल किंवा नाही पटणार.
केवळ तुम्हाला सहमती नाही म्हणून न वाचताच पुढे निघून गेल्यावर पटला नाही ला काय अर्थ आहे?

डोक्याला जास्त ताप न देता या धाग्यातुन जे समजले ते असे.

१)जवळच्या नात्यात लग्न करु नये संततित दोष येउ शकतो जे हल्ली डॉ. ही सांगत आहेत व सायन्स ही सांगत आहे.

२)निरोगी संतान जन्माला यावी म्हणुन आंतरजातिय/धर्मीय/प्रांतिय विवाहाला मान्यता देण्यामध्ये मन जुळने व प्रेम

असने हे ही तेवढेच महत्वाचे आहे असे असेल तर पालकांनी जास्त खळखळ न करता विवाहाला मान्यता द्यावी

दोन्ही गोष्टी साध्य होतिल प्रेमाची सफलता व निरोगी संतान.

मंदार, तो सगळयांनाच समजला आहे.

एक गट आहे ज्याला आपले अस्तित्व टिकवायचे आहे. तो ते टिकवण्याचा निकराचा प्रयत्न करतो आहे

आणि एक गट असा आहे तो ते अस्तित्व मोडण्याचा निकराचा प्रयत्न करतोआहे.

आणि या दोन्ही पेक्षा श्रेष्ठ निसर्ग चक्र आहे.जे सतत फिरत आहे.

त्या चक्राची एक आरी एकदम वर असते तर एक खाली

चक्रतर सतत फिरतच आहे.

वंशविस्तार हा विवाहाचा एक मुख्य उद्देश आहे हा मुद्दा तरी मान्य आहे काम तुम्हाला? <<
नाही. आताच्या काळात हा मुख्य उद्देश मानताच येणार नाही.>>

असे असते तर जगातील सर्वात जास्त IVF centers असण्याचा मान भारताला मिळाल नसता.असे असते तर ज्यांना IVF कळत नाही किंवा परवदत नाही ते बाबा बुवांकडे गेले नसते. शिकलेले लोकही मुल होत नसेल तर उप्वास कर्ताना दिसतात.
आज ज्या गावात प्यायचे पुरेसे पानीही नाही तिथे निपुत्रिकांना संतान देणार्‍या जाहीराती दिसतात त्या दिसल्या नसत्या.IVF जाउदेत आयुर्वेदिक आणि होमेओप्थी वाले लोक सुध्दा आता ह्यात हात धुवुन घेत आहेत.

मी स्वतः 'लग्न झाले म्हनजे मुल झालेच पाहिजे' ह्या विचाराच्या विरोधात आहे आणि माझ्यासारख्या लोकाम्ची संख्या वाधत आहे पण तरी बहुतांश समाजाला लग्न झाल्यावर मुले निर्माण करायची असतात.

१. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?)>

ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
म्हणजे आत्ये मामे भावंडाच्या लग्नाच्या १० जोड्या आणि नात्याबाहेरील लग्नातल्या १० जोद्या घेतल्या तर पहिल्या १० जोद्यापैकी जर ३ जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.

अर्थात दुर्दैवाने इतर काही कारणांमुळे जसे की आइला गरोदपणात चुकीची औष्धे देली गेले,पुरेसा संपुर्ण आहार नाही मिलाल,कावेळ झाली,अप्घात झाला,जद धातु आलेले पणी प्यावे लागले,तर दुसर्‍या गटात देखील अपत्यात काही व्यंग त्रास आधळुन येतो.

इस्त्रायलमधे वंशशुध्दीच्या हट्टापायी ज्यु समाजात downsyndrome babies जन्माला याअचे प्रमाण खुप वाधले आहे. ह्यावर खुप मागे एक चांगला लेख times मधे आला होता.

After so many days, at-least someone is replying to it. Thank God.

However, my first doubt is still being misinterpreted.

Anyways, I will be back after few hours.

उदाहरणादाखल शाकाहार/ मांसाहार हा संस्कार घेऊ. अजुनही भारतात अनेक ज्ञाती मांसाहार निषेध करतात तर काही ज्ञाती नाही. अश्यावेळी फार विचार न करता केलेला आंतरजातीय विवाह एखाद्या शाकाहारी मुलीला सासरी मांसाहार निषेध नसेल तर त्रासदायक वाटु शकतो.>
माझा अनुभव हे सांगतो की शाकाहारमांसाहाराचा प्रश्न समजातीय लोकांमधे पण येय्तो, पन तो highlight होत नाही.
आमच्या staff मधे एक मराठा-वारकरी संप्रदायातील घरात वाधलेली मुलगी आहे जिच्या घरी काम्दा लसुन देखील खात नाहीत,तीचे लग्न माराठाच पण मांसाहार करणार्‍या घरात झाले. त्या विषयी तीने तक्रार केलेली आठवत नही. पण हेच तीचा आंतर्जातीय विवाह असता तर कदाचित खळखळ ऐकु आली असती.

आमचे सोलापुरचे एक नातलग आहेत ,घरात अंडे ह्या शब्दाचा उच्चार केलल्ला तरी चालत नाही, पन जेव्हा मुलीव्चे लग्न जमनेच अवघड झाले ,तेव्हा मुलीला चिकन/मासे करुन नवर्‍याला खायला घालावे लागेल ही अट माहीत असुनही सारस्वत घरी मुलगी दिली.मुलगा श्रीमंत होता,कर्त्रुत्ववान होता हे वेगळे सांगायला नकोच

arc हाच मुद्दा मी मागे मांडला होता,समजातीत कंफर्ट झोन असतो हा ईथल्या अनेकांचा गैरसमज तुम्ही दूर करत आहात.
अगदी ब्राह्मण पोटजातीतले उदाहरण घेतले ,तर देशस्थांकडे कणकेचे मोदक करतात, तर कोब्रांकडे उकडीचे. देशस्थी स्वयंपाक तिखट असतो तर कोब्रांकडे सपक. कोब्रा काटकसरी असतात तर देब्रा बरोबर याउलट .
जर असा पोटजातिय विवाह झाला तर त्या मुलीला अँडजेस्टमेंट कराव्या लागतीलच जरी ब्राह्मण असली तरी.त्यामुळे आंतरजातीय विवाहाने कंफर्ट झोन मिळत नाही या मुद्द्यात तितकासा दम नाही.

arc सर्वच प्रतिसाद आवडले.

शाकाहार मांसाहार हा मुद्दा घरातल्या वातावरणावर अवलंबून आहे, तो जनुकीय नाही. घरात कोणीही खात नसले तरी बाहेर जाऊन मांसाहार करायला ब-याच लोकांना आवडतो. तो आवडीनिवडीचा प्रश्न आहे.

लग्न ठरविताना किंवा त्यास विरोध करताना चूकीच्या गोष्टींचा आधार घेतला जातो याची खंत आहे. माझा प्रेमविवाह झाला तोही दोन्ही बाजूने कडकडून विरोध असताना . माझी व माझ्या पत्नीची नाडी एक आहे या फालतू कारणास्त्व सासरच्या अतिशहाण्यांनी प्रखर विरोध दर्शविला होता. लग्न झाले तर अमूक तमूक होईल असे मुर्खपणाचे तर्क काढले , प्रत्यक्षात लग्नही छान झाले आणि आता संसारास ७ वर्षे झाली,मुलगा मी आणि पत्नी यांची तब्बेतही ठणठणीत आहे. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यात आमचे सर्वच नातेवाईक एकमेकांत मिसळले.इथे आम्ही त्या अतिशहाण्या आणि शास्त्राचें गुणगाण करणा-यांच्या नादी लागलो असतो तर कल्याणच झाले असते.

ही घटना इथे सांगायचा उद्देश एवढाच कि माझ्या घरी मांसाहार रेग्युलर असतो तर माझ्या सासरच्यांना वासही नको असतो, पण त्यामुळे आमच्या कंफर्ट मध्ये काहीही फरक पडलेला नाही. कंफर्ट असण्यासाठी एका मॅच्युरिटीची गरज असते.बाकी लग्नातील जोडीदारांचे स्वभाव जितके भिन्न तितका संसार जास्त टिकाऊ असतो यावद्दल दुमत नसावे.

>>>arc | 9 June, 2015 - 10:02

१. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?)>

ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
म्हणजे आत्ये मामे भावंडाच्या लग्नाच्या १० जोड्या आणि नात्याबाहेरील लग्नातल्या १० जोद्या घेतल्या तर पहिल्या १० जोद्यापैकी जर ३ जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.<<<

हे तुमचे विधान मला समजले व अर्थातच पटलेही. परंतु मला काहीतरी वेगळे विचारायचे होते असे मला वाटत आहे. शंका जरा अधिक नीटपणे विचारतो.

आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे अधिक उच्चदर्जाची पिढी निर्माण होते (होण्याची शक्यता असते) अश्या अर्थाचे विधान मूळ लेखात आहे. शंका अशी आहे की कमी दर्जाची पिढीसुद्धा निर्माण होऊ शकेल ना? आत्ते-मामे भावंडांची पुढची पिढी दोषयुक्त असण्याचे प्रमाण जास्त असते हे मान्य आहे, पण प्रश्न समजातीय विरुद्ध आंतरजातीय आणि समधर्मीय विरुद्ध आंतरधर्मीय असा (मी मानत) आहे.

आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहातून पुढची पिढी 'अधिक' चांगलीच होईल असे कसे सांगता येईल? असे सांगण्यासाठी आवश्यक तो शास्त्रीय आधार लेखात आढळत नाही आहे. लेखात जनुकांच्या काँबिनेशनचे लॉजिक आहे, पण तेच लॉजिक नेहमी लागू होईल ह्याचा शास्त्रीय आधार दिलेला दिसत नाही आहे. Happy

कृपया त्या विधानाचा शास्त्रीय आधार मिळावा.

(चर्चा फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून होईल अशी आशा आहे. ज्यांना वैचारीकही बोलायचे असेल - स्वतःची गृहीतकेही नोंदवायची असतील - त्यांनी आपल्या मुद्याच्या समर्थनार्थ आपण शास्त्रीय आधार वापरणार आहोत की वैचारीक तर्क वापरणार आहोत हे जरूर तपासावे व त्यातील एकच काहीतरी वापरावे अशी विनंती! Happy )

मुद्याच्या समर्थनार्थ quantitative आणि qualitative अशी दोन प्रकारची विधाने केली जाऊ शकतात.
Quantitative म्हणजे जे मोजू शकतो ते. ज्याला तुम्ही येथे "शास्त्रीय आधार" म्हणत आहात. उदाहरणार्थ Probability.
याउलट Qualitative म्हणजे जे मोजू शकत नाही ते. ज्याला तुम्ही "वैचारिक तर्क" म्हणत आहात. उदाहरणार्थ "कम्फर्ट झोन"

यापैकी केवळ एकच वापरले जावे हा तुमचा अट्टाहास का हे समजलं नाही.

आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहातून पुढची पिढी 'अधिक' चांगलीच होईल असे कसे सांगता येईल? असे सांगण्यासाठी आवश्यक तो शास्त्रीय आधार लेखात आढळत नाही आहे. लेखात जनुकांच्या काँबिनेशनचे लॉजिक आहे, पण तेच लॉजिक नेहमी लागू होईल ह्याचा शास्त्रीय आधार दिलेला दिसत नाही आहे
<<
वरती शास्त्रीय आधार व त्याच्या लिंका मी दिलेल्या आहेत.
झापडबंद वाचन करू नये.
धन्यवाद.

विखारकाका (v-khaar) मायबोलीकर - श्री आणि जान्हवी, तुम्ही गोखले-सहस्त्रबुद्धे असं लग्न केलंत हे चुकलंच तुमचं.
श्री- अहो पण काका, आमचं प्रेम होतं एकमेकांवर..आणि अजूनही आहे.
जान्हवी- आणि आम्ही पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करु, तुम्ही कोण मधे नाक खुपसणारे? हा आमचा खाजगी मामला आहे, तुमचा संबंधच काय?
विखारकाका- हे बघा, आम्हीच ठरवणार कोणी कसं वागायचं ते. लग्न हा खाजगी मामला आहे हेच मान्य नाही आम्हाला. आम्ही शक्य तितकं ब्रेन वॉशिंग करत राहणार आणि जमेल तेव्हा या विषयाला सरकारच्या कक्षेतही आणणार. कायदेच करतो कडक. प्रेम-बिम गेलं खड्डयात.
श्री- डोकं ठिकाणावर आहे का?

and wait for it-

जान्हवी- काहीही हं विखारकाका!

>>>>> १. जसे ह्यातून आधीपेक्षा काहीतरी अधिक चांगले निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आहे त्याहून वाईट घडण्याची शक्यताही तितकीच असेल ना? (/असायला हवी ना?)>

ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
म्हणजे आत्ये मामे भावंडाच्या लग्नाच्या १० जोड्या आणि नात्याबाहेरील लग्नातल्या १० जोद्या घेतल्या
तर पहिल्या १० जोद्यापैकी जर ३ जोड्यांच्या अप्त्याला काही genetic problem येणार असेल ,दुसर्‍या गटात ही शक्यता अजुन कमी होते.<<<<<

बेफिकीरः हे तुमचे विधान मला समजले व अर्थातच पटलेही. परंतु मला काहीतरी वेगळे विचारायचे होते असे मला वाटत आहे. शंका जरा अधिक नीटपणे विचारतो. <<<<<

बेफिकीर, उत्तरातील शब्दात गुन्डाळले गेल्याने कदाचित तुम्हाला ते पटले असेल पण मला पटत नाही, मूळ प्रश्नाला बगल दिली आहे असे वाटते. कारण प्रश्न आंतरजातिय/धर्मिय विवाहांमधिल दु:ष्परिणामाबद्दल आहे, आते-मामे भावंडामधिल विवाहाबद्दल नाही.

आंतरजातीय/धर्मिय विवाहांमधे चांगले तेच जनुकीय परिणाम मिळतील हे गृहितक कशावरून?
आंतरजातीय/धर्मिय विवाहांमधे धोकादायक जनुकीय परिणाम मिळणार नाहीतच हे कशावरून?

लिंब्या अभ्यास कर. हे गृहितक नाही. जेनेटिक्स आहे.
हे असेच घडते हा निसर्गाचा नियम आहे.

हाच नियम हायब्रीड बियाणांच्या व्यवसायाचा पाया आहे. आणि क्रॉसब्रीडींग शिवाय ते गुणधर्म मिळत नाहीत. हायब्रीड जातीच्या झाडाचे त्याच जातीशी पॉलिनेशन होऊन जे बियाणे तयार होईल(म्हणजे पुढची पिढी) त्यामधे हायब्रीड जातीची वैशिष्ठ्ये असलेले गुणधर्म मिळणार नाहीत हा दुसरा नियम. ज्या पायावर आख्खी हायब्रीड बियाणांची इंडस्ट्री फोफावली आहे.

Pages