आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(ह्यात 'वैविध्य निर्माण होईल' हे अर्थातच मान्य केले गेलेले आहे
पण वैविध्यापैकी सगळेच वैविध्य चांगलेच असेल का की काही
अपत्ये आई वडिलांपेक्षा जेनेटिकली कमी सबल असू शकतील
अशी विचारणा आहे)>>>>>>>>सगळीच अपत्ये सुपेरबेबीज म्हनुन जन्माला येतील‌असा दावा मी लेखात केलेला नाही ,परंतु जनूकीय वैविध्य चांगले असते या समर्थनार्थ मी बर्याच लिंक दिलेल्या आहेत.जेनेटीक पूल मज मजबूत झाल्याने व्यापक अर्थाने फायदा होईल,अगदी प्रत्येक वैयक्तीत केसमध्ये असा फायदा होईल याची गॅरेंटी लेखात दिलेली नाही.

तुमच्या मूळ लेखात हे विधान आहे. हा दावाच आहे की?

>>>परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात<<<

'असू शकतात' असे हवे ना?

एका स्पेसिफीक समाजातल्या काही व्यक्ति जीव तोडून कडाडून विरोध करत आहेत. काळानुसार बदलणे महत्वाचे आहे. सध्या फक्त प्रेमविवाह आंतरजातिय / आंतकधर्मिय होतात आणि त्यांनाही फक्त आंतरजातिय आहे म्हणून विरोध होतो.
व्यक्तिवरुन विरोध व्हावा, तिच्या जातिवरुन नाही.

'असू शकतात' असे हवे ना?>>>>>>>मी लिहिल्याप्रमाने ते व्यापक अर्थाने सांगितले आहे.अगदी प्रत्येक वैयक्तीक केसेसमध्ये नाही.

एका स्पेसिफीक समाजातल्या काही व्यक्ति जीव तोडून
कडाडून विरोध करत आहेत. काळानुसार बदलणे महत्वाचे आहे.
सध्या फक्त प्रेमविवाह आंतरजातिय / आंतकधर्मिय होतात
आणि त्यांनाही फक्त आंतरजातिय आहे म्हणून विरोध होतो.
व्यक्तिवरुन विरोध व्हावा, तिच्या जातिवरुन नाह>>>>>>>>>म्हात्रे साहेब ,आपण इतर जातीपेक्षा जास्त सुपिरीअर आहोत असा अनेक जात समुहांचा गैरसमज आहे,फक्त एका जातीला‌ टारगेट करणे योग्य नाही.

सुरेख, आरोप मान्य नाहीत तर आम्ही काय करू?

इथे आंतर____ विवाह झालेच पाहिजेत अशी घोषणा केली नाही तर तुम्ही लोक मुद्दा काय आहे वगैरे न बघता
'आंतरजातीय विवाह करणारेही विरोध दर्शवतात हे चूक आहे' 'स्पेसिफिक समाज....... ' आणि अजून काहीही वेडपट आरोप करत सुटताय.

कॅसेट अडकलीये त्या जेनेटीक्सच्या मुद्द्यावर. कोणी कुणाशी विवाह करावा हे इतरांनी सांगू नये हे पण झेपत नाहीये तुम्हाला.

सुरेख, आरोप मान्य नाहीत तर आम्ही काय करू? >>>कोणाला काही करा असे कुठे म्हटलय मी माझे म्हणने एवढेच मला आरोप मान्य नाहित.

कोणी कुणाशी विवाह करावा हे कोणी ही कोणाला सांगितलेल नाहिय .

नीधप | 5 June, 2015 - 02:18

इथे आंतरजातीयच करावे असा दबाव करतायत लोक असे का वाटते तुम्हाला?
मला तसं काही वाटलं नाही.

आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाचे फायदे सामाजिक ते जेनेटिक सगळेच योग्य आहेत पण त्या कारणासाठी कुणी लग्न करू नये इतकेच.>>>>

हा तुमचा मुद्दा मला पटला होता.

खरेतर इथे जेनेटीक्सच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी.

मंदार कुमठेकर,

>> ... जातिव्यवस्थेमुळे जेनेटिक डाय्वर्सीटी कमी झाली आहे हा मुद्दा तरी तुम्हाला मान्य आहे का?

माझ्या माहितीप्रमाणे असा अभ्यास केला गेलेला नाहीये. जातिव्यवस्थेमुळे जनुकीय वैविध्य कमी होणे हा एक अंदाज आहे. त्याचा ठोस पुरावा नाही.

आ.न.,
-गा.पै.

जातिव्यवस्थेमुळे जनुकीय वैविध्य कमी होणे हा एक अंदाज आहे. त्याचा ठोस पुरावा नाही.>

अमुमोदन.

म्हात्रे साहेब ,आपण इतर जातीपेक्षा जास्त सुपिरीअर आहोत असा अनेक जात समुहांचा गैरसमज आहे,फक्त एका जातीला टारगेट करणे योग्य नाही.
>>

हो. अगदी बरोबर.. आपल्यापैकी बरेच जण राहुल गांधींना ते घराण्याच्या जोरावर पुढे आलेत असे म्हणतात. (या मुद्द्यावरुन कृपया राजकारण काढू नये, वानगीदाखल बोलतोय)
पण असे बोलताना स्वतः मात्र आपल्या पुर्वजांनी, ते पण पुराणकालिन पुर्वजांनी कमावलेल्या नावामुळे स्वतःच्या समुदायांना अजुनही सर्वश्रेष्ठ समजतात.

अहो कसला धर्म आणि कसली जात घेऊन बसलात?
धर्म म्हणजे परमात्म्याच्या जवळ जाण्याचा आणि माणसांना जोडणारा मार्ग आणि जात म्हणजे पुर्वीच्या काळी समव्यवसायीकांनी स्थापन केलेले समुदाय...

मी जेनेटीक्समध्ये तज्ज्ञ नाही पण लेख आणि सगळी चर्चा वाचल्यावर लक्षात आले की एकूणच लेख आणि चर्चा आंतरजातीय, आंतरधर्मीय भारतीयांच्या लग्नाभोवती फिरत आहे. परंतु भारतीयांचा जीन पूलमध्ये फार वैविध्य नसावे असे मला वाटते (चूक असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा). उदाहरणार्थ भारतीय लोक परदेशात टाईप २ डायबिटीस साठी हाय रिस्क मानले जातात. तिथे त्यांची जात, धर्म, प्रांत ह्याचा विचार केला जात नाही. टाईप २ डायबिटीसमध्ये जीन्स महत्वाचा रोल निभावतात असे संशोधनसुद्धा आहे (तज्ज्ञ नसल्यामुळे त्यात किती तथ्य आहे ते महित नाही).

खरेतर जीन पूलमध्ये वैविध्य आणायचे असेल देशांतर्गत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करण्यापेक्षा आंतरवंशीय (interracial ) लग्न करायला हवे. त्यामुळे फायदा होईल की तोटा ते माहित नाही पण वैविध्य निश्चितच येईल.

बाकी नीधपच्या सर्व पोस्ट्सना माझे अनुमोदन. लग्न ही वैयक्तीक बाब आहे तेव्हा कोणाशी लग्न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव (शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, इ.) कोणाशी लग्न करावे ह्यावर सक्ती अथवा विरोध होणे अयोग्यच आहे.

प्रथम म्हात्रे, अनुमोदन !

आता मोदी साहेबांचच बघा ते जातीने तेली (ओबिसी) पण देशाचे पंतप्रधान झाले ना?आणि ते स्वता:ला व्यापारी ही

म्हणुन घेतात.(या मुद्द्यावरुन कृपया राजकारण काढू नये, वानगीदाखल लिहलय )

अप्पाकाका थोडा तरी सेन्स बाळगा, पादरीचे कामच असते धर्मप्रसार, अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले बरे.

अप्पाकाका थोडा तरी सेन्स बाळगा, पादरीचे कामच असते धर्मप्रसार, अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले बरे.
>>>

Lol

Pages