आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आते मामे अथवा इतक्या जवळच्या नात्यामध्ये शारीरिक अथवा मानसिक रीत्या अपंग जन्मण्याचे चान्सेस जास्त असतात हे मान्यच आहे. नुकत्याच गाजत असलेल्या एका जोडप्यानं त्यांच्या आठ (कि सहा??) मुलांसाठी इच्छामरणाचा विषय आठवत असेल तर त्याही जोडप्याचा असाच जवळच्या नातेसंबंधामधला विवाह आहे, आणि त्याच्या प्रत्येक अपत्याला तो रोग होणारच असे डोक्टरांनी सांगितले असे वाचल्याचे आठवतेय. *(चुकीचे असेलही!)

पुरावा मागा टिव्ही
हे लोक पायात घालून पळतील>>

महादेवाचे नाव घेवुन भामटेगिरी करायचे काम नाही

कसली ही भाषा तुमची?

भाषेवरून पातळी कळतेय

सु. अ. सा. न. ल.

आंतरजातिय विवाह विरोध फक्त काही टिनपाट लोक करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे
<<

देब्रा - कोब्रा इंटरकास्ट म्हणायचं की इंट्राकास्ट? Wink

आंतरजातिय/धर्मीय विवाहाला काही लोकांचा विरोध फक्त गोर गरिब जनते साठी आहे का?
वर मी काही नेत्यांची उदाहरण दिले आहे त्याबद्दल कुणी बोलत नाही.फिल्म लाईन मधे ९०% लग्न आंतरजातिय/धर्मीय / प्रांतिय आहेत.१००० उदाहरणे देऊ शकते.

सलमान ची आई ब्राम्हण वडिल मुस्लिम.अभिताभच्या तिन पिढ्या,सुनिल दत्त नरगिस.त्यांची मुले.

राजकारणात रामदास आठव्ले द्लित बायको ब्राम्हण,असेच रामविलास पासवान्,सु .शिंदे, वगैरे लिस्ट मोठी आहे.

यांच्या लग्नाच्या वेळेस हिंदू वाल्यांचा कडवे पणा कुठे गेला होता?

पाटील ,एवढी अचुक माहिती तुमच्या कडे आहे तर कॄपाया दलित हिंदू मधिल कुठली जात ते पण सांगा(हिंदु महार्,मातंग कि चांभार की अजुन काही.

माझ्या http://www.maayboli.com/node/54107 या लेखातील काही भाग इथे अनुरूप वाटत असल्याने डकवित आहे.

जातीयवादाविषयी देखील हीच समस्या (दुटप्पी वर्तणूकीची) आहे. भैरप्पा यांच्या एका कादंबरीत एक ब्राह्मण कन्या व एक क्षत्रिय तरुण यांच्या प्रेमाला त्यांच्या घरातून मोठा विरोध असतो. त्यातही विशेषकरून मुलीच्या वडिलांचा विरोध तीव्र असतो. त्यांच्या मते ह्या परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर आहे आणि त्यांनीच जर परंपरेविरुद्ध आंतरजातीय विवाह होऊ दिलेत तर समाज बुडायला कितीसा वेळ लागणार? नंतर काही दिवसांनी त्या ब्राह्मणकन्येच्या लक्षात येते की आपले वडील एका अस्पृश्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवून आहेत. आपल्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना ती त्यांच्या या कृत्याचा जाब विचारते. तेव्हा ते म्हणतात की त्या स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण होणे व त्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही नैसर्गिक घटना आहे तिथे मानवनिर्मित नियम आडवे येऊ शकत नाहीत. परंतु विवाह हा एक मानवनिर्मित संस्कार असल्याने तो करताना मानवनिर्मित नियम पाळणे भागच आहे. आपल्या दुटप्पी वागण्याचे समर्थन करताना त्या ब्राह्मणाने केलेला युक्तिवाद वाचकांच्या बुद्धीला चक्रावून टाकतो.

ही जुन्या काळातील गोष्ट झाली. आजच्या काळात जातीयवादाचा विखार कमी व्हावा म्हणून सरकार आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देते. असे विवाह करणाऱ्या जोडप्यास रुपये पन्नास हजार पर्यंतच्या संसारोपयोगी वस्तू देण्याची एक सरकारी योजना आहे. परंतु त्याचवेळी असे विवाह मोठ्या प्रमाणात होऊच शकणार नाहीत याचीही काळजी शासनाने घेतली आहे. आता असे आंतरजातीय विवाह ठरवून थोडीच होणार? झालेच तर ते प्रेमविवाह होणार. परंतु त्याकरिता प्रेम व्हायला हवे व प्रेमाकरिता जवळीक हवी. नेमकी ही जवळीकच होऊ नये याची खबरदारी शासनाचा ऍट्रॉसिटी ऍक्ट घेतो. आता दोन शेजाऱ्यांमध्ये कधी ना कधी किरकोळ भांडणे ही होणारच, परंतु एक शेजारी खुल्या प्रवर्गातला आणि दुसरा दलित असेल तर भांडण झाल्यास तक्रार करताना ऍट्रॉसिटी ऍक्टचा दुरुपयोग होऊ शकतो या भयाने खुल्या प्रवर्गातील लोक दलित वस्तीत घर घेत नाहीत किंवा स्वतःच्या वसाहतीत दलित व्यक्तीस घर विकत घेऊ देत नाहीत. जातीजातीतल्या भिंती भक्कमपणे उभ्या राहाव्यात अशीच या कायद्याने व्यवस्था करून टाकली असूनही दुसरीकडे शासन जातिभेद कमी करायच्या बाता मारीत असते.

नीधप,

१.
>> वाय गुणसूत्र म्हणून ग्रेट आणि एक्स म्हणून कमी अशी भुक्कडगिरी जेनेटिक्स करत नाही असे म्हणले आहे.

जेनेटिक्स नामे कोणी मनुष्य असावा असे तुमच्या विधानावरून वाटते आहे! Lol ते काय सांगत नाही त्यापेक्षा काय सांगतंय ते जास्त महत्त्वाचं आहे.

२.
>> अर्थात एक्स आणि वाय यामधे एक ग्रेट आणि एक कमी असे काही नसते हे तुम्हाला समजणे, मान्य होणे अंमळ
>> अवघडच आहे. तेव्हा वाद घालायला येऊ नका.

वाय गुणसूत्र एकाकी असल्याने कमजोर आहे. मी दुवा दिलेला लेख तुम्ही वाचलेला दिसंत नाही. परत दुवा देतो : http://www.hitxp.com/articles/veda/science-genetics-vedic-hindu-gotra-y-...

आ.न.,
-गा.पै.

कधी किरकोळ भांडणे ही होणारच, परंतु एक शेजारी खुल्या प्रवर्गातला आणि दुसरा दलित असेल तर भांडण झाल्यास तक्रार करताना ऍट्रॉसिटी ऍक्टचा दुरुपयोग होऊ शकतो या भयाने खुल्या प्रवर्गातील लोक दलित वस्तीत घर घेत नाहीत किंवा स्वतःच्या वसाहतीत दलित व्यक्तीस घर विकत घेऊ देत नाहीत. जातीजातीतल्या भिंती भक्कमपणे उभ्या राहाव्यात अशीच या कायद्याने व्यवस्था करून टाकली असूनही दुसरीकडे शासन जातिभेद कमी करायच्या बाता मारीत असते.>>

केवळ शेजारी शेजारी राहिल्यानेच प्रेमविवाहाच्या शक्यता वाढतात का?
प्रेमात पडायचंच असेल तर माणसं अक्षर्शः दोन ध्रुवावरून एकत्रं येऊन प्रेमात पडू शकतात.
आणि त्यांच्यात इच्छा आणि धमक असेल तर लग्नंही करू शकतात.
Wink

सिकलसेल ' हा आजार आनुवंशिक असतो. भिल्ल , आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे हा रोग आढळतो. छोटे जनसमुदाय , किंवा ज्या समुदायांमध्ये नात्यांत विवाह होतात , त्यांच्यात ' सिकलसेल ' चे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात सातपुड्याचा पट्टा , गडचिरोली , धुळे , विदर्भ आदी भागांत या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या रोगाचे अस्तित्व सर्वप्रथम १९१० मध्ये अमेरीकेत सिद्ध झाले , भारतात हा रोग १९५२ मध्ये आला. १९९४ च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पाहणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय ४२ वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय ४८ वर्षे आढळून आले. भारतात नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय ६० पर्यंत आढळले आहे. ' सिकलसेल ' हा आजार झाल्याचे लहानपणीच दिसून येते. सिकल आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे , अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे >>>>>

या आजारा विषयी टाइम्स मधिल लेख.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/...

काही पुरावा आहे का? ही सलमान ची सावत्र आई आहे.जिला सलमान खुप मानतो. त्यांची जन्मदात्री आई ब्राम्हण आहे आणि हे तुम्ही का नाकारत आहात अजुन ही शेकडो उदाहरण आहेत.

सुरेख,
सिकल सेल अ‍ॅनिमिया नामक आजार अनुवंशिक आहे हे बरोबर, पण, तो भारतात '५२ साली आला ही शब्दरचना चुकीची आहे. तो होताच, ५२ ला सापडला, हे म्हणणे बरोबर होईल.

तो संपुर्ण लेख महाराष्ट्र टाइम्स मधला आहे. छपाई मधली चुक असेल.मला फक्त हे सांगायचे होते की

छोटे जनसमुदाय , किंवा ज्या समुदायांमध्ये नात्यांत विवाह होतात , त्यांच्यात ' सिकलसेल ' चे प्रमाण जास्त आढळते

नीधप सोडता बाकी सगळ्या पोस्टस नॉनसेन्स आहेत.
दोन्ही बाजु फक्त आपले "अजेंडे" घेऊन आल्या आहेत. यापैकी कुणालाही "सुप्रजा" निर्माण करणे वगैरे फालतु प्रकरणात इंटरेस्ट नसुन फक्त आपले अजेंडे रेटायचे आहेत. एवढंच असेल तर विज्ञानाचा/धर्माचा बुरखा पांघरुन कशाला, स्पष्टच लिहा की काय ते.

>>> नताशा | 5 June, 2015 - 21:57 नवीन

नीधप सोडता बाकी सगळ्या पोस्टस नॉनसेन्स आहेत.
दोन्ही बाजु फक्त आपले "अजेंडे" घेऊन आल्या आहेत. यापैकी कुणालाही "सुप्रजा" निर्माण करणे वगैरे फालतु प्रकरणात इंटरेस्ट नसुन फक्त आपले अजेंडे रेटायचे आहेत. एवढंच असेल तर विज्ञानाचा/धर्माचा बुरखा पांघरुन कशाला, स्पष्टच लिहा की काय ते.
<<<

वाद घालायची किंवा तुम्हाला मनस्ताप व्हावा अशी अजिबात इच्छा नाही. पण तुमच्या ह्या प्रतिसादातील ताशेरा माझ्याही पोस्टला लागू होत असल्याने नम्रपणे नोंदवू इच्छितो की मी शंका विचारल्या होत्या. त्या शंकांचे निरसन तर झालेच नाही पण त्या शंका अत्यंत बावळट व वेडगळ शंका आहेत हेसुद्धा दाखवून देण्यात आले नाही. माझ्या शंका किंवा प्रतिसादाचा कोणताही छुपा अजेंडा नव्हता, मी फार प्रामाणिकपणे शंका विचारल्या होत्या. तेव्हा तुमचा हा ताशेरा सेन्सिबल वाटला नाही हे नमूद करू इच्छितो. धागाकर्त्यानेच नव्हे तर इतर कोणीही त्या शंकांचे निरसन करावे किंवा शंका बावळटासारख्या आहेत हे कृपया समजावून द्यावे. आभारी राहीन.

अवांतर - बाकी काही जण एखाद्या धाग्यावर पहिलीच पोस्ट लिहिताना इतकी तारस्वरात का लिहितात हेच कळत नाही. जणू आधी कुठेतरी प्रचंड भांडणे झाली आहेत आणि अचानक हा धागा समोर आला आहे असा आवेश असतो नुसता.

कुमठेकर लेख चांगला आहे वैज्ञानिक दृष्टी बाळगून वैगरे लिहिलेला आहे हे स्पष्ट आहे. पण आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे कि त्यात ह्यामुळे काही फरक पडणार नाही जाती नि धर्म हे ह्या देशाचे दुर्दैव नि वास्तव आहे.आपण कितीही शिकलो, स्वताला पुढारलेले समजलो तेरी इथे व्यक्तीला त्याच्या जाती नि धर्मावारुनच ओळखले जाते. आपली जात अथवा धर्म हा सर्वोच्च आहे इतरांपेक्षा आपण वेगळ्याच ब्रीड्चे आहोत असा एक विचित्र समज इथले बहुतांशी लोक बाळगून असतात. त्यामुळे इतर धर्मियांशी लग्न किंवा संबंध हे त्यांना धर्म बुडाल्यासारखे वाटते सध्याच्या काळात वरवर ते कुणी दाखवत नाही पण मनातून मात्र त्यांना असले विवाह म्हणजे धर्मावरची आपत्तीच वाटत असते. इथे व्यक्ती त्याचे विचार ह्यापेक्षा धर्म नि जात ह्याला महत्व आहे

पण सामाजिक ते जेनेटिक असल्या कुठल्याही कारणांसाठी आंतरजातीय वा आंतरधर्मीय वा आंतरप्रांतीय वगैरे विवाह व्हायला हवेत हे मला प्रचंड भाबडं आणि सरकारी वाटतं.
विवाह हा दोन सज्ञान व्यक्तींमधला मामला असतो. आपला जोडीदार कसा असावा याचे प्रत्येकाचे आडाखे असतात. ते अमुकच असावेत आणि तमुक नसावेत याला काहीही अर्थ नाही. तो प्रत्येकाचा (जोडीदार निवडणार्‍याचा/ रिचा. त्याच्या/तिच्या आईबापांचासुद्धा नाही) खाजगी प्रश्न आहे.>>>> नीधप, यांचा प्रतिसाद मस्त आहे.मागे लक्ष्मण माने जातीभेद मिटवण्याबाबत आंतरजातीय लग्नासंबंधात बोलले होते त्यावेळी हेच वाटले होते.

प्रेमात पडायचंच असेल तर माणसं अक्षर्शः दोन ध्रुवावरून एकत्रं येऊन प्रेमात पडू शकतात.
आणि त्यांच्यात इच्छा आणि धमक असेल तर लग्नंही करू शकतात.>>> +१

नीधप यांचेशी सहमत.

चांगल्या हेतूने पण थोड्याश्या भाबडेपणाने लिहिलेला लेख वाटतो. मुळात लग्न कुणी सुप्रजा निर्माण करण्यासाठी करत नाही, करूही नये.

आंतरजातीय/ धर्मिक लग्नाचे स्वागतच व्हायला हवे पण "चला क्रांती करुयात" अशा आवेशाने कुणी ठरवून आंतरजातीय लग्ने करत नाहीत. करुही नयेत. तसे विवाह म्हणजे एका सहचार्‍याला विनाकारण मिंधे करून ठेवणे होऊ शकते. आपण असा विवाह केला म्हणजे फार मोठी क्रांती केली असा त्यांचाही गैरसमज नसतो. मला अमूक एक व्यक्ती आवडली आणी तिच्याशी लग्न करताना जात महत्वाची वाटली नाही इतकेच त्यांचे मत.

लेखाने प्रभावीत होऊन एखाद्या व्यक्तीने ठरवून आंतरजातीय विवाह केला आणी दुर्दैवाने त्यांच्या संततीत काही दोष निघाला तर ? अशी संतती परफेक्ट असेल याची गॅरंर्टी देणार का ? त्यावेळी मोठे लोक म्हणतील की "सांगत होतो जाती बाहेर जाऊ नकोस" अशावेळी काय उत्तर देणार ?

बेफिकीर यांची शंका रास्त आहे.

>>> नताशा | 5 June, 2015 - 21:57 नवीन

नीधप सोडता बाकी सगळ्या पोस्टस नॉनसेन्स आहेत.
दोन्ही बाजु फक्त आपले "अजेंडे" घेऊन आल्या आहेत. यापैकी कुणालाही "सुप्रजा" निर्माण करणे वगैरे फालतु प्रकरणात इंटरेस्ट नसुन फक्त आपले अजेंडे रेटायचे आहेत. एवढंच असेल तर विज्ञानाचा/धर्माचा बुरखा पांघरुन कशाला, स्पष्टच लिहा की काय ते.
<<<

वाद घालायची किंवा तुम्हाला मनस्ताप व्हावा अशी अजिबात इच्छा नाही. पण तुमच्या ह्या प्रतिसादातील ताशेरा माझ्याही पोस्टला लागू होत असल्याने नम्रपणे नोंदवू इच्छिते की मी काहीप्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचे निरसन तर झालेच नाही पण ते प्रश्न अत्यंत बावळट व वेडगळ आहेत हेसुद्धा दाखवून देण्यात आले नाही. माझे प्रश्न किंवा प्रतिसादाचा कोणताही छुपा अजेंडा नव्हता, मी फार प्रामाणिकपणेप्रश्न विचारले होते. तेव्हा तुमचा हा ताशेरा सेन्सिबल वाटला नाही हे नमूद करू इच्छितो. कोणीही त्या शंकांचे निरसन करावे किंवाप्रश्न बावळटासारख्या आहेत हे कृपया समजावून द्यावे. आभारी राहीन.

लिहायचा कंटाळा आल्यामुळे काही शब्द वरच्या पोस्ट मधुन कॉपी पेस्ट केले आहेत.

नताशा, माझी पोस्ट आंतरजातीय्/आंतरधर्मीय विवाह करा की करु नका असं अजिबात सांगणारी नाही. मलाही नीरजाचा मुद्दा अगदी पटतोय. पण अगदी जवळच्या नात्यात विवाह करुन झालेली संतती, ह्या बाबतीत जे काही माहित होते त्या पुष्ट्यर्थ मी ती लिंक दिली आहे. अजेंडा कसला आलाय डोंबलाचा! Lol

फक्त जनुकीय फायद्यासाठी ठरवुन आंतरजातिय लग्न करा असा कोणताही विचार मी मांडलेला नाही ,तशी सक्ती करणे योग्य होणार नसेल तर एकाच जातीत लग्न झाले पाहीजे अशी सक्तीही व्हायला नको .
मुळात अरेंज मॅरेज ही संकल्पना जातीधारीत विवाहांना काही प्रमाणात प्रोत्साहन देते, आजकाल जातीच अट नसलेल्या वधु वरांच्या जाहिराती सर्रास दिसत असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे, विवाह हा मामला फक्त दोघांमधला असायला हवा व तो प्रेमविवाह असेल तर उत्तमच.मग अशा लग्नात जाती पातीचा प्रश्नच उरत नाही ,पालकांचा प्रेमविवाहाला विरोध असतो कारण बर्याचदा ते आंतरजातिय /धर्मीय प्रकरण असते, हा विरोध कमी व्हायला हवा.

गंमत अशी आहे की आंतरजातीय, धर्मीय, प्रांतीय वगैरे विविध आंतर ____ विवाहांमधे अजूनतरी भारतात मुलीला मुलाच्या घरी जाणे, सासर आपलेसे करणे, सासरच्या गोष्टींना/चालीरितींना/विचारांना प्रथम प्राधान्य देणे हे कंपलसरी आहे.
अश्या परिस्थितीत आपल्या घरात जसे वातावरण/ विचार वगैरे आहेत त्याच्या जवळ जाणारे वातावरण/ विचार वगैरे निवडणे हे फार साहजिक आहे. शेकडो वर्षांपासून जातींच्या, धर्माच्या, प्रांताच्या भिंतींमुळे प्रत्येकाच्या वेगळ्या सवयी, चालीरिती वगैरे निर्माण झालेल्या आहेत. ज्या एकमेकांपासून प्रचंड प्रमाणात भिन्न आहेत. चांगले वाईट नाही केवळ भिन्न आहेत.
आंतर____ विवाहांमधे चालीरिती, सवयी वगैरे बाबतीत सहन करण्याचे, त्रास होण्याचे राज्य हे जनरली त्या त्या मुलीवर असते. सर्वच विवाहांच्यात असेच होते असे नाही पण जिथे होते तिथे त्रास जास्तकरून मुलीलाच भोगावा लागतो असे पाह्यलेले आहे. अश्या वेळेला कुठल्या आईबापांना पटेल मुलीला त्रास व्हावा म्हणून?
या कारणासाठी आईबाप शक्यतो अमुक चार गोष्टी समान असलेले घर निवडतात. मुलींनाही असेच वाटत असू शकते. त्यांचे तसे वाटणे यामधे चुकीचे, समाजविघातक वगैरे काहीही मला दिसत नाही.
त्यांचे मिक्सिंग व्हावे हा विचार खूप आदर्श आहे पण जोवर मुलगा आणि मुलगी हे दोघेही आपापले कुटुंब एका अंतरावर ठेवून, कुटुंबातून बाहेर पडून दोघांचे मिळून वेगळे घर उभारतील अशी व्यवस्था रूळत नाही तोवर समान वातावरणाचा आग्रह धरणे हे जाणार नाही. तोवर या भिंती बेटी व्यवहारात भक्कमच राहणार.

>>> आपण असा विवाह केला म्हणजे फार मोठी क्रांती केली असा त्यांचाही गैरसमज नसतो. मला अमूक एक व्यक्ती आवडली आणी तिच्याशी लग्न करताना जात महत्वाची वाटली नाही इतकेच त्यांचे मत. <<<
एक्झॅक्टली!

एकाच जातीत लग्न झाले पाहीजे अशी सक्तीही व्हायला नको .<<<
जर मुलीने जोडीदाराबद्दल हे ठरवले असेल तर ते तुम्ही चूक ठरवणार का?

>>> आपण असा विवाह केला म्हणजे फार मोठी क्रांती केली असा त्यांचाही गैरसमज नसतो. मला अमूक एक व्यक्ती आवडली आणी तिच्याशी लग्न करताना जात महत्वाची वाटली नाही इतकेच त्यांचे मत. <<<
अगदी अगदी !!!

Pages