आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मी फक्त वैज्ञानिक तथ्य मांडले आहे ,त्यावर चर्चा व्हावी.<<<

मग पहिल्या पानावर मी विचारलेल्या शंकांचे वैज्ञानिक निरसन करावेत.

पहिल्या पानावर समजले होते तर

आ.न.,

गा. पै.

६व्या पानापर्यन्त वाचत का आले होते:) Happy

वाचकाच्या भुमिकेतच रहा.

माझ्या पोस्ट वाचा माझ्या अल्प बुद्धीनुसार शंका निरसन करन्याचा प्रयत्न केला आहे.

मला सगळे सविस्तर लिहित बसायची सवय नाही त्या साठी मायबोली वर १० वर्षे कथा कादबर्‍या गजला लिहायची सवय करायला लागेल मला माफ करा माझ्या सिमित क्षमंता साठी.

>>> सुरेख१ | 6 June, 2015 - 12:49 नवीन

माझ्या पोस्ट वाचा माझ्या अल्प बुद्धीनुसार शंका निरसन करन्याचा प्रयत्न केला आहे.

मला सगळे सविस्तर लिहित बसायची सवय नाही त्या साठी मायबोली वर १० वर्षे कथा कादबर्‍या गजला लिहायची सवय करायला लागेल मला माफ करा माझ्या सिमित क्षमंता साठी.
<<<

सध्या मूळ धागाकर्त्याशी बोलत आहे. तुमचे ते प्रतिसाद वाचले व तुमचा स्वतःच्या बुद्दीबद्दल वरच्या प्रतिसादात तुम्ही वर्तवलेला अंदाज खरा असण्याची शंका आली म्हणून ते जंप केले. कुमठेकरांशी बोलत असताना त्यांना उत्तरे देऊ देत. आपण जरा आराम केलात तरी हरकत नाही. सविस्तर तर नकाच लिहू पण मधेच स्त्रीरुपी क्रियापदे आणि मधेच पुल्लिंगी क्रियापदे हे घोळ होत आहेत ते निस्तरलेत तरी खूप होईल. धन्यवाद!

.

क्रॉसब्रीडेड प्रोजेनीमधे क्रॉसब्रिडींगमुळे आलेले चांगले गुणधर्म हे तसेच्या तसे पुढच्या प्रोजेनीमधे येत नाहीत. त्यासाठी प्रत्येक वेळी क्रॉसब्रीडींग करावे लागते. (शेतीच्या हायब्रीड बियाणांच्यात याच कारणामुळे कंपन्यांची मोनोपॉली आहे). थोडक्यात प्रत्येक वेळेस क्रॉसब्रीडींग झाल्याशिवाय प्रोजेनी एक्स्ट्रॉऑर्डिनरी होणार नाही हे नक्की. (तज्ञांनी वरच्या मुद्द्यात चूक असल्यास कृपया सुधारावे).

पण शेतीचे हायब्रीड बियाणे आणि मानवाचा समाज यामधे फरक आहे की नाही?

तुम्ही म्हणता एक्स्ट्रॉऑर्डिनरी संततीसाठी अधिक तडजोडी कराव्यात मुलींनी. म्हणजे स्त्रियांचा जन्म हा चांगली मुले जन्माला घालणे यापुरताच आहे अश्या समजाला बळकटी देताय तुम्ही. विवाह हा दोन व्यक्तींचा असतो. आता विवाहाचा उद्देश संतती जन्माला घालणे, वंशविस्तार एवढाच राह्यलेला नाही हे तरी मान्य व्हावे.

कुठल्या दोन व्यक्तींना एकमेकांच्याबरोबर आयुष्य घालवावेसे वाटावे याचे कुठलेही आडाखे, कुठलीही सक्ती, कुठलीही बंधने असता कामा नयेत. सजातीय वा आंतरजातीय कुठल्याच बाजूने हे पटतंय का?

भेदभावांच्या भिंती नाहीश्या व्हाव्यात याबद्दल कुणाचेच दुमत नाही पण असे कार्यक्रम राबवून त्या होणार नाहीत.

माझा आंतरजातीय विवाह आहे. आणि अनेक कारणांमुळे मला आंतरजातीय या तपशीलाचा काहीही त्रास झालेला नाही. त्याबाबतीत मी नशिबवान ठरले हे नक्की. पण त्रास झालेली भरपूर उदाहरणे समोर असताना मुलीच्या आईवडिलांना आंतर____ विवाहाची धास्ती वाटली तर त्या मुलीच्या आईवडिलांना दोष देण्यात अर्थ नाही.

मी आंतर____ विवाहांच्या विरूद्ध नाही. कुणी दोघे आंतर____ विवाह करू पाहत असतील आणि घरांमधून विरोध असेल तर त्यांना माझ्याकडून पाठींबा/ मदत मिळेलच. पण कुणी असे ठरवले की मी स____ च विवाह करणार तर मी तो त्या व्यक्तीचा चॉइस म्हणेन.

लग्नाचे शिक्कामोर्तब हे सामाजिक वास्तव असले तरी लग्न, सहजीवन या गोष्टी अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक असतात.

कुठल्या दोन व्यक्तींना एकमेकांच्याबरोबर आयुष्य घालवावेसे वाटावे याचे कुठलेही आडाखे, कुठलीही सक्ती, कुठलीही बंधने असता कामा नयेत.>>>>>>+१

लग्नाचे शिक्कामोर्तब हे सामाजिक वास्तव असले तरी लग्न, सहजीवन या गोष्टी अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक असतात.>>>>>>>>>+१

नीधप यांचे बहुतांशी प्रतिसाद आवडले. खासकरून वरील वाक्ये.

बाकी लेखाचा उद्देश जरी जनुकीय फायदे समजावणे असले तरी त्यासाठी आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहाचा पुढाकार समाजाने घ्यावा असा काही सदस्यांचा आग्रह कळला नाही. भारतीय समाजात आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह होतात त्यातील बहुतांशी ही प्रेमविवाह असतात. पण एकूणच समाजाला तुम्ही इतर जाती/धर्मीयांशी विवाहच करा असे सांगणे चूक आहे. तसेच अनेक सदस्यांनी उत्पन्न केलेल्या शंका सुध्दा रास्त आहेत. त्यांचे कोणी निरसन करीत असेल तर वाचायला अजून आवडेल.

मंदार कुमठेकर. | 5 June, 2015 - 13:36

फक्त जनुकीय फायद्यासाठी ठरवुन आंतरजातिय लग्न करा असा कोणताही विचार मी मांडलेला नाही ,तशी सक्ती करणे योग्य होणार नसेल तर एकाच जातीत लग्न झाले पाहीजे अशी सक्तीही व्हायला नको .
मुळात अरेंज मॅरेज ही संकल्पना जातीधारीत विवाहांना काही प्रमाणात प्रोत्साहन देते, आजकाल जातीच अट नसलेल्या वधु वरांच्या जाहिराती सर्रास दिसत असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे, विवाह हा मामला फक्त दोघांमधला असायला हवा व तो प्रेमविवाह असेल तर उत्तमच.मग अशा लग्नात जाती पातीचा प्रश्नच उरत नाही ,पालकांचा प्रेमविवाहाला विरोध असतो कारण बर्याचदा ते आंतरजातिय /धर्मीय प्रकरण असते, हा विरोध कमी व्हायला हवा.>>>>>

त्याच हे म्हणने मला समजायला सोप गेलय.

होत असे कधी, कधी. दोन ब्राऊसर मधुन स्त्री आणि पुल्लींगी आयडींचे बेअरिंग संभाळताना होतात चुका.>>>>

प्रसाद भौ ,स्त्रिलींग समजा अगर पुल्लींग नो प्रॉब्लेम वाचल जातय हे महत्वाच.

चर्चा चांगली चालली होती आता नेजमीप्रमाणे ये रे माझ्या मागल्या ..... भरकटायला लागली.
आंतरजातीय/धर्मीय विवाहासाठी किंवा एकाच जातीतील विवाहासाठी सक्ती होवू शकत नाही, ती एक मानसिकता आहे, ज्याला जेंव्हा बदलायची तेंव्हा तो बदलेलच . जात ,पात,धर्म आणि गोत्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तसेच कुठलाही धर्म श्रेष्ट नाही ज्याने त्याने आपली (माकड म्हणते माझीच ....) त्याप्रमाणे गिरवली.
सर्वात महत्वाचे म्हणजे धर्म आणि जातीचे तुणतुणे वाजणे आता लोप होत आहे. कदाचित आणखी ५० वर्षानंतर कोण कुठल्या धर्माचा किंवा जातीचा हे ही सांगता येणे अवघड होवून बसेल. धागाकर्त्याचा मूळ हेतू काही वैज्ञानिक माहीती पुरविणे आणि त्यावर चर्चा होणे असा असावा, जो तो बडवत बसलाय उगाच.

सुरेख१,

>> ६व्या पानापर्यन्त वाचत का आले होते:)

एकदा का कळायचं ते कळलं की उरते ती निखळ करमणूक. Lol

आ.न.,
-गा.पै.

>>>कंफर्ट झोन फक्त स्वजातीतच असतो या विधानाला माझा आक्षेप आहे<<<
>> या विधानाचा स्पष्ट अर्थ असा होतो की कंफर्ट झोन फक्त समजातीत नसतो.

बेफिकीर, तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात.
"कंफर्ट झोन फक्त स्वजातीतच असतो या विधानाला माझा आक्षेप आहे. तो परजातीत देखील असू शकतो " असे मी ते वाक्य वाचले. (अर्थात ठळक भाग माझ्या मनातला)

म्हणजेच आर्थिक पातळी, पुरोगामी/पारंपारिक विचारसरणी किंवा प्रांतीय जवळीक यावर देखील कंफर्ट झोन अवलंबून असतो फक्त स्वजातीवर नाही.

पण तुमच्या सारख्या भाषाप्रभूंना हे समजत नसेल यावर विश्वास बसत नाही.

>>>पण तुमच्या सारख्या भाषाप्रभूंना हे समजत नसेल यावर विश्वास बसत नाही.<<<

कृपया वैयक्तीक कमेंट्स करू नयेत.

तसेच, मधलीच एखादी कमेंट वेगळी, स्वतंत्रपणे वाचल्यासारखी करून त्यावर प्रतिसाद देऊन खूप काही साध्य केल्याच्या आविर्भावात असू नयेत. पहिल्या प्रतिसादापासून सगळे वाचल्यानंतर असा प्रतिवाद केला नसतात हे मी जाणतो.

>> कृपया वैयक्तीक कमेंट्स करू नयेत.
?? यात वैयक्तिक कमेंट काय आहे? तुमचे गझल आणि ललित कथांमधले प्रभुत्व वादातीत आहे. मी तुम्हाला भाषाप्रभू आदराने म्हणालो तिरकसपणे नव्हे. हे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे हे दुर्दैवी आहे. असो.

>>मधलीच एखादी कमेंट वेगळी, स्वतंत्रपणे वाचल्यासारखी करून त्यावर प्रतिसाद देऊन खूप काही साध्य केल्याच्या आविर्भावात असू नयेत.
असा अविर्भाव तुम्हाला कुठे दिसून आला?

>> पहिल्या प्रतिसादापासून सगळे वाचल्यानंतर असा प्रतिवाद केला नसतात हे मी जाणतो.
मी सगळे प्रतिसाद वाचले आहेत. तरीही तुमची ती कमेंट मला खटकली.

>> म्हणजेच आर्थिक पातळी, पुरोगामी/पारंपारिक विचारसरणी किंवा प्रांतीय जवळीक यावर देखील कंफर्ट झोन अवलंबून असतो फक्त स्वजातीवर नाही.
या विधानावर तुमचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

म्हणजेच आर्थिक पातळी, पुरोगामी/पारंपारिक विचारसरणी किंवा प्रांतीय जवळीक यावर देखील कंफर्ट झोन अवलंबून असतो फक्त स्वजातीवर नाही. >>>.

सहमत.

दोन पुरोगामी विचाराची डोकी एकत्र आली की घरच्यांनाही ते त्यांची मत, विचार पटवुन द्यायला यशस्वी होतात.

पण शेतीचे हायब्रीड बियाणे आणि मानवाचा समाज यामधे
फरक आहे की नाही?>>>>>>>>जनुकीय पातळीवर काहीच फरक नाही,सामाजिक पातळीवर आहे.

तुम्ही म्हणता एक्स्ट्रॉऑर्डिनरी संततीसाठी अधिक
तडजोडी कराव्यात मुलींनी. म्हणजे स्त्रियांचा जन्म हा
चांगली मुले जन्माला घालणे यापुरताच आहे अश्या समजाला
बळकटी देताय तुम्ही. विवाह हा दोन व्यक्तींचा असतो. आता
विवाहाचा उद्देश संतती जन्माला घालणे, वंशविस्तार एवढाच
राह्यलेला नाही हे तरी मान्य व्हावे.>>>>>>>>>>वंशविस्तार हा विवाहाचा एक मुख्य उद्देश आहे हा मुद्दा तरी मान्य आहे काम तुम्हाला?

Pages