आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगोत्री, मामाच्या मुलीशी इ. लग्ने (नाईलाजाने वा मूर्खपणाने) करून निर्माण होणारे जनुकीय आजार गर्भावस्थेतच निदान करून, गंभीर आजार असल्यास गर्भपाताचा सल्ला वैद्यकशास्त्र देते. यातून "कु"प्रजा निर्माण होणे कमी होते.

कुप्रजा निर्माण होऊ नये यासाठीच गुणसुत्रे 'जोडी'ने असतात. डॉमिनंट व रिसेसिव्ह जीन म्हणजे काय? दोषी गुणसूत्र शक्यतो 'एक्स्प्रेस' होऊ नये म्हणून काय निसर्गरचना असते, नेमका त्याच चेक-बॅलन्सवर जवळच्या नात्यात लग्ने केल्याने काय परिणाम होतो, ते जेनेटिक्सचा थोडा उमज असल्यास ठाऊक असते, व त्यानंतर लिंबाजीरावांसारखे कुप्रजा निर्मितीचे प्रश्न मुळातच पडत नाहीत.

उदा. हिमोफिलिया नामक आजारात नेहेमी फिमेल कॅरियर व मेल सफरर का असतो, हे समजले, तर जेनेटिक मिक्सिंगनंतर जनुकीय आजार नष्ट होण्यास व अधिक उत्तम प्रजा निर्माण होण्यासच उत्तेजन मिळते, हे सरळ व सहज समजते.

पण तुम्हाला अभ्यास तर करायचा नाहीच आहे, शिवाय भगव्या मेंदूने वाद घालायला आल्यावरच लेख प्रचारकी असल्याचे भास होऊ लागतात.

वेलकम. मात्र याचा धाग्याचा आशय समजून घ्यायला नक्की काय उपयोग होईल सांगता येत नाही. कारण पुस्तकात अमुक अमुक आहे म्हणून आंतरजातीय/धर्मीय विवाह करावेत(च) असा कुठेही उल्लेख किंवा आग्रह नाही. पुस्तक वाचल्यावर काय ते समजेलच. तर ते असो.

लेखाचा रोख प्रचारकी असून आन्तरजातीय-धर्मीय विवाहास उत्तेजना देण्याच्या हव्यासापोटी पूर्वग्रहदूषित वाटतो . लेखकाने लेखाचा उद्देश स्पष्टपणे नमूद करावा .

श्री कात्रे, उद्देश स्पष्टपणे नमूद करायला धागाकर्त्यास संकोच वाटत असावा. आपण धागाकर्त्याच्या भावना समजून घेतल्या पाहीजेत.

लेखकाने लेखाच्या प्रारंभीच "आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे" हे वाक्य लिहिले आहे. आंतरजातीय विवाहांना केवळ जाती-पातींच्या चष्म्यातुन न पाहता वैज्ञानिक दृष्टीकोनातुन पहावे असे लेखक सुचवत आहे. यात त्याने 'अमुक एका जातीने तमुक एका जातीशीच विवाह करावा' असे सुचविले नाही, त्यामुळे हा लेख पूर्वग्रहदूषित आहे असे सुचविणार्‍यांनी स्वतःच्या कमेंटसमागिल उद्देश तपासुन पाहिला तर बरे होईल.

इतर संकेतस्थळावरही ह्या लेखावर उच्च- नीच जातीच्या आंतरजातीय विवाहाचा विषय उकरुन काढला जात आहे ,लेख लिहण्यामागे माझा तसा कोणताही उद्देश नाही. फक्त आंतरजातिय/धर्मिय विवाहाचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून फायदे इथे देण्याचा प्रयत्न आहे. असे विवाह कोणत्याही स्तरावरील जातीधर्मांमध्ये व्हावेत, अगदी आंतरप्रांतिय विवाहही व्हावेत. लेख पुरोगामी चळवळ ,जातीअंताचा लढा वगैरे वळणाने जाणारा नाही. आंतरजातिय विवाहाने जाती मीटतील का हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे .मी फक्त जेनेटीक फिटनेसचा मिळणारा फायदा यावर प्रकाश टाकला आहे.

व्हावेत नक्की व्हावेत आंतरजातीय विवाह. त्यातुन कदाचित अजुन काही नव्या नव्या जाती निर्माण होऊ शकतील. कोण जाणे ?
आतेभाऊ आणि मामेबहिणीचे लग्न होण्याची परंपरा खुप आधीपासुन होती / आहे. यात वावगे असण्याचे काही कारण नाही कारण त्या दोघांच्या पालकांचे गोत्र वेगळे असते.
वॉव १००, अचानक शतकाचा मान मिळाला Happy

@महेश, गोत्र ही संकल्पना एक धार्मिक खुळ आहे .वास्तविकतः आते मामे भावंडांच्या विवाहातून जन्मलेली अपत्ये रोगट असण्याचा संबंध असतो. त्यामुळे गोत्र वगैरेची चर्चा इथे न केलेलीच बरी.

आतेभाऊ आणि मामेबहिणीचे लग्न होण्याची परंपरा खुप आधीपासुन होती / आहे. यात वावगे असण्याचे काही कारण नाही कारण त्या दोघांच्या पालकांचे गोत्र वेगळे असते.>>

+१०००
दहावीनंतर बायॉलॉजी सोडून पीसीएम ग्रूप घेतला की कॉन्सॅन्ग्विनिटी आणि जेनेटिक्स अशी पाश्चात्यं थेरं उगाच डोक्यात घुसत नाहीत.

आते मामे भावंडांच्या विवाहातून जन्मलेली अपत्ये रोगट असण्याचा संबंध असतो.>>> याचा काही डाटा दिल्यास बरे होईल.

उद्या कुणाला नोकरी मिळाली नाही एखाद्या क्षेत्रात तर "कंपनीने शिक्षण, अनुभव, अक्कल वगैरे फालतू गोष्टी बघू नये. थोडक्यात त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेऊ नये." असा धागा निघाला तरी आश्चर्य वाटायला नको

मंकु - अशी लग्ने होवोत अथवा न होवोत, मला किंवा कोणालाच काही प्रोब्लेम असण्याचे कारण नाही.
अशा लग्नाला गोत्रामुळे विरोध होऊ शकत नाही एवढेच सांगायचे होते.

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3419292/

ह्या लिंकमध्ये Consanguinity and health parameters, Preconception and premarital counseling for consanguinity आणि Proposed steps in preconception counseling for a consanguineous couple ह्या हेडिंग खाली दिलेली माहिती वाचा.

अश्विनी, ती लिंक भारतातली नाही.
भारतातल्या कॉन्सँग्विनिटीला गोत्राचे नियम लागू होतात, अमेरिकेतले नाहीत.
असो.


सौजन्य- पॉइंट ब्लँक / मिपा

जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय विवाह करा असं सुचवायचं असेल तर हा तर्क फक्त पाच दहा वर्ष चालेल. कारण एकदा CRISPR Cas9 साराखी जनुकामध्ये हवे तसे बदल करणारी यंत्रना प्रचलित झाली की तुमचे रेसेसिव्ह दोष काढूण टाकता येतील, आणि जेनेटिक्सवाले डिझायनर बेबीज तुम्हाला देण्याची स्वप्न दाखवयला लागली आहेत. एकदा ते झालं कि मग आंतरजातीय विवाहाची गरज राहाणार नाही असा निष्कर्ष काढायचा का?

जातीभेद अमानविय आहेत इतकं सरळ सांगता येत असताना, उगाच विज्ञानाची अर्धी अधुरी ढाल वापरायचा प्रयत्न काही समजला नाही.

बाकी जेनेटिक्समधल्या संकल्पना शास्त्रोक्त म्हणून फार विश्वासानं वापरू नका. कारण बहुतांश गोष्टी असोसियेशन लेव्हलला अडकल्या आहेत. त्याची कारण मिमांसा अजून व्हायला वेळ आहे.

ते पाँईंट ब्लँक वाले डीझायनर बेबीचा विषय घेउन आले आहेत ,जीन एडीट करणे आणि जीन तयार करणे यातला फरक त्यांना अजून कळलेला दिसत नाही .त्यांच्याच लिंकमधे जीन एडीटींगमुळे humen gene poolवर विपरीत परिणाम होतो असे लिहलेय.

>>>अपौरुषेय सारखं अमानवीय. मानवाने नव्हे तर जगन्नियत्यांनेच ते निर्माण केलेत<<<

अगदी अगदी! तसेच, मानवाने वेगवेगळे जगन्नियंतेही निर्माण केलेले आहेत.

बघाल तसे दिसेल.

आते-मामे भावंडांची अपत्ये रोगट जन्मतात हे माहीत नव्हते.

बरंच शिक्षण घ्यावं लागणारे असं दिसतंय.

उदा.

Abstract

A total of 151 retinitis pigmentosa (RP) patients from 83 families were screened and the frequencies of different genetic categories studied. One hundred and ten patients out of 151 had a positive inheritance pattern, and autosomal recessive (AR) emerged as the predominant (53 out of 151), genetic pattern followed by isolated or sporadic (41 out of 151) cases. Further study of autosomal recessive cases revealed consanguinity as the main characteristic (49 out of 53) in the Indian population studied. Early onset and severe progression of disease was seen in the consanguineous group.

Keywords: Autosomal - Recessive - Clinical subtypes - Pedigree analysis -Retinitis pigmentosa.

ग्यारंटीने तरूण वय येईपर्यंत आंधळे बनवणारा, व उपचारच नसलेला हा आजार. इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजीमधील पियर रिव्ह्युड आर्तिकल आहे.

आते-मामे भावंडांची अपत्ये रोगट जन्मतात हे माहीत नव्हते. >>> आमचे शेजारी आते-मामे भावंड आहेत. त्यांची तिनही मुले अगदी निरोगी निपजली. सगळ्यात मोठ्या मुलीचं वय ५० असेल आणि धाकट्या मुलाचं ४५.

Pages