आंतरजातीय /धर्मिय विवाह ,एक जनुकीय(genetic) गरज!!!

Submitted by मंदार कुमठेकर. on 4 June, 2015 - 02:24

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
11.jpg

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,
एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दीलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यामते तर जातीभेद नष्ट करण्यास जाती सरमिसळ करीत "मोडूनतोडून" टाकण्यापेक्षा, आहे त्या जातीतील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मास प्रतिष्ठा मिळवून देणे अधिक महत्वाचे आहे. >> लिंबुकाकांनी हा मुद्दा थोडा सविस्तरपणे सोदाहरण स्पष्ट केला तर बरे असे वाटते.

गापै ,मर्यादीत लोकसंख्या असलेल्या आपल्या जातींमध्ये काही प्रमाणात प्रत्येकजण लांबचा नातेवाईक असण्याची शक्यता जास्त असते. आजही अनेक जातीत लग्न ठरवताना पदराला पदर लागतो का हे पाहतात,म्हणजे ठराविक जनुकेच सर्क्युलेट होत राहतात. त्यामुळे जातीची सिमीत लोकसंख्या काही प्रमाणात inbreeding depresion ला बळी पडते, थोडे गुगलून पाहिल्यास कळेल. >> अगदी पटलं!!

Inbreeding depression चं ठळक उदाहरण म्हणजे स्पेनचं हाब्सबर्ग राजघराणं. या राजघराण्यात ५-६ पिढ्यापर्यंत अगदी जवळच्या नात्यातच सोयरीक व्हायची, म्हणजे आते-मामेभावंडं, चुलतभावंडं, मावसभावंड, एवढंच काय काका-पुतणी, मामा-भाची अशीही लग्ने लागायची. त्यात आपल्या घराण्याचंच रक्त श्रेष्ठ आहे ही कल्पना होतीच. पण त्यामुळे निर्माण झालेली संतती ही बहुतांशी रोगट, अपंग निपजायची आणि बहुतेकांचा किशोरवयात अथवा तारूण्यातच अंत व्हायचा. या घराण्यातला शेवटचा वारस म्हणजे दुसरा चार्ल्स, हा रोगट, मतिमंद आणि नपुंसक होता आणि तारुण्यातच त्याचे निधन झाले. हाब्सबर्ग घराण्याचा दुसरा कोणताही वारस तेव्हा जिवंत नव्हता मग ऑस्ट्रियातील एक घराणं स्पेनवर राज्य करू लागले. हाब्सबर्ग घराण्याविषयी असे म्हणतात की स्पेनमधील गरीब भिकारी सुद्धा या राजघराण्यातील लोकांपेक्षा जास्त निरोगी आणि सुदृढ असायचा!

आंतरजातीय/धर्मीय विवाह करण्याबाबत तरुण पिढी सकारात्मक आहे. सध्याचे तरुण जात/धर्माच्या पलिकडे जावून प्रेमाचा विचार करतात हे चांगले आहे.
जातीमधील कट्टरता शहरी भागातून हद्दपार झालेली आहे. ग्रामीण भाग किंवा वाड्यावस्त्यात लोक केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने आंतरजातीय विवाह टाळतात. आंतरजातीय विवाहांना विरोध म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे.
तरीही आजही लग्न लावायचे म्हटले कि कुणीही स्वजातीतील मुलगा/मुलगी पाहतील कारण आपल्याला त्या जोडप्याच्या आनंदापेक्षा समाजाची भिती जास्त महत्वाची वाटते .

सुरेख१ यांच्या वरच्या प्रतिसादात शूद्र - शूद्रांचे असे हवे. क्षुद्र नव्हे. क्षुद्र म्हणजे कस्पटासमान.
चर्चा स्वजातीच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान बाजूला ठेवून होईल अशी अपेक्षा आहे.

किरण कुमार > +१०००

मंदार कुमठेकर>> चांगला आणि माहितिपुर्ण लेख

जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह व्हायला पहिजेत.

मंदार कुमठेकर आपला लेख माहितीपुर्ण आहे पण एक शंका आहे त्याचे कोणी उत्तर देऊ शकेल का?

आपल्याकडे पूर्वीपासून सगोत्र विवाह करू नये असे म्हणतात. ते ही याच दृष्टीकोनातून असेल का?

गोत्र या संकल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही, विभिन्न गोत्राचे लोक जनुकिय दृष्ट्या भिन्न असतात असा कोणतीही अभ्यास वा माहीती उपलब्ध नाही. तस्मात गोत्र ह्या संकल्पनेला शास्त्रीय आधार नाही.

बराक ओबामा चे आई वडिल हे एक उदाहरण .

केव्हढे वादग्रस्त उदाहरण!!!
तुम्ही लिबरल (डेमोक्रॅट) की कॉन्सर्वेटिव (रिपब्लिकन) यावर याचे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात!

मागे मी अनेकदा लिहीले होते - हिंदू धर्मातल्या बर्‍याच गोष्टी पाश्चात्य शास्त्रानुसार पडताळून पहाता येत नाहीत, याचा अर्थ एव्हढाच की ज्या काही ज्ञानानुसार या गोष्टी हिंदू धर्मात आहेत ते ज्ञान केंव्हाच लोप पावले, त्यामुळे कुणाला माहित नाही. कुणास ठाउक हे गोत्र, जातपात या गोष्टी कशावरून ठरवल्या, डीएने, की शादी डॉट कॉम वाले ठरवतात तसे?

केवळ रूढी म्हणून जे समाजात आहे त्याला पाश्चिमात्य किंवा कुठलेच शास्त्र लागू पडत नाही.
सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या समाजात, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह अश्या गोष्टी रूढी म्हणून करत नसत. रुढी बदलतात, बालविवाह हीहि असलीच एक रुढी! नशीबाने बदलली. काय वाईट झाले? उलट चांगलेच झाले.

तसे खात्रीलायक काहीच सांगता येत नाही, कदाचित भिन्न जातीयांचे लग्न झाले तर अपत्यात दोन्हीचे वाईट गुणच येतील!!! आणि हे अगदी जात, गोत्र, कुंडली पाहून लग्न केले तरी होऊ शकते, शिवाय एका अपत्यात दोघांचेहि दोष तर दुसर्‍यात दोघांचे चांगले येऊ शकतात - जसे जिमी नि बिलि कार्टर!

हिंदूंच्या जातीव्यवस्थेत जवळच्या नात्यात लग्ने केली जात नाहीत. जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाज inbreeding depresion ला बळी पडल्याच्या तुमच्या दाव्यात तथ्य नाही. अपवाद फक्त मामेबहीण-आतेभाऊ विवाहाचा आहे. मात्र ही समाजव्यापी समस्या नाही. हिंदूंमध्ये सगोत्र विवाहास inbreeding समजतात.
<<

१. नात्यात केलेल्या लग्नांचे प्रमाण किती असावे असे तुम्हाला वाटते?
२. भारतीय समाज inbreeding depressionला बळी पडल्याचा दावा यांनी कुठे केलेला आहे?
३. अनेक जातींत एकच गोत्र असू शकते, या पाठीचे लॉजिक काय?

मनुष्याकडे गुणसुत्रांच्या चौविस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची चोविसावी जोडी फक्त विभिन्न असते, >> Happy जरा करेक्ट कराल प्लिज!!

किरण कुमार>>> - 10000000000000

इथे शारीरिक आकर्षणा स्तव वा पैशाच्या बळावर अंतरजातीय विवाह करण्याचे समर्थन खपवून घेतले जाणार नाही

तसेच धादान्त खोटे पाश्चिमात्य जनुकीय निष्कर्ष ढापून ते अंधापणे हिंदुधर्म / जातीसन्स्थेस लावण्यास कडवा विरोध असेल

आम्ही पारंपारिक सनातन वैदिक हिंदुधर्माचे समर्थक आहोत , आणि त्यासाठी कोणत्याही किममत मोजण्याची आमची तयारी आहेण

<<इथे शारीरिक आकर्षणा स्तव वा पैशाच्या बळावर अंतरजातीय विवाह करण्याचे समर्थन खपवून घेतले जाणार नाही

तसेच धादान्त खोटे पाश्चिमात्य जनुकीय निष्कर्ष ढापून ते अंधापणे हिंदुधर्म / जातीसन्स्थेस लावण्यास कडवा विरोध असेल>>
सहमत +१००

माझा मुळात हा प्रश्न आहे की आधीच इतकी लोकसंख्या असलेल्या जगात 'उत्तम संतती' जन्माला घालणं हेच विवाहाचं मोटिव्हेशन असावं का? एकविसाव्या शतकातही?
नाहीतर यातूनही पुन्हा नवीन प्रकारची एक जातीव्यवस्थाच निर्माण होईल. जेनेटिक बेसिसवरती पार्टनर सिलेक्शन केलं जाईल. म्हणजे आमच्या जातीत गोरे लोक कमी मग शोधून गोरे लोकवाल्या जातीतील पार्टनर शोधा. (पण तो तुमच्याशी लग्नाला तयार होण्यासाठी तुमच्याकडे तसेच काही जेनेटिकल प्लस पॉईन्ट्स असावे लागतील.) आमच्या जातीत बिझनेस सेन्स कमी मग तसा धंदा करु शकणारा पार्टनर शोधा. म्हणजे शेवटी ज्या मोजक्या जाती स्वतःला जेनेटिकली उच्च समजतात त्याच आपापसात क्रॉस-ब्रीड करायला तयार होणार. ज्योतिषी गुण जमवतात त्याएवजी जेनेटिक्समधले स्पेशालिस्ट्स जीन्स स्कोअर ठरवतील. मुळात संततीसाठीच लग्न- जेनेटिकली डायव्हर्स सुपिरियर बेबी बनवण्यासाठी लग्न- म्हणजे मग मनाचं मीलन वगैरे दूरच. त्यात मग अशा तुम्हाला पूरक जेनेटिकल गुणधर्मवाल्या जोडीदाराला मूल होणार नाही हे लग्नानंतर कळलं तर काय त्याला सोडून देणार का?

How about having LOVE as motivation for inter-caste marriages? Let people marry outside caste if they genuinely fall in love. Why this extreme desperation to promote/market inter-caste marriages without love as basis for it?

आपल्या़कडे जातीत लग्न ठरवतानाही सगोत्र वगैरे बघितलं जातं. आधीच्या अनेक पिढया तपासून पाहिल्या जातात. अगदी जवळच्या नात्यात लग्नं होत नाहीत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी इनब्रीडिंगच्या धोक्याचा आधीच विचार केला असावा असं दिसतंय. उगाच स्वजातीत लग्न केल्यावर प्रॉब्लेम येईल असा फुकाचा गैरसमज कोणाचा करुन दिला जाऊ नये.तसंही भारतीय इतिहासातील अनेक महामानवांच्या काळात आंतरजातीय विवाह प्रचलीत नव्हते..त्यांच्या पालकांचे आंतरजातीय विवाह झाले नसावेत. तरीही जातीत लग्न करुनही उत्तमच संतती होऊ शकतेच की.

शेवटी पुन्हा स्पष्ट करावसं वाटतं- आंतरजातीय्/देशीय विवाहांना विरोध नक्कीच नाही. पण त्याचं मोटिव्हेशन जेन्युईन प्रेम असावं असं वाटतं. त्यासाठी प्रमोशन करणं, दबाव आणणं चुकीचं वाटतं. शेवटी हा फार म्हणजे फारच वैयक्तिक प्रश्न असतो त्यामुळे एखादया प्रेमी युगुलाला तुम्ही वेगळ्या जातीचे आहात म्हणून एकमेकांना विसरा असं सांगणं जितकं चुकीचं तितकंच एखादया जातीत लग्न करु इच्छिणार्‍या व्यक्तीवर तसं न करण्याचा इनडायरेक्ट दबाव आणणं (जातीत जोडीदार मिळणार नाही, जेनेटिकल समस्या येईल अशी खोटी भीती घालून) हेही चूकच. आणि यातील दुसरी बाजू तुम्ही सोयिस्कर लपवत आहात की तुमच्या जातीत न आढळणारा एखादा अनुवंशिक रोग किंवा निगेटिव्ह गुण आंतरजातीय विवाह करुन तुमच्या संततीत व पुढील सर्व पिढयांत येऊ शकतो. आंतरजातीय विवाह म्हणजे फक्त जेनेटिकल प्लस पॉईन्ट्स अशी भाबडी समजूत असू नये.

मंदार कुमाथेकर जी , तुम्ही तुमचे निष्कर्ष फारशी समाजातील व्यक्तींना समजावून सांगितलेत अथवा त्यांना आंतरधर्मीय विवाह करनेस उत्तेजना दिलीत तर अधिक योग्य ठरेल . कृपया हिंदू अथवा भारतीय धर्मावर असे निष्कर्ष नकोत ,असे नम्रपणे निवेदन आहे
इत्यलम

लेख माहितीदृष्टीने आवडला, पण हेच करा आणि तेच नको असं प्रीचींग नाही आवडलं.
तुमच्यात लग्न का करतात?
१. वैदिक धर्माचे समर्थन टिकवण्यासाठी
२. शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी
३. निरोगी संतती निर्माण करण्यासाठी/ निर्माण करण्याची जास्तीतजास्त शक्यता निर्माण होण्यासाठी.
४. जोडीदार (प्रेम, विचार जुळतात, भावनिक/ शारीरिक आकर्षण इ.) आवडला म्हणून
५. आमच्यात करतात ब्वा. माहित नाही का ते.
आता वरील पैकी उत्तर ३ असेल तर जनुकीय विविधता अपील होईल. आता आवडलेली व्यक्ती जेनेटिकली मिस फिट असेल तर काय करायचं? का जेनेटिक आवड आधी बघायची, आणि वर random म्युटेशन होणारच, आणि बऱ्याच शक्यता, त्यामुळे कोणी काय करायचं हे ज्याचं त्याला ठरवूद्या. अलिप्तपणे फक्त योग्य माहिती दिली तर तुमच्या लेखातले बरेच उद्देश सफल होतील, अन्यथा वादविवाद फक्त. सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट आहेच शेवटी, नाही ऐकलं तर निसर्ग आपलं काम करणारच.

स्वामी वेशांतरानंद,

रामायण व महाभारत व त्यातील विवाह / अपत्यजन्म हे "हिंदू" अथवा "भारतीय" धर्मानुसार मार्गदर्शक ठरू शकतील का? जुन्या उपलब्ध ग्रंथांपैकी उदा. गाथासप्तशतीत लिहिल्याप्रमाणे स्त्रीपुरुषांचे जोडीदार शोधण्याबद्दलचे नियम उज्जवल भारतीय परंपरेस अनुसरून आहेत किंवा कसे?

पारशी समाज भारताबाहेर कुठे व किती प्रमाणात शिल्लक आहे याबद्दलचे आपले म्हणणे ऐकायला आवडेल. त्यानंतर "भारतीय" धर्मांत पारशी समाज येत नाही काय, याबद्दलचे विवेचनही उद्बोधक ठरेल.

*

लेख जेनेटिक्स नावाच्या विज्ञानशाखेवर आधारित आहे. त्याला "धार्मिक" फाटे फोडले नाहीत तर चालणार नाही का? की प्रत्येक ठिकाणी लव्ह जिहाद इ. आणलेच पाहिजे असा भगवा फतवा आहे?

>>मनुष्याकडे गुणसुत्रांच्या चौविस जोड्या(pair)असतात <<
मी ८-९वीत असे पर्यंत २३ जोड्या होत्या; आता कदाचीत १ जोडी बोनस मिळत असेल... Happy

मंदार कुमठेकर.,

>> गोत्र या संकल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही, विभिन्न गोत्राचे लोक जनुकिय दृष्ट्या भिन्न असतात असा
>> कोणतीही अभ्यास वा माहीती उपलब्ध नाही.

नेमक्या याच गोष्टीचा अभ्यास व्हायला हवा, बरोबर? बहुसंख्य हिंदू गोत्रपद्धती पाळतात. तरीही भारतात inbreed depression ची उदाहरणं तुलनेनं कमी आहेत. गोत्रपद्धतीत निश्चितच काहीतरी तथ्य असणार.

आ.न.,
-गा.पै.

गामा,
माझ्याशी बोला की Wink

ब्रिटनचा रॉयल डिसीज कोणता आहे? तो कशाने होतो? Wink

पाश्चात्यांनी जाती तयार केल्याच नाहीत, अन वर्णश्रेष्ठत्व जितक्या टोकाचे बाळगले, तितक्याच पट्कन झटकूनही टाकले.

तिकडे जितक्या सहजपणे आंतर-वांशिक/धर्मीय विवाह होतात, तितकाच मोकळेपणा युरोप अमेरिकेत देशांतरित झालेल्या भारतीय जोडप्यांची अपत्येही दाखवतात व तिथलेच भिन्नवंशीय जोडीदार स्वीकारतात. हे प्रमाण किमान ५० टक्के असायला हरकत नसावी. माझ्याकडे अधिकृत विदा नाही.

तरीही एकीकडे मामाची मुलगी केल्याने काही जेनेटिक प्रॉब्लेम नाही, हे हिंदूधर्मसुसंगत आहे, असे म्हणत असतानाच, गोत्रफित्रासारख्या हास्यास्पद बाबींना 'शास्त्रीय' ठरवत खाप पंचायतीस्टाईल लॉजिक लढविण्याची गम्मत वाटत नाही, कारण त्यामुळे तरुण जोडप्यांचे जीव घेतले जातात.

मंदारभौ,
ते राज यांनी सांगितलेलं २४चं बदलायचं बघा जरा. सीमंतिनी यांनीही तेच सांगितलं होतं.
माझ्याही लक्षात आलं नव्हतं ते. I shall make a bad proof reader Wink

माझ्या पहिल्या प्रतिसादाला उत्तरच न आल्याने मी निराश झालेलो असून ह्या नैराश्याच्या भरात बाकीचे प्रतिसाद वाचल्यामुळे कोण कोणाशी कशावरून वाद घालत आहे हे आता खरे तर कोणालाही समजत नसेल असे असूनही ते फक्त मलाच समजत नाही आहे असे मला वाटू लागले आहे.

हो ते तेवीस पाहीजे ,घाई गडबडीत चोविस लिहले. उद्या बदलतो, आता पीसी एक्सेस नाही.

छान विषय.

मला यातले शास्त्रीय ज्ञान नाही पण मी फार पूर्वी ऑर्कुटच्या काळात लॉजिकचा वापर करत हाच सिद्धांत एका धाग्यात मांडला होता.

बहुतेक पारशी लोकांमध्ये अगदी जवळच्या नात्यात लग्न केल्याने प्रॉब्लेम उदभवतात तर त्याच धर्तीवर थोडेसे लांब म्हणजे आपल्याच जातीत लग्न केल्यावर थोड्याफार प्रमाणात तरी त्याचा इफेक्ट होणारच म्हणत असेच लोकांना आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह करायचा सल्ला दिला होता.

पण मी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कर्ता सर्वधर्मसमभाव जपणारा अशी माझी इमेज असल्याने हा आपला धर्म बुडवतोय म्हणत माझा धागा त्या समूहातून उडवण्यात आला.

तर अश्या विचारसरणीचा आपला समाज असताना अश्या सिद्धांताला खरे खोटे तपसण्याऐवजी हट्टाने खोटे ठरवायची चढाओढ लागल्यास नवल नसावे.

इन-ब्रीडीन्ग च्च्या समस्या वर मात करन्या साठि भारतीय विवाह पद्ध्तीत एक कारगर इलाज म्हंजे "देवक".
नात्ये संबंधात लग्न करताना "देवक" एकच असल्यास लग्न करत नाहि.
"देवक" हे निर नीराले आसते. उदा. आम्ब्याचे पान, कमल, वडाचे फान्दि, हरली ची मुलि, झेंडु चे फुल, वैगैरे.
म्हनुण "देवक" हे जनुकिय गुणसुत्रा चे निदर्शक आहे व आपत्य विक्रूती चे प्रमाण नगन्य आहे.

Pages