दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
शेअर मार्केट मधे कसा येतो
शेअर मार्केट मधे कसा येतो माहीत आहे का ?
अनिरुद्ध वैद्य, पार्टीसिपेटरी
अनिरुद्ध वैद्य,
पार्टीसिपेटरी नोट त्यासाठीच तर काढली होती चिदंबरमनी.
काळा पैसा व्हाईट करुन परत आणण्यासाठी आणि आणणार्याला वर त्यावर कोणताही टॅक्स लागू नये म्हणून.
केजरीवाल सांगे पर्यंत
केजरीवाल सांगे पर्यंत भारतातल्या लोकांना माहित नव्हत परदेशात काळा पैसा ठेवलेला आहे काही भारतियांनी.

<<मला ठामपणे वाटत की सगळा
<<मला ठामपणे वाटत की सगळा काळा पैसा परत आलाय, शेअर मार्केट आणि रिअलिटी मार्केटमध्ये. सो तिकडून काही येईल अशी काहीही आशा नाही.>>
पैसा असेल तिकडे अजून पण तो परत येईल अशी आशा मलाही नाही. इतके मोठाले लोक आहेत हे की काही ना काही जुगाड करतीलच.
<<केजरीवाल सांगे पर्यंत भारतातल्या लोकांना माहित नव्हत परदेशात काळा पैसा ठेवलेला आहे काही भारतियांनी.>>
माहीत होतं की युरो. पण चहापानासोबत विषय चघळण्याइतकंच. केजरीवालांनी पहिल्यांदा हिंमत केली हे सांगायची की "सरकारकडे २०११ सालापासून ७०० खातेधारकांची नावे आहेत, सरकार फक्त छोट्या उद्योजकांवर छापे घालतंय आणि मोठ्या माशांना सोडून देतंय. त्यातली काही नावे माझ्या हातात लागली आहेत ती अमुक अमुक. ह्या लोकांना कसलीही सवलत न देता त्यांचा तपास करा"
तोपर्यंत अंबानी हे नाव उच्चारायलासुद्धा नेते लोक घाबरत होते. अकेंनी नावं जाहीर केल्यावर अंबानींनी स्विस बँकेत खातं असल्याचंच नाकारलं. बाकीच्यांनीही अकेंची भरपूर टर उडवली. पण यंदाच्या फेब्रुवारीत आलेल्या यादीत अंबानींचं नाव आहे. तरीही सरकार कुठे काय करतंय?
म्हणजे निदान मलातरी हे असं माहीत आहे. केजरीवालांच्या आधी दुसर्या कोणी व्यक्तीने/नेत्याने/अधिकार्याने ही नावं जाहीर केल्याचं तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सांगा. माझा गैरसमज दूर होईल.
आहात कुठे गेल्या १ वर्षात
आहात कुठे गेल्या १ वर्षात मोदींनी १लाख करोड ब्लॅक मनी भारतात आणला आहे. हे गुपित शेवटी भाजपाच्या एका नेत्याने काल वर्षपुर्तीवर सांगितले. खरतर हे २०१९ला जाहीर करणार होते. परंतू एकावर्षात काहीच अचिव्ह केले नसल्याने हातचे राखुन ठेवलेले गुपित नाईलाजाने सांगावे लागले
हे कोण म्हणे?
हे कोण म्हणे?
http://hindi.news24online.com
http://hindi.news24online.com/bjp-mp-sonaram-says-modi-govt-have-taken-b...
काला धन की वापसी को लेकर पहले ही मोदी सरकार की दिक्कतें कम नहीं है कि अब बाड़मेर से बीजेपी सांसद ने इस मामले में एक और अजीब बयान दिया है। बीजेपी सांसद कर्नल सोनाराम चौधरी ने कहा है कि मोदी सरकार एक लाख करोड़ रुपये का काला धन वापस ला चुकी है
कोणाचीही नावे आली म्हणून ते
कोणाचीही नावे आली म्हणून ते पैसे परत मागता येणार नाहीत. तो पैसा बेकायदेशीर रीत्या देशा बाहेर गेलेला आहे हे सिध्द करावे लागेल. केवळ भारतिय लोकंची नावे आहेत म्हणून स्विस बॅंक पैसे परत देणार नाही.
केजरीवाल यांनी या प्रकरणात नाव घेतले म्हणजे मोठ्या धाडसाचे काम केले आहे असे नाही. या आधी या उद्योग समुहावर टीका झालेली आहे. केसेस झलेल्या आहेत. या उद्योग समुहाने एल एन्ड टी सरखी कंपनी टेकओवर करण्याचा केलेला आणि तो हाणुन पाडण्याचा उपाय बघीतलेला आहे.कॉंग्रेस च्या काळात या उद्योग समुहाला मिळणार्या करसवलती हा नेहेमी टीकेचा विषय होत असे. अगदी मध्यवर्ती बॅकेचे गवरनर ही अशा टीकेतुन त्या वेळी सुटलेले नाहीत. तेच नैसर्गिक वायुची किंमत काय ठरवावी या समितीवर होते.
गेल्या एका वर्षात मोठा झलेला उद्योग समुह नाही हा. अनेक सरकारांबरोबर आणि पक्षांबरोबर कामे केलेली आहेत यांनी.
अरविंद केजरीवाल म्हणाले, त्याच्यावर अता कारवाई करा अस चालत नाही मिर्ची ताई. अके नी केस केलेली आहे ना नैसर्गिक वायु किंमती संदर्भात ती तरी लढा आधी.
काल काही तरी वाचले अके कोणत्या तरी केस मधे उच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाणार नाही आहेत म्हणे?
२ जी घोटाळ्यात सगळ्या उद्योग समुहाच्या मालकांना चवकशी ला बोलावले होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन कोणीही त्यातुन सुटलेले नाही. तेव्हा शांत रहा
माझ्या माहिती प्रमाणे एस आय टी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली काम करत आहे.
मधुकर, अनुमोदन. पी-नोट मुळे
मधुकर, अनुमोदन.
पी-नोट मुळे खूप गैरव्यवहार झालेत. मध्यंतरी सेबीनी नियम कडक केले होते, परंतु अजूनही ते सुरु आहेतच.
The Sebi move comes weeks after a white paper on black money by the central government identified P-notes as one of the routes through which illicit money transferred outside India returns here through a process called ‘round tripping’. (२०१२ मधले आर्टिकल आहे)
http://www.business-standard.com/article/markets/sebi-tightens-reporting...
मिर्ची,
बहुतेक मुद्द्यांना अनुमोदन.
बाकी काही शंका आहेत : २०१२ मध्ये केजरीवाल यांनी विकीलीक्सवरून घेतलेली लिस्ट होती का ती? मग ती तर पब्लिक डोमेन मध्येच असावी. बाकी ती नावे २०११ मध्ये सरकारकडे असतील तर द्विपक्षीय करारान्वये नावे आरोप सिद्ध न करता उघड करणे कराराचा भंग ठरू शकला असता आणि ती नामुष्की झाली असती. केजरीवाल ह्यांनी तसे धैर्य दाखवले ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण सरकारच्या कोणत्याही पदावर नसल्याने त्यांच्यावर काहीही नियमांचा किंवा करारांचा दबाव नव्हताच. सो त्यांनी ती लिस्ट प्रकाशित केली ह्यामुळे त्यांची टीआरपी निश्चितच वाढली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा लढवय्या अशी प्रतिमा तयार झाली Which even I support
as he is the only one who can fight corruption in India.
as he is the only one who can
as he is the only one who can fight corruption in India.>>>
<<केजरीवाल यांनी या प्रकरणात
<<केजरीवाल यांनी या प्रकरणात नाव घेतले म्हणजे मोठ्या धाडसाचे काम केले आहे असे नाही.>>
मला वाटतं हे धाडसाचं काम. इतक्या मोठ्या शक्तींशी समोरासमोर टक्कर घ्यायला स्वतःच्या जीवावर उदार झालेली व्यक्तीच पाहिजे. आजवर अनेक आरटीआय कार्यकर्ते संशयास्पदरित्या मारले गेले आहेत.
पण सगळ्यांनाच असं वाटेल असं नाही आणि ते ठीक आहे.
<<अरविंद केजरीवाल म्हणाले, त्याच्यावर अता कारवाई करा अस चालत नाही मिर्ची ताई. अके नी केस केलेली आहे ना नैसर्गिक वायु किंमती संदर्भात ती तरी लढा आधी.>>
ती चालूच आहे. मोदीसरकारने पाय खेचणं थांबवलं तर लवकरात लवकर निकाल लागेल.
<<काल काही तरी वाचले अके कोणत्या तरी केस मधे उच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाणार नाही आहेत म्हणे?>>
त्याचं इथे काय??
<<२०१२ मध्ये केजरीवाल यांनी विकीलीक्सवरून घेतलेली लिस्ट होती का ती? मग ती तर पब्लिक डोमेन मध्येच असावी. बाकी ती नावे २०११ मध्ये सरकारकडे असतील तर द्विपक्षीय करारान्वये नावे आरोप सिद्ध न करता उघड करणे कराराचा भंग ठरू शकला असता आणि ती नामुष्की झाली असती>>
अनिरुद्ध,
नाही. मला जितकं माहीत आहे त्यानुसार ती यादी पब्लिक डोमेनमध्ये नव्हती. स्विसलीक्सची यादी तर आत्ता फेब्रुवारी २०१५ मध्ये आली होती.
ही ७०० नावे असलेली सीडी २०११ मध्ये फ्रान्स सरकारने भारत सरकारला पाठवली होती. पण सरकारने त्यातल्या फक्त ३ लोकांवर छापा टाकला. कराराचा भंग म्हणून नावं जाहीर नाही केली तरी तपास तर करायला हवा ना सरकारने?
केजरीवालांनी इन्कम टॅक्स विभागात जॉइंट कमिशनर म्हणून काम केलं आहे. त्यांच्या सोर्सेसकडून त्यांना मिळाली असावी.
<<सो त्यांनी ती लिस्ट प्रकाशित केली ह्यामुळे त्यांची टीआरपी निश्चितच वाढली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा लढवय्या अशी प्रतिमा तयार झाली>>
भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईतील पहिलं पाऊल असलेली त्यांची 'परिवर्तन' ही चळवळ १९९९ मध्ये चालू केलेली आहे. तेव्हापासून त्यांची लढाई चालूच आहे. बिनाटीआरपीची.
अवांतर - त्यांच्या रजेच्या आरोपसत्राबद्दल त्यांनी मनमोहन सिंगांना लिहिलेलं हे पत्र आज वाचण्यात आलं.
<<आयला, ते तोमर म्हणतायत - यह
<<आयला, ते तोमर म्हणतायत - यह पोलिटिकल साजीश है. बहोत अच्छे...>>
Tomar was a bonafide student: University
बातमी पूर्ण वाचा.
"But senior advocate Aman Lekhi, who was appearing for the BCD, opposed Tomar’s plea, arguing that the AAP leader was “delaying the proceedings” as he had been asked by the BCD to submit the original copies of his certificates and degrees for verification."
अमन लेखी म्हणजे भाजपा खासदार मीनाक्षी लेखीचे पती.
(अगदीच अवांतर - अमन लेखीचे वडील प्राणनाथ लेखी हे इंदिरा गांधींचा खुनी सतवंत सिंगचे वकील.)
अगदीच अवांतर - अमन लेखीचे
अगदीच अवांतर - अमन लेखीचे वडील प्राणनाथ लेखी हे इंदिरा गांधींचा खुनी सतवंत सिंगचे वकील.) >>> ह्म्म्म बहुत राष्ट्रवादी घराना दिखता है
उद्देश, >> ह्म्म्म बहुत
उद्देश,
>> ह्म्म्म बहुत राष्ट्रवादी घराना दिखता है
आहेच मुळी. नि:शस्त्र गोरक्षाग्रही आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या इंदिरा गांधींना काय म्हणायचं? सुवर्णमंदिरात ऐन सणवारी सैन्य घुसवून निरपराध्यांना ठार मारणाऱ्या इंदिरा गांधींना काय म्हणायचं?
आ.न.,
-गा.पै.
सुवर्णमंदिरात त्यावेळी
सुवर्णमंदिरात त्यावेळी निरपराधी होते. ? व्वा तुझे सडलेले डोके गुढघ्यातच आहे हे सिध्द केलेस
बाकी तुझ्यासारख्या मानसिकतेची लोक ही अतिरेक्यांना समर्थन करणारीच आहे.
(अगदीच अवांतर - अमन लेखीचे
(अगदीच अवांतर - अमन लेखीचे वडील प्राणनाथ लेखी हे इंदिरा गांधींचा खुनी सतवंत सिंगचे वकील.)
केजरीवाल ना विरोध केला म्हणुन ही अॅनोलोजी?
उद्देश, १. >> सुवर्णमंदिरात
उद्देश,
१.
>> सुवर्णमंदिरात त्यावेळी निरपराधी होते. ?
होय. कारवाईच्या वेळेस अपराध्यांसोबत निरपराधीही होते. कारण त्यावेळी पौर्णिमा चालू होती. त्यानिमित्त अतिरेक्यांशी काडीमात्र संबंध नसलेले भाविक दर्शनासाठी हरमंदिरसाहेबात आलेले होते. ही निरपराध लोकांची गर्दी ओसरल्यावर कारवाई करावी असा जनरल वैद्यांनी आग्रह धरला होता. तो इंदिरा गांधींनी धुडकावून लावला.
२.
>> व्वा तुझे सडलेले डोके गुढघ्यातच आहे हे सिध्द केलेस
आता बघा की, माझे 'सडलेले डोके' गुढघ्यात असण्यात व्वा असा प्रशंसादर्शक उद्गार काढण्यासारखे काय आहे? त्यामुळे तुमचे डोके कुठेतरी भलतीकडेच चिकटलेले असावे, असा माझा अंदाज आहे.
३.
>> बाकी तुझ्यासारख्या मानसिकतेची लोक ही अतिरेक्यांना समर्थन करणारीच आहे.
बाकी लोकांचं माहीत नाही. मी अतिरेक्यांचं समर्थन करत नाही.
आ.न.,
-गा.पै.
(अगदीच अवांतर - अमन लेखीचे
(अगदीच अवांतर - अमन लेखीचे वडील प्राणनाथ लेखी हे इंदिरा गांधींचा खुनी सतवंत सिंगचे वकील.)
केजरीवाल ना विरोध केला म्हणुन ही अॅनोलोजी?>>
अपेक्षितच आहे हे आपवाल्यांकडून. ज्या रिक्षावाल्याने केजरीवालच्या मुस्काडीत भडकावली त्याच्या वडिलांच्या रिक्षातून आदरणीय वंदनीय मोदीदीजींनी वीस वर्षांपूर्वी प्रवास केला म्हणून त्याने थोबाडीत मारली अशीही थाप खपवायला कमी करणार नाहीत हे.
ते एक ऑपरेशन
ते एक ऑपरेशन अतिरेक्यांविरुध्द होते.
बस इतकेच धागा केजरीवाल बद्दल आहे
आणि गामा मुद्दामुन वरील वकिलांवरची बातमीवरुन लोकांचे लक्ष वळवण्याकरीताच मुर्खासारखे बरगळत आहे.
उद्याच्या सुनवाईवरुन काटजू यांनी अत्यंत मार्मिक ट्विट केले आहे. नक्की वाचा
अनिरुद्ध, नाही. मला जितकं
अनिरुद्ध,
नाही. मला जितकं माहीत आहे त्यानुसार ती यादी पब्लिक डोमेनमध्ये नव्हती. स्विसलीक्सची यादी तर आत्ता फेब्रुवारी २०१५ मध्ये आली होती.
ही ७०० नावे असलेली सीडी २०११ मध्ये फ्रान्स सरकारने भारत सरकारला पाठवली होती.
>>
ओके मिर्ची, २०११ मध्ये विकीलिक्सनी एक्स्पोज केलेल्या नावांची खूप चर्चा होती. काही रिपोर्टसुद्धा आले होते. त्यातच असांजची मुलाखत वाचल्याने माझा तसा समज झाला होता.
http://timesofindia.indiatimes.com/india/Black-money-comes-mainly-from-I...?
>>
पण सरकारने त्यातल्या फक्त ३ लोकांवर छापा टाकला. कराराचा भंग म्हणून नावं जाहीर नाही केली तरी तपास तर करायला हवा ना सरकारने?
केजरीवालांनी इन्कम टॅक्स विभागात जॉइंट कमिशनर म्हणून काम केलं आहे. त्यांच्या सोर्सेसकडून त्यांना मिळाली असावी.
>>
SIT का काय ते केलेय सुरु … . मलातरी तो पेन्शनर क्लब वाटतोय!
>>
भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईतील पहिलं पाऊल असलेली त्यांची 'परिवर्तन' ही चळवळ १९९९ मध्ये चालू केलेली आहे. तेव्हापासून त्यांची लढाई चालूच आहे. बिनाटीआरपीची.
>>
येस, पण खरी चमक २०११ पासूनच आली
असो, परिवर्तन आणि RTI संबंधीच कार्य वादातीत आहेच, पण त्याच बरोबर कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले तेवढेच चिंताजनक.
<<येस, पण खरी चमक २०११ पासूनच
<<येस, पण खरी चमक २०११ पासूनच आली>>
2004: Ashoka Fellow, Civic Engagement
2005: Satyendra K. Dubey Memorial Award, IIT Kanpur for his campaign for bringing transparency in Governance
2006: Ramon Magsaysay Award for Emergent Leadership
2006: CNN-IBN Indian of the Year in Public Service
2009: Distinguished Alumnus Award, IIT Kharagpur for Eminent Leadership
2009: Awarded a grant and fellowship by the Association for India's Development.
2010: Policy Change Agent of the Year, Economic Times Awards along with Aruna Roy
ही २०११ पूर्वीची चमक.
माझा सांगायचा मुद्दा एवढाच की अकेंनी जे काही 'एक्स्पोजेस' केले ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले हे म्हणणं मला कुठल्याच अँगलने पटत नाही. असो.
<<केजरीवाल ना विरोध केला म्हणुन ही अॅनोलोजी?>>
युरो, मी कुठे काय अॅनालॉजी केलीये?
अमन लेखी, मीनाक्षी लेखी ह्यांच्या धागेदोर्यांमुळे तोमरवरचे आरोप राजकीय हेतूने आहेत ह्याला पुष्टी मिळतेय. ते लिहीत असताना मला गेल्या वर्षी वाचलेलं एका ज्येष्ठ पत्रकाराचं ट्वीट आठवलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की प्राणनाथ लेखींनी नथुराम गोडसेचाही बचाव केला होता. पण मला तसा संदर्भ कुठे मिळाला नाही. सतवंत सिंगचं मात्र वाचलं होतं म्हणून सहज उल्लेख केला. दुसरा काही उद्देश नाही त्यात.
<<अपेक्षितच आहे हे आपवाल्यांकडून.>>
अप्पाकाका, तुमच्या पक्षाध्यक्षांना बॅरिकेडवरून खाली उतरायला मदत करा.


आणि हो, स्मृतीतैंची डिग्री खोटीच आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे "नरेंद्र मोदी, इस्तिफा दो - इस्तिफा दो" असे बॅनर्स बनवायला सांगा.
माझा सांगायचा मुद्दा एवढाच की
माझा सांगायचा मुद्दा एवढाच की अकेंनी जे काही 'एक्स्पोजेस' केले ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले हे म्हणणं मला कुठल्याच अँगलने पटत नाही. असो.
>>>
मिर्ची,
अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध तिरस्काराला व्यकत करण्यासाठी लोकांना एक माध्यम मिळालं. या आंदोलनाचा सर्वात जास्तं फायदा कोणी उठवला तर तो केजरीवालनी! अन्यथा आम आदमी पार्टीची स्थापना २००४ मध्ये का झाली नाही?
<<अण्णा हजारेंच्या
<<अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध तिरस्काराला व्यकत करण्यासाठी लोकांना एक माध्यम मिळालं. या आंदोलनाचा सर्वात जास्तं फायदा कोणी उठवला तर तो केजरीवालनी! >>
फायदा कसला उठवणार? ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून आणलं. अण्णा फक्त आंदोलनाचा चेहरा होते. अण्णांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यात केजरीवाल जॉइन झाले असं घडलेलं नाहीये. केजरीवालांना आंदोलन करायचं होतं, त्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी अण्णांना जाऊन विनंती केली. ह्यावर पहिल्या धाग्यावर चर्चा झालेली आहे.
<<अन्यथा आम आदमी पार्टीची स्थापना २००४ मध्ये का झाली नाही?>>
कारण राजकारण करणं हा उद्देशच नव्हता. अस्तित्वात असलेल्या पक्षांनी मागण्या मान्य केल्या असत्या तर आपची स्थापना करण्याची गरजच नव्हती.
पण दिग्विजयसिंगांनी आव्हान दिलं " आधी निवडून या आणि मग पाहिजे ती बिलं पास करून घ्या" आणि मग तिथून पुढे राजकारणात पडायचा निर्णय झाला.
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून आणलं. अण्णा फक्त आंदोलनाचा चेहरा होते.
>>>>>>>>>
_____/\_____
बर झाल अके राजकारणात आले.एक
बर झाल अके राजकारणात आले.एक प्रामाणिक आणि निर्भीड नेता देशाला मिळाला.
आत्ता त्यांच्या विरोधात बोलणारेही त्यांचे काम बघुन त्यांच्या प्रेमात पडतिल.
शांत पणे त्यांना काम करायची संधी द्यायला पाहिजे. त्यांना घाबरुन विरोधक नुसते सैर-भैर झालेत.
खरी चमक मीडियाची असते हो!
खरी चमक मीडियाची असते हो! आमच्या गल्ल्या बोळात २०११ आधी केजरीवाल म्हणजे कोण? असं विचारलं जायचं. कोणालाच ठाऊक नव्हत.
तुमच्या चमकीविषयीच आमचंच अज्ञान!
नंतर आले तेव्हा कळले आणि कधी आदरार्थी होऊन बसले कळलेच नाही!
अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे
अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध तिरस्काराला व्यकत करण्यासाठी लोकांना एक माध्यम मिळालं. या आंदोलनाचा सर्वात जास्तं फायदा कोणी उठवला तर तो केजरीवालनी! अन्यथा आम आदमी पार्टीची स्थापना २००४ मध्ये का झाली नाही?
----- अण्णा यान्च्या आन्दोलनाचा फायदा केजरीवाल यान्नी घेतला असे जरी मानले तर त्यात चुकीचे असे काही नाही आहे. हा मुद्दा गैरलागू आहे आणि आता मागे पडायला हवा.
त्यानन्तर दिल्लीत दोन निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकीत आप आणि केजरीवाल यान्ना दिल्ली जनतेने पुर्णतः नाकारले. पण विधानसभे साठी त्यान्च्यावर पुर्ण विश्वस दाखवला आहे. विधानसभेमधे जे यश मिळवले त्याचे सर्व श्रेय आप कार्यकर्ते आणि केजरीवाल यान्ना द्यायला काय हरकत आहे? तात्विक मतभेद असले तरी चालतील पण कामाचे श्रेय देण्याने आपण लहान होत नाही.
स्वच्छता आणि पारदर्षकता याला आपले प्राधान्य असायला हवे. त्या गोष्टी कोण आणतो आहे हा मुद्दा गौण आहे. मला व्यक्ती पेक्षा त्यान्च्या कृती आणि त्याचे दुरागामी चान्गले/ वाईट परिणाम हे जास्त महत्वाचे वाटतात.
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून आणलं. अण्णा फक्त आंदोलनाचा चेहरा होते.
हे खरे आहे.
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून
ते आंदोलनच केजरीवालांनी घडवून आणलं. अण्णा फक्त आंदोलनाचा चेहरा होते.
>>
अनुमोदन! सगळीकडे केजरीवाल यांचे कार्यकर्ते होते ...
एकच प्रश्न - सगळीकडे
एकच प्रश्न -
सगळीकडे केजरीवालचे कार्यकर्ते होते, केजरीवाल इतके पराक्रमी आणि 'तूच कर्ता आणि करविता' होते, तर मग त्यांना अण्णा कशासाठी लागले? पब्लिसिटीसाठी?
केजरीवाल स्वतः उपोषणाला का बसले नाहीत? अण्णांना का बसवलं? स्वतःच्या बळावर आंदोलन का केलं नाही? आधी कोणी आडवलं होतं का हे सगळं करण्यासाठी?
Pages