अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या व्हिडिओ पाहिले नाहीत. पण वाचलं आहे. सापडलं तर देईन.
लॉजिकली स्पीकिंग, सिसोदिया जंगांना थेट पत्र का लिहितील?? ते मुमंना लिहिणार, मुमं जंगांना लिहिणार.

व्हिडीओ सापडला तर नक्की द्या बरं का!
कारण वाचलेल्यावर तुमचा विश्वास नाही त्यामुळे आम्हालाही आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर पाहिल्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही.
आपच्या बाबतीत कोणतंही लॉजिक अप्लाय होत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना! लॉजिकल्ली इल्लॉजिकल!

ते डिटिसीच्या बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे आणि मार्शल नेमणार होते केजरिवाल त्याचे काय झाले? कि तेच मार्शल, तुमच्या पक्षाविरुध्द आवाज उठवणार्‍या, तुमच्याच नेत्यांना बदडयला आता नेमलेत.

२. गॅमलिन रिलायन्स कंपनीच्या बोर्डमेंबर आहेत हे एकातरी मिडियाने सांगितलं का? हा मुद्दा क्षुल्लक आहे का?
>>

पुरावा द्या.

<<ते डिटिसीच्या बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे आणि मार्शल नेमणार होते केजरिवाल त्याचे काय झाले? >>

२५०० मार्शल्सचं प्रशिक्षण पुरं होत आलं आहे. लवकरच रुजू होतील असं गोपाल रायच्या भाषणात ऐकलं होतं.
"As per our plan, 2,500 personnel of civil defence and home guards are now being trained as marshals in first phase. They will patrol in buses in groups. Each group will have 3-4 marshals. They will soon start patrolling buses," Transport Minister Gopal Rai said.

<<२. गॅमलिन रिलायन्स कंपनीच्या बोर्डमेंबर आहेत हे एकातरी मिडियाने सांगितलं का? हा मुद्दा क्षुल्लक आहे का?>> पुरावा द्या.>>

हा घ्या. BSES (रिलायन्सची वीजकंपनी) च्या स्वत:च्या संस्थळावरची यादी. BSES Yamuna Power Limited (BYPL) च्या यादीतील खालून दुसरं नाव.

<<१५ लाख कॅमेरे, ५ वर्षात>>

१५ लाख रूपये, जुमला है Proud

प्रसाद, तुमच्या जागरूकतेबद्दल आनंद वाटला. एवढीच जागरूकता प्रत्येक नागरिकाने प्रत्येक सरकारबाबत दाखवायला हवी तरच खरे 'अच्छे दिन' येतील. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रसरकारने पूर्ण केलेल्या किंवा मार्गावर असलेल्या आश्वासनांबद्दल तुम्हाला माहिती मिळाली की जरूर लिहा.

माझ्याआधीच टीव्हीची पोस्ट आली.

<<मग त्यांना त्याचा राजीनामा द्यायला सांगायचं. हाकानाका.>>
असं कसं? मग ११००० कोटींचं सरकारी हमीपत्र कोण देणार?

<<कसलं हमीपत्र>>
हे राम ! Lol
अप्पाकाका, सगळं रामायण घडून गेल्यावर विचारताय रामाची सीता कोण? मागची पाने वाचून काढा एकदा.

दिल्लीत भाजपाच्या कुंडलीत शनि वक्री झाला असावा बहुतेक. अजून एक धक्का.
CBI unearths ‘birth certificate’ scam in MCD
काल रात्री सीबीआयने नगरनिगमच्या ऑफिसेसवर छापा घालून हजारो संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. दलालांच्या मार्फत एकाच क्रमांकाचे अनेक जन्मदाखले देण्याचं काम चालू होतं अशी शंका आहे.
"The CBI had received information that the corporation officials were working in connivance with touts. It has been alleged the certificates were issued by using unique SDM order number of any genuine applicant. Multiple birth certificates too were allegedly being issued on the basis of the hospital records of any genuine applicant."
मिडियाने प्राइम टाइम स्लॉटमध्ये आज हा विषय ठेवायला हवा.

२५०० मार्शल्सचं प्रशिक्षण पुरं होत आलं आहे. लवकरच रुजू होतील असं गोपाल रायच्या भाषणात ऐकलं होतं.
>>
<<

21.gif. 21.gif. 21.gif.21.gif.21.gif.21.gif

अय्यो, म्हणजे न वाचताच टीका करत सुटला आहात होय??>> ये हुई ना आप वाली बात.
परत वाचायला वेळ नाही असं म्हणायचं होतं. ते तुम्हाला समजलं नाही यात आश्चर्य नाहीच. आपवाल्यांचे होते असे. Proud

poster-politics.jpg

हे वरिल पोस्टर आजकाल दिल्लीत सर्व ठिकाणी पहायला मिळतायत. नावे का नाही जाहीर करत दिल्लीसरकार त्या अटक केलेल्या ३५ भ्रष्ट अधिकांर्‍याची? कि हा पण पब्लिसीटी स्टंट होता, त्या गजेंद्रसिंग प्रकरणा सारखा.

मिर्ची | 4 June, 2015 - 13:06
अय्यो, म्हणजे न वाचताच टीका करत सुटला आहात होय?? अ ओ, आता काय करायचं
टाइम्सनाऊचे प्रतिनिधी शोभताय फिदीफिदी
असो.
<<
>>

आता 'टाईम्सनाऊ' तुमचा नावडता चॅनल झालाय म्हणजे, तो आता आम आदमी पार्टि बाबतच्या खर्‍या बातम्या देत असावा.

<<तुम्ही कितीही प्रयत्न करुन, व्यवस्थित मुद्दे मांडुन चर्चा करायचा प्रयत्न केलात,तरिही हे ट्रोलर्स डुआयडी इथे फक्त आणि फक्त मोदि बॅशिंग करण्याकरताच येतात, त्यांना मुद्देसुद चर्चा वगैरेशी काही देणेघेणे नाही.>>

देशमुखभौ, आहात का? केंद्राच्या धाग्यावर प्रसादच्या वरील वाक्याला विनोद म्हटल्यावर राग आला होता ना? हा पहा त्यांच्या चर्चेचा नमुना.

एवढी मुद्देसूद आणि 'हसर्‍या बाहुल्यां'वाली चर्चा करण्याची क्षमता मज पामरामध्ये नसल्याने प्रसाद आणि अप्पाकाकांच्या अशा गहन प्रश्नांना इथून पुढे उत्तर देऊ शकणार नाही. क्षमा असावी __/\__

पहिल्याच धाग्यावरच्या सोळा की सतरा मुद्देसूद प्रश्नांना उत्तर न देता "माझा पास" असं म्हणून चर्चेतून पलायनकर्ते झालेल्यांकडून आमचीही फारशी अपेक्षा नाहीच.

असो. चालुद्या. आजपुरतं एवढंच बास.

धन्यवाद,
कुठुनही उचलले, अर्धवट न वाचताच दिलेले दुवे, ऐकीव माहीती, आम्ही म्हणु तेच बरोबर, आमचाच पक्ष कसा धुतल्या तांदळासारखा, इतर सर्व एकजात चोर, यावर काय तर म्हणे मुद्देसुद चर्चा करणार.
तुम्हाला भजन म्हणायचे आहे का?

हे वरिल पोस्टर आजकाल दिल्लीत सर्व ठिकाणी पहायला मिळतायत. नावे का नाही जाहीर करत दिल्लीसरकार त्या अटक केलेल्या ३५ भ्रष्ट अधिकांर्‍याची?>>>>>>>

मिर्ची ताई, हे खरे आहे का?

++++++२५०० मार्शल्सचं प्रशिक्षण पुरं होत आलं आहे. लवकरच रुजू होतील असं गोपाल रायच्या भाषणात ऐकलं++++++++++++++

:G:

+++++++++ हेच गोपालराय दिल्लीसाठी १०,००० सिएनजीच्या बसेस घेणारेत म्हणे ++++++

अजुन एक जुमला !!

:G:

Pages