दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
मिर्ची, >> आपबद्दल हे असे
मिर्ची,
>> आपबद्दल हे असे उच्च विचार असताना स्वतःला आप वॉलंटियर म्हणवून घ्यायचं कारण काय???
एक शंका आहे. आआप म्हणजे केजरीवाल ना? का तुमच्या मते या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत? माझ्या मते एकंच आहेत. तुमचं मत काय आहे?
कृपया ही शंका वेगळ्या प्रश्नाशी जोडू नका. स्वतंत्र आहे असं समजा.
आ.न.,
-गा.पै.
'आपच्या नेत्यांनी गजेंद्रला
'आपच्या नेत्यांनी गजेंद्रला आत्महत्या करायला लावली' इथपासून 'ती आत्महत्या नसून अपघात होता' इथपर्यंत आता दिल्ली पोलिस आले आहेत.
"Gajendra's death was an accident. Forensic experts opined that he died due to asphyxia. Investigations based on the circumstances and the analysis of the video grabs suggest he lost balance and tripped over. Since he was standing on the branch of a tree he could not react on time and the cloth that he had put around his neck became a noose and he died," a Delhi Police report said."
दरम्यान, त्या घटनेनंतर युथ काँग्रेसच्या रॅलीमध्येसुद्धा एक माणूस झाडावर चढण्याचा प्रकार झाला. ह्यावेळी पोलिसांनी तत्परतेने झाडावर चढून त्याला खाली आणलं.
झाडावर नेमकं कोण चढलं होतं हे जाणून घेण्यासाठी ह्या बातमीचा मथळा वाचा !
"Man climbs tree at farmers’ protest, Congress workers bring him down"
आपच्या रॅलीमध्ये 'झाडावर चढून त्याला उतरवणं ही आमची जबाबदारी नव्हती' असं पोलिसांचं मत होतं. आपचे कार्यकर्ते आमच्या रेस्क्युमिशनमध्ये अडथळा आणत होते हा आरोप अजूनही आहेच.
मग ह्या चित्रात दिसणार्या व्यक्ती सिव्हिल ड्रेसमधील पोलिस आहेत का????
पोलिसांनी कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाही तर लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे.
<<एक शंका आहे. आआप म्हणजे
<<एक शंका आहे. आआप म्हणजे केजरीवाल ना? का तुमच्या मते या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत? माझ्या मते एकंच आहेत. तुमचं मत काय आहे?>>
गापै, ह्याबद्दल लिहिलं आहे की आधी.
केजरीवाल आपचे संयोजक आहेत. त्यामुळे कुणाला आवडो न आवडो, केजरीवाल हे आपच्या तंबूचा मध्यवर्ती खांब आहेत. आपमध्ये असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या वागण्याबद्दल हमी देऊ शकत नाही. केजरीवालांवर अजूनही विश्वास आहे. तो तुटेल असं अजूनतरी त्यांनी काही केलेलं नाही.
कुठलीही व्यक्ती आपच्या तत्वांविरूद्ध वागल्यास केजरीवाल त्यावर काय कारवाई करतात ह्यावर सगळं अवलंबून राहणार. ज्यादिवशी केजरीवाल स्वतःच त्या तत्वांविरुद्ध वागतील त्यादिवशी हा धागा बंद.
भाजपा, काँग्रेसवर निष्ठा असलेले बरेच लोक आपमध्ये अजूनही असणार आहेत असा माझा अंदाज आहे. ते कोणीही असू शकतात. त्यामुळे केजरीवाल सोडून माझा कुणावरही १००% विश्वास नाही. (YoMirchiSoBhakt :फिदी:)
कदाचित केजरीवालांच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळेच मी आपसमर्थक झाले हे ह्यामागचं कारण असेल. त्यामुळे माझ्यासाठी तरी केजरीवाल=आप. बाकीच्यांचं माहीत नाही.
मॅडम, +++पोलिसांनी कुठल्याही
मॅडम,
+++पोलिसांनी कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाही तर लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे.++++
तुम्हाला पोलिसांनी लोकांसाठी काय काय काम करणं अपेक्षित आहे ?
बनावट कर्मचारी हजेरीपटावर
बनावट कर्मचारी हजेरीपटावर दाखवून खोटे वेतन काढण्याच्या Ghost Muster Roll Employees Scamच्या आरोपाखाली दिल्ली एसीबीने आज एका निवृत्त अभियंत्याला आणि सह-अभियंत्याला अटक केली.
७४५ बोगस कर्मचारी पटावर सापडले.
आता केजरीवालवरची चिखलफेक आणखी वाढणार.
पोलिसांनी गजेंद्र सींगला
पोलिसांनी गजेंद्र सींगला वाचवायला प्रयत्न केला नाही म्हणुन आआप काय करणार आहे ?
केजरीवाल म्हणाले की फाशी द्या ! कोणाला फाशी देणार !
<<तुम्हाला पोलिसांनी
<<तुम्हाला पोलिसांनी लोकांसाठी काय काय काम करणं अपेक्षित आहे ?>>
सध्याच्या चर्चेपुरतं बोलायचं तर कुठल्या पक्षाची रॅली चालु आहे ह्याचा विचार न करता माणूस मरत असताना त्याला वाचवण्याचे प्रयत्न करणं.
आता केजरीवालवरची चिखलफेक आणखी
आता केजरीवालवरची चिखलफेक आणखी वाढणार >> +१
+++++++सध्याच्या चर्चेपुरतं
+++++++सध्याच्या चर्चेपुरतं बोलायचं तर कुठल्या पक्षाची रॅली चालु आहे ह्याचा विचार न करता माणूस मरत असताना त्याला वाचवण्याचे प्रयत्न करणं !! +++++++++
पोलिसांनी हे काम कराव अशी अपेक्षा का ठेवावी ? रॅली तुमची, लोक तुमची मग त्या रॅलीतल्या एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी काय करायच ? पोलिसांनी प्रयत्न नाही केला तर ?
आणी तिथे त्या पोलिसांवर कॅमेरे लावणार का ?
ह्या रॅलीच्या वेळेला आआपने काय काय व्यवस्था केलेली होती ? रॅलीच्या जागी अँब्युलंस, फायर ब्रिगेड ची व्यवस्था नव्हती ! जिथे १०,००० लोक येणार होते, मग अशी व्यवस्था करणे गरजेच होत ! मग का केल नाही ?
ओळखा हिटलर कोण! स्रोत :
ओळखा हिटलर कोण!
स्रोत : http://i1.wp.com/www.sabhlokcity.com/wp-content/uploads/2015/04/kejriwal...
-गा.पै.
>> डिग्री खोटी असल्यास त्याला
>> डिग्री खोटी असल्यास त्याला पदावरून आणि आपमधून बाहेर काढायला हवं<<
आयला, ते तोमर म्हणतायत - यह पोलिटिकल साजीश है. बहोत अच्छे...
थोडस अवांतर लहान बाळासाठी
थोडस अवांतर
लहान बाळासाठी मदतीचे आवाहन
http://www.maayboli.com/node/53705
बनावट कर्मचारी हजेरीपटावर
बनावट कर्मचारी हजेरीपटावर दाखवून खोटे वेतन काढण्याच्या Ghost Muster Roll Employees Scamच्या आरोपाखाली दिल्ली एसीबीने आज एका निवृत्त अभियंत्याला आणि सह-अभियंत्याला अटक केली.
७४५ बोगस कर्मचारी पटावर सापडले. >>>>>>>
मस्त बातमी मिर्ची ताई
मिर्ची, दिल्लीत भ्रष्टाचारी
मिर्ची, दिल्लीत भ्रष्टाचारी पकडले जातायत हे चांगलंच आह.
आमच्या महाराष्ट्रातील ACB काय करतंय ते खाली दिलेल्या लिंकांवर नेहमीच वाचायला मिळेल....
महाराष्ट्र राज्य सरकारची (मग ते सरकार कुठल्याही पक्षाचे असो) अँटिकरप्शन ब्यूरोची ही http://acbmaharashtra.gov.in/news.asp साईट आहे. इथे दर आठवड्याच्या कामगिरीचे अपडेट्स ऑर्डर्सच्या इमेजेस सकट पहायला मिळतात.
http://acbmaharashtra.gov.in/statistics2008.asp ह्या लिंकवर तर धमाल माहिती उपलब्ध आहे.
http://acbmaharashtra.gov.in/lodgecomplaints.asp ह्या लिंकवर भ्रष्टाचार विरोधी कंप्लेंट ऑनलाईन नोंदवता येते.
http://acbmaharashtra.net/marathi इथे ACB Maharashtra मोबाईल अॅप आहे तसेच १०६४ वरुन ACB Maharashtra ला कंप्लेंटसाठी नि:शुल्क फोन लावता येतो.
http://acbmaharashtra.gov.in/StatReport/acblink.pdf इथे इतर राज्यांतल्या ACB च्या साईट्सच्या लिंक्सची लिस्ट आहे.
http://acbmaharashtra.gov.in/Citizen%20Charter1.asp इथे ACB Maharashtra ची नागरिकांकरिता सनद आहे. ह्यात संक्षिप्त रुपात कार्यवाहीची माहिती आहे.
http://www.mahapolice.gov.in/ महाराष्ट्र पोलिसांची साईट
http://acbmaharashtra.gov.in/Statistics.asp इथे २०१० पासूनच्या हाताळल्या गेलेल्या प्रकरणांचे स्टॅटिस्टिक्स आहे.
http://acbmaharashtra.gov.in/StatReport/comparative_chart.pdf इथे २०१४-१५ च्या रिलेव्हंट महिन्यांची सापळे लावल्याची व आरोपी पकडले जाण्याची तुलना आहे.
http://acbmaharashtra.gov.in/StatReport/probpsi.pdf इथे पोलिसांविरोधातल्या कंप्लेंट्सचे स्टॅटिस्टिक्स आहे.
जय महाराष्ट्र

बापरे अश्विनी, फारच त्रास
बापरे अश्विनी, फारच त्रास घेतलात.
पण ह्या लिंकाचं गाठोडं तुम्ही मला का दिलंय? वेगळा धागा काढून महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल लिहिलंत तर बरं होईल.
आणि 'आमचा' महाराष्ट्र नव्हे तर 'आपला' महाराष्ट्र.
मी मागे इंद्रप्रस्थ भूलेखबद्दल लिहिलं होतं. ती कल्पना प्रत्यक्षात आली आहे. साऊथ-वेस्ट दिल्लीमधील जमिनींचे रेकॉर्डसचं संगणकीकरण करून सर्व डाटा पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात आला आहे. ह्यामुळे ७८,००० प्रॉपर्टीजची माहिती ऑनलाइन झाली आहे. पुढील सहा महिन्यांत दिल्लीच्या इतर भागांसाठीसुद्धा असं करण्याचा संकल्प आहे.
"In a first-of-its-kind initiative in Delhi, the land-records of South West District of Delhi have been digitized and made available online in the public domain, thus making it possible for the citizens to directly download digitally signed copies of their Record-of-Rights on the click of a button from the internet. Land-records of more than 78,000 property owners consisting of more than 1,80,000 khasras are now available on the website http://dlrc.delhigovt.nic.in/ Initially, the records have been uploaded in ‘draft’ mode till 25th May 2015. Any errors which may have crept in due to computerization may be brought to the notice of the following authorities for correction by anyone concerned"
ह्याविषयी हिंदू मधली आजची बातमी.
अश्विनीतै, येऊ द्या आता महाराष्ट्राची लिंक.
गापै, (संभाव्य) हिटलर
गापै,
(संभाव्य) हिटलर ओळखण्यात मी तुमची मदत करू का?
पहिली बातमी - Germans listen to an antisemitic speech by Hitler. Josef Goebbels, minister of propaganda, encouraged every family to acquire a radio. Germany, January 30, 1937.
दुसरी बातमी - PM Modi vows to bring back ‘every penny’ of black money. Asks citizens without access to internet to write to him at Akashwani.
दोन्हीतील फोटो पहा.
असो. मुख्यमंत्र्याला हिटलर म्हटलेलं चालतं, पण पंतप्रधानांना नाही असा काही नियम असल्यास ही पोस्ट उडवून टाकण्यात येईल.
<<अश्विनीतै, येऊ द्या आता
<<अश्विनीतै, येऊ द्या आता महाराष्ट्राची लिंक.>>
७/१२ चे उतारे ऑनलाइन महाराष्ट्रात २०१४ च्या आधी पासुन मी बघतो आहे. त्यतल्या त्यात तुमच्या साठी आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणजे हे सगळ मोदी पंतप्रधान होण्या अगोदरचं आहे तेव्हा याच क्रेडीट त्यांना नाही.
Maharashtra is definately
Maharashtra is definately better place than Delhi. Delhi has just got a govt who wants to work. So the comparison is not required. I personallly believe that govt of other parties also can do a better job and not only AAP. AK has to do lot of things.
पण ह्या लिंकाचं गाठोडं तुम्ही
पण ह्या लिंकाचं गाठोडं तुम्ही मला का दिलंय? वेगळा धागा काढून महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल लिहिलंत तर बरं होईल.>>>> अहो मला एवढं खोलात जायचं नाहिये प्रत्येक बाबतीत तुलना करुन लिहायला. माझं ते उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि नसेल. मागेच ACB महाराष्ट्राची लिंक मिळाली होती आणि आता हा विषय दिसला म्हणून तिथे जाऊन बघितलं इतकंच
मी नियमित त्या लिंकांवर जाऊन बघणार पण नाहिये.
हो, आपला महाराष्ट्र
जगात काही कुठे चांगलं दिसलं की आपल्याकडे पण ते आहे का हे आपोआप बघितलं जातं कीनै? केवळ त्याच भावनेने मी त्या लिंका पाहिल्या. खास धागा उघडण्याजोगं काही वाटलं नाही कारण हे तर वर्षानुवर्षं चालूच असेल ACBचं काम... म्हणून इथेच लिहिल्या लिंका.
<<अहो मला एवढं खोलात जायचं
<<अहो मला एवढं खोलात जायचं नाहिये प्रत्येक बाबतीत तुलना करुन लिहायला. माझं ते उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि नसेल. मागेच ACB महाराष्ट्राची लिंक मिळाली होती आणि आता हा विषय दिसला म्हणून तिथे जाऊन बघितलं इतकंच स्मित मी नियमित त्या लिंकांवर जाऊन बघणार पण नाहिये.....खास धागा उघडण्याजोगं काही वाटलं नाही कारण हे तर वर्षानुवर्षं चालूच असेल ACBचं काम... म्हणून इथेच लिहिल्या लिंका. >>
उत्तम.
नागरिकांच्या ह्याच औदास्यीन्यामुळे आपल्या आणि एसीबीच्या नाकाखाली सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, तेलगी घोटाळा वगैरे घडतात असं म्हणायला वाव आहे. आपण कष्टाने पैसा कमवायचा आणि घोटाळेबाजांच्या मालमत्ता वाढवायच्या ! मज्जाय
(ह्या औदास्यीन्यामध्ये आधी मीसुद्धा होते. त्यामुळे वरील वाक्य मलाही लागू आहे.)
<<७/१२ चे उतारे ऑनलाइन
<<७/१२ चे उतारे ऑनलाइन महाराष्ट्रात २०१४ च्या आधी पासुन मी बघतो आहे. त्यतल्या त्यात तुमच्या साठी आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणजे हे सगळ मोदी पंतप्रधान होण्या अगोदरचं आहे तेव्हा याच क्रेडीट त्यांना नाही.>>
युरो, पण देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हे पहिल्यांदाच का घडत आहे ? आधीसुद्धा हे असेल तर दिल्लीकरांनी सांगावं, 'पहिल्यांदा घडतंय' हे शब्द काढून टाकेन.
मंदार +१
जे काही चांगलं घडतंय ते फक्त दिल्लीत, काहीही चांगलं करणारा नेता म्हणजे फक्त केजरीवाल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सगळ्या लिखाणातून कुणाला तसा आभास होत असेल तर तो केवळ माझा लेखनदोष आहे.
पण मिडिया जे दिवसरात्र दाखवते आहे त्यावरून असं वाटतं की आप फक्त येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवण्यासाठी सवंग प्रकार करते, इतर कुठलीही कामं करत नाही, जगातील सर्व खोटारडे, नाटकबाज, सत्तापिपासु, हत्यारे, निष्ठुर, रिकामटेकडे, कामासाठी नालायक लोक फक्त आणि फक्त आपमध्ये भरले आहेत.
हा अन्याय मला आवडत नाही, सहन होत नाही. म्हणून मी इथे लिहिते. आशुचँपच्या धाग्यावर त्यांनी लिहिलंय तसं मनातल्या फ्रस्ट्रेशनला वाट देतेय असं म्हणा हवं तर.
एक नवीन चांगला प्रयोग केवळ दुसरी बाजू समोर न आल्याने चिरडला जाऊ नये ही प्रामाणिक इच्छा ह्यामागे आहे. शिवाय ह्या लिखाणामुळे त्रास होणार्यांना धाग्यावरून उडी मारून पुढे जायचं स्वातंत्र्य आहेच की.
नियमांत बसत नाही किंवा इतर कुठल्याही कारणांनी हा धागाच मायबोलीवर नको असं काही असल्यास वेमांनी जरूर सांगावे. लिखाण त्वरित थांबवलं जाईल.
जगातील सर्व खोटारडे, नाटकबाज,
जगातील सर्व खोटारडे, नाटकबाज, सत्तापिपासु, हत्यारे, निष्ठुर, रिकामटेकडे, कामासाठी नालायक लोक फक्त आणि फक्त आपमध्ये भरले आहेत.
<<
>>
+१००
अगदि योग्य निरिक्षण.
नागरिकांच्या ह्याच
नागरिकांच्या ह्याच औदास्यीन्यामुळे आपल्या >>> हे औदासिन्य नसतं मिर्ची. आपलं रुटीन सांभाळून प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत आपण लक्ष नाही घालू शकत. निदान माझी तेवढी capacity नाही. ज्यांच्या हातात (पक्ष कुणीही असो) आपणच सत्ता दिलेली असते त्यांच्यावर थोडातरी विश्वास ठेवावाच लागतो. त्यांच्यावर पहारा ठेवायचा म्हणजे कुठे काळबेरं दिसतंय हे सतत शोधत राहायचं ह्याने संशयी वृत्ती वाढेल व चांगलं काही दिसणारच नाही. सतत संशयी वृत्तीने मी राजकारण तर सोडाच, आयुष्यातल्याही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे मी नाही बघू शकत. आपलं प्रत्येकाचंच आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट असं टोकाचं नसतं, ते ग्रे स्केलमध्येच असतं. त्यामुळे जर माझ्या हातूनही चुका होत असतात तर मी दुसर्याला मी सर्वगुणसंपन्न असल्याच्या अविर्भावात त्याच्या प्रत्येक खर्या/खोट्या चुकीसाठी ताडन करत राहणे चांगले नाही.
मनातल्या फ्रस्ट्रेशनला वाट देतेय असं म्हणा हवं तर.>>> लिहित रहा
किती त्रागा कराल मिर्ची ताई.
किती त्रागा कराल मिर्ची ताई. तुम्ही म्हणालात येउ द्या लिंक म्हणुन मी आपला माझा अनुभव लिहीला. यात मी काय वाईट बोललो ते समजले नाही?
युरो, बरं <<ज्यांच्या हातात
युरो, बरं
<<ज्यांच्या हातात (पक्ष कुणीही असो) आपणच सत्ता दिलेली असते त्यांच्यावर थोडातरी विश्वास ठेवावाच लागतो. त्यांच्यावर पहारा ठेवायचा म्हणजे कुठे काळबेरं दिसतंय हे सतत शोधत राहायचं ह्याने संशयी वृत्ती वाढेल व चांगलं काही दिसणारच नाही.>>
जेव्हा आप जिंकून आली नव्हती तेव्हाही मी तुमच्या ह्या मताशी सहमत नव्हते. आधीच्या धाग्याच्या पहिल्या १-२ पानांवरच असेल ही चर्चा.
सध्याच्या राजकारण्यांवर माझा विश्वास नाही. ४ वर्षे आपण गाफिल बसतो आणि पाचव्या वर्षात खोटानाटा प्रसार करून मिडिया अक्षरशः आपल्याला मंत्री, आमदार, खासदार विकते. पुन्हा ४ वर्षे गाफिल.
असो. अॅग्री टु डिसॅग्री
अश्विनीतै, भूमी अधिग्रहणाच्या
अश्विनीतै, भूमी अधिग्रहणाच्या धाग्यावर आत्ता एक पोस्ट टाकली आहे. तुम्हीच सांगा, ह्या लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? किंवा कुठल्या विचारांवर ठेवायचा - सत्तेत असतानाच्या की सत्तेत नसतानाच्या?
आदरणीय वंदनीय नरेन्द्र मोदी
आदरणीय वंदनीय नरेन्द्र मोदी काय तो योग्यच निर्णय घेतील शेवटी. माझा विश्वास आहे तसा.
मिर्ची, राजकारणाचा तो
मिर्ची, राजकारणाचा तो अविभाज्य भाग असावा कदाचित. आपण नाही आपले उद्योग धंदे सोडून त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पहात बसू शकत. मिडिया ह्या प्रकाराचा तर नॉशिया आला आहे.
मिर्ची, एक मैत्रीचा (आणि खरोखर कळकळीचा) सल्ला...तुम्ही एकंदरच ह्या सगळ्यात खूप इन्व्होल्व्ह झाला आहात. थोडंस मनाला लावून घेणं कमी करता आलं तर पहा. इन्व्होल्व्ह असतानाही त्या इन्व्होल्वमेंटचा अतीशय ताण येणार नाही, त्रास होणार नाही इतपत अलिप्तता हवी. इथला तुमचा वावर पाहून असं वाटलं म्हणून लिहिलं. तसं नसेल तर उत्तमच
हे पटलं नसेल तर सांगा मी हा पॅरा उडवून टाकते.
भूमी अधिग्रहणाचा धागा नंतर बघते (ही पोस्ट सबमिट करायच्या आधी रिफ्रेश केलं तेव्हा तुमची नवी पोस्ट दिसली म्हणून हे शेवटचे वाक्य टाकले).
<<मिर्ची, राजकारणाचा तो
<<मिर्ची, राजकारणाचा तो अविभाज्य भाग असावा कदाचित. आपण नाही आपले उद्योग धंदे सोडून त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पहात बसू शकत. मिडिया ह्या प्रकाराचा तर नॉशिया आला आहे.>>
मग आपल्याला त्याचे परिणाम सोसावे लागतात.
<<मिर्ची, एक मैत्रीचा (आणि खरोखर कळकळीचा) सल्ला...तुम्ही एकंदरच ह्या सगळ्यात खूप इन्व्होल्व्ह झाला आहात. थोडंस मनाला लावून घेणं कमी करता आलं तर पहा. इन्व्होल्व्ह असतानाही त्या इन्व्होल्वमेंटचा अतीशय ताण येणार नाही, त्रास होणार नाही इतपत अलिप्तता हवी. इथला तुमचा वावर पाहून असं वाटलं म्हणून लिहिलं. तसं नसेल तर उत्तमच स्मित हे पटलं नसेल तर सांगा मी हा पॅरा उडवून टाकते.>>
माझं इथलं काम भारतातील कामाच्या मानाने कमी त्रासाचं आहे, घर आणि कामाची जागा एकाच इमारतीत असल्याने कम्युटिंग टाइम शून्य. लेक दिवसभर शाळेत असतो. त्यामुळे पुरेसा वेळ मिळतो.
अमर्यादित हाय स्पीड वायफाय आहे. त्यामुळे हवे तितके व्हिडिओज बघता येतात.
पण इन्वॉल्वमेंट जरा जास्त झाली आहे हे अगदी खरंय. स्वभावाचा जुना दोष आहे तो. काठावर राहून पोहायला आवडत नाही. ह्याचा अनेकदा त्रास झालाय, आत्ताही कधी-कधी होतो.
तुमचं म्हणणं पटल्यामुळे आत्तापासून आठ दिवस माबोसंन्यास घेतेय. फिर मिलेंगे
माझं इथलं काम भारतातील
माझं इथलं काम भारतातील कामाच्या मानाने कमी त्रासाचं आहे, घर आणि कामाची जागा एकाच इमारतीत असल्याने कम्युटिंग टाइम शून्य. लेक दिवसभर शाळेत असतो. त्यामुळे पुरेसा वेळ मिळतो.
अमर्यादित हाय स्पीड वायफाय आहे. त्यामुळे हवे तितके व्हिडिओज बघता येतात.
>>
<<
अच्छा म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम सुरु आहे तुमचे.
Pages